चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Aug 2023 - 8:25 am

चांद्रयान

देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.

"आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना,
दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना
दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना
एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को',
फिरसे बनाओ चांद्रयान तीन को"....

घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला
मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला

गोठले शब्द ओठी,श्वास काही रोखले
श्रमसाफल्य पाहता,मनोमनी सुखावले

पाहून विक्रमास, तो चंद्र गाली हासला
लेवूनी तिरंग्यास तो धन्य धन्य जाहला

मिशन फत्ते जाहले,स्वप्न त्यांचे भंगले
रुस हो या अम्रीका,हात चोळीत बैसले....

मामासवे बाळकाचे ('प्रग्यान') ते दुडूदुडू धावणे
पाहूनी आभाळ ठेंगणे,
मुदित झाले देशवासी,
डोळा पाणी दाटले.....
२४-८-२०२३

ट्रम्पफ्री स्टाइलमुक्त कवितारोमांचकारी.कवितामुक्तक

प्रतिक्रिया

अनिता's picture

24 Aug 2023 - 6:08 pm | अनिता

चांद्रयान 3 चे लँडिंग बघताना माझ्या डोळे वारंवार आन॓दाश्रु॑नी भरुन येत होते.

Trump's picture

24 Aug 2023 - 7:14 pm | Trump

छान कविता.
खरे तर चंद्रयानाने केलेली गोष्ट खुप मोठी नाही. अमेरीकेची माणसे चंद्रावर जाऊन आली आहेत.
पण भारतीयांनी ज्या अडचणींना तोंड देऊन अत्यंत तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर आधारीत ते केले आहे त्याचे खरे कौतुक आहे. पाशात्य देशांनी अगदी प्रत्येक गोष्टीत अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. अतिशीत इंजिनेचे उदाहरण सगळ्यांना ज्ञातच असेल. (श्री बायडेन त्यात सगळ्यात पुढे होते.)

चौकस२१२'s picture

25 Aug 2023 - 8:20 am | चौकस२१२

जागतिक स्पर्धेत असे मोडते घातले जाताचच , प्रत्येक देश त्याच्या कुवती प्रमाणे करतो ... आणि कधी मदत हि ( अमेरिकेने ऑस्ट्रेल्या वर पूर्वी दबाव आणला होता कि भारताला अणू उर्जे साठी लागणारे युरेनियम तुम्ही भारताला द्या म्हणून )
https://www.smh.com.au/national/pressure-mounts-on-uranium-sales-to-indi...

त्यामुळेच अत्यंत तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर आधारीत ते केले आहे त्याचे खरे कौतुक आहे. .. पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... "
आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि .

यात कोनता ही मनाचा कोते पणा दाखवू नये ( कि जे काही प्रसिद्ध राजकारणी दाखवत आहेत )
याना हे हि काळात नाही कि आज चीन जसा होतोय तसा भारत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतोय ... पण यानां का कडू तोंडाने बोलावेसे वाटते कोण जाणे

( स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये स्पर्धा वाढली ...भारत आता त्यातील एक महत्वाचाच खिलाडू झाला आहे ,, हेवा वाटतो भारताचा आमच्या देशाची जगातील ११ वि आर्थिक मोठी उलाढाल असलेली अर्थवयवस्था असली तरी येथे असे काही यान वैगरे उपक्रम होण्याची शक्यता नाही ..हायला गाड्या पण बनत नाहीत तर चांद्रयान कुठलं बनवतोय पण येथून अंतराळातील संदेश दळणवळ यासाठी दक्षिण गोलार्धात काही मोक्याच्या जागा आहेत ( वूमेरा / पाईन गॅप ) त्यासाठी आम्ही धडपड करणार ,, ,)

त्यामुळेच भारताचे कौतुक .. पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... "
आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि .

यात कोनता ही मनाचा कोते पणा दाखवू नये ( कि जे काही प्रसिद्ध राजकारणी दाखवत आहेत )

इसरो मध्ये भारतीय खाजगी उद्योग हि सामील असणारच जसे कि टाटा / गोदरेज टूल रूम - अतिप्रगत उत्पादन साठी ( पूर्वीचं गुपित माहिती वर आधारित !)

पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... "
आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि .

याहु बातम्या, आरटी, फेसबुक, टिव्टर इ. सारख्या समाज माध्यमावरील गोर्‍यांच्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. बहुतेकजणांना भारताचे यान यशस्वीरीत्या पोचल्याचे आवडले नाही. त्यामुळे त्यांचा भारतीय आणि हिंदुद्वेष उफाळुन आला आहे.

येथेही एका मिपाकराने २४ तास पुर्ण व्ह्यायच्या आता इस्त्रोच्या लोकांनी फसवले असा आरोप खरडफळ्यावर केला.

उन्मेष दिक्षीत's picture

27 Aug 2023 - 10:10 pm | उन्मेष दिक्षीत

हाहाहा आता मात्र हद्द झाली

हिंदुद्वेष कुठून काढला , लॉल

समयोचित कविता आवडली पण आमचे 'सामान्य ज्ञान' अगदीच तोकडे असल्याने काही संदर्भ समजले नाहीत. उदा. "मामासवे बाळकाचे ('प्रग्यान') ते दुडूदुडू धावणे" यातला मामा कोण, 'प्रग्यान' कोण? "देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले" मधील 'पंडित' कोण, वगैरे.

कर्नलतपस्वी's picture

25 Aug 2023 - 5:53 am | कर्नलतपस्वी

चांद्रयान दोन अयशस्वी झाले .शास्त्रज्ञांचे चेहरे पडले. मा. प्रधानमंत्र्यांनी त्यांना धीर देत पुन्हा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. हे पहिल्या व दुसर्‍या कडव्यात सांगीतले आहे. तर पंडित म्हणजे शास्त्रज्ञ गेयता वाढविण्यासाठी वापरला आहे.

प्रतिसादाबद्दल आभार.

इन्दुसुता's picture

25 Aug 2023 - 3:51 am | इन्दुसुता
इन्दुसुता's picture

25 Aug 2023 - 3:57 am | इन्दुसुता

चांद्रयान मोहीम फत्ते झाल्याबद्दल इस्त्रो, चांद्रयान टीम आणि तमाम भारतियांचे अभिनंदन !

अतिशय आनंद झाला. खूप अभिमानाची गोष्ट आहे.
मिपावर इतर कुठे लिहिलीले दिसले नाही यावर म्हणुन इथेच लिहिले.

@चित्रगुप्त

मामासवे= आपला चांदोमामा हो
बाळकाचे ('प्रग्यान': रोव्हर
फक्त ते ते दुडूदुडू धावत नाहीये, १ सेमी मिनिटाला अशी गती आहे

कर्नलतपस्वी's picture

25 Aug 2023 - 6:58 am | कर्नलतपस्वी

आज रांगते आहे. उद्या धावेल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

द. धृवावर सूर्यप्रकाश थोडे तास आडवा पडतो त्यासाठी सोलर पॅनेल उभे लावले आहे. त्यातून बॅटरीत वीज भरून वापरायची आहे. हेच कारण आहे चंद्रावर अधिक प्रकाशाच्या विषुववृत्तावर यान उतरवतात. पण पाणी असले तर ते धृवांवर गोळा होणार म्हणून तिकडे उतरवले. तर तिकडे रोवर उतरवून फिरवणे हे ८०% काम झाले आहे.

कविता नेमकी झाली आहे.

कुमार१'s picture

27 Aug 2023 - 5:32 pm | कुमार१

छान कविता !

उन्मेष दिक्षीत's picture

27 Aug 2023 - 9:50 pm | उन्मेष दिक्षीत

फक्त स्वप्नासाठी ९०० कोटी मोजले

कर्नलतपस्वींचे चंद्रयान , फक्त फोटो काढत राहीले…