२०२२ मधील उत्तर ते दक्षिण - लेह लडाख ते कन्याकुमारी - प्रवास अनुभव

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in जनातलं, मनातलं
3 Jan 2023 - 6:30 pm

२०२२ हे एक रोडट्रीप special dream वर्षे होत , कारण एकाच वर्षात भारतातील २ अशी ठिकाणे , जे प्रत्येक पर्यटन प्रेमी च्या लिस्ट मदे टॉप ला असतात . पहिलं म्हणजे लडाख - भारताचं उत्तरेकडील टोक आणि दुसरा कन्याकुमारी - भारताचं दक्षिण टोक .

लेह लडाख -
भरपूर लोक बोलले फर्स्ट time मध्ये पुणे लडाख पुणे सोप्प नाय , अर्ध्यातूनच याल, गाड्या ट्रेन ला लोड करून दिल्ली पासून जा , पण नाही या वेळी पक्कं ठरवलेलं पुणे ते पुणे करायचंच.

जवळपास १५ दिवसांचा प्रवास , जातानाचा प्रवास : मुंबई - सुरत highway - वडोदरा - मोडासा - जयपूर - हरियाणा - अंबाला - पठाणकोट - श्रीनगर मार्गे लेह.
लडाख मधील फेमस ठिकाणे - लेह , खारदूगला , नुब्रा valley , हुंडेर , श्योक valley , पँगॉंग तलाव , टांगलंगला पास , चांग ला पास , नुकीला पास , जिस्पा , सरचू , केलांग , रोहतांग , मनाली .
परतीचा प्रवास : मनाली , चंदीगड, पानिपत , चित्तोडगड , जयपूर, मध्य प्रदेश , नाशिक मार्गे पुणे .
संपूर्ण प्रवास जवळपास ६००० किमी चा. प्रवासाचा संपूर्ण खर्च ४१०००रुपये

लडाखचा प्रवास कधीच सोपा होणार नाही याची जाणीव होती, पण नियती हा प्रवास मर्यादेपलीकडे करेल याची कधीच कल्पना नव्हती…
लडाख हे भारतातील एक असा टुरिस्ट ठिकाण आहे जे जवळपास प्रत्येक प्रवाशाच्या बकेट लिस्टमध्ये असलेलं एक ड्रीम डेस्टिनेशन .. जे ट्रिप संपल्यानंतरही वर्षानुवर्षे मनात कोरले जाईल!

लडाख हे अनेकांसाठी, विशेषत: दुचाकीस्वारांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. लडाख म्हणजे हाय पासेसची भूमी, भारतातील प्रत्येक साहसी व्यक्तीच्या बकेट लिस्टमध्ये अग्रस्थानी टॉप ला असलेलं ठिकाण. स्वतःला जीवनातील गजबजलेल्या गोष्टींपासून डिस्कनेक्ट करा, जगातील काही सर्वोच्च मोटार करण्यायोग्य मार्गांवर साहसी बाइकिंगचा अनुभव घ्या किंवा लडाखचे अतिवास्तव वातावरण आणि दृश्ये पाहा.

या प्रदेशातील वैविध्यपूर्ण संस्कृती, भूतकाळातील अद्वितीय वास्तुशिल्प चमत्कार आणि विशेष म्हणजे, उंचावरील तलाव आणि विस्तीर्ण दऱ्यांनी सुशोभित असाधारणपणे विस्मयकारक पर्वतीय लँडस्केप - लडाखसाठी इतर कोणतेही डेस्टिनेशन सोडण्याची काही कारणे तुमच्याकडे आहेत.

ते म्हणतात की प्रवास हा डेस्टिनेशन इतकाच महत्त्वाचा आहे आणि लडाखच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. लडाखचा प्रवास तुम्हाला निसर्गाच्या असंख्य छटांसह तुमची स्मृती गल्ली रंगवून, लँडस्केपच्या सर्वात वैविध्यपूर्ण श्रेणीतून नेईल. त्यामुळे, लडाखला जाण्यासाठी तुम्ही निवडलेला प्रवास मोड तुमच्या एकूण अनुभवामध्ये मोठी भूमिका बजावतो.

जर तुम्हाला साहसाची भूक असेल आणि तुमच्या हातात बराच वेळ असेल, तर लडाखच्या रोड ट्रिप सारखी मजा कशातच नाही. उंच पर्वतांच्या वळणदार रस्त्यावर मोटारसायकल चालवणे हा तुमच्यासाठी जीवन बदलणारा अनुभव ठरेल जो जीवन आणि जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलतो.

उंच उंच तपकिरी पर्वत दूरवर पसरलेले आहेत, चंचल सूर्यप्रकाशाखाली चमकणाऱ्या बर्फाच्या झऱ्याने झाकलेले आहेत. ढग खाली नदीच्या प्रवाहाची नक्कल करतात, कारण ते थंड वाऱ्याचे अनुसरण करतात आणि नापीक मातीच्या बुरुजावर त्यांची सावली टाकतात. प्रदूषित शहराच्या हवेच्या तावडीतून मुक्त आकाश तुमच्याकडे सरळ आणि निळ्या रंगात हसत आहे. आणि रेव आणि वाळूचा एक लांब पॅच जो टेकड्यांमध्ये नाहीसा होताना दिसतो.

कन्याकुमारी / धनुष्कोडी -

ट्रिप चा प्रवास मार्ग -
पुणे - तासगाव - बेळगाव - बेंगलोर - सेलम - त्रिची - तंजावुर - रामेश्वरम - धनुष्कोडी - कन्याकुमारी - मदुराई - कोडाईकनाल - बेंगलोर - मिरज - तासगाव - पुणे.
जवळपास ३५०० किमी चा प्रवास . संपूर्ण ट्रिप चा खर्च १६००० रुपये .

लडाख ची ट्रिप successful झाली तेव्हाच ठरवलं होत, लडाख म्हणजे भारताचं उत्तरेकडील एक टोक झालंच आहे तर भारताचं दक्षिण टोक हि करायचं, म्हणजेच कन्याकुमारी. लडाख मध्ये जगातील सर्वात उंच रस्त्यावर गाडी चालवली होती तर इकडॆ , भारताच्या दक्षिणेकडील समुद्रातील शेवटचा रस्ता - धनुष्कोडी.
लडाख च्या पर्वत रांगातील घाटमाथ्यावरच्या वळणदार थरारक रस्त्यांच्या मानाने दक्षिणेकडील रस्ते एकदम टकटक. संपूर्ण ट्रिप मध्ये फक्त कोडाईकनाल ला घाट लागला बाकी रस्ते एक्दम ओक्के ..
धनुष्कोडीच्या रस्त्यावरून bike ride चा अनुभव एकदम विलक्षण होता . कारण जाताना रस्त्याचे दोन्ही बाजूला दोन वेगवेगळे समुद्र , एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर, आणि त्यामधून आपली गाडी ...वाह. कन्याकुमारी म्हणजे भारताचा दक्षिणेकडील शेवटचा गाव , पुढे डायरेक्ट हिंदी महासागर . इथल्या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल वरून दिसणारा निळाशार समुद्र डोळ्यात सामावण हि अवघड . इथून दिसणारा सूर्यास्त कधी चुकवू नये .
दक्षिणेला या सोबतच अजून पुढील काही ठिकाणे पाहिली -
- तंजावूर - (बृहदेश्वर मंदिर, Big Temple )
- रामेश्वरम
- मदुराई (मीनाक्षी मंदिर
- कोडाईकनाल

या सर्व ठिकाणी ची संपूर्ण माहिती आणि उत्तर ते दक्षिण या प्रवासाचा अनुभव संक्षिप्त स्वरूपात लवकरच आणण्याचा प्रयन्त करू . तोवर हा आपला विडिओ नक्की पहा .

धन्यवाद

२०२२ मधील उत्तर ते दक्षिण - लेह लडाख ते कन्याकुमारी - प्रवास अनुभव

धोरण

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

3 Jan 2023 - 7:06 pm | कर्नलतपस्वी

भारीच प्रवास आहे. बर्‍याच तरूणांना आकर्षित करणारा असा प्रवास आहे. तरी रस्ते व इतर सुखसोई लडाख व काश्मीर मधे भरपूर आहेत.

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2023 - 9:32 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!

Nitin Palkar's picture

3 Jan 2023 - 7:07 pm | Nitin Palkar

व्हिडीओ ही झलक झाली. मेन पिक्चर लवकर येऊ द्या!

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2023 - 9:31 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !! लवकरच आणू

Bhakti's picture

4 Jan 2023 - 11:00 am | Bhakti

एक नंबर!

व्लॉगर पाटील's picture

5 Jan 2023 - 9:30 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!