आमच्या जिम मधे (म्हणजे माझी नाही, मी ज्या जिम ला जातो ती) एक से एक नमुने आहेत. एक मुलगा आहे त्याच्या सर्व वस्तू ब्रॅंडेड असतात्,त्याचे कपडे,शूज सोडा,घाम पुसायचा नॅपकिन पण 'नाईके' चा आहे. त्या मानाने व्यायाम यथातथाच करतो. दुसरा एक जण तर पुर्ण नटुन थटुन येतो.डोक्याला हेड बँड(केस डोळ्यावर येतात म्हणॅ),हाथाला रीस्टबँड,कानात आयपॉड्,हाथात ग्लोवस्,पायाला नी पॅड्.(नशीब abdomen guard, चेस्ट पॅड घालुन येत नाही ते).अजुन एक बाई आहे(चांगली जाडजूड आहे). एके दिवशी ती चक्क कॅमेरा घेवुन आली आणी ट्रेनर ला म्हणाली कि माझा ट्रेड मिल वर धावताना फोटो काढ. आता तीला तो फोटो कोणाला प्रुफ म्हणुन दाखवायचा होता कोणास ठाउक.
काही नवीन मेंबर तर जॉईन करुन एक आठ्वडा झाला नाहितर आरश्यात बघुन न पडलेले बायसेप्स/ट्रायसेप्स चे कट्स बघत असतात. काहिजण व्यायामातले 'सेट्स' करायचे सोडुन पोरी 'सेट' करायला बघतात.आजुबाजुला मुलगी असेल तर बाहेर आलेली पोटे,श्वास रोखुन,आत खेचुन घेतात,वजने जास्त उचलायला बघतात किंवा ट्रेड मिल वर चार पावले जास्त धावतात्.काही जण जिम मधल्या आरशांचा पुरेपुर उपयोग करुन्(म्हणजे 'Angle' सेट करुन व्यायाम करतात).
काही जण व्यायाम करुन खाली जावुन गाड्यांवर जंक फुड खात बसतात्.काही जणांचे म्हणणे असते कि एक दिवस खाल्ले तर काही फरक पडत नाही.एव्हढेसे खाल्याने काय होते. ही वाक्यं ज्यांची वजने ऑल रेडी कंट्रोल मधे आहेत/बॉडी 'शेप' मधे आहेत त्यांच्या साठी ठीक आहेत्.पण जर तुम्ही आधीच 'ओवर वेट' आहात किंवा 'ऑउट ऑफ शेप' आहात तर तुम्हाला स्वतावर कंट्रोल ठेवणे भाग आहे.क्रिकेट च्या भाषेत सांगायचे म्हणजे जर 'Required RunRate' आवाक्यात किंवा कमी आहे तेव्हा एखादि ओवर मेडन गेली तर फार फरक पडत नाहि.पण 'Required RunRate' आधीच हाथाबाहेर आहे तर तुम्हाला एक बॉल ही 'डॉट' जाणे महाग पडू शकते.
जिम / व्यायामाच्या बाबतित लोकांचे खूप चुकीचे समज आहेत. (डाएटींग च्या बाबतीत तर एव्हढे चुकीचे समज आहेत कि त्या साठी वेगळा लेख लिहायला लागेल.)
जेव्हा तुम्ही जिम मधे प्रवेश घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला तुमचा उद्देश विचारला जातो.त्या नुसार तुमचा 'वर्क ऑउट" ठरवला जातो.पण काही जण स्वताच्या उद्देशा बाबत अनिभिज्ञ असतात कि विचारायला नको.जिम मधे येणारी माणसे दोन प्रकाराची असतात. एक बारीक होण्यासाठी,आणी दोन बॉडी बनवण्यासाठी.
आता पहिल्या प्रकारच्या लोकांना उद्देश विचारला तर ते 'वेट लॉस' असे सांगतात्.पण 'वेट लॉस' आणी 'फॅट लॉस' या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत हे त्याना माहीत नसते.'वेट लॉस' करणे अतिशय सोपे आहे.अहो जर तुम्ही दिवसभर पाणी न पिता राहलात आणी मग वजन केलेत कि झाले 'वेट लॉस' त्या साठी जिम ला जायची काय गरज?'वेट लॉस' मधे तुमच्या वजना बरोबर शरीरातिल 'मसल्स' पण कमी किवा कमजोर होतात्.जे हानीकारक असते.'वेट लॉस'मधे तुमचे वजन कमी होते पण तुम्हाला हवा तसा शरीराला 'शेप' मिळत नाही. या उलट 'फॅट लॉस' मधे शरीरातली अतीरिक्त चरबी कमी केली जाते ज्या मुळे शरीराला हवा असलेला 'शेप' मिळतो.
काही जण या साठी 'सोना बेल्ट' सारखे चुकिचे प्रकार वापरतात. अशा प्रकारामुळे पुढे नुकसानच जास्त होते.काही तथाकथीत कंपन्या 'वेट लॉस' च्या नावाखाली गंडवतात्.पायाला,पोटाला,कंबरेला वायरी लावुन झोपायला सांगतात ३०-४० मिनीटें. नतंर लघवी करुन यायला सांगतात.आणी मग वजन करतात.आता सहाजिकच लघवी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आणी तुम्हाला वजन कमी झाल्यासारखे वाटते.(शरीरातील पाण्याचे वजन आपल्याला वाटते त्या पेक्षा अधिक असते) काही प्रमाणात वजन कमी होते ही पण जेवढे ते भासवतात तेवढे तर नक्कीच नाही.
अजुन एक चुकीचा समज आहे कि नुसत्या 'सिट अप्स' मारल्या तरी पोट कमी होते.एखाद्या भागावरील 'फॅट' कमी करणे हे आपल्या हाथा मधे नसते. ते शरीर स्वताचे स्वतः ठरवत असते.त्यामुळे कुठलाही एका अवयवा साठी व्यायाम केला तर त्या अवयवावरील 'फॅट' कमी होतात हा समज चुकिचा आहे. उलट अशा प्रकारामुळे त्या अवयवाचे 'मसल्स' घट्ट होउन बेढ्ब( बाकिच्या शरीराच्या मानाने) दिसायला लागते.सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे समजा तुम्ही एका वर एक असे १० शर्ट घातले आहेत आणी तुम्हाला पोटाचा भाग कमी करायचा आहे तर तुम्ही तेव्हढाच भाग कापू नाही शकत. तुम्हाला एक एक करुन पुर्ण शर्ट काढायला लागतात.शरीराचे पण तसेच आहे. तुम्हाला पुर्ण शरीराचा व्यायाम करावा लागतो.शरीर फॅटस कमी करताना आय्.टी . वाल्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे LIFO(Last In First Out) प्रमाणे कमी करते.
बॉडी बनवरया मधे पण दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपल्या 'भीम रूपी महारूद्रा' 'टारझन' प्रमाणे(बॉडी बील्डर).दोन म्हणजे 'लीन बॉडी'(मॉडेल टाईप,जॉन अब्राहीम टाईप)तुम्ही जर सुरवातिलाच स्पष्ट केलेत तर त्या प्रमाणे ट्रेनर तुम्हाला ट्रेन करु शकेल.
इथे सुध्धा काही लोंक झटपट बॉडी बनवण्यासाठी पावडर्/गोळ्या घेतात. पण त्याचे दीर्घ कालीन परिणाम त्यांना माहीत नसतात.
पुरूषांसाठी आयडल 'शेप' म्हणजे 'V'.(पुन्हा 'टारझन' चे उदाहरण्.त्याचा 'बॅक पोझ' मधला फोटो पाहीला होता मिपा वर्.परफेक्ट 'शेप'.मस्त रे गड्या.)
स्त्रीयांसाठी आयडल 'शेप' म्हणजे 'कोक बॉटल' फिगर(१.५ लीटर ची नव्हे). हे प्रमाण ३६-२४-३६ असेच असायला पाहिजे असा काही नियम नाहि. प्रत्येकिच्या उंची नुसार हे प्रमाण बदलत असते. पण 'शेप' मात्र 'कोक बॉटल' हवा.
तुम्ही 'फिट' आहात कि नाही किंवा तुम्हाला व्यायामाची गरज आहे कि नाही हे ठरवण्या साठी काही निकष आहेत.
१)बॉडी मास ईंडेंक्स(BMI):- हे काढण्यासाठी सोपा 'फॉर्मुला'
तुमचे वजन्/(तुमची उंची(मीटर मधे)*तुमची उंची(मीटर मधे)). याचे उत्तर १८ ते २५ च्या मधे आले तर तुम्ही नॉरमल आहात.
१८ च्या खाली आले तर 'अंडर वेट' आणी २५ च्या पुढे आले तर 'ओवर वेट'
उदा. ७०/(१.७५*१.७५) =२२.८ नॉर्मल
२)वेस्ट हीप रेशो= वेस्ट/हीप . पुरूषांसाठी हे प्रमाण .९५ किंवा त्या पेक्षा कमी तर स्त्रीयांसाठी हे प्रमाण .८० किंवा त्या पेक्षा कमी असले तर चांगले.
३)फॅट %= हे प्रमाण काढायला वेगळे उपकरण लागते. किंवा बरीच आकडे मोड करावी लागते.(माहीती साठी: जॉन अब्राहीम चे फॅट % १० आहे. त्यामुळे आपल्या सारख्या लोकांचे १५-१६ असले तरी चालते.
सध्या इथेच थांबतो. बाकिचे पुन्हा कधीतरी.....
- भिडू
वाचने
8702
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
नविन विषय
असेच म्हणतो
In reply to नविन विषय by रामदास
बी एम आय आणि इतर रेश्योज..
>>बी एम आय,
In reply to बी एम आय आणि इतर रेश्योज.. by एक
फॅट पेशी?
In reply to बी एम आय आणि इतर रेश्योज.. by एक
परफेक्ट
In reply to फॅट पेशी? by चतुरंग
मी फॅट सेल्स या उद्देशाने तो शब्दप्रयोग वापरला होता.
In reply to फॅट पेशी? by चतुरंग
समजले. धन्यवाद एक!
In reply to मी फॅट सेल्स या उद्देशाने तो शब्दप्रयोग वापरला होता. by एक
छान लेख
टंकलेखन सहाय्य
In reply to छान लेख by स्वातीदेव
अनुस्वार
In reply to छान लेख by स्वातीदेव
मस्त रे
मस्त रे टारु!
In reply to मस्त रे by टारझन
छान लेख आहे!
उत्तम लेख
लेख आवडला.
व्हीडीओ चालत नाही.
In reply to लेख आवडला. by सहज
आरे आमचे गुंडोपंत
सिट अप्स
क्रंचेस आणि सिट्-अप्स ने पोटाचे स्नायुंची
In reply to सिट अप्स by मैत्र
मस्तच, अगदी
हम्म! जिम,
पटले बॉ
In reply to हम्म! जिम, by विसोबा खेचर
भिडू जल्ला
>>एखाद्या
उत्तम लेख
ते मला ही
In reply to उत्तम लेख by अमोल नागपूरकर
आमीर खान..