Skip to main content

तू जाताना...

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 15/03/2023 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
अश्रू जरा ओघळले तू जाताना ना शब्द ओठी फुटले तू जाताना... जलप्रलय यावा तैसा पूर नदीला आभाळ ही कोसळले तू जाताना... ती रात होती पुनवेची तेव्हा ही का चांदणे ना पडले तू जाताना...? हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी ना फूल कोठे फुलले तू जाताना... उधळून जीवन गेले तेव्हा माझे वादळ जरासे उठले तू जाताना... ही वेस ओलांडूनी गेलीस तसे आधार सारे तुटले तू जाताना... दीपक पवार.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2290
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

दीपक भाऊ
ही वेस ओलांडूनी गेलीस तसे आधार सारे तुटले तू जाताना...
जबरदस्त ! शेवटी काय ....जाने भी दो यारों ........ जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा....असं बोलून आपापल्या रस्त्याला लागायचं ...हाकानाका.

गाव दुर राहीले. "तू नही तो और सही",मुसाफिर हूं, दिल कभी नही लगाता. किंवा "गुंत्यात गुंतूनी" असेच जगलो. रचना आवडली.