समाजात अनेक जणांवर अचानक काही ना काही शारीरिक आपत्ती ओढवते- जसे की अपघात, गंभीर आजार आणि त्याची शेवटची अवस्था. अशा प्रसंगी मोठी आर्थिक तरतूद करण्याची वेळ येते. ज्यांच्या बाबतीत अशी कौटुंबिक तरतूद करता येणे अवघड असते, ते लोक आर्थिक मदतीसाठी निरनिराळ्या वृत्त आणि समाजमाध्यमांमधून आवाहन करतात. आपणही बऱ्याच वेळा अशा प्रकारची आवाहने वाचतो.
संबंधित बातमीमध्ये ऑनलाईन पैसे कोणत्या बँक खात्यात पाठवायचे याची योग्य ती माहिती दिलेली असते. या प्रकारची सेवा देणारी काही संस्थळे किंवा ॲप्स अलीकडे निर्माण झालेली आहेत. त्यांच्यामार्फतही मदतीचे आवाहन केले जाते आणि तिथे आपण मदत पाठवू शकतो. तिथे ज्याला रक्कम पाठवायची त्याच्याबद्दलची माहिती, त्याची एकंदरीत शारीरिक परिस्थिती, दाखल केलेले रुग्णालय वगैरे माहिती दिलेली असते. तसेच, एकूण अपेक्षित मदत आणि आतापर्यंत झालेली मदत याचीही आलेख स्वरूपात माहिती दाखवलेली असते.
या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रथम उपस्थित होतो. संबंधितांचे आवाहन वाचून बऱ्याच जणांना भावनिक दृष्ट्या अशी मदत करण्याची इच्छा होते. परंतु, आपण ज्या व्यक्तीस मदत करीत आहोत ती अजिबात ओळखीची नसते. दुसरे असे की, ज्या मध्यस्थ ऑनलाइन यंत्रणा आहेत त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवावा का अशी शंकाही आपल्या मनात येऊ शकते. यासंदर्भात माझ्या मनातील काही शंका आधी उपस्थित करतो :
१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.
२. समजा, एखाद्याला मोठ्या रकमेची मदत करायची आहे तर अशावेळी त्याला भावी वर्षात आयकर सवलतीची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. अशा प्रसंगी त्याने ऑनलाईन संस्थळाची मदत घेतल्यास फायदा होईल हे उघड आहे. अशा संस्थळावर ते लोक पाठवणाऱ्यांची संपूर्ण माहिती- नाव गाव पत्ता फोन इत्यादी सर्व काही विचारतात. इथे पाठवणाऱ्या व्यक्तीस अडखळल्यासारखे होऊ शकते.
अशा संस्थळाची विश्वासार्हता जोखण्याचे निकष काय असतात ?
३. जी संस्थळे किंवा ॲप्स अशी सेवा देत आहेत, ती आपण पाठवलेल्या रकमेतून काही वाटा त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी काढून घेणार हे उघड आहे. त्या वाट्याचे प्रमाण अंदाजे किती असते?
या विषयावर थोडाफार विचार केल्यावर मला झालेला अर्थबोध असा आहे :
१. अनोळखी व्यक्तीस आपल्याला लहान स्वरूपात रक्कम पाठवायची असेल तर तर ती थेट व्यक्तीच्या खात्यावर पाठवलेली चांगली. म्हणजे त्याला ती पूर्ण मिळेल. परंतु अशा वेळेस ती रक्कम नेट बँकिंगने पाठवावी की UPI ने ? यापैकी जास्त सुरक्षित (आपल्या दृष्टीने) काय मानले जाते? की दोन्ही सारखेच ?
नेट बँकिंगमध्ये नव्या व्यक्तीचे नाव नोंदवून चार तासानंतर पाठवणे हे सर्वाधिक सुरक्षित मानले जाते का?
२. UPI ने पैसे पाठवल्यास पलीकडच्याला आपला फोन नंबर समजणार हे उघड आहे. नेट बँकिंगमध्ये तो न समजण्याचा फायदा दिसतोय पण आपल्या नावाची नोंद तर बँकिंग व्यवहारात होणारच.
३. एखाद्याला रक्कम तर पाठवायची इच्छा आहे व आयकर सवलत नकोय. परंतु त्याला त्याचे नाव, फोन नंबर, ईमेल असे काहीही दुसऱ्याला कळू नये अशी इच्छा असल्यास रक्कम रोख नेऊन देणे हाच एकमेव पर्याय राहतो का ? किंवा मध्यस्थ संस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीत तशी गोपनीयता जपता येते का ?
४. आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी देणगीच्या रकमेसाठी काही किमान तसेच कमाल मर्यादा असते का?
या आणि अशा अनेक प्रकारच्या शंका विचारण्यासाठी आणि त्यांचे माहितगारांकडून निरसन करून घेण्यासाठी हा धागा उघडतो आहे. इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे ही वि.
लक्षात घ्या :
मूळ मुद्दा, पूर्णपणे अनोळखी व्यक्तीस मदत हा आहे.
वाचने
5762
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेमेंट गेटवे
रोचक मुद्दा आहे!!
होय,
In reply to रोचक मुद्दा आहे!! by राजेंद्र मेहेंदळे
वैयक्तिक अकाउंट म्हणजे नक्की कुणाचे?
होय,
In reply to वैयक्तिक अकाउंट म्हणजे नक्की कुणाचे? by कंजूस
गरजुंना मदत देण्यासाठी असलेली
impactguru
In reply to गरजुंना मदत देण्यासाठी असलेली by परिंदा
बहुतेक सर्वच...
In reply to impactguru by हेमंतकुमार
+१
In reply to बहुतेक सर्वच... by कर्नलतपस्वी
+१
In reply to बहुतेक सर्वच... by कर्नलतपस्वी
दिलेला अकाउंट नंबर -
नाही हो,
In reply to दिलेला अकाउंट नंबर - by कंजूस
तसं नाही.
In reply to नाही हो, by हेमंतकुमार
अच्छा,
In reply to तसं नाही. by कंजूस
आर्थिक व्यवहारांत नेहमीच १००%
+१
In reply to आर्थिक व्यवहारांत नेहमीच १००% by साहना
माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने
In reply to +१ by राघव
चांगले मुद्दे.
..
In reply to चांगले मुद्दे. by हेमंतकुमार
१. समजा, ज्या व्यक्तीला
१. समजा, ज्या व्यक्तीला ऑनलाईन मदत पाठवायची आहे तिच्या बँक खात्याची माहिती वृत्तपत्रातून आलेली आहे. समजा, अशी मदत एखाद्याने थेट त्याला पाठवली तर पाठवणाऱ्या व्यक्तीस आयकर सवलतीचा लाभ घेता येतो का ? बहुतेक नसावा.बरोबर, अशी मदत एकदा पाठवली होती, पैसे वैयक्तिक बँक अकाउंटला पाठवले असल्याने आयकर सवलतीचा लाभ घेता आला नाही.देणाऱ्या हाताचीच चौकशी
विश्वासार्हता वाढवणे
मदत आणि आयकर सवलत.
+११
In reply to मदत आणि आयकर सवलत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे