आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in जनातलं, मनातलं
10 May 2024 - 6:45 am

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट
प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर
दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन"
https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws
झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ?? कारण त्या कादंबरीचं गोडव्या मागचे कारण ते छोटं गाव आणि तिथली भाषा आणि व्यक्ती
शाळा कादंबरी ची आठवण झाली !
किंवा दळवीनच्या ठणठणपाळ (बहुतेक हेंच नाव होते ) या त्यांच्या कोकणातील लहानपणाच्या जीवनाबद्दल च्या कादंबरीची आठवण झाली !

कलाविचार

प्रतिक्रिया

लेख वाचायला लागतो तोच संपला. काय वाचले काय समजले काही कळेना.
मग विचार केला तुम्ही एवढे कष्ट घेऊन लेख लिहीला आहे आतुरतेने प्रतिसादाची वाट पहात असणार.

निदान एक प्रतिसाद तरी असावा म्हणून दिला. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 1:09 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ अतिशय त्रोटक लेख.

हा लेख नव्हाताच, क्षमा तुमची दिशाभूल झाली असले तर फक्त माहिती / प्रसार म्हणून लिहिले
मिपावर असे चालत नाही का?

मुक्त विहारि's picture

11 May 2024 - 4:31 pm | मुक्त विहारि

जमल्यास, सिनेमा बघीन...

बाय द वे ,

मिपावर सगळे काही चालते.

फक्त, लेख किमान 7-8 ओळींपेक्षा जास्त हवा..

कॉमी's picture

11 May 2024 - 6:49 pm | कॉमी

प्रकाश संतांची "लंपन" अशी कोणतीही कादंबरी नाहीये. लंप्याची कादंबरी नाहीच आहे, चार कथासंग्रह आहेत. (वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर)

लहान असताना फक्त वनवास वाचले होते. प्रचंड आवडलेले, आणि जनरली मस्त हलक्याफुलक्या कथांमध्ये एक दुःखद अंडरटोन तेव्हासुद्धा जाणवली होती (वनवास ह्या शिर्षकी कथेत खासकरून). नंतर पुढील पुस्तके वाचली त्यात ही दुःखाची छटा फारच गडद होते.

ह्या गोष्टी स्क्रीनवर आणणे खूप कठीण काम आहे. निपुणला शुभेच्छा.

चौकस२१२'s picture

12 May 2024 - 6:29 pm | चौकस२१२

हो बरोबर , लंपन या शीर्षकाची कादंबरी नाहीये, ती व्यक्तिरेखा आहे या ४ कादंबरीतील ,

चौकस२१२'s picture

12 May 2024 - 7:18 pm | चौकस२१२

हो बरोबर , अश्या शीर्षकाची त्यांची कादम्बरी नाही , या चार कादंबर्यांतील मुख्य पात्र लंपन आहे