आमच्या जिम मधे (म्हणजे माझी नाही, मी ज्या जिम ला जातो ती) एक से एक नमुने आहेत. एक मुलगा आहे त्याच्या सर्व वस्तू ब्रॅंडेड असतात्,त्याचे कपडे,शूज सोडा,घाम पुसायचा नॅपकिन पण 'नाईके' चा आहे. त्या मानाने व्यायाम यथातथाच करतो. दुसरा एक जण तर पुर्ण नटुन थटुन येतो.डोक्याला हेड बँड(केस डोळ्यावर येतात म्हणॅ),हाथाला रीस्टबँड,कानात आयपॉड्,हाथात ग्लोवस्,पायाला नी पॅड्.(नशीब abdomen guard, चेस्ट पॅड घालुन येत नाही ते).अजुन एक बाई आहे(चांगली जाडजूड आहे). एके दिवशी ती चक्क कॅमेरा घेवुन आली आणी ट्रेनर ला म्हणाली कि माझा ट्रेड मिल वर धावताना फोटो काढ. आता तीला तो फोटो कोणाला प्रुफ म्हणुन दाखवायचा होता कोणास ठाउक.
काही नवीन मेंबर तर जॉईन करुन एक आठ्वडा झाला नाहितर आरश्यात बघुन न पडलेले बायसेप्स/ट्रायसेप्स चे कट्स बघत असतात. काहिजण व्यायामातले 'सेट्स' करायचे सोडुन पोरी 'सेट' करायला बघतात.आजुबाजुला मुलगी असेल तर बाहेर आलेली पोटे,श्वास रोखुन,आत खेचुन घेतात,वजने जास्त उचलायला बघतात किंवा ट्रेड मिल वर चार पावले जास्त धावतात्.काही जण जिम मधल्या आरशांचा पुरेपुर उपयोग करुन्(म्हणजे 'Angle' सेट करुन व्यायाम करतात).
काही जण व्यायाम करुन खाली जावुन गाड्यांवर जंक फुड खात बसतात्.काही जणांचे म्हणणे असते कि एक दिवस खाल्ले तर काही फरक पडत नाही.एव्हढेसे खाल्याने काय होते. ही वाक्यं ज्यांची वजने ऑल रेडी कंट्रोल मधे आहेत/बॉडी 'शेप' मधे आहेत त्यांच्या साठी ठीक आहेत्.पण जर तुम्ही आधीच 'ओवर वेट' आहात किंवा 'ऑउट ऑफ शेप' आहात तर तुम्हाला स्वतावर कंट्रोल ठेवणे भाग आहे.क्रिकेट च्या भाषेत सांगायचे म्हणजे जर 'Required RunRate' आवाक्यात किंवा कमी आहे तेव्हा एखादि ओवर मेडन गेली तर फार फरक पडत नाहि.पण 'Required RunRate' आधीच हाथाबाहेर आहे तर तुम्हाला एक बॉल ही 'डॉट' जाणे महाग पडू शकते.
जिम / व्यायामाच्या बाबतित लोकांचे खूप चुकीचे समज आहेत. (डाएटींग च्या बाबतीत तर एव्हढे चुकीचे समज आहेत कि त्या साठी वेगळा लेख लिहायला लागेल.)
जेव्हा तुम्ही जिम मधे प्रवेश घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला तुमचा उद्देश विचारला जातो.त्या नुसार तुमचा 'वर्क ऑउट" ठरवला जातो.पण काही जण स्वताच्या उद्देशा बाबत अनिभिज्ञ असतात कि विचारायला नको.जिम मधे येणारी माणसे दोन प्रकाराची असतात. एक बारीक होण्यासाठी,आणी दोन बॉडी बनवण्यासाठी.
आता पहिल्या प्रकारच्या लोकांना उद्देश विचारला तर ते 'वेट लॉस' असे सांगतात्.पण 'वेट लॉस' आणी 'फॅट लॉस' या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत हे त्याना माहीत नसते.'वेट लॉस' करणे अतिशय सोपे आहे.अहो जर तुम्ही दिवसभर पाणी न पिता राहलात आणी मग वजन केलेत कि झाले 'वेट लॉस' त्या साठी जिम ला जायची काय गरज?'वेट लॉस' मधे तुमच्या वजना बरोबर शरीरातिल 'मसल्स' पण कमी किवा कमजोर होतात्.जे हानीकारक असते.'वेट लॉस'मधे तुमचे वजन कमी होते पण तुम्हाला हवा तसा शरीराला 'शेप' मिळत नाही. या उलट 'फॅट लॉस' मधे शरीरातली अतीरिक्त चरबी कमी केली जाते ज्या मुळे शरीराला हवा असलेला 'शेप' मिळतो.
काही जण या साठी 'सोना बेल्ट' सारखे चुकिचे प्रकार वापरतात. अशा प्रकारामुळे पुढे नुकसानच जास्त होते.काही तथाकथीत कंपन्या 'वेट लॉस' च्या नावाखाली गंडवतात्.पायाला,पोटाला,कंबरेला वायरी लावुन झोपायला सांगतात ३०-४० मिनीटें. नतंर लघवी करुन यायला सांगतात.आणी मग वजन करतात.आता सहाजिकच लघवी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आणी तुम्हाला वजन कमी झाल्यासारखे वाटते.(शरीरातील पाण्याचे वजन आपल्याला वाटते त्या पेक्षा अधिक असते) काही प्रमाणात वजन कमी होते ही पण जेवढे ते भासवतात तेवढे तर नक्कीच नाही.
अजुन एक चुकीचा समज आहे कि नुसत्या 'सिट अप्स' मारल्या तरी पोट कमी होते.एखाद्या भागावरील 'फॅट' कमी करणे हे आपल्या हाथा मधे नसते. ते शरीर स्वताचे स्वतः ठरवत असते.त्यामुळे कुठलाही एका अवयवा साठी व्यायाम केला तर त्या अवयवावरील 'फॅट' कमी होतात हा समज चुकिचा आहे. उलट अशा प्रकारामुळे त्या अवयवाचे 'मसल्स' घट्ट होउन बेढ्ब( बाकिच्या शरीराच्या मानाने) दिसायला लागते.सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे समजा तुम्ही एका वर एक असे १० शर्ट घातले आहेत आणी तुम्हाला पोटाचा भाग कमी करायचा आहे तर तुम्ही तेव्हढाच भाग कापू नाही शकत. तुम्हाला एक एक करुन पुर्ण शर्ट काढायला लागतात.शरीराचे पण तसेच आहे. तुम्हाला पुर्ण शरीराचा व्यायाम करावा लागतो.शरीर फॅटस कमी करताना आय्.टी . वाल्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे LIFO(Last In First Out) प्रमाणे कमी करते.
बॉडी बनवरया मधे पण दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपल्या 'भीम रूपी महारूद्रा' 'टारझन' प्रमाणे(बॉडी बील्डर).दोन म्हणजे 'लीन बॉडी'(मॉडेल टाईप,जॉन अब्राहीम टाईप)तुम्ही जर सुरवातिलाच स्पष्ट केलेत तर त्या प्रमाणे ट्रेनर तुम्हाला ट्रेन करु शकेल.
इथे सुध्धा काही लोंक झटपट बॉडी बनवण्यासाठी पावडर्/गोळ्या घेतात. पण त्याचे दीर्घ कालीन परिणाम त्यांना माहीत नसतात.
पुरूषांसाठी आयडल 'शेप' म्हणजे 'V'.(पुन्हा 'टारझन' चे उदाहरण्.त्याचा 'बॅक पोझ' मधला फोटो पाहीला होता मिपा वर्.परफेक्ट 'शेप'.मस्त रे गड्या.)
स्त्रीयांसाठी आयडल 'शेप' म्हणजे 'कोक बॉटल' फिगर(१.५ लीटर ची नव्हे). हे प्रमाण ३६-२४-३६ असेच असायला पाहिजे असा काही नियम नाहि. प्रत्येकिच्या उंची नुसार हे प्रमाण बदलत असते. पण 'शेप' मात्र 'कोक बॉटल' हवा.
तुम्ही 'फिट' आहात कि नाही किंवा तुम्हाला व्यायामाची गरज आहे कि नाही हे ठरवण्या साठी काही निकष आहेत.
१)बॉडी मास ईंडेंक्स(BMI):- हे काढण्यासाठी सोपा 'फॉर्मुला'
तुमचे वजन्/(तुमची उंची(मीटर मधे)*तुमची उंची(मीटर मधे)). याचे उत्तर १८ ते २५ च्या मधे आले तर तुम्ही नॉरमल आहात.
१८ च्या खाली आले तर 'अंडर वेट' आणी २५ च्या पुढे आले तर 'ओवर वेट'
उदा. ७०/(१.७५*१.७५) =२२.८ नॉर्मल
२)वेस्ट हीप रेशो= वेस्ट/हीप . पुरूषांसाठी हे प्रमाण .९५ किंवा त्या पेक्षा कमी तर स्त्रीयांसाठी हे प्रमाण .८० किंवा त्या पेक्षा कमी असले तर चांगले.
३)फॅट %= हे प्रमाण काढायला वेगळे उपकरण लागते. किंवा बरीच आकडे मोड करावी लागते.(माहीती साठी: जॉन अब्राहीम चे फॅट % १० आहे. त्यामुळे आपल्या सारख्या लोकांचे १५-१६ असले तरी चालते.
सध्या इथेच थांबतो. बाकिचे पुन्हा कधीतरी.....
- भिडू
प्रतिक्रिया
18 Dec 2008 - 11:25 pm | रामदास
भिडू,लेख आवडला.जिमला जाणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे ही आनंदाची गोष्ट आहे.शो ऑफ करणारे पण येतील.पण सिरीअसली वर्क आउट करणारे पण येतील.शरीर संपदेची निगा राखणे आणि निर्व्यसनी राहणे, आनंदमय आयुष्य बनवणे ....
वा! वा!
20 Dec 2008 - 4:24 am | धनंजय
लेख आवडला.
(पटवापटवी करणे हे "जिम"मध्ये जाण्याचे सुयोग्य कारण आहे, मात्र काही लोक उगाच गंभीरपणे व्यायाम करायला येतात आणि मूड घालवतात - असे माझ्या काही मित्रांचे मत आहे. मी सहमत नाही, पण आपली माहिती म्हणून सांगितली...)
18 Dec 2008 - 11:58 pm | एक
हे स्वःताच मोजून कुठलेही निर्णय घेवू नयेत.
बी एम आय हा तुमच्या बॉडी टाईपवर अवलंबून असतो. आमच्या सारख्या मिडीयम-टू-लार्ग बॉडीफ्रेम असणार्या लोकांचा बी एम आय हा फसवा असू शकतो.
बी एम आय, वेस्ट-हीप रेश्यो आणि फॅट % हे ३ ही मोजून तज्ञांना दाखवून मग काय ते ठरवावं आणि त्याप्रमाणे व्यायाम करावा. केवळ एकाच आकड्यावर विसंबून चालत नाही.
दुसरं अजूनएक वाचनात आलं, कितीही व्यायाम केला तरी शरिरात असलेल्या फॅट पेशींची संख्या कमी होत नाही. व्यायामाने त्यांच्यात साठवलेली फॅट कमी करता येते. म्हणून नियमीत व्यायाम महत्त्वाचा. एकदा फॅट % कमी केलं की झालं असं होत नाही.
अत्यंत महत्त्वाचं - जॉन किंवा अर्नॉल्ड सारखी बॉडी असणं म्हणजेच 'फिट' असणं असं नाही.
भिडूभाऊ, लाडका विषय होता म्हणून थोडी भर घातली. काही चुकलं असेल तर करेक्ट कर.. लेख आवडलाच आहे.
19 Dec 2008 - 12:13 am | भिडू
>>बी एम आय, वेस्ट-हीप रेश्यो आणि फॅट % हे ३ ही मोजून तज्ञांना दाखवून मग काय ते ठरवावं आणि त्याप्रमाणे व्यायाम करावा. केवळ एकाच आकड्यावर विसंबून चालत नाही.
हेच म्हणतो मी. आणी व्यायामात सातत्य हे हवेच. नाहितर जिम मधेच सोडलि तर अजुन जाड होयला होते. बाकि प्रतिसादा बद्दल धन्यवाद. माझ्या हि आवडिचा विषय आहे
हा.
19 Dec 2008 - 12:25 am | चतुरंग
हा शब्दप्रयोग तितकासा बरोबर नाही 'फॅट पेशी' असं काही नसतं. आपल्या शरिरात चरबी (फॅट) विविधप्रकारे साठवलेली असते. बोन मॅरो, स्नायू आणि अवयवांवरती ही असते. सर्वसामान्य शरीररचनेत बहुतांश चरबी ही शरीराची विविध कार्ये पार पाडायला जरुरीचीच असते. अवयवांवरची खोलवर असलेली चरबी ही बफर सारखे काम करते आणि अवयवांचे रक्षण करते.
खाल्लेले अन्न संपूर्ण पचन होऊन सर्व उष्मांक खर्च झाले तर मेद वाढत नाही पण त्यात 'जमेचा खाद्यसंकल्प' (तुटीचा अर्थसंकल्प च्या चालीवर) सुरु झाला की वजन वाढलेच!;)
व्यायाम करताना कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) आणि चरबी (फॅट) दोन्ही जाळून उष्णता मिळते. चरबी घटवण्यासाठी केला जाणारा व्यायाम हा सावकाश आणि अधिक काळ करावा लागतो म्हणजे चरबी हे मुख्य इंधन म्हणून वापरले जाते नाहीतर जलदगतीने केलेल्या व्यायामासाठी तातडीचा इंधनपुरवठा कर्बोदकांपासून केला जातो.
(शरीर हे अत्यंत साध्या नैसर्गिक तत्त्वावर चालते - 'ज्या इंधनापासून चटकन उष्णता मिळेल ते वापरायचे'! कर्बोदके ही ग्लूकोज निर्मितीच्या सगळ्यात जवळचा घटक असतो त्यामाने चरबी ही खूप दूर असते त्यामुळे झटपट उष्णता कर्बोदकांपासूनच मिळते.)
शिवाय आहारावरील नियंत्रणही खूपच म्हत्त्वाचे असते. पोटात जाणारे आणि खर्च होणारे ऊष्मांक (कॅलरीज) ह्यातले संतुलन राखले गेले तरच वजन घटताना दिसते अन्यथा नाही. शिवाय प्रथिनेही महत्त्वाची त्याशिवाय स्नायूंना पुरेशी शक्ती मिळत नाही.
वजन हे अत्यंत हळूहळू आणि तुमच्या अक्षरशः नकळत वाढते त्यामुळे ते तितक्याच हळूहळू कमी होते हे लक्षात ठेवा! कोणताही शॉर्टकट नाही!
चतुरंग
19 Dec 2008 - 12:35 am | टारझन
एकदम परफेक्ट सांगितलं आहे, सावकाश व्यायाम म्हणजे मराठीत एरोबिक्स (रनिंग/जॉगिंग बेस्ट) ... आणि झटपट याम ला मराठीत अन-एरोबिक्स म्हणतात (कोणताही जिममधला वजनी व्यायाम)
बी.एम.आय. फसवा असू शकतो... बॉडी शो मधे भाग घेणारे बिल्डर्स सहा फुटाच्या आतले असून त्यांच वजन ९५+ भरू शकतं .. त्यामुळे ह्यावर एक परफेक्ट फॉर्मुला बणू शकत नाही ...
19 Dec 2008 - 12:56 am | एक
अधिक माहिती साठी या लिंक्स..
http://health.howstuffworks.com/fat-cell.htm
http://images.google.com/imgres?imgurl=http://www.rkm.com.au/CELL/cellim...
http://whyfiles.org/276metabolic_syndrome/images/fat_cells.jpg
मी म्हणत होतो ती माहिती ही आहे..
http://abcnews.go.com/Health/BeautySecrets/Story?id=4777493&page=1
त्यामूळे सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी ऍडिपोझ, लायपोसाईटस शब्द वापरण्यापेक्षा फॅट पेशी (सेल्स) हा शब्द वापरला.
19 Dec 2008 - 1:00 am | चतुरंग
चतुरंग
18 Dec 2008 - 11:59 pm | स्वातीदेव
छान लेख आहे. चागली माहीती आहे. (चा वर अनुस्वार कसा दयावा ?)
19 Dec 2008 - 12:00 am | मुक्तसुनीत
डाव्या कोपर्यातला दुवा :
http://www.misalpav.com/node/1312
19 Dec 2008 - 9:55 am | वृंदा
अनुस्वार देण्यासाठी [Shift+m] दाबावे.
19 Dec 2008 - 12:30 am | टारझन
मस्त रे भिडू लेका ... येवस्थित माहिती दिली आहेस ... सुरूवात केली तेंव्हा असं वाटलं की जिम मधले किस्से सांगतो का काय !! पण माहीतीयुक्त लिहीलंस ..लोकांच्या डॉस्क्यात जिम बद्दल जे गोड-गैरसमज आहेत ते बरेच कमी होतील... जीम मधे जाणारं निम्म पब्लिक हे केवळ हेवा ह्या हेतूने जॉईन करतात (मी पण अशीच जॉईण केलेली)... पण हे लोखंडाचे चणे फारच थोडे लोकं पचवू शकतात !
=)) ते कंसातलं वाक्य टाकलं म्हणून वाचलास
अवांतर :
आमची जिम "हनुमान जिम" जिथं सोना बाथ, स्टिम बाथ किंवा हाय-फाय इलेक्ट्रानिक्स उपकरणे नाहीत... तिथं फक्त मशिन्स आणि वजनं !! फॅट लॉस हवं असतं पण कष्टांची तयारी णसते ... तिथंच घोडं पाणी पितं,,., मग हे लोक्स पिल्स किंवा कसलेसे बेल्ट वगैरेचे सोप्पे उपाय अवलंबवतात ... . ४ दिवस नाटक .. पाचव्या दिवशी तो बेल्ट कंबरेला सपोर्ट म्हणून वापरतात ..काही जणं पटकन बॉडी व्हावी म्हणून प्रोटीन पावडर किंवा स्टिरॉईडच्या आहारी जातात.. ही बॉडी जितक्या लवकर बणते त्याच्या दुप्पट वेगाने कमी पण होते ... अतिप्रमाण केल्यास आणि व्यायाम सोडल्यास , किडणीचे विकार आणि (स्टिरॉईडच्या केस मधे फिमेल हार्मोन सिक्रिशन होऊन चेस्टची ब्रेस्ट ही बणू शकते बरं .. ).. हल्ली आय.टी. मधे एका जागी बसून काम असतं यामुळे मेदूवडे तयार होतात ..त्यांनाच खरी गरज असते,,,, हल्ली कंपन्यांमधे स्वतंत्र जिम असतात .. पण कामाचा एवढा शीण होतो की इच्छाच उरत णाही.. (आमचं पण त्यामुळंच दुर्लक्ष झालं) कॉलेजात आम्हाला जिमचं एवढं व्यसन लागलेलं की तिण तिण तास तिकडंच पडिक... पण च्यायला आता ३० मिनीटं लै झाली ... पण तरी आधून मधून विकली ३ दिवस का होईणा याम होतो.
फुकटचा सल्ला : जीम जॉइन केल्याच्या २ महिन्यात आपण अभिशेक बच्चन चे हृतिक रोशन बणनार णाहीत ही गोष्ट लक्षात घ्या , ही एक वेळखाऊ प्रक्रिया असून किमान ६ ते १२ महिने (डिपेंडिंग अपॉन, वर्काऊट प्रोग्राम अँड डाएट अँड बॉडी टाईप) लागू शकतात ... चोच्या सारखा याम केला तर आपली बॉडी खेकड्यासारखी (विषम) होऊ शकते ह्याकडे लक्ष द्यावे !
अतिअवांतर : लेखात आमचं णाव पाहूण अंमळ गुदगुल्या झाल्या !

पुरूषांसाठी आयडल 'शेप' म्हणजे 'V'.(पुन्हा 'टारझन' चे उदाहरण्.त्याचा 'बॅक पोझ' मधला फोटो पाहीला होता मिपा वर्.परफेक्ट 'शेप'.मस्त रे गड्या.)
एवढा आयडल नाय ... 'V' नसला तरी 'W' आहे ..
(हौशी बिल्डर) टार्नोल्ड शिवाजीनगर
::: तुझा फोटू कुढय रे ?
19 Dec 2008 - 12:42 am | चतुरंग
तुझा शेप खरंच V आहे की. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
एरवी इथे मी बरेच लोक्स उलट्या V सारखे बघतो! ;)
चतुरंग
19 Dec 2008 - 12:35 am | चतुरंग
व्यायाम का करायचा आहे हे नक्की असावे. इतर जिमेकर्यांशी तुलना करु नये. प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते.
अजुन एक बाई आहे(चांगली जाडजूड आहे). एके दिवशी ती चक्क कॅमेरा घेवुन आली आणी ट्रेनर ला म्हणाली कि माझा ट्रेड मिल वर धावताना फोटो काढ. आता तीला तो फोटो कोणाला प्रुफ म्हणुन दाखवायचा होता कोणास ठाउक?
हे खासच!
अहो ट्रेडमिल वाल्यांच्याच जाहिरातीत द्यायचा असेल तिला फोटू. "आमच्या ट्रेडमिलवर आम्ही बघा केवढे वजन घेऊ शकतो, म्हणून!" ;)
चतुरंग
19 Dec 2008 - 1:38 am | संदीप चित्रे
'सातत्य' हा व्यायामाचा स्थायीभाव आहे आणि कुठल्याही स्थायीभावाचा आमच्या ठायी अभाव आहे. :) :)
अधिक काय सांगावे.
(अवांतरः आपल्याला भेटल्यानंतर ' उलटा V' ही आयडिया रंग्याच्या डोक्यात आली असेल काय ? :? )
19 Dec 2008 - 10:02 am | सहज
आमीरखान ने घाझनी [का घाजीनी?] केलेली मेहनत
येथे व्हिडिओ पहा
19 Dec 2008 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
(सहजकाका, व्हीडीओ चालत नाही आहे.)
लेख मस्तच! उपयुक्त माहिती आहेच.
पाणी प्यायल्याने वजन जास्त दिसतं हे तर अनेक ट्रेनर्सनाही समजत नसावं. माझ्या वजनात २०० ग्रॅमचा फरक म्हणजे ०.४%चा फरक आहे आणि तो नगण्य आहे, त्यामुळे माझी काळजी करु नये किंवा मी प्रोटीन सप्लिमेंट्स खाणार नाही, मला पीळदार स्नायू नको आहेत, मला फक्त व्यायामासाठी व्यायाम करायचा आहे यावरुन मी माझ्या जिममधल्या डाएटीशनशी वाद घातल्याचं स्मरतं!
(कोकच्या अर्धा आणि दीड बाटलीच्या मधली) अदिती
19 Dec 2008 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे
आरे आमचे गुंडोपंत कुठे गेले? त्यांच्याकड जिमचे लई किस्से असनार?
प्रकाश घाटपांडे
19 Dec 2008 - 10:20 am | मैत्र
अजुन एक चुकीचा समज आहे कि नुसत्या 'सिट अप्स' मारल्या तरी पोट कमी होते.एखाद्या भागावरील 'फॅट' कमी करणे हे आपल्या हाथा मधे नसते.
तुम्हाला क्रंचेस म्हणायचं आहे का?
आणि बरेचदा शरीराच्या इतर भागांच्या मानाने पोट जरा जास्त असतं ( जरा ... पोलिसासारखं किंवा पुलंच्या टेलरकडे आलेल्या माणसासारखं नाही - त्याला ओळंबा लावावा तसा टेप लावतात.)
तेव्हा क्रंचेस ने उपयोग होतो असा माझा समज आहे. जिम बद्दल इतकी तपशीलवार माहिती नाही.
अनुभवी आणि माहितगार लोकांनी थोडी भर घालावी..
ता.क. : लिफो चा उगम कॉस्टिंग आहे .. आय टी मध्ये त्याच संदर्भाने वापरतात...
19 Dec 2008 - 11:32 pm | एक
ताकद वाढेल आणि ते स्नायू पुढे आलेलं पोट आत खेचायला मदत करू शकतील.
पण त्याने चरबी नाही वितळणार.
क्रंचेस आणि सिट-अप्स ने मसल्स नक्की डेव्हलप होतील पण वरच्या चरबीच्या थरामुळे दिसणार नाहीत.
प्रमाणाबाहेर क्रंचेस आणि सिट-अप्स मारल्यातर लोअर बॅक आणि मानेची दुखणी जडतील.
19 Dec 2008 - 10:46 am | सखाराम_गटणे™
मस्तच,
अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात.
फुले शु
----
सखाराम गटणे
19 Dec 2008 - 11:05 am | विसोबा खेचर
हम्म!
जिम, व्यायाम, योगासनं वगैरे.. बापरे..!
सगळे विषय आमच्या अवाक्याबाहेरचे आहेत..! :)
योगापेक्षा भोग मोठे आहेत हेच आमचे ठाम मत आहे..!
बाकी चालू द्या..
तात्या.
19 Dec 2008 - 6:05 pm | विनायक प्रभू
एकदम पटले बॉ.
19 Dec 2008 - 7:54 pm | ब्रिटिश
भिडू
जल्ला मटनं आनी कालवनं खाउन मना जरा जास्तच चरबी चडलीय र
चरबी ऊतरवन्या साटी डायेट न यायाम सांगशील क र
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
20 Dec 2008 - 6:21 am | स्वानन्द
>>एखाद्या भागावरील 'फॅट' कमी करणे हे आपल्या हाथा मधे नसते. ते शरीर स्वताचे स्वतः ठरवत असते.
एकदम सहमत!
बाकी मलाही वातलं होतं की तुम्ही जिम मधले किस्से सांगणार...पण एकूणच लेख अगदी माहितीपूर्ण होता.
आपल्यापैकी कित्येकांना यातील थोडीफार माहीती इकडून तिकडून कळलेली असते पण त्याच बरोबर इतरही कचरा माहिती असते.. त्यामुळे कित्येक वेळा खरं काय आणि खोटं काय असा संभ्रम पडतो... पण या लेखामुळे बरेच गैर्समज नक्कीच दूर होतील.
माझ्याबाबत सांगायचं तर... मला रोज जिम ला जाणं शक्य नाही होत. कारण एकाच जागी स्थिर नसणे हा नोकरीचा स्थयी भाव. शिवाय जिम ल गेलो की fat loss पेक्षा muscle building कडे कल झुकतो. म्हणून सद्ध्या साथारण ३ किमी रनिंग, ६० पुश अप्स, आणि १२-३० सुर्यनम्स्कार असा माफक व्यायाम नियमीत करतो.
खास करून बैठी कामे करणारया सर्वांना मी सुचवू इछीतो की अगदी काही नाही तरी १२ सूर्यनमस्कार दररोज नक्की घाला. शरीर लवचीक राहतं. कारण शाळा कॉलेज चे दिवस संपले की आपलं साध कंबरेत वाकणं पण खूप कमी होतं आणि मग या ना त्या प्रकारची अंगदुखी सुरू होते.
असो हे आपलं माझं मत. मी कोणी तज्ञ नाहे. पण अनुभव पण बरच काही शिकवतो म्हणून आपलं थोडं सांगितलं :)
--वनी आनन्द, भुवनी आनन्द
आणि मिपा वर स्वानन्द
20 Dec 2008 - 11:36 am | अमोल नागपूरकर
छान लिहिले आहे. spot reduction शक्य नसते. body frame (large, medium or small) कसे ओल्हखत असतात ?
20 Dec 2008 - 11:56 am | भिडू
ते मला ही माहित नाही पण जेव्हा गुगलुन बघीतले तेव्हा मला हे सापडले.
http://www.ehow.com/how_4517938_identify-frame-size-elbow-measurement.html
20 Dec 2008 - 8:34 pm | नि३
आमीरखान ने घाझनी [का घाजीनी?] केलेली मेहनत
त्या चित्रपटाच नाव घजनी (ghajini) अस आहे.
---(आमिर खान चा एसी ) नि३.