लग्न

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
7 Dec 2023 - 11:27 am
गाभा: 

आज लग्नसंस्थेबद्दल फेसबुकवर एक लेख वाचला
त्या लेखात असे म्हंटले होते की
ज्या गोष्टीबद्दल चोवीस पंचवीस वर्षे कुठल्याही पद्धतीने घरात काहीही चर्चा देखील करत नव्हता ती गोष्ट आज अचानक कर म्हणता.
कोणत्यातरी सहा/सात महिन्याच्या ओळखीच्या कुटुंबाशी नाते जोडता. जीच्या /ज्याच्या स्वभावाची अजून ओळखही नाही त्याच्या सोबत जन्मभर रहायला लावता.
खालील ओळी त्या पोस्ट मधील. आहेत

1) वयाच्या 24- 25 वर्षांपर्यंत कुठल्याही पद्धतीने आणि त्याविषयी घरात काहीही न बोलता आता अचानक लग्न कर म्हणत आहेत. कश्याच्या आधारावर करू लग्न ? मला त्यातलं काहीच माहित नाही. स्वतः शोधायचा कुणीतरी, तर date करायचं म्हणजे त्यात काय करायचं असतं, हे ही मला माहित नाही.
2) 8 वर्षे एकमेकांना ओळखतो आम्ही. 2 वर्षांपासून date करत होतो. मागच्या महिन्यात लग्नही आम्हाला हवं तसं ( संगीत, मेहंदी, कोडकौतुक, खर्चिक) झालं पण हनिमूनच्या तिसर्या दिवशीच कडाक्याचं भांडण झालं आणि आता आम्हाला एकत्र रहायचं नाहीये.
3) अहो मॅडम, लहान मूल बाहुलीकडे कसं हरखून बघतं तसा तो एकेका अवयवाला हात लावून पाहत बसला. मला irritation आलं त्यामुळे. माझं satisfaction काही आहे की नाही? त्याचा अभ्यासच चालू आहे अजून, म्हणून मी त्याला आता अंगाला हात लावू देत नाही.
या आणि अश्यांसारख्या अनेक केसेस वारंवार समुपदेशनासाठी येत आहेत. केवळ लग्नाचं वय, भौतिक गोष्टी यापलिकडे जाऊन लग्न किंवा relationship साठी काय आवश्यक असते याचा विचार करण्याची गरज आहे. पूर्वी होत नव्हती का लग्नं पण असे घटस्फोटांचे फॅड नव्हते तेव्हा ! आत्ताच्या मुलामुलींमध्येच प्राॅब्लेम आहे. असं म्हणणार्या आधीच्या पिढ्यांनाही काही गोष्टी स्पष्ट सांगण्याची, आरसा दाखवण्याची वेळ आलेली आहे.
एक counsellor आणि psychotherapist म्हणून romantic relationship साठी आणि लग्नासाठी स्वतःची तयारी कशी करावी याचे शिक्षण केवळ तरूण मुले-मुली यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही देण्याची नितांत गरज आहे,असं माझं मत आहे.

हे वाचल्यावर मला वाटले की मिपाकरांना यावर मत विचारायला हवे.
माझे मत विचारल तर
लग्न करणे हा एक मूर्खपणा आहे.
कोण्यातरी इसमाची /बाईचा कायमची/चा गुलाम बनुन रहाणे
नातेवाईक वगैरे पासार्‍यामागे उगाचची केसांची गुंतवळ असावी तसे फरफटत जाणे
नातेवाईक / मुले / कुटुंब नामक गोतावळ्यामुळे स्वतःची होणारी कुचम्बणा ही त्याग नामक उच्च फोलफटा मागे दडवणे .
आणि उतरवयात स्वतःला हाडुत हुडूत करून घेणे हे लग्न संस्थेचे मोठे यश आहे.
स्त्रीयाना पुरुषांचे आणि पुरूषाना स्त्रीयांचे लोढणे बनवून त्यांची प्रगती कशी रोखता येईल हे पहान्यात तसेच कोणालाही त्याच्या इच्छेप्रमाणे यश मिळवून न देण्यात लग्न संस्थेचा मोठा हातभार आहे.

तुमची जाणून घ्यायला आवडतील.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 Dec 2023 - 11:28 am | विजुभाऊ

ही फेसबुकावरची पोस्ट वृशली प्राजक्त यांनी लिहीलेली आहे.

सुबोध खरे's picture

7 Dec 2023 - 11:36 am | सुबोध खरे

वृशली प्राजक्त

यांची "द्राक्षं आंबट" अशी स्थिती नाहीये ना?

विजुभाऊ's picture

7 Dec 2023 - 12:42 pm | विजुभाऊ

असू शकेल किंवा नसूही शकेल.
मिपकरांची मते काय आहेत ते पाहुया

सतिश पाटील's picture

7 Dec 2023 - 12:46 pm | सतिश पाटील

व्हाट्सएप आणि फेबूच्या लिखाणाची चर्चा इथे ?

लग्न ही खूप व्यक्तिगत गोष्ट असते,कोणाची भट्टी जमते,कोणाची उशीरा जमते ,कोणाची अजिबात जमतच नाही.त्यामुळे यावर काय मत द्यायचं :) असो,या रीलमध्ये सांगितल्या प्रमाणे लग्न हे सहजीवन आहे एक जीवन नाही,स्पेस देऊन आनंद घेतला तर लग्न सुंदर गोष्ट आहे.बाकी वरती लिहिलेले प्रश्न जोडप्यांना पडणे रास्त आहे, अशावेळी चांगल्या यशस्वी वयस्क जोडप्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
(स्वगत-बापरे ,खुपच हुशार झाले म्हणायचे मी ;))

विजुभाऊ's picture

7 Dec 2023 - 5:09 pm | विजुभाऊ

खरे आहे.
नवरा बायको जसे आहेत तसे एकमेकाना आवडतात. पण नंतर त्याना ते दोष दिसायला लागतात.
ते दोष दूर केले की तो / ती पहिल्यासारखी वागत नाही म्हणून कुरकुर सुरू करतात

अहिरावण's picture

7 Dec 2023 - 1:36 pm | अहिरावण

भारतीय लग्नव्यवस्थेने आता बदलणे गरजेचे आहे. आधी भारतीयांनी बदलावे लागेल. बाकी सर्व बाबतीत बदल झाले आहेत पण लग्न, कर्तव्ये, नातेवाईक, मानपान, इत्यादी अजुनही बुरसटलेली मानसिकता आहे.

Trump's picture

8 Dec 2023 - 2:39 pm | Trump

भारतीय लग्नव्यवस्थेने आता बदलणे गरजेचे आहे. आधी भारतीयांनी बदलावे लागेल. बाकी सर्व बाबतीत बदल झाले आहेत पण लग्न, कर्तव्ये, नातेवाईक, मानपान, इत्यादी अजुनही बुरसटलेली मानसिकता आहे.

मानपान परदेशी लग्नातही असतात.

अहिरावण's picture

9 Dec 2023 - 3:22 pm | अहिरावण

हुंडाबळी असतात का? सासू सूना, नणंद भावजया, जावाजावा, मेहूणे मेहूणे, भाऊ भाऊ. सासरा जावई, असली भांडणे, त्यापाई डोक्यात कु-हाडी, कोयते असतात का?

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jan 2024 - 8:19 am | llपुण्याचे पेशवेll

१०० कोटी मध्ये किती?
भारतातल्या 100 कोटी लोका पैकी ५० कोटी केसेस आहेत का?
भारतीयांची आत्मवंचना करणारे गुलाम मनोवृत्ती गेलेले नाही हेच वरील प्रतिसादातून दिसत आहे.
चालले मोठी लग्न संस्था बदलायला.

आपल्या बुद्धिमत्तेबद्दल आणि समाजातील घडामोडींच्या जाणकारीबद्दल मला नितांत आदर आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Dec 2023 - 5:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

भारतीय संस्कृतीमध्ये लग्न ही कामतृप्ती साठी समाजमान्य व्यवस्था आहे. ठराविक वयात हॉर्मोन्स आपले काम करायला सुरुवात करतात आणि ही एक महत्वाची गोष्ट होऊन बसते. पाश्चात्य देशात लिव्ह ईन राजरोस असले तरी आपल्याकडे तेव्हढे (निदान उघडपणे) नाही. मग दुसरी सोय काय?

आजकाल मुला-मुलींना शिकुन सेटल होण्यासच ईतका वेळ लागतो की वय निघुन जाते. सगळे चांगले असुन घरात कोणी पुढाकार घेणारे नसल्याने लग्न अडकलेली मुले-मुलीसुद्धा खुप आहेत. चाळीत राहणारा मुलगा नको, स्वतःचे घर हवे, कार हवी, एकत्र कुटुंब नको, सेंट्रल्/वेस्टर्न लाईनवर राहणाराच हवा,पुण्यातलाच हवा असेही अपेक्षांचे प्रकार आहेत. आणि सुरुवातीला अवास्तव अपेक्षा ठेवल्याने शेवटी मिळेल ते पदरात पाडुन घेणारेही आहेत.

लग्नाबद्दल ईतके सगळे वाईट असले तरी घरच्यांनी लग्न लावुन दिले नसते तर आयुष्यभर जोडीदार मिळाला नसता अशा लायकीचेही लोक आहेत. थोडक्यात शारीरीक/मानसिक कुचंबणा टाळण्यासाठी लग्न ही तडजोड आहे. मग एकदा पत्करलेच आहे तर नीट पार पाडावे, न जमल्यास शहाण्यासारखे बाहेर पडावे हे उत्तम.

चौथा कोनाडा's picture

11 Dec 2023 - 10:41 pm | चौथा कोनाडा

लग्न ही कामतृप्ती साठी

फक्त कामतृप्ती साठी ?

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jan 2024 - 8:20 am | llपुण्याचे पेशवेll

कामतृप्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक नाही?

कुमार१'s picture

7 Dec 2023 - 7:53 pm | कुमार१

लग्न या जयवंत दळवी यांच्या नाटकाचा सारांश त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यातच आलेला आहे:

लग्न न करता माणूस सुखी असतो का ?
आणि
लग्न केलेला माणूस सुखी होतो का ?

( वरील दोन्ही गटांतील ज्याने त्याने या प्रश्नांची उत्तरे आपापल्या मनात द्यावीत !) 🙂

आपण कोणतीही गोष्ट ( कपडे, पादत्राणे , मोबाईल, घर वगैरे गरजेच्या )दुकानात विकत घेण्यास जातो तेव्हा सर्वात प्रथम बजेट ठरलेले असते. ठरवले नसल्यास दुकानदार ते आपल्याला निरखून अथवा आड मार्गे जाणून घेतो.
लग्नासाठी हेसुद्धा लागू आहे. ज्यांचे प्रेमविवाह होतात त्यांची यातून सुटका होते. म्हणजे पालक आणि नातेवाईक यांच्या कचाट्यातून मुक्त असू शकणारी आर्थिक परिस्थिती असणारे(=बजेट).ते काही करू आणि बोलू शकतात.

बाकी अतिरेकी, स्वैर विचारी लोकांबद्दल काय बोलणार?

मत नक्की कुठल्या विषयावर पाहिजे हे स्पष्ट केले असते तर सविस्तर पणे लिहिले असते.

लग्नव्यवस्था प्रत्येक १०० वर्षांत अमूलाग्र बदलते. प्रत्येक बदल हा कर्मठ लोकांसाठी कठीण होतो. काही लोक आपटी खातात आणि आयुष्याची नासाडी करून घेतात. पण हळू हळू समाज त्याला अड्जस्ट होत जातो. इथेही तसेच.

हे समुपदेशन वगैरे करणारी मंडळी मूर्ख आहेत. ह्यांच्या नादी लागणे आणि तांत्रिक मंडळींच्या नादी लागणे सेम आहे.

समुपदेशन करणे एक व्यवसाय आहे.

लग्न झालेल्या काही तरुण तरूणींमध्ये हट्टीपणा असतो. तो वेळ आणि पैसे घालवून दूर करण्याचा खटाटोप परवडणारे लोक समुपदेशन घेतात.
पैसा,करिअर आणि स्वातंत्र्य विरुद्ध सहनिवास अशा लढाया काही जणांच्या सुरूच राहतात.

वामन देशमुख's picture

12 Dec 2023 - 8:58 am | वामन देशमुख

'
तो जणू जमदग्न
ती खूपच स्वमग्न
त्यांचे झाले लग्न
घरात रोज विघ्न
...
आयुष्य झाले भग्न
'

नठ्यारा's picture

12 Dec 2023 - 11:25 pm | नठ्यारा

हिंदू समजुतीनुसार हा जन्म अजिबात फुकट मिळालेला नाही. त्याकरिता अनेक प्रकारचं पुण्य खर्ची घालावं लागतं. तसंच अक्षरश: असंख्य शक्तींची कृपा असावी लागते. तेव्हा कुठे नरजन्म ( वा नारीजन्म ) लाभतो.

त्यामुळे जन्मास येणारं बालक डोस्क्यावर भलंथोरलं ओझं घेऊन जन्माला येतं. त्यापैकी देवऋण, पितृऋण आणि आचार्यऋण हे महत्त्वाचे. तर पितृऋणाची परतफेड विवाह करून पोरं जन्मास घालून करायची असते.

पोरं जन्माला घालून वाढवायची म्हणजे जोडीदाराशी सुसंवाद हवाच. च महत्त्वाचा. हिंदू विवाहसंस्था या खुंट्याभोवती उभारली आहे. निदान माझा तसा समज तरी आहे.

-नाठाळ नठ्या

मुक्त विहारि's picture

20 Dec 2023 - 6:52 pm | मुक्त विहारि

माझाच, जुना धागा आठवला..

https://www.misalpav.com/node/30022