वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे

Primary tabs

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Feb 2023 - 9:42 am

श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:

नमस्कारास वेचावें नलगे
नमस्कारास कष्टावें नलगे
नमस्कारास कांहींच नलगे
उपकरण सामग्री. (४/६/२२)

आपल्या देशात आज ही खेडे गावांत रस्त्यातून येता जाता अनोळखी माणसाला ही लोक स्मित करून ,राम-राम, जय रामजी की म्हणतात नमस्कार करतात. आपण ही आई, वडील, गुरुजन आणि वरिष्ठांना नमस्कार करतो. पण समर्थ म्हणतात लहान मोठे अनोळखी सर्वांनाच नमस्कार केल्याने आपले काहीच जात नाही. ज्या गोष्टीसाठी पै ही लागत नाही ती करण्यात कंजूषी कारायची गरज नाही. नमस्कार केल्याने रस्त्यावरचे दुकानदार, रेहडी पटरीवाले, भाजी विक्रेता, रस्त्यातून जाणारे अनोळखी लोक ही आपल्याला ओळखू लागतात. वेळ प्रसंगी त्यांची मदत ही होते.

याचेच एक उदाहरण. एक जुना प्रसंग, त्यावेळी आमच्या कालोनीत पक्के रस्ते नव्हते. रिक्शा घेण्यासाठी किंवा कार्यालयात जाण्यासाठी जनकपुरी सी-1 च्या बसस्टॉप पर्यंत पायीच चालत जावे लागायचे. तिथे काही रेहडीवाले फळ-भाज्या विकायचे. मी रोज त्यांना येता जाता नमस्कार करत होतो. कधी- कधी फळ भाजी इत्यादि ही विकत घेत होतो. एक दिवस दीड वर्षाच्या लेकी सोबत जनकपुरी सी-1 वर रिक्शातून उतरलो. तोच एका वेगात येणार्‍या कारने रिक्षाला धडक दिली. रिक्षाचे मागचे एक चाक वाकडे झाले आणि रिक्शालाहि नुकसान झाले. कार चालक गाडीतून उतरला आणि रिक्शा चालकावर भडकला, तुला रिक्शा चालविता येत नाही, माझ्या कारची हेड लाइट तुटली, नुकसान भरपाई कोण देणार म्हणत त्याने रिक्शावाल्यावर हात उगारला. मी त्याच्या हात मध्येच धरला आणि म्हणालो चूक तुमची आहे, नुकसान भरपाई तुम्हाला द्यायला पाहिजे. पहिले तुलाच देतो नुकसान भरपाई म्हणत त्याने माझ्यावर हल्लाच केला म्हणा. खबरदार साहेबांना हात लावला तर... म्हणत रस्त्यावरचे फळ विक्रेता लगेच माझ्या मदतीला धाऊन आले. परिस्थिति क्षणात बदलली. कार चालकाने रिक्शाचालकाला दुरुस्तीचा खर्च दिला. जर मी त्यांना नमस्कार करत नसतो तर ते माझ्या मदतीला धाऊन आले असते का? ही आहे नमस्काराची महिमा.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Feb 2023 - 12:20 pm | कुमार१

नमस्कार !
चांगले विचार आहेत.

@ विवेकः अगदी बरोबर आहे, आणि हॅलो - हाय पेक्षा हात जोडून केलेला नमस्कार हा खूप नम्र, सभ्य, सुसंस्कृतपणाचा वाटतो. मला पण ही सवय असल्याने नवीन जागी पण ओळखी होत असतात. केमिस्ट, फोटोकॉपीवाला, न्हावी, दूधवाला, किंवा कुणाकडे गेलो तर मी असा नमस्कार करत असतो, आणि माझ्यापेक्षा वयाने जास्त वृद्ध असलेल्यांना वाकूनही नमस्कार करतो. लहान मुलांनी मला हॅलो वगैरे केले तर त्याचे जरा आश्चर्य वाटते.
या बाबतीत बहुतांश पंजाबी तरूण-तरूणी अगदी रस्त्यात भेटली तरी 'पायलागू' करतात, आणि युरोप-अमेरिकेत मुलांच्या मित्रांकडे वगैरे जातो तेंव्हा फक्त दिल्ली-यूपी-बिहार वगैरेवाले प्रणाम, पायलागू वगैरे करतात. बहुतांश मराठी तरूण मात्र बघितल्या- न बघितल्यासारखे करतात, किंवा कोणी ओळख करून दिली, तर हलकेसे स्मितहास्य वगैरे, किंवा टिपिकल पुणेरी "बssर" असा उच्चार करतात, असा अनुभव आहे.
तुमचे आणि अन्य वाचकांचे असे अनुभव वाचायला आवडेल.

विवेकपटाईत's picture

3 Feb 2023 - 10:34 am | विवेकपटाईत

उत्तर भारतात विशेष करून पंजाब हिमाचल लग्नाच्या आधी मुली पाया पडत नाही.हिमाचल मध्ये म्हातारे ही लहान मुलींच्या पाया पडतात.( कुमारिका ही देवी समान असते). माझी नात हिमाचाली असल्याने अजूनही आठ वर्षाची आहे. आधी घरी पाहुणे आल्यावर तिला पाय पाडण्याचा इशारा करावा लागायचा आणि हिमाचल मध्ये गावी गेल्यावर उलटा प्रकार. आता तिला दोन्ही रिवाज कळून गेले आहे.

उत्तर भारतात विशेष करून पंजाब हिमाचल लग्नाच्या आधी मुली पाया पडत नाही

हे मी एका दिल्ली तील कुटुंबात बघितले तेवहा न राहवून एक प्रश्न विचारला .. कि ठीक आहे त्यामागचे कारण कळले पण मग सुनेने नमस्कार केलेला कसा काय चालतो ? ती पण कोणाची तरी मुलगीच असते ना ?

आणि मग मी त्यांना महाराष्ट्रातील आणि ( अनेक इतर राज्यातील सुद्धा )या पद्धतीमागचा तर्क सांगितलं तो इतका साधा आहे कि .... " वयाने जेष्ठ अस्लेल्याना मान देणे " म्हणून असे मुलगी किंवा मुलगी नमसकार करते/ करतो .. त्यात काय वावगे आहे ?

'कुमारी' मुलगी देवीसमान मानली जाते. 'सून' ही विवाहित असते. तिकडे ख्रिस्ती लोक देखील येशूची आई मेरी ही 'व्हर्जिन' होती, असे मानतात.

चौकस२१२'s picture

3 Feb 2023 - 1:17 pm | चौकस२१२

चित्रगुप्त साहेब ... मला तेव्हा त्या कुटंबाने जे सांगतले ते काहीसे असे होते ... " कि मुलगी लग्न झाल्यावर सासरी तिला कष्ट असतातच म्हणून माहेरी असताना ( लगना आधी ) तिला वाकायला लावायचे नाही ( कष्ट या अर्थाने ) पण काही म्हणा मला काही हा तर्क पटला नाही .. या अर्थाने कि लग्न ना झालेली मुलगी आणि सून यात फरक काय ? एक तर दोघींना हि नमस्कार करू नये किंवा करावा एकीला एक नियम आणि दुसरी ला दुसरा हे काय !

बाकी राज्यातील "मोठ्यांना नमसकार करा ( मुलगी असो मुलगा असो / लग्न झालेलं असो किंवा नको ) हीच आदर दाखवण्याची जास्त चांगली प्रथा आहे असे वाटते असो ... ( अर्थात मोती पिढी आदराने वागवण्याचं दर्जाचे असणार हे गृहीत आहे यात )

पण आपण उत्तरेत राहता ... तर कदाचित माझया आकलनात चूक असले! तर एक सांगा कि तिकडे सुनेनें पण वडीलधाऱ्यांना "नमस्कार" करणे हि प्रथा आहे का ?

चित्रगुप्त's picture

3 Feb 2023 - 2:11 pm | चित्रगुप्त

माझ्या माहिती प्रमाणे कुमारिका ही देवीचे स्वरूप असते, म्हणून तिला मोठे पुरुष सुद्धा नमस्कार करतात, अशीच रूढी आहे.
उत्तरेत सुनेने सासू सासर्यांना आणि अन्य वडीलधारे, घरी येणारे पाहुणे यांना (कुठे कुठे डोक्यावर पदर घेऊन) वाकून नमस्कार करणे हे अगदी नित्याचे असते. माझी अमेरिकेतली (पीएचडी झालेली) सून गुजराती आहे. ती रोज सकाळी आम्हा दोघांना नमस्कार करून कामावर जाते.
मोठ्यांना वा कुणालाही नमस्कार करण्यात 'आदराने वागवण्याचा दर्जा' यापेक्षाही आपण स्वतःची नम्रता, मर्यादा, विनयशीलता वगैरे जपणे आणि समोरच्याचा `आशिर्वाद घेणे, त्या व्यक्तीला बरे वाटणे, वृद्ध लोकांना 'आपल्याला मान देणारे कुणीतरी आहे' हे समाधान देणे हे महत्वाचे असते, असे स्वतः साठीत आल्यापासून मला कळू लागले आहे. आम्ही रहात होतो, त्या गल्लीतल्या काही सुना (त्या चांगल्या शिकलेल्या, नोकरी करणार्‍या होत्या) रस्त्यावर फिरताना आम्ही समोरून आलो, तर पायलागू करायच्या. हल्लीच्या मराठी तरुणींमधे काय पद्धत आहे, मला माहीत नाही.
दुसरे म्हणजे फक्त स्त्रियाच नव्हे, तर उत्तर भारतीय तरूण सुद्धा परिचयातील वृद्धांना 'पायलागू' करत असतात ( हे उपचार ते परदेशात गेल्यावरही पाळत असतात) एका अर्थी हे नमस्कार प्रकरण म्हणजे एकमेकांशी ओळख करून घेण्याचाही एक सुंदर प्रकार आहे असे मला वाटते. असो.

कानडाऊ योगेशु's picture

5 Feb 2023 - 12:36 am | कानडाऊ योगेशु

मोठ्यांना वा कुणालाही नमस्कार करण्यात 'आदराने वागवण्याचा दर्जा' यापेक्षाही आपण स्वतःची नम्रता, मर्यादा, विनयशीलता वगैरे जपणे आणि समोरच्याचा `आशिर्वाद घेणे, त्या व्यक्तीला बरे वाटणे, वृद्ध लोकांना 'आपल्याला मान देणारे कुणीतरी आहे' हे समाधान देणे हे महत्वाचे असते,
सहमत..
मी स्वतः घरातल्या वडिलधार्यांना अंघोळीनंतर रोज नमस्कार करतो. त्याचा एक फायदा असा होतो कि काही कारणाने आदल्या दिवशी वडिलांशी/सासर्यांशी मतभेद झाले व प्रसंगी भांडण ही झाले तर दुसर्या दिवशी अंघोळ केल्यानंतर नमस्कार करताना पुन्हा संवाद साधताना अवघडलेपणा येत नाही.

श्वेता व्यास's picture

2 Feb 2023 - 6:14 pm | श्वेता व्यास

चांगली सवय आहे, बघू जमतंय का.

कर्नलतपस्वी's picture

3 Feb 2023 - 5:52 pm | कर्नलतपस्वी

एक चांगली पद्धत आहे.

सैन्यात, चलते को सॅल्युट और खडे को चुना असे गमतीने म्हणले जाते.

सेवानिवृत्तीनंतर नवीन सोसायटीत नवीन रहायला आल्यानंतर सकाळी व्यायाम करताना शेजारून येणाऱ्या जाणाऱ्यांना नमस्कार, राम राम म्हणायला सुरुवात केली. सुरवातीला अशी सवय नसलेले सिव्हिलीयन लोकांना ते अजब वाटले.हळुहळू इतर सदस्यांनी नमस्कार परत करण्यास सुरुवात केली. आता वयोमानानुसार नातेवाचक शब्द जोडून अभिवादन करतात.
जसे,नमस्कार काका,गुडमॉर्निंग आजोबा वगैरे.

धर्मराजमुटके's picture

3 Feb 2023 - 7:29 pm | धर्मराजमुटके

समर्थांचा श्लोक आवडला. नमस्काराचे आश्चर्यकारक आणि चमत्कारीक फायदे मिळाल्याचे याची देही याची डोळा अनुभवले आहे. मुंबईतील एका वार्डातील नगरसेवक रस्त्याने निघाला की थोरामोठ्यांना नमस्कार, पायलागू करायचा. सत्यनारायण पुजेचे निमंत्रण कधी चुकवायचा नाही. या पुण्याईवर दोन वेळा नगरसेवक झाला.