अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३
(महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पावसाच्या दुर्घटनांसाठी चर्चा धागा.)
हल्ली काही वर्षांत पावसाळा सात जूनला सुरू होत नाही आणि मग एक जुलैच्या आसपास मान्सूनचे ढग गोळा होतात. पाऊस एक तर वेळेवर येत नाही आणि मग चिडून आल्यासारखा कोसळतो.
मागच्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रचंड पाऊस अगदी थोड्या तासांत कोसळून पूर आले. तेवढे पाणी जलद नदीमधून वाहून जात नाही आणि शहरांतील सखल भागांत घुसते. तेच झाले आणि दिल्ली यमुनेच्या पाण्यात बुडून आहे. पाणीच पाणी चहूकडे आणि पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था झाली. कारण पाणी शुद्धीकरण संयंत्रे बुडाली आहेत.
महाराष्ट्रात
लोणावळ्याच्या डोंगरात पाऊस झाला की नागोठाणेची अंबा नदी वाहाते. महाबळेश्वर डोंगररांगेत पाऊस झाला की
महाडची सावित्री, खेडची जगबुडी,चिपळूणची वासिष्टी तिकडची शहरे बुडवतात. कोयनेचं बरंच पाणी धरणात साठवलं जातं आणि मोठा धोका टळतो.
इर्शाळवाडीवर दरड कोसळली.
काल (१९-२० जुलैची रात्र साडे अकराची वेळ )मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल खोपोली रस्त्यावर चौक स्टेशन/मोरबे धरणाजवळ असलेल्या इर्शाळगड नावाच्या डोंगरपायथ्याजवळ असलेल्या इर्शाळवाडीच्या घरांवर बाजुचा मोठा डोंगर कोसळला आणि बरीच घरे (५०+) माती खाली गाडली गेली आहेत. दबलेल्या लोकांस काढायचे काम करण्यासाठी बरीच पथके आली आहेत. मंत्रीही हजर आहेत. जीवितहानी कमी होवो ही अपेक्षा आहे.
वर्गीकरण
वाचने
3152
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सकाळपासून इर्शाळवाडी कव्हरेज
दिल्लीचा फक्त एक थोडासा भाग
खुप दुर्दैवी आहे ही घटना.
श्रीराम समर्थ !!!
इर्शाळवाडीच्या घरांवर बाजुचा मोठा डोंगर कोसळला आणि बरीच घरे (५०+) माती खाली गाडली गेली आहेत.ईश्वर सर्वांना शक्ती देवो . मृतात्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली !दुर्दैवी घटना!!
याबाबत एक वेगळा धागा काढीन.
In reply to दुर्दैवी घटना!! by राजेंद्र मेहेंदळे
हल्ली कुठल्याही शहरात दोन तीन
In reply to दुर्दैवी घटना!! by राजेंद्र मेहेंदळे
सहमत
दुर्घटना