अनोळखी व्यक्तीस ऑनलाईन आर्थिक मदत

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
9 Feb 2023 - 6:00 pm
गाभा: 

समाजात अनेक जणांवर अचानक काही ना काही शारीरिक आपत्ती ओढवते- जसे की अपघात, गंभीर आजार आणि त्याची शेवटची अवस्था. अशा प्रसंगी मोठी आर्थिक तरतूद करण्याची वेळ येते. ज्यांच्या बाबतीत अशी कौटुंबिक तरतूद करता येणे अवघड असते, ते लोक आर्थिक मदतीसाठी निरनिराळ्या वृत्त आणि समाजमाध्यमांमधून आवाहन करतात. आपणही बऱ्याच वेळा अशा प्रकारची आवाहने वाचतो.

संबंधित बातमीमध्ये ऑनलाईन पैसे कोणत्या बँक खात्यात पाठवायचे याची योग्य ती माहिती दिलेली असते. या प्रकारची सेवा देणारी काही संस्थळे किंवा ॲप्स अलीकडे निर्माण झालेली आहेत. त्यांच्यामार्फतही मदतीचे आवाहन केले जाते आणि तिथे आपण मदत पाठवू शकतो. तिथे ज्याला रक्कम पाठवायची त्याच्याबद्दलची माहिती, त्याची एकंदरीत शारीरिक परिस्थिती, दाखल केलेले रुग्णालय वगैरे माहिती दिलेली असते. तसेच, एकूण अपेक्षित मदत आणि आतापर्यंत झालेली मदत याचीही आलेख स्वरूपात माहिती दाखवलेली असते.

या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रथम उपस्थित होतो. संबंधितांचे आवाहन वाचून बऱ्याच जणांना भावनिक दृष्ट्या अशी मदत करण्याची इच्छा होते. परंतु, आपण ज्या व्यक्तीस मदत करीत आहोत ती अजिबात ओळखीची नसते. दुसरे असे की, ज्या मध्यस्थ ऑनलाइन यंत्रणा आहेत त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवावा का अशी शंकाही आपल्या मनात येऊ शकते. यासंदर्भात माझ्या मनातील काही शंका आधी उपस्थित करतो :

१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.

२. समजा, एखाद्याला मोठ्या रकमेची मदत करायची आहे तर अशावेळी त्याला भावी वर्षात आयकर सवलतीची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. अशा प्रसंगी त्याने ऑनलाईन संस्थळाची मदत घेतल्यास फायदा होईल हे उघड आहे. अशा संस्थळावर ते लोक पाठवणाऱ्यांची संपूर्ण माहिती- नाव गाव पत्ता फोन इत्यादी सर्व काही विचारतात. इथे पाठवणाऱ्या व्यक्तीस अडखळल्यासारखे होऊ शकते.
अशा संस्थळाची विश्वासार्हता जोखण्याचे निकष काय असतात ?

३. जी संस्थळे किंवा ॲप्स अशी सेवा देत आहेत, ती आपण पाठवलेल्या रकमेतून काही वाटा त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी काढून घेणार हे उघड आहे. त्या वाट्याचे प्रमाण अंदाजे किती असते?

या विषयावर थोडाफार विचार केल्यावर मला झालेला अर्थबोध असा आहे :

१. अनोळखी व्यक्तीस आपल्याला लहान स्वरूपात रक्कम पाठवायची असेल तर तर ती थेट व्यक्तीच्या खात्यावर पाठवलेली चांगली. म्हणजे त्याला ती पूर्ण मिळेल. परंतु अशा वेळेस ती रक्कम नेट बँकिंगने पाठवावी की UPI ने ? यापैकी जास्त सुरक्षित (आपल्या दृष्टीने) काय मानले जाते? की दोन्ही सारखेच ?

नेट बँकिंगमध्ये नव्या व्यक्तीचे नाव नोंदवून चार तासानंतर पाठवणे हे सर्वाधिक सुरक्षित मानले जाते का?

२. UPI ने पैसे पाठवल्यास पलीकडच्याला आपला फोन नंबर समजणार हे उघड आहे. नेट बँकिंगमध्ये तो न समजण्याचा फायदा दिसतोय पण आपल्या नावाची नोंद तर बँकिंग व्यवहारात होणारच.

३. एखाद्याला रक्कम तर पाठवायची इच्छा आहे व आयकर सवलत नकोय. परंतु त्याला त्याचे नाव, फोन नंबर, ईमेल असे काहीही दुसऱ्याला कळू नये अशी इच्छा असल्यास रक्कम रोख नेऊन देणे हाच एकमेव पर्याय राहतो का ? किंवा मध्यस्थ संस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीत तशी गोपनीयता जपता येते का ?

४. आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी देणगीच्या रकमेसाठी काही किमान तसेच कमाल मर्यादा असते का?

या आणि अशा अनेक प्रकारच्या शंका विचारण्यासाठी आणि त्यांचे माहितगारांकडून निरसन करून घेण्यासाठी हा धागा उघडतो आहे. इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे ही वि.

लक्षात घ्या :
मूळ मुद्दा, पूर्णपणे अनोळखी व्यक्तीस मदत हा आहे.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Feb 2023 - 7:29 pm | कंजूस

१)युपिआइ म्हणजेच नेट बँकिंग फक्त ते एक app करून देते एवढाच फरक.
२) वैयक्तिक अकाउंटला पैसे पाठवूच नये हे माझे मत.
३)संस्था फंड गोळा करत असेल तर त्यांनी 80G certificate घेतलेल्याची नोंद दिसेल आणि करबचत मिळेल.
४) थोडीशी रक्कम NEFT करावी. जेवढे रुपये लिहिले तेवढेच तुमच्या अकाउंटमधून त्या घेणाऱ्यांच्या अकाउंटला जातील. (दहा हजारला पंचवीस रुपये फी)
५)तो प्रामाणिक खरा गरजू आहे असं समजू.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2023 - 7:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

--ज्यांना करसवलत घ्यायची असेल त्यांच्यासाठी वर ८० जी सवलतीचा मुद्दा आला आहेच.

--नेट बँकिंग मधे ३० मिनीटानंतर पैसे पाठवता येतात व फोन नंबर गोपनीय राहतो, पण महत्वाचे म्हणजे दरम्यानच्या वेळात तुमचे मत बदलले तर नुसते अकाउंट अ‍ॅड करुन स्वस्थ बसता येते. यु पी आय मध्ये मात्र बटण दाबले की पश्चात्ताप करुन फायदा नाही. दोन्ही पद्धती सुरक्षित आहेत.

बाकी प्रश्नांना पास.

कुमार१'s picture

9 Feb 2023 - 8:37 pm | कुमार१

मत बदलले तर नुसते अकाउंट अ‍ॅड करुन स्वस्थ बसता येते

चांगला व्यावहारिक मुद्दा.

पेशंटचे स्वतःचे की नातेवाईकाचे हा प्रश्न राहतोच.
पैसे पाहिले की विचार बदलतात.

कुमार१'s picture

9 Feb 2023 - 8:39 pm | कुमार१

पेशंटचे स्वतःचे की नातेवाईकाचे हा प्रश्न राहतोच.

>>

बरोबर. त्याचा अंदाज आपण बांधू शकत नाही.
काही वेळेस रुग्ण आणि देणगीदार यांच्यामध्ये रुग्णालयच मध्यस्थ असते आणि थेट रुग्णालयाच्या खात्यावर पाठवण्याचे आवाहन केलेले असते. ते एका दृष्टीने बरे. बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाबाबत तर हे अधिक लागू.

गरजुंना मदत देण्यासाठी असलेली संस्थळे (उदः impactguru वगैरे) गरजु रुग्णाला पुर्ण रक्कम देत नाहीत असे ऐकले आहे. किती टक्के कापतात ते ठाऊक नाही
पण हे खरे आहे का?

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 7:29 am | कुमार१

होय,
हे संस्थल मिळालेल्या रकमेपैकी 12.93% कापून घेते असे अन्यत्र झालेल्या चर्चेवरून समजले. मला अनुभव नाही.

अशा प्रकारच्या अन्य संस्थलाचा कोणाला अनुभव असल्यास लिहावे

कर्नलतपस्वी's picture

10 Feb 2023 - 8:44 am | कर्नलतपस्वी

बहुतेक सर्वच संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या पैशातून काही हिस्सा कापून मगच रुग्णाला किंवा दवाखान्याला दिला जातो.

एकदा जर असे पैसे पाठवले की संकेतस्थळे पाठीमागे लागतात.

जर रूग्ण ओळखीचा असेल तर त्याच्याच खात्यात जमा करावे. बरेच रुग्ण अशाप्रकारे मदत गोळा करतात. पुढे त्या रुग्णाचे काय झाले कळत नाही. माहितीतला असेल तर पुढील माहीती कळते.

बाकी,नेकी कर और दर्यामे डाल याला सीमा नाही.

घेणाऱ्या चे हात हजार दुबळी माझी पर्स.....

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 9:21 am | कुमार१

एकदा जर असे पैसे पाठवले की संकेतस्थळे पाठीमागे लागतात.

बरोबर.
भविष्यात त्यांचा असा ससेमिरा नको असेल तर आपण थेट व्यक्तीला पाठवलेले चांगले. अर्थात अशा मध्यस्थ संस्थांचे काही फायदेही दिसतात. एखाद्या परदेशस्थ व्यक्तीला (ज्याचे भारतात कुठलेच बँक खाते नाही) भारतातील एखाद्या रुग्णाला पैसे पाठवणे या प्रकारे सोपे जाते असा काहींचा अनुभव आहे.

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 9:21 am | कुमार१

एकदा जर असे पैसे पाठवले की संकेतस्थळे पाठीमागे लागतात.

बरोबर.
भविष्यात त्यांचा असा ससेमिरा नको असेल तर आपण थेट व्यक्तीला पाठवलेले चांगले. अर्थात अशा मध्यस्थ संस्थांचे काही फायदेही दिसतात. एखाद्या परदेशस्थ व्यक्तीला (ज्याचे भारतात कुठलेच बँक खाते नाही) भारतातील एखाद्या रुग्णाला पैसे पाठवणे या प्रकारे सोपे जाते असा काहींचा अनुभव आहे.

कंजूस's picture

10 Feb 2023 - 10:55 am | कंजूस

तो कोणाचं खातं हे बँका उघड करणार नाहीत.
NEFT केल्यास ही IFC CODE ,AC NOएवढेच दिसते.

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 11:08 am | कुमार१

एकेकाळी तसे होते.
मी आत्ताच माझ्या एका खात्यावर नजर टाकली. जमा झालेल्या काही रकमा मला कोणाकडून आल्या आहेत त्यांचे नाव त्यात व्यवस्थित दिसते आहे

कंजूस's picture

10 Feb 2023 - 6:47 pm | कंजूस

कुठून आले हे दिसते हे ठीक. पण NEFT करताना बँक कर्मचाऱ्यास फक्त घेणाऱ्याचा अकाउंट नंबर व आइएफसी कोड (जो आपण लिहिला तोच) दिसतो , (नाव दिसत नाही चेकिंगसाठी)आणि तो क्रमांक काळजीपूर्वक खात्री करूनच पाठवतो .

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 7:42 pm | कुमार१

समजले.
घेणाऱ्याचा अकाउंट नंबर.

आर्थिक व्यवहारांत नेहमीच १००% पारदर्शिकता ठेवावी. निनावी मदत करू नये. फार तर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मार्फत करावी. कधी कधी अत्यंत गरजू आणि निष्पाप व्यक्तीला मदत सुद्धा करताना आपण संकटांत सापडू शकता त्यामुळे पैसे कुणालाही देताना किती दिले, कधी दिले आणि का दिले ह्याचे पुरावे ठेवावेत आणि पैसे मिळणाऱ्या व्यक्तीला सुद्धा द्यावेत.

राघव's picture

10 Feb 2023 - 4:07 pm | राघव

असे फोन, मॅसेज, मेल्स, अ‍ॅड्स आजकाल नेहमी येतच असतात. ही आवाहने खूप भावनिक असतात आणि प्रत्येकाची सत्यता आपण खरंच तपासू शकत नाही. त्यात सिक्यूरिटी (स्वतःची आणि आपल्या परिवाराचीही) हा सध्याच्या जगात इतका महत्त्वाचा मुद्दा झालाय की, अगदी ईच्छा होऊन सुद्धा बरेचदा मन धजावत नाही.
त्यामुळे अगदीच रूक्ष वाटेल पण, सरळ एखाद्या माहितीतल्या आणि खात्रीलायक संस्थेमधेच मदत करावी अन् रीतसर पावती घ्यावी, या मताचा मी आहे.

माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने NEFT करून एका गरीब विधवेला मदत केली. विधवा एका फार दूरच्या शहरांत होती. कधी भेट सुद्धा झाली नसेल. मदत करण्याचे कारण व्हाट्सएप्प ग्रुप आणि जात हे होते. व्यक्ती कदाचित विसरली सुद्धा असेल. त्या विधवेला ती वेश्या व्यवसाय करते असे आरोप लावून तिलाच तुरुंगात कोंडण्याचा प्रयत्न तिच्या सासरच्या लोकांनी केला. नक्की प्रकरण मला ठाऊक नाही पण पोलीस ह्याच्या घरी येऊन चौकशी करून गेले. अर्थांत हे आरोप टिकले नाहीत पण बेइज्जती विनाकारण झाली.

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 4:23 pm | कुमार१

1.

निनावी मदत करू नये.

मध्यंतरी मला आपण होऊन एका अंधांच्या संस्थेला मदत करायची होती. त्यांच्यावर अन्य संस्थळावर एक चांगला लेखही आलेला होता . मी त्या संस्थेचे संस्थळ पाहिले परंतु त्यात कुठेही देणगी देण्यासाठी बँकेचे तपशील दिलेले नव्हते. मग मी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी ते मला दिले.
वास्तविक त्यांची पद्धत अशी होती की कुठल्याही इच्छुक देणगीदाराला ते प्रथम संस्थेत बोलावून त्यांचे काम पाहायला सांगतात. मग पटले तरच देणगी द्यावी असे त्यांचे मत आहे.
..
२.

माहितीतल्या आणि खात्रीलायक संस्थेमधेच

यामध्ये मला 'सोशल फॉर ॲक्शन' ही संस्था चांगली वाटली. तिथे आपण देणगी दिली की काही क्षणातच आप ल्याला ई-मेलने पावती येते.
पुन्हा आयकर परतावा भरण्याच्या दरम्यान योग्य ती माहितीही ते आपल्याला स्वतंत्रपणे पाठवतात.

कुमार१'s picture

10 Feb 2023 - 4:32 pm | कुमार१

( प्रतिसाद उडाल्याने तो पुन्हा लिहितो)
१.

निनावी मदत करू नये.

मध्यंतरी मला आपण होऊन एका संस्थेला मदत द्यायची होती. त्या संस्थेवर अन्यत्र एक चांगला लेखही आलेला होता. मी त्या संस्थेचे संस्थळ पाहिले परंतु त्यात कुठेही देणगी देण्यासाठी बँकेचे तपशील दिलेले नव्हते. मग मी त्यांना फोन केल्यावर त्यांनी ते दिले. वास्तविक त्यांची अशी पद्धत होती, की कुठल्याही इच्छुक देणगीदाराने आधी संस्थेत येऊन काम बघावे आणि मगच देणगी द्यावी.
.. ..

२.

माहितीतल्या आणि खात्रीलायक संस्थेमधेच

>>
याबाबतीत मला सोशल फॉर ॲक्शन ही संस्था खूप चांगली वाटली। आपण ऑनलाइन देणगी पाठवल्यानंतर काही क्षणातच आपल्याला ईमेलवर त्यांची पावती येते. पुन्हा आयकर परतावा भरण्याच्या दरम्यान योग्य ती माहिती ते स्वतंत्रपणे पाठवतात.

श्वेता व्यास's picture

10 Feb 2023 - 4:38 pm | श्वेता व्यास

१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.
बरोबर, अशी मदत एकदा पाठवली होती, पैसे वैयक्तिक बँक अकाउंटला पाठवले असल्याने आयकर सवलतीचा लाभ घेता आला नाही.

कंजूस's picture

12 Feb 2023 - 7:23 am | कंजूस

सुरू होणार असेल - याला पैसे का दिले वगैरे तर नसती उठाठेव.
_________
आमच्या इथे एक मानव सेवा संघ नावाची वैद्यकीय सेवा स्वस्तात देणारी चांगली संस्था आहे. मोतीबिंदू सर्जरी आठ/बारा हजारांत म्हणजे कल्पना करा.
तर यांच्याकडे लावलेल्या दानपेटीत पैसे आत टाकायला गेले तर नोटा आत जातही नाहीत इतकी गच्च भरलेली असते. रोख रक्कम पावतीनेही देता येते. सासऱ्यांनी सांगितले होते की माझे 'कार्य' न करता एक पेन्शन यांनाच द्या.

कुमार१'s picture

12 Feb 2023 - 8:24 am | कुमार१

खरंय.
यासंदर्भात अलीकडेच पाहिलेला एक चांगला अनुभव सांगतो. एका व्यक्तीच्या बंधूंना डोक्याला गंभीर इजा झाल्याने शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यासाठी मोठी रक्कम लागणार म्हणून त्यांनी मध्यस्थ संस्थलावर नाव नोंदवलेले आहे.

पण त्याचबरोबर त्यांच्या एका मित्राने समाज माध्यमांमध्ये ही माहिती स्वतःच्या नावाने प्रकाशित केली आणि त्याचबरोबर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती देखील दिली.

ते वाचल्यानंतर त्या माध्यमातील वाचक सभासदांचा विश्वासही लगेच बसतो. आपल्यातल्याच एका ओळखीच्या व्यक्तीचा भाऊ ही गरजू व्यक्ती आहे हे कळल्यानंतर बरोबर भराभर मदतीचे हात पुढे झाले.

इथे मदत करणाऱ्या व्यक्तींना दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत:
१. ज्यांना छोटी रक्कम पाठवायची आहे ते थेट खात्यावर पाठवतात.
२. ज्यांना मोठी रक्कम पाठवल्यामुळे आयकर सवलतीचा लाभ घ्यायचा आहे ते त्या मध्यस्थ यंत्रणेकडे पाठवतात.
अशा तऱ्हेने दोन प्रकारे मदत लवकर मिळत राहते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2023 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजकाल वाट्सॅपवर असे मदतीचे ओळखीचे आणि अनोळखी असलेले अनेक मदत करण्याबद्दलचे मेसेज येत असतात. ओळखीचे नात्यातले असले की अनेक लोक मदत करतांना पाहिले आहे. आता अनोळखी असलेल्यांना खरेच मदतीची गरज असते की हा पैसे जमा करण्याचा एक नवा धंदा आहे, हे लक्षात येत नाही. त्यामुळे लोक अनोळखी लोकांना मदत करीत असतील असे काही वाटत नाही.

>>> आयकर सवलतीचा लाभ घ्यायचा आहे ते त्या मध्यस्थ यंत्रणेकडे पाठवतात.

काही संस्थांना केलेली मदत आयकर सवलत मिळवून देते असेही वाचनात येते. अ‍ॅक्च्युअल किती रकमेला किती आयकर सवलत मिळते, हे कोणी तपशीलवार सांगू शकेल काय ?

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

12 Feb 2023 - 9:19 am | कुमार१

होय, मलाही ते नीट जाणून घ्यायचे आहे.

आपल्या इथे जे कोणी संबंधित व्यावसायिक किंवा माहितगार असतील त्यांनी सोप्या भाषेत सांगावे ही विनंती.
इथे दिलेल्या माहितीनुसार काही प्रकारांना 100 टक्के तर काही प्रकारांना 50 टक्के सवलत आहे.