ओटीटीला मराठीत ......

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in काथ्याकूट
29 Mar 2023 - 5:38 pm
गाभा: 

मनोरंजन क्षेत्रात आताचे युग OTT चे युग आहे. ओटीटी हा शब्द मनोरंजन विश्वात पावलो पावली वापरला जातो.   
वृत्तपत्रे, मासिके, छापील माध्यमे तसेच आंतरजालीय विश्वात देखील ओटीटी या शब्दाने धुमाकूळ घातलेला आहे.  

ओटीटी या शब्दाला योग्य मराठी शब्द अद्याप वाचण्यात ऐकण्यात आलेला नाहीय.
ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन ( किंवा पलीकडे) अर्थात satelite लाही वरताण असे मनोरंजन/ माहितीरंजन बीन तरी यंत्रणेने चलाखीने ( smart) वेगवान पद्धतीने देतो. 

OTTCHARCHA

तर, OTT ला खालील पैकी कोणता शब्द चपखल वाटतोय?

१. वरतून मंच 
२. वरताण माहितीरंजन 
३. उच्चरंजन मंच 

अर्थात याचे लघुरूप म्हणून (काळाची गरज) वरतून, वरताण, उच्चरंजन असे शब्द आपण मराठीत रुळवू शकतो.
तुम्हाला दुसरा कुठला योग्य शब्द माहित असेल, सुचत असेल तर तो प्रतिसादात नक्की लिहा. 

प्रतिक्रिया

आंतरजालावर आधारित आणि अद्याप तरी फार भौगोलिक किंवा सेन्सॉर निर्बंध नसलेलं असं हे नवीन विश्व असल्याने त्याला जालरंजन किंवा मुक्तरंजन किंवा मुक्तजालरंजन असे काहीतरी म्हणता येईल. मोफत अशा अर्थाने मात्र मुक्त नव्हे.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2023 - 5:37 pm | चौथा कोनाडा

जालरंजन हे net entertainment रिप्रेझेण्ट करतंय ! सध्या वेगळ्या अर्थी वापरात असलेला शब्द.

मुक्तरंजन किंवा मुक्तजालरंजन हे शब्द सुद्धा ओटीटीचे वेगळेपण दर्शवत आहेत असं वाटत नाही.

आनन्दा's picture

30 Mar 2023 - 10:25 am | आनन्दा

जालवाहिनी

हवे तर मायाजाल वाहिनी म्हणा.
अधिक समर्पक.

सुरिया's picture

30 Mar 2023 - 12:01 pm | सुरिया

वरदान म्हणावे.
वरुन आलेले दान अशीही फोड करु. ;)

.
दिव्यदर्शन, नेत्रबह्म हे ही जरा वैदिक ऑप्शन्स आहेतच.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2023 - 5:49 pm | चौथा कोनाडा

वरदान भारी वाटतंय ! (मी सुचवलेल्या "वरतून मंच " वरताण माहितीरंजन " यांच्याशी साधर्म्य आहेच,

"वरदान मंच" म्हणायला सुरुवात केल्यास रुळेल असं वाटतंय !

उदा.
पाताललोक कुठच्या वरदानवर आहे रे ?
कांतरा आता बघणार. प्राईम वरदान वर आलाय.
लॉकडाऊन वरचा भीड फारसा खास नाहीय. काल नेट्फ्लिक्स वरदानला लावला होता, अर्ध्या पाऊण तासात बोअर झाला.

तर्कवादी's picture

30 Mar 2023 - 8:49 pm | तर्कवादी

ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन

Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन नाहीये. कारण ते इंटरनेटच्या माध्यमातुन आपण बघतो. satelite इंटरनेट उपलब्ध असले तरी ते अतिशय महागडे आहे (माझ्या माहितीप्रमाणे - जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी). आपण जे ईंटरनेट वापरतो ते मुख्यत: optic fibre वर अवलंबून आहे. याच्या केबल्स समुद्रतळातून फिरवलेल्या आहेत. satelite मधून येणारे मनोरंजन म्हणजे दूरचित्रवाहिन्या - म्हणजेच जुन्या काळचे मनोरंजन. ते आपल्यापर्यंत डिश अँटेना आणि सेट टॉप बॉक्स द्वारे पोहोचते
ओटीटी हे नाव खरेतर गंडलेले आहे. Over The Top या शब्दांतून काहीच कळत नाही. उगाचच हा शब्द माथी मारलाय.

पण या संकल्पनेत internet (माध्यम) आणि streaming (आधी डाउनलोड करण्याची गरज नसणे - थेट बघता येणे) हे तांत्रिकदृष्टीने महत्वाचे. त्या अर्थाने YouTube ही ओटीटी मग Netflix , Prime , Hotstar ई व YouTube यांत फरक काय ? तर YouTube वर कुणीही वापरकर्ते चित्रफिती टाकू शकतात आणि अपवाद वगळता YouTube कडून त्यावर काही निर्बंध नाहीत. शेकडो प्रकारातल्या चित्रफिती YouTube वर आहेत. पण Netflix वा ईतर ओटीटी आपल्या चित्रफिती स्वतः टाकतात. त्यांचे प्रकारही काही मोजकेच आहेत (मालिका, चित्रपट ई)
त्यामुळे आंतरजालीय नियंत्रित प्रवाही असे हे स्वरुप आहे. एका अर्थाने Netflix वा ईतर ओटीटी या आंतरजालीय वाहिन्याच आहेत (सॅटेलाईट वाहिन्यांप्रमाणेच पण आंतरजाल अर्थात इंटरनेटद्वारे बघता येतात) म्हणून आंतरजालीय वाहिन्या किंवा जालीय वाहिन्या असे सुटसुटीत नाव कसे वाटते ?
यात काही मोफत आहे MXPlayer सारखे तर काही अंशतः मोफत आहेत (Zee 5, Sony Liv) तर काही पुर्णतः सशुल्क आहेत (Netflix , Prime )

सागर's picture

31 Mar 2023 - 1:38 am | सागर

स्त्रोतः telestream.net
OTT (over-the-top) is a means of providing television and film content over the internet at the request and to suit the requirements of the individual consumer. The term itself stands for “over-the-top”, which implies that a content provider is going over the top of existing internet services.

ओटीटी साठी मराठी प्रतिशब्द शोधण्याची गरज नाही असे मला वाटते. शेकडो हजारो इंग्रजी शब्द आहेत ज्यांना आजही मराठीत प्रति शब्द नाहीत.

"जाळ्यावर जाळे" अशातला प्रकार आहे शीर्ष स्थानी असलेला हा ओटीटी प्लॅट्फोर्म साठी "सर्वोच्च मनोरंजन" असे काहीतरी आशयपूर्ण वापरता येऊ शकेल.

प्रदीप's picture

1 Apr 2023 - 10:03 am | प्रदीप

ओटीटी साठी मराठी प्रतिशब्द शोधण्याची गरज नाही असे मला वाटते. शेकडो हजारो इंग्रजी शब्द आहेत ज्यांना आजही मराठीत प्रति शब्द नाहीत.

अगदी. प्रत्येक परकीय भाषेतील शब्दासाठी मराठी प्रतिशब्द प्रयोजिततांना दोन बाबींचा विचार व्हावा. पहिली, ही संकल्पना मूळ कुठून आली? ती आपली, आपल्या मातीतीलच असेल, तर मग मराठी सम्बोधन असणे उचित ठरावे. दुसरी, नवा शब्द सहजपणे बहुतांश मराठी जनांच्या तोंडांत बसेल का? तर, ह्याबाबतीत आपण थोडा पूर्वेतिहास पहावा-- स्टेशन, प्लॅटफॉर्म, बस.. आसे अनेक परकीय शब्द आपण अगदी सहज रूळवून घेतलेत, त्यांना आपल्या जिभेला रूळेल असा बदल करून का होईना, तसे झालेले आहे. तेव्हा, ओ. टी. टी. जसेच्या तसे आपण मराठींत स्वीकारावयास काही अडचण नसावी.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2023 - 5:53 pm | चौथा कोनाडा

ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन

यात "OTT bypasses cable, broadcast, and satellite television platforms" असे म्हणायचे होते.

आंतरजालीय वाहिन्या किंवा जालीय वाहिन्या
ओके, पण खुप मोठा (लांब) शब्द वाटतोय

प्रदीप's picture

1 Apr 2023 - 9:57 am | प्रदीप

तुमचा प्रतिसाद बराचसा बरोबर आहे, असे ह्या क्षेत्रांत अनेक वर्षे काम केलेल्या मला वाटते.

काही तपशिलांतील :

satelite इंटरनेट उपलब्ध असले तरी ते अतिशय महागडे आहे (माझ्या माहितीप्रमाणे - जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी).

हे खरे आहे. पण हेही खरे की, ते वापरून त्यावरून व्हिडीयो लोकांपर्यंत पाठवणार्‍या ब्रॉडकास्ट कंपन्या, एका ट्रान्स्पॉन्डरवर, किती चॅनेल्स पाठवावयाची हे बर्‍यापैकी ठरवू शकतात. नव्वदीच्या दशकांत सुरू झाल्यापासून तंत्रज्ञान जसे विकसीत होत गेले, तशी ही क्षमता वाढू लागली.

पण हे थोडे अवांतर झाले. सॅटेलाईट्वरून, अथवा केबलवरून अथवा थेट लहरींतून प्रक्षेपण केले जाते ते लिनीयर ब्रॉडकास्ट पद्धतीचे आहे. म्हणजे ब्रॉडकास्टर जे जसे ठरवणार, त्याप्रमाणे, त्या त्या वेळेस तो तो कार्यक्रम 'प्रक्षेपित' केला जाणार. प्रेक्षकांना तो, बहुतांश, तेव्हाच बघावा लागणार. आणी तेही त्यांचा विवक्षीत सेट टॉपच्घा वापर करूनच. -- अर्थात, एकाच जाही, घरांत/ बारमधे वगैरे. स्ट्रीमींगमुळे आता प्रेक्षकांना, काहीही, कुठेही पहाता येते. (Anywhere, anytime).

पण या संकल्पनेत internet (माध्यम) आणि streaming (आधी डाउनलोड करण्याची गरज नसणे - थेट बघता येणे) हे तांत्रिकदृष्टीने महत्वाचे.

बरोबर, यू ट्यूबही स्ट्रीमींगच आहे, फक्त आपण लिहील्याप्रमाणे, ह्यांत कुणीही स्वतःचे कार्यक्रम यूट्यूबचा वापर करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. तांत्रिक दृष्ट्या, ह्यांत व इतर स्ट्रीमींगमध्ये फारसा प्रकर नाही. (ह्या विधानांत 'DRM' चा विचार केलेला नाही. पण तो थोडा खोलांतला फरक झाला).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2023 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरजालीय वाहिन्या बेष्ट.

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

4 Apr 2023 - 10:35 am | प्रदीप

ओ. टी. टी. हे 'वाहिनी' नव्हे. ते मुख्यत्वे व्ही. ओ. डी. आहे -- अनेक वाहिन्या स्ट्रीमींग स्वरूपांतही उपलब्ध असतात हे खरे आहे. तरीही, त्याचा मुख्य वापर व प्रसार, त्याच्या व्ही. ओ. डी. स्वरूपांत आहे.

तेव्हा त्याला, अगदी अट्टाहासाने मराठी नाव द्यायचेच तर आंतरजाल- प्रवाह, अथवा सुटसुटीत, जाल-प्रवाह जास्त उचित ठरावे.

आनन्दा's picture

6 Apr 2023 - 2:43 pm | आनन्दा

वा!!

VOD ला इच्छादर्शन म्हणायचे का?

आनन्दा's picture

6 Apr 2023 - 2:45 pm | आनन्दा

आणि OTT ला इच्छावाहिनी

प्रदीप's picture

6 Apr 2023 - 3:56 pm | प्रदीप

व्ही. ओ. डी. हे, ओ. टी. टी. ची व्यवस्था वापरून कन्झ्यूम करता येते. ओ. टी. टी. वापरून टी. व्ही. चॅनेल्स, लाईव्ह ('लिनीयर') टेलेकास्टही दाखवू शकतात, व काही तसे दाखवतात.

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2023 - 6:10 pm | चौथा कोनाडा

आंतर जालीय वाहिन्या .. हे पण छानझकास आहे.
लघुरूप : आंजावा .... थोडे स्टायलिश म्हणायचे असेल तर आंजावाही

विवेकपटाईत's picture

31 Mar 2023 - 10:02 am | विवेकपटाईत

नभोवाहिनी हे नाव उपयुक्त वाटते. छोटे आणि बोलला ही सौपे

सामान्यनागरिक's picture

31 Mar 2023 - 5:04 pm | सामान्यनागरिक

या सगळ्या वाहिन्या आंतरजालातुन येत असल्याने हा शब्द उपयुक्त वाटत नाही.
जालीय वाहिनी हाच उपयुक्त वाटतो. जालवाहिनी म्हणायला हरकत नाही

तर्कवादी's picture

2 Apr 2023 - 4:10 pm | तर्कवादी

जालीय वाहिनी हाच उपयुक्त वाटतो. जालवाहिनी म्हणायला हरकत नाही

जालवाहिनी सुटसुटीत वाटतेय.
किंवा पारंपारिक (म्हणजे गेले २०-३० वर्षे अस्तित्वास असलेल्या उपग्रह वाहिन्या ... ) वाहिन्यांपेक्षा वेगळेपण - म्हणजे केवळ तांत्रिक नव्हे तर प्रेक्षकाच्या दृष्टिने इतरही काही महत्वाचे बदल आहेत जसे निवडीला खूप वाव असणे , जाहिराती अगदी कमी अस्णे ई.. तर हे वेगळेपण अधोरेखित करायचे असेल तर वाहिनीपेक्षा प्रवाहिनी शब्द वापरु शकतो. शब्दाच्या आधी "प्र" लावल्याने अधिक प्रगत असा अर्थ ध्वनीत होईल व प्रवाह शब्दामुळे streaming हा अर्थही सामावला जाईल.
म्हणजे जाल प्रवाहिनी असा पुर्ण शब्दप्रयोग किंवा नुसतेच प्रवाहिनी असा छोटा शब्दप्रयोग करता येईल.
सरकारी पातळीवरुन एखादा प्रतिशब्द अधिकृतरीत्या स्वीकारला गेला व वापरात आला तर तो प्रचलित होतो. त्यामुळे सरकारी निर्णय गरजेचा आहे,

प्रदीप's picture

1 Apr 2023 - 9:38 am | प्रदीप

ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन ( किंवा पलीकडे) अर्थात satelite लाही वरताण असे मनोरंजन/ माहितीरंजन बीन तरी यंत्रणेने चलाखीने ( smart) वेगवान पद्धतीने देतो.

असे नव्हे.

ओव्हर द टॉप-- म्हणजे जालाच्या अस्तित्वात आसलेल्या पायाभूत सुविधांचा, जसाच्या तसा वापर करून घेऊन त्यावरून स्ट्रीम (प्रवाह) नेणे. म्हणजे, निम्न स्तरीय सुविधा (सेल नेटवर्क, ब्रॉडबँड नेटवर्क) आहेत तश्याच्या तश्या, त्यांत काहीच बदल करण्याची जरूरी न लागता, इतर डेटा (जसे की, ई- मेल्स, फाईल शेयरींग, इत्यादी पूर्वापार अस्तित्वात असलेल्या व्यवस्था) जसा त्यांजरून नेला जातो, त्याचप्रमाणे, हे स्ट्रीम्सही त्याजवरून वाहिले जातात. हे ओव्हर द टॉप (ऑफ लोव्हर लेव्हल सिस्टीम्स, प्रोव्हायडेड बाय सर्विस प्रोव्हायडर्स).

थोडे खोलांत शिरूर सांगायचे झाले तर, इतर, 'पारंपारीक डेटा' एका स्थळाहून दुसर्‍या स्थळावर नेण्यासाठी जी निम्न स्तरीय यंत्रणा (IP based) अगोदरच उभारलेली गेलेली आहे व वापरांत आहे, तिचा तसाच्या तसा वापर करून. त्यावरून व्हिडीयो स्ट्रीम नेणे. अर्थात, व्हिडीयो स्ट्रीम आता आनेक अर्थांनी, इतर डेटासारखाच झाला-- 'अवघा रंग एक झाला!'

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद. खूप गोष्टी स्पष्ट कळल्या. धन्यवाद.

असलेल्या इन्फ्राचा वापर करून, मूळ रचनेत बदल न करता नवीन कामासाठी उपयोग ही संकल्पना भारी आहे. सर्वच क्षेत्रात आज तशी आवश्यक आहे.

सर टोबी's picture

1 Apr 2023 - 11:54 am | सर टोबी

चांगली माहिती समजली. ओ टी टी ला “आंतरजालावर स्वार” असं नाव द्यायला हरकत नाही.

आपल्याकडे देखील एखाद्या गोष्टीच्या वितरणासाठी अथवा पूर्ततेसाठी दुसऱ्या सेवेच्या पायाभूत सुविधा वापरणं हि काही नवीन गोष्ट नाही. खूप वर्षांपूर्वी क्षय रोगावरील ओव्हर द कॉउंटर औषधं खेडोपाडी पोस्ट ऑफीस मध्ये मिळण्याची सोय होती. खानेसुमारी, निवडणूका, कल्याणकारी योजनांचा प्रसार यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शिक्षक यांची मदत घेतली जाते. उद्योग क्षेत्रात काही ब्रॅण्ड्स सुरुवातीला प्रस्थापित ब्रॅण्ड्सच्या मदतीने पाय रोवतात. नॉर्थ स्टार, हश पपीज, पॉवर या ब्रॅण्ड्स नि बाटाची मदत घेतली.

प्रदीप's picture

1 Apr 2023 - 5:42 pm | प्रदीप

गवि व सर टोबी ह्यांना धन्यवाद.

मी वर लिहीतांना, नेटवर्कीगच्या एका निम्न स्तरीय पातळीचा ( IP) फक्त उल्लेख केला. मात्र, नेटवर्कींगची अगदी वरील पातळी, म्हणजे अ‍ॅप्लिकेशन लेव्हलसाठी ह्यांत, त्याअगोदर इतर अनेक कामांसाठी वापरांत असलेला HTTP चा उल्लेख, विस्तारास्तव टाळला होता, तो महत्वाचा उल्लेख आता येथे करतो आहे. अ‍ॅपलने HTTP चा वापर करणारी प्रणाली बाजारांत प्रथम आणली. तिचे नांव HLS (HTTP based Live Streaming).

जालावरून व्हिडीयो स्ट्रीमींग सहजपणे सरावांत आली, त्यामागे ह्या प्रणालीचा महत्वाचा हात आहे. ह्यामुळे जालावरून सहजगत्या स्ट्रीमींग करण्याचे अनेकानेक प्रश्न सुटले. ह्या प्रणालीवरून नंतर MPEG- DASH ही स्टँडर्ड प्रणाली बनवण्यात आली, जी आज वापरली जाते.

वर सर टोबी ह्यांनी काही, अशाच प्रकारच्या व्यवस्थांचा उल्लेख केला आहे, तो तत्वतः ह्या संदर्भांत बरोबर आहे (उदा. पोस्ट ऑफिसांतून , टपालाव्यतिरीक्त दिलेल्या सुखसोयी, व काही ब्रँड्सनी वितरणासाठी घेतलेली बाटाची मदत). मात्र येथे एक सू़क्ष्म फरक लक्षांत घेतला पाहिजे. ओ. टी. टी. स्ट्रीमच्या वितरणासाठी ती स्ट्रीम निर्माण करणारी संस्था, त्यांच्या व ग्राहकांच्यामधील सर्विस प्रोव्हायडर्सना काहीच पैसे देत नाही. -- ज्या प्रकारे, एखाद्या संस्थेची वेब साईट, ग्राहकांना दिसावी, व त्यावर वावरता यावे, ह्यासाठी ती वेबसाईट जिच्या मालकीची आहे ती संस्था, मधील कुणालाच पैसे देत नाही. म्हणूनच तर 'ओव्हर द टॉप'.

(पुन्हा ह्यांत काही अन्य भाग , जसे CDN चा वापर, व zero rating ची व्यवस्था. पण हे तपशिल आहेत, ते सध्या बाजूस ठेऊयात).

चित्रगुप्त's picture

1 Apr 2023 - 3:04 pm | चित्रगुप्त

'चित्रपट' म्हटले की 'थेट्रात' जाऊन बघण्याचा 'पिच्चर' आठवतो, तसे इंटरनेटवरून बघण्याचे 'जालपट' वा 'नेटपट' म्हणावे काय ?

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2023 - 4:59 pm | चौथा कोनाडा

जालपट / 'नेटपट' ओटीटीवरच्या चित्रपटाला म्हणता येईल .. पण ओटीटीला ?

... अर्थात जालपट, नेटपट हे दोन्ही शब्द आवडले !

चित्रगुप्त's picture

1 Apr 2023 - 4:09 pm | चित्रगुप्त

'सिनेमा'. तसे 'जालिमा'
सुन सुन सुन जालिमा ( रफी, गीता दत्त, ओपी नय्यर 'आरपार' १९५४)
https://www.youtube.com/watch?v=UZOTH20eMyQ

बाकी आकाशगंगा सारखा जालगंगा म्हणायला काय हरकत आहे?

किंवा कालिंदी सारखे जालिंदी.. अर्थात अर्थ थोडा वेगळा होतो बहुधा. इंदी म्हणजे चंद्रिका किंवा चांदणी असा अर्थ आहे.
पण विचार करायला काय हरकत आहे?

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2023 - 5:46 pm | चौथा कोनाडा

"जालगंगा" सही शब्द वाटतोय .... वापरायला सुरुवात केली तर रुळून जाईल.
मराठी शब्द रुळवण्याची गोची अशी झालीय की जो पर्यंत मराठी वृत्तपत्रे, उग्र वाहिन्या, माध्यमे इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरतात.
त्यांनी मराठी शब्द वापरून रुळवायला सुरुवात केली तर नक्की लाभदायक असेल ( दै लोकसत्ताने असे काही मराठी शब्द वापरायचा प्रयत्न केला होता)

जालिंदी .... क्या बात.. भारी सुचवणी !

'जालगंगा' छान आहे. अर्थात काही बाबतीत ते 'जालगटार' ही असते.

कंजूस's picture

2 Apr 2023 - 8:22 pm | कंजूस

{भारतात} प्रसारभारतीच्या नियंत्रण कक्षात येत नाहीत यांचे कार्यक्रम. तसेच इतर देशांत असणार. म्हणून OTT over the top.

यांचा फायदा उठवत भाषा आणि दृष्ये टाकू शकतात.

हॉस्टेलवरची/ शेअरिंग रुमची मुले यांच्या फिया भरून कॉमन टीव्हीवर पाहात असतील.

ओतिती रात्रंदिवस मनोरंजनाचे बुधले
भले अथवा बुरे - सकळांसि जे खुले.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2023 - 5:25 pm | चौथा कोनाडा

ओतिती रात्रंदिवस मनोरंजनाचे बुधले
भले अथवा बुरे - सकळांसि जे खुले.

व्वा, चित्रगुप्त साहेब ... खुपच मस्त !
एकदम सही वर्णन !

क्या बात हैं !

❤️

ओटीटी - ओतिती ... हे साधर्म्य तर पर्फेक्ट वर्णलय !