माझ्याच त-हा

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
19 Dec 2008 - 11:59 pm

माझ्याच त-हा
===========================
.
.
सांभाळलेला गारवा..
सांभाळलेला झरा..
अन तो सांभाळलेला कवडसा..
नाहीच मुळी मजहून वेगळा.
.
मीच गारवा मीच झरा.
ऊन कवडसे माझ्याच त-हा!!
अवखळ वेल्हाळ धबधबा
लागला आता सपाटीला.
.
खंडी खंडी गाळतळा
माझ्याच मी दाबला.
एक प्रवाह अन किती धारा..
ओळखेना माझॆ मला!!
.
तो पहिला वेगळा
माझा थेंब कोणता?......
.
.
==========================
स्वाती फडणीस...................... २००७

कवितामुक्तकप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

शितल's picture

20 Dec 2008 - 12:31 am | शितल

खंडी खंडी गाळतळा
माझ्याच मी दाबला.
एक प्रवाह अन किती धारा..
ओळखेना माझॆ मला!!

सुंदर..
:)

ऋषिकेश's picture

20 Dec 2008 - 11:46 am | ऋषिकेश

मीच गारवा मीच झरा.
ऊन कवडसे माझ्याच त-हा!!

कविता आवडली..
अजूक एखादे रुपकात्म कडवे असते तर और मजा आता!

-(गोंधळलेला) ऋषिकेश

जयेश माधव's picture

20 Dec 2008 - 5:43 pm | जयेश माधव

जयेश माधव

छान!!!!!

स्वाती फडणीस's picture

20 Dec 2008 - 6:34 pm | स्वाती फडणीस

:)

मॅन्ड्रेक's picture

22 Dec 2008 - 1:33 pm | मॅन्ड्रेक

अ-प्रतिम