ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती.
बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती.
२.४
विचार करून सांगतो म्हणून बाहेर सटकलो.
बिल्डरला प्रत्यक्ष बघणारा मी एकमेव साक्षीदार होतो , माझ्या साक्षीवर केस बरीच पुढे जाणार होती . पोलिसांना मोठा रीमांड मिळाला असता म्हणून ही गुळपट्टी लावणे चालले होते.
उगाच माझ्या मागे झा*उपट ! असला रोज रोज थोडी आपल्या आयुष्यात घडते ?
बाल्याला शोधला तर उस्मान सोबत मिसळ खात बसला होता.
मला बघताच आला, गाडीवर टांग टाकत बोलला, "उद्यापासून उस्मानच्या साईटची सिक्युरिटी आपली. १-१ भैया लावून टाकायचा .आपण फक्त बाहेरची कोणी लफडी केली तर निस्तारायाची.मस्त काम भेटला. माणूस पण चांगला आहे,कटकट नाय केली पैशाला"
बाल्याचे ऐकून मी कपाळावर हात मारून घेतला. बाल्याच्या डेरींगवर फिदा झालेला दिसत होता.
"तोडपाणी झाला असाल ना तुझा आतमध्ये,म्हणून मला कलटी केला !शेठ बोलला मला , उचल ऑफर,इथ कोन नाय कोणचा."
फक्त बोलायचा "मी नीट बघितला नाही, शेठसारखा कोणी नव्हता बाकी पोलिस आणि वकील बघतील.ते पण खाणार रे !"
"छापून घे भाइ , ओन्ली आय विटनेस". उस्मान आता शेठ झाला होता. बाल्याची चूक नव्हती , सेटल व्हायला लाईन मिळणार होती.
बाल्याला उस्मानच्या पैशाचा रंग चढलेला दिसत होता..ह्याच्याशी बोलण्यात अर्थ नव्हता. त्याला कट्ट्यावर सोडला.
मला पुन:पुन्हा त्या पोरी आठवत होत्या. या प्रकरणाचा छडा लावायला हवाच.
होंडा मेडिकल कॉलेजवर घेतली, एक मित्र तिथे शिपाई होता. दोन स्ट्राँग बियर घेतल्या त्याला साइडला घेऊन कालची स्टोरी सांगितली.तोही गडी खुलला.. "काल इकडेच झाली मेडिकल,मी होतो ना"
" रेप झालाय का नक्की ? "
"डॉक्टरने फिक्स काय संगीताला नाही, सील पॅक तर नव्हता बोल्ला .पण या पोरींचा काय भरोसा रे, दुसरीकडून बोलतो,फोर्स एन्ट्री दिसत नाही आणि पोरी धुळीने माखून आल्या होत्या त्यांनी पार्ट्स हात पाय धुतले होते. बाकी खुणा सेक्स वेळी झाल्या की मारहानीच्या वेळी कसे सांगणार?"
रिपोर्ट दिला का रे ?
"नाय आज रात्री देणार.."
म्हणजे हा पण साला छापायचे मागे आहे तर. सगळेच वाहत्या गंगेत हात धूत आहेत.उस्मान असाही तसाही सुटणार.मग आपणच येड्यासारखा काठावर का बसायचा ? असली जळमट मनात यायला लागली ती झटकली.
मोबाइल रिंगने तंद्री भंगली .. बघतो तर येतोच म्हणून काल गेलेल्या आमदार बंधूंना आठवण आलेली दिसत होती.फोन उचलला तर प्रत्यक्ष आमदार मामा !काय कुठे आहेस चौकशी झाली. "अरे एवढा झाला मला एक फोन तरी करायचा.अधिवेशन सोडून आलो असतो.आता पण मंत्र्याची मीटिंग आहे मुंबईला,पण मी म्हणाल, मंत्री संत्री नंतर,आपला पोरगा पहिला यातून बाहेर आला पाहिजे.तू ऑफिसला ये लगेच!
हा थोडा वाढीव बोलतो पण इलेक्शनला याच्यासाठी लई पळलो ते आज कामी आला, अस वाटला . आज एकटाच ऑफिसला गेलो.
पुन्हा काय झालं कसा झालाची उजळणी. मी फक्त साक्षीदार आहे , बाकी काही नाही त्यामुळे मिटले आहे आपण काही करायची गरज नाही आणि आजच्या व्यवहाराचे सोडून सगळे सांगितले.
आमदार उगीचच तापलेले दिसले, "आपल्या भागात अशी घटना होते हे दुर्दैवी" वगैरे चालू झाले. हळूहळू गाडी रुळावरून सरकत गेली आणि ह्या लांड्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे आमच्या दलीत भगिनीवर झालेल्या अन्यायबदल शिक्षा झालीच पाहिजे आणि मुख्य म्हणजे यावेळी आपलाच माणूस स्टार विटनेस आहे त्यामुळे केस स्ट्राँग आहे .उद्या सकाळी आपण हिंदू दलीत आक्रोश मोर्चा घेऊन स्टेशनवर जायचा आणि तिथे तुझा स्टेटमेंट देऊन टाकू. कोणताही दबाव सहन करणार नाही. हिंदू दाबला जाणार नाही . आमदार प्रचारझोन मध्ये गेले. मला फक्त स्टेटमेंट देउन मिटवायचा होता, पण यांना वाढवायाचाच होता.
सगळच त्रांगड होऊन बसले होते.आपल्या बुद्धीला झेपत नव्हतं. जो तो फायदा बघत होता . पोरींचे काय हा प्रश्न यापैकि कोणालाच पडला नव्हता. लोकांचे फिरते रंग बघून हे प्रकरण आपल्यावर पण कधीही उडू शकते याची जाणीव झाली,अशा वेळी एकच ठिकाणी शरण जायचे,बाप!
घरी आल्यावर बाबांना सगळ बसून सविस्तर सांगितला., एखादी कानफटात खायची तयारी पण ठेवली.
घरी येउन अथःपासून इतिपर्यंत सांगितले ,
बाबांनी विचारलं, "तुला काय करायचं आहे ? काय मिळवायचा आहे का यामधून? "
"मला यातून बाहेर पडायचं आहे, पण मला काही नकोय. पोरी खर बोलतात की उस्मान की पोलिस की डॉक्टर! काहीच कळत नाही, फक्त माझ्या घाबरण्यामुळे कोणावर अन्याय झाला ही बोच आयुष्यभर नकोय इथे खर खोट कळेना. सगळे फायदा बघत आहेत. "
बाबांनी १-२ फोन केले.मला गाडीवर बसवले.आमची वरात पुन्हा स्टेशनमध्ये ! तेवढ्यात वकील दादा आला, साहेब, स्टेटमेंट घ्या . त्यांनी पोलिसांना विनंती केली.
"बाळा ,जसे झाले तसे आणि तेवढेच लिही.."
स्टेटमेंट रेकॉर्ड झाले.ओळख परेड सकाळी झाली होतीच. ती ऑन रेकॉर्ड झाली.
"आम्ही आमचे काम केले आहे, पुढील काम तुमचे आहे. पुन्हा मुलाला त्रास होईल असे काही करू नका." असे बाबांनी सांगून आम्ही बाहेर पडलो.
४ दिवस कोणाचे फोन नाही , डोक शांत झालं. जगाच्या नाही पण बापाच्या परीक्षेत पास झालो होतो.
कट्ट्यावर रविवारी सकाळी कट्ट्यावर जायला बाहेर पडलो तर सोसायटीमधल्या साईटवर बाल्या उस्मानची गाडी खाली करून घेत होता. तो पण आला.
वर सकाळच्या चाय सुट्टा मध्ये माझी अक्कल काढत सगळ्यांना सांगत होता.देवाने खायला सोना दिला तर हा गू खाउन आला.उस्मानने सगळ्यांना खिलवले. पोरींनी पण घेतले.आमदार से लेके डॉक्टर तक तूच चूत्या ! बहती गंगा मे सब ने हाथ धोया मेरी जान..
या हप्त्यापासून उस्मानची साइट सिक्युरिटी आपली फुल छपाई ! सिक्युरिटी पण आपली आणि भंगार पण आपलाच. वरतून पार्टी साठी साईटपण !! बाल्या सातब्या अस्मानात होता. सगळी पोरं मला चूत्यात काढून बाल्याची लाल करत बसली.मी माझ्या मध्यमवर्गीय चुत्यापाची शाल ओढून ऐकत बसलो.
हा भाग इथे समाप्त.
प्रतिक्रिया
16 Jan 2026 - 4:49 pm | गवि
फायनल साक्ष नेमकी काय झाली? उस्मानचे नाव घेतले?
तसे वाटते आहे. तरीही कोणाकडून काही पीडा झाली नाही हे सुदैवच. या भागात काहीसं कन्फ्युजन झालं खरं. पण आवडलं.
सॉरी.. ही चुकीची भाषा..खाली पुन्हा लिहीतो ;-)
फायनल साक्षीत नेमका काय झाला? उस्मानचा नाव घेतला?
तसाच वाटला मला वाचून. तरीही कोणाकडून काही कॉल आला नाही हा साला चांगला नशीबच म्हणायचा.
हा भाग संपला की कथा संपली?
कथेच्या या भागात काहीसा कन्फ्युजन झाला खरा. पण आपल्याला आवडला..
16 Jan 2026 - 7:54 pm | कपिलमुनी
जसा होता तसा खरा जबाब दिला. पुढे मेडिकल ऑफिसर ,पोलिस आणि मुलीचे आईबाप सगळ्यांनी पैसे घेऊन केस दाबली. आपल्याकडे फक्त खरे बोलल्याचे समाधान राहिले.
16 Jan 2026 - 8:42 pm | राजेंद्र मेहेंदळे
नाय म्हण्जे काय, आपल्याला xल ना xचा, फुकटचा लोचा नकोच!! ज्याला खायचे त्याला खाउदे, फालतु मध्ये २ लाखाच्या भानगडीत....