नमस्कार मंडळी !
नवी मुंबई - राजणगाव - पंढरपूर - अक्कलकोट - तुळजापूर - अंबाजोगाई - परळी वैजनाथ - औंढा नागनाथ - घृष्णेश्वर - शिर्डी - नवी मुंबई असा नाताळ च्या सुट्टी मध्ये १४०० ते १५०० कमी रोड ट्रिप चा बेत केला आहे.
एकूण वेळ - ३ रात्री ४ दिवस.
प्रवाशी संख्या - १० ते १२ ( वय ९ पासून ७६ पर्यंत)
वाहन - टेम्पो ट्रॅव्हलर्स.
मुक्काम - १) पंढरपूर २) अंबाजोगाई अथवा परळी वैजनाथ ३) शिर्डी
या ठिकाणी बरेच मिपाकर गेले असतील तर वरील प्लॅन मध्ये काही बदल करावेत का ते सुचवा. (आणखी एकदा दिवस वाढवू शकतो.)
तसेच आणखी काही महत्वाची ठिकाणे ऍड करू शकतो का? राहण्याची व खादाडी ची ठिकाणे सुचवा.
ऍडव्हान्स बुकिंग कुठे कुठे करावे लागेल?
इतरत्र माहिती असेल तर अवश्य कळवा
प्रतिक्रिया
7 Dec 2023 - 5:24 am | कंजूस
धार्मिक ठिकाणांच्या (आणि गर्दीच्याही) जागी मुले काय मजा घेणार हा प्रश्नच आहे. त्यांच्यासाठी दोन जागा शोधा आणि वाढवा.
7 Dec 2023 - 11:46 am | सुबोध खरे
१४०० ते १५०० किमी रोड
वय ९ पासून ७६ पर्यंत
३ रात्री ४ दिवस.
रोज ३५० ते ४०० किमी फार जास्त प्रवास होईल असे वाटते
विशेषतः लहान मुलांना कंटाळवाणा आणि वरिष्ठ नागरिकांना दगदगीचा होईल
7 Dec 2023 - 12:38 pm | सतिश पाटील
नाताळच्या सुट्टीत असाच अष्टविनायक दर्शनाचा प्लॅन केला होता ६ वर्षांपूर्वी.
सगळीकडे नुसती भयाण मूर्खांची गर्दी, आणि बेशिस्त ट्राफिक, अव्वाच्या सव्वा दर, माजोरडेपणा.
तेव्हापासून नाताळ ला कुठेच ना जाण्याचा चंग बांधला.
8 Dec 2023 - 10:45 pm | चौथा कोनाडा
सहमत.
दिवाळी पासून जी भयानक गर्दी सुरु होते ते पार संक्रांत / जाने एन्ड पर्यंत सुरु राहते. त्यात विकांत शनि-रवि अ थ वा पब्लिक हॉलीडे असेल तर विचारू नकात !
धार्मिक स्थळे तर ओसांडून वाहतात. आपण ज्या भावनेने देवदर्शनाला गेलेलो असतो ते पावित्र्य ही प्रचंड गर्दी, रांगा, ढकलाढकली, संबंधितांचे तट्टू, व्हीआयपी घुसखोरी बघून कुठल्या कुठे पळून जाते !
आणि मला तर आता तर प्रत्येक विकांतच काटा आणणारा वाटू लागला आहे !
14 Dec 2023 - 2:04 pm | विजुभाऊ
धार्मीक ठिकाणी देवदर्शनासाठी जाणे हा अक्षरशः गाढवपणा वाटतो तिथली गर्दी पाहिल्यावर
14 Dec 2023 - 2:40 pm | अहिरावण
ओ विजुभाऊ ! हे तर सगळ्याच बाबतीत लागु आहे की... पर्यटन केंद्रावर निसर्गदर्शनासाठी जाणारे, पावसाळ्यात डोंगर द-या तुडवणारी गर्दी आणि धार्मिक ठिकाणची गर्दी समानच आहे की....
उगा धार्मिक ठिकाणाच्या नावाने गळे का काढता? ऑ !
14 Dec 2023 - 3:20 pm | कंजूस
गर्दी टाळण्याचा उपाय
वद्य पक्षात वैष्णव देवळात जाणे. शुक्ल पक्ष टाळणे. अमावस्या सर्वोत्तम. शनिवार रविवार सर्व देवळे टाळणे. मंगळ शुक्रवारी देवीची देवळे.
23 Jan 2024 - 5:20 pm | चौथा कोनाडा
झाली की नाही सहल शेवटी.
झाली असेल तर लेख टाका की राव, नाहीतर मिपाकरांनी दिलेले सल्ले फुकट गेले म्हणायचे.
असो.. आम्हालाही अशी सहल आयोजित करायची आहे.. त्यामुळे याबद्दल उत्सुकता आहे.