चांद्रयान
देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.
"आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना,
दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना
दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना
एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को',
फिरसे बनाओ चांद्रयान तीन को"....
घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला
मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला
गोठले शब्द ओठी,श्वास काही रोखले
श्रमसाफल्य पाहता,मनोमनी सुखावले
पाहून विक्रमास, तो चंद्र गाली हासला
लेवूनी तिरंग्यास तो धन्य धन्य जाहला
मिशन फत्ते जाहले,स्वप्न त्यांचे भंगले
रुस हो या अम्रीका,हात चोळीत बैसले....
मामासवे बाळकाचे ('प्रग्यान') ते दुडूदुडू धावणे
पाहूनी आभाळ ठेंगणे,
मुदित झाले देशवासी,
डोळा पाणी दाटले.....
२४-८-२०२३
काव्यरस
वाचने
7045
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप छान.
छान कविता.
जागतिक स्पर्धेत असे मोडते
In reply to छान कविता. by Trump
त्यामुळे त्यांचा भारतीय आणि हिंदुद्वेष उफाळुन आला आहे.
In reply to जागतिक स्पर्धेत असे मोडते by चौकस२१२
येथेही एका मिपाकराने २४ तास
In reply to त्यामुळे त्यांचा भारतीय आणि हिंदुद्वेष उफाळुन आला आहे. by Trump
Trump
In reply to त्यामुळे त्यांचा भारतीय आणि हिंदुद्वेष उफाळुन आला आहे. by Trump
समयोचित कविता आवडली पण काही संदर्भ समजले नाहीत.
@चित्रगुप्त जी
In reply to समयोचित कविता आवडली पण काही संदर्भ समजले नाहीत. by चित्रगुप्त
चांद्रयान मोहीम फत्ते
चांद्रयान मोहीम फत्ते
सहमत
In reply to चांद्रयान मोहीम फत्ते by इन्दुसुता
द. धृवावर सूर्यप्रकाश थोडे
In reply to चांद्रयान मोहीम फत्ते by इन्दुसुता
वा !
उत्तर