अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
20 Jul 2023 - 11:12 am
गाभा: 

अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३
(महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पावसाच्या दुर्घटनांसाठी चर्चा धागा.)
हल्ली काही वर्षांत पावसाळा सात जूनला सुरू होत नाही आणि मग एक जुलैच्या आसपास मान्सूनचे ढग गोळा होतात. पाऊस एक तर वेळेवर येत नाही आणि मग चिडून आल्यासारखा कोसळतो.
मागच्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रचंड पाऊस अगदी थोड्या तासांत कोसळून पूर आले. तेवढे पाणी जलद नदीमधून वाहून जात नाही आणि शहरांतील सखल भागांत घुसते. तेच झाले आणि दिल्ली यमुनेच्या पाण्यात बुडून आहे. पाणीच पाणी चहूकडे आणि पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था झाली. कारण पाणी शुद्धीकरण संयंत्रे बुडाली आहेत.
महाराष्ट्रात
लोणावळ्याच्या डोंगरात पाऊस झाला की नागोठाणेची अंबा नदी वाहाते. महाबळेश्वर डोंगररांगेत पाऊस झाला की
महाडची सावित्री, खेडची जगबुडी,चिपळूणची वासिष्टी तिकडची शहरे बुडवतात. कोयनेचं बरंच पाणी धरणात साठवलं जातं आणि मोठा धोका टळतो.

इर्शाळवाडीवर दरड कोसळली.

काल (१९-२० जुलैची रात्र साडे अकराची वेळ )मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल खोपोली रस्त्यावर चौक स्टेशन/मोरबे धरणाजवळ असलेल्या इर्शाळगड नावाच्या डोंगरपायथ्याजवळ असलेल्या इर्शाळवाडीच्या घरांवर बाजुचा मोठा डोंगर कोसळला आणि बरीच घरे (५०+) माती खाली गाडली गेली आहेत. दबलेल्या लोकांस काढायचे काम करण्यासाठी बरीच पथके आली आहेत. मंत्रीही हजर आहेत. जीवितहानी कमी होवो ही अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया

सकाळपासून इर्शाळवाडी कव्हरेज बघत आहे टिव्हीवर. जे नातेवाईक गावाकडे परतून पायथ्याशी वाट बघत आहेत त्यांची मानसिक अवस्था भयंकर आहे. त्रासदायक. पोलिस / मदत यंत्रणा वर जाऊ देत नाहीत (जे योग्य आहे) आणि वरची परिस्थिती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येत नाहीये. उलट सुलट बातम्या नुसत्या येताहेत. असहाय्य अनिश्चित परिस्थिती.

गाडले गेलेले अनेक लोक अजून ढिगाऱ्याखालीच आहेत. ढिगारे उकरण्यासाठी अत्यंत मर्यादित उपकरणे आहेत. हातांनी ढिगारे उकरले जात आहेत.

एक स्त्री रडत होती की तिची तीन लहान मुले आणि पूर्ण कुटुंब वर आहे. काही खबरबात कळत नाहीये. आम्हाला वर तरी जाऊ द्या.

विवेकपटाईत's picture

20 Jul 2023 - 12:04 pm | विवेकपटाईत

दिल्लीचा फक्त एक थोडासा भाग जो लाल किल्ल्याचा मागे आहे आणि डूब क्षेत्रात असलेल्या अवैध कालोनी. बाकी गेल्या दहा वर्षात
बहुतेक वजीराबाद आणि आयटीओ मधल्या भागात यमुनाची खुदाई ( वाळू उपसा) झालेली नाही त्याचा परिणाम. बाकी कुठेही पाणी साचलेले नाही.

चौथा कोनाडा's picture

20 Jul 2023 - 12:13 pm | चौथा कोनाडा

खुप दुर्दैवी आहे ही घटना. दुर्घटना स्थळी क्रेन जेसीबी जाऊ शकत नाहीत, मदतकार्यात प्रचंड मर्यादा येत आहेत.

मा. मुम & उपमुम स्वतः जातीने लक्ष घालत आहेत ही दिलासा देणारी बाब आहे.
ज्यांचे नातेवाईक दगावले आहेत त्यांना अर्थिक मानसिक मदत पोहोचणेअ त्यंत गरजेचे आहे आहे.

आलो आलो's picture

20 Jul 2023 - 2:13 pm | आलो आलो

इर्शाळवाडीच्या घरांवर बाजुचा मोठा डोंगर कोसळला आणि बरीच घरे (५०+) माती खाली गाडली गेली आहेत.

ईश्वर सर्वांना शक्ती देवो .
मृतात्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली !

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jul 2023 - 4:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईर्शाळला जाताना मोरबे धरणाच्या बाजुने वसलेली ही वाडी वाटेत लागतेच. पण ही काही डोंगर फोडुन झालेली वस्ती नव्हे, पूर्वापार राहणारे आणि नाचणीची शेती (आणि काही प्रमाणात हातभट्टी) करुन राहणारे आदिवासी आहेत. हा डोंगर ईतका ठिसुळ वाटत नाही. दरड कोसळायला काय कारण असावे? लोकांना लवकर मदत मिळो हीच प्रार्थना.
दुसरा मुद्दा--

केजरीवाल म्हणतो हरियाणा सरकारने हथनीकुंड बॅरेज मधुन अचानक पाणी सोडले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा निवडणुकीवर डोळा ठेवुन केलेला डाव आहे. वस्तुतः बॅरेजच्या दोन्ही कालव्यांची मिळुन २५ हजार क्युसेक पाणी वाहुन नेण्याची क्षमता आहे, आणि सध्या विसर्ग १ लाख क्युसेक एव्हढा चालु आहे. त्यामुळे पूर येणारच होता. दुसरीकडे नदीपात्रात अतिक्रमण करुन गेल्या दहा वर्षात जे बंगले(त्यात मंत्र्यांचे बंगलेही आले) उभे राहीलेत त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. सॅटेलाईट इमेजवरुन ते स्पष्ट दिसते आहे. मुंबईतही काही वेगळी स्थिती नाही, केवळ सगळे पाणी वाहुन न्यायला समुद्र आणि खाड्या आहेत म्हणुन चालले आहे. तरीही पाउस आणि भरती एकदम आली की काय होते सर्वांना माहीत आहे.

दिल्लीच्या एका मित्राशी बोलत होतो. केजरीवाल सरकारने निवडणुकीच्या मतांवर डोळा ठेवुन बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांचे जे फालतू लाड चालवले आहेत, त्याने एक एक परीसर गलिच्छ होतो आहे, जिकडे तिकडे फूटपाथवर टपर्‍या टाकुन उद्योग धंदे सुखैनैव सुरु झाले आहेत. काही काही परीसर तर पाय ठेवण्याच्या लायकीचे राहीले नाहीत. हे लोक मतांपायी देश विकायला निघालेत, आणि लोक त्याची फळे भोगताहेत.

"वस्ती इथे का झाली आणि वाढली."

हल्ली कुठल्याही शहरात दोन तीन दिवसाच्या मुसळधार पावसाने पूर येण्याची हीच कारणे आहेत.
अतिक्रमण, नद्या, नाल्यांमधले भराव, आणि मुख्य म्हणजे मोकळ्या जमिनीचा अभाव ज्यामुळे पाणी जमिनीत मुरायला जमीनच शिल्लक नाही.

कर्नलतपस्वी's picture

20 Jul 2023 - 5:57 pm | कर्नलतपस्वी

पूर्वापार मानवाने मर्यादित अंतर ठेवून नदीकाठावर वस्त्या बनवल्या. लोकसंख्येत वाढ झाली मानवाने मर्यादा सोडली. स्वताच नदीपात्रात अतिक्रमण केले व बोबंड्या मारतोय.

माध्यमांना बरोबर माहीत आहे. याच कालावधीतल्या मागील वर्षातील बातम्यात हेच सर्व विषय दिसतील. या वर्षांत मुंबई तुबंई असे काही ऐकले नाही.

नेमीची येतो मग पावसाळा

कर्नलतपस्वी's picture

20 Jul 2023 - 6:17 pm | कर्नलतपस्वी

दुःखदायक आहे.मृतात्म्यास शांती लाभो.

दुर्घटना स्थळाची छायाचित्रे बघताना, भुसभुशीत मातीचा लोढां अतिवृष्टीमुळे आपली जागा सोडून खाली घसरला. . मातीला पकडून ठेवणारी झाडे,झुडपे अजीबात दिसत नाहीत. वर्षानुवर्ष डोगंराची झिज व पर्यावरणाचा नाश हेच कारण असावे. सह्याद्रीचे मातीच्या ढिगार्यात रुपांतर होत आहे काय? दुर्घटना रात्री झाल्यामुळेच जीवित हानी जास्त झाली.

हिमालय तसाच भुसभुशीत आहे. तिथे भुस्खलन फार लवकर व सतत होते. पण मानवी वस्ती त्याच्या चपाट्यात कमी वेळा येताना दिसते.