रेल्वे रिटायरिंग रूम्स

अक्षय देपोलकर's picture
अक्षय देपोलकर in जनातलं, मनातलं
16 Mar 2024 - 9:23 pm

रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात.

तीन तासापासून ते चौवीस तासापर्यंत आपल्या गरजेनुसार बुक करू शकता. फ्रेश होण्यासाठी दोन्ही प्रकारात स्वच्छ बाथरूम, टॉयलेट आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असते. डिलक्स रूम ३ तासासाठी ५०० रुपये आणि डॉर्मिटरी बेड ३ तासासाठी १८० रुपये एवढा नाममात्र दर* आहे. आपल्या गरजेनुसार (३,६,१२,२४ तास) रूम किंवा बेड बुक करू शकता.रूम बुक करताना तिकिटाचा पीएनआर नंबर आणि ओळखपत्र द्यावं लागतं. रेल्वे स्टेशन मध्येच रूम असल्यामुळे वेळ पण वाचतो हॉटेल शोधायचा आणि स्वस्तात सोय पण होते म्हणून पुढील प्रवासात नक्की उपयोग करा.

(दोन वेगवेगळ्या ठिकाणी सदर सोय वापरून चांगला अनुभव आल्यामुळेच लिहीत आहे)

*(दर रेल्वे स्टेशनप्रमाणे कमी जास्त असू शकतात अंदाज यावा म्हणून बडोदा येथील दर दिलेले आहेत)

-अक्षय देपोलकर

प्रवासअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

न्यू जलपायगुडी आणि कामाख्या या दोन ठिकाणी AC रूम वापरल्या आहेत. बाथरूम/टॉयलेट स्वच्छ असतात एव्हडे सोडून बाकी मुद्द्यांशी सहमत.
ऑन लाईन रूम बुक करतांना दिवसा आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ असे 12 तासाचे दोनच पर्याय होते.

अक्षय देपोलकर's picture

17 Mar 2024 - 11:44 pm | अक्षय देपोलकर

रेल्वेने गेल्यावर २-३ तासासाठी रूम हवी असल्यास चांगला पर्याय आहे ...

ओफ लाईन बुकिंग नेहमीच्या आरक्षण खिडकीवर होतं का?
रेल्वे गाड्यांचं अमुक एक तारखेचं आरक्षण आहे का नाही ते जसं ओनलाइन रेल्वे साईट/ app वर पाहतो तसं या रिटायरींग रुम्सचं आरक्षण कसं पाहतात?
एकदा विजापूर प्रवासात एका प्रवाशाने सांगितलं की सोलापूर स्टेशनची एसी रुम घेतल्याने तुळजापूर पटकन करता आलं. रुम चांगली होती.

रेल्वे स्टेशनच्या अलीकडे राहण्याचं हॉटेल असेल आणि फिरण्याची जाग पलीकडे असेल तर ओटो रिक्षाचा मोठा फेरा पडतो. किंवा स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकीट काढून रेल्वे पुलाचा वापर करून पलीकडे जावं लागतं. भूवनेश्वरला हा अनुभव घेतला होता. पण स्टेशनचीच रिटायरींग रुम घेतली असती तर त्रास वाचला असता. रुममध्ये टीवी असतो का?

अक्षय देपोलकर's picture

17 Mar 2024 - 11:50 pm | अक्षय देपोलकर

खोल्यांचं आरक्षण ऑनलाईन बघू शकता IRCTC वेबसाईटवर आहे पण मला तरी एवढं उपयोगाचं नाही वाटलं..
ऑफलाईन आरक्षण जिथे रूम्स आहेत तिथे वेगळा रिसेप्शन एरिया आहे तिथून घेऊ शकता.
थेट जाऊन रूम्स बघून घेतलेल्या बऱ्या नाहीच पसंत पडल्या तर बाहेर तरी बघू शकतो.
डिलक्स रूम्स मध्ये टीव्ही चालू होता.

टर्मीनेटर's picture

21 Mar 2024 - 10:10 pm | टर्मीनेटर

सात-आठ वर्षांपूर्वी कामानिमीत्त केलेल्या केरळ ते हैदराबाद (नामपल्ली) आणि हैदराबाद ते मुंबई अशा रेल्वे प्रवासात (काहि तासांचा) ब्रेक जर्नी असल्याने हैदराबाद रेल्वे स्टेशन वरच्या रेल्वे रिटायरींग रूमचा अनूभव घेतला होता आणि तो समाधानकारक होता.

आपण एकटे असू आणि काही सामान आहे तर रिटाइरिंग रूम. पण दोघे असतील तर एसी वेटिंग रुम घेता येईल दहा रु तासाने. काही मोठ्या जंक्शन स्टेशनांवर मिळते. उदाहरणार्थ झाशी,हुबळी.