जन्मजात दुखणे येता (2) : हात व पाय

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Dec 2022 - 9:49 pm

भाग-1 इथे :
…………….

या भागापासून जन्मजात शारीरिक दोषांची शरीरभागानुसार उदा. पाहू. या भागात हात व पायाच्या अशा दोषांचे विवेचन करतो. हे दोष मुख्यतः तीन प्रकारचे आहेत:

१. हात किंवा पायाचा पूर्ण अभाव अथवा खुरटलेली वाढ. या दोषांचे प्रमाण दर 10,000 जन्मांमध्ये ८ इतके आहे. पायांच्या तुलनेत हातांचे दोष अधिक प्रमाणात दिसतात. खालील प्रकारचे दोष बऱ्यापैकी आढळतात :
• Forearm मध्ये रेडियस हे हाड नसणे.
• गुडघा ते घोटा या पायाच्या भागातील fibula हे हाड नसणे.

कारणमीमांसा:
A. गर्भाची वाढ चालू असताना संबंधित पेशींच्या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो आणि त्यातून त्यांचा नाश होतो.
B. औषधांचे दुष्परिणाम : हे मानवनिर्मित कारण ठरते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी thalidomide हे औषध गरोदारपणातील उलटयांच्या त्रासासाठी दिले जात होते. पण त्या स्त्रियांना झालेल्या बाळांचे हात व पाय मोठ्या प्रमाणात खुरटले होते (phocomelia). हे लक्षात आल्यानंतर गर्भवतींना देण्याबाबत त्याच्यावर बंदी घातली आहे.

२. बोटांची वाढीव संख्या: हा जरी दोष असला तरी तो बघणाऱ्यांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय असतो. यामध्ये असे प्रकार दिसतात:
A . हात किंवा पायाला जादा अंगठा असणे: काही बालकांमध्ये फक्त हा एकच दोष असतो तर अन्य काही बालकांमध्ये याच्या जोडीला हृदयरचनेचे दोष देखील आढळतात. हा दोष भारतीय वंशात मोठ्या प्रमाणात आढळतो.

ok

ok

B . मधली तीन बोटे जादा असणे हा प्रकार दुर्मिळ आहे. त्यामध्ये त्यातल्या त्यात अधिकची तर्जनी कॉमन आहे.

C. जादा करंगळी: हा दोष आफ्रिकी वंशात मोठ्या प्रमाणात आणि स्वतंत्रपणे आढळतो. तर अन्य वंशांत त्याच्या जोडीने इतर काही व्यंग किंवा गुणसूत्रांचे बिघाड असतात.

ok

बोटांची संख्या वाढण्यासंदर्भात सुमारे ३९ प्रकारचे जनुकीय बदल आढळलेत. काही कुटुंबांत असे दोष सलग २-३ पिढ्यांमध्ये दिसून येतात. जादा जे बोट असते ते सहसा फक्त मऊ पेशींनी बनलेले असते. पण कधीकधी अशा बोटामध्ये संपूर्ण वेगळे हाड (पण सांध्याविना)असते, तर क्वचित प्रसंगी एखाद्या व्यक्तीत सांध्यासह परिपूर्ण असे वेगळे बोट देखील दिसून येते. असे परिपूर्ण उपयुक्त बोट असलेल्या व्यक्तींना काही वेळा त्याचा फायदा सुद्धा होतो. सामान्य माणसांना एखादे काम करण्यास जर दोन हात लागत असतील तर अशा व्यक्तीला ते काम एका हाताने सहज जमू शकते.
(रच्याकने..
जेव्हा स्मार्टफोन्स नव्याने वापरात आलेले होते तेव्हाचा एक विनोद आठवला. मानवाच्या भावी उत्क्रांतीत डाव्या हाताला सहावे बोट फुटेल असे म्हटले गेले होते. याचे कारण म्हणजे स्मार्टफोन नीट धरता यावा !)

३. संयोग झालेली हाताची किंवा पायाची बोटे: यामध्ये दोन प्रकार आढळतात. पहिल्या प्रकारात संबंधित दोन बोटांचे फक्त स्नायू आणि त्वचा एकमेकांशी जोडलेल्या असतात. तर दुसऱ्या प्रकारात बोटांची हाडे सुद्धा एकमेकांशी जुळलेली असतात. अशा बोटांची क्ष-किरण तपासणी केली असता चित्र स्पष्ट होते. गरज भासल्यास निवडक रुग्णांमध्ये जनुकीय चाचण्या केल्या जातात.
ok

उपचार :
निव्वळ बोटांचे व्यंग असते तेव्हा ते शल्यक्रियेने दुरुस्त करता येते. मात्र संपूर्ण हात किंवा पायाचा अभाव असेल तर कृत्रिम अवयवरोपणाचा विचार करावा लागतो.
एकंदरीत पाहता हात व पायांची व्यंगे असलेली ही बालके उपचारांच्या मदतीने पुढील आयुष्य व्यवस्थित जगू शकतात.
………………………..
क्रमशः

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

12 Dec 2022 - 9:33 am | शेखरमोघे

(नेहेमीसारखाच) अभ्यासपूर्ण लेख. अभिनन्दन.
नवजात अर्भकात शारिरिक (आणि इतरही) दोष घडवणार्‍या मानवनिर्मित कारणात जगभर खळबळ उडवून देणारे thalidomide हे औषध जसे सामिल आहे तसेच जपानमधील मिनामाता (Minamata) भागातल्या समुद्रात पर्‍यामुळे झालेले प्रदूषण आणि अमेरिकेतल्या PTFE/Teflon चा वापर या दोन्हीही मधून बरेच दुष्परिणाम झाल्यानन्तरच त्यान्चा "बन्दोबस्त" करण्याकरता काही पावले उचलली गेली.

कुमार१'s picture

12 Dec 2022 - 10:07 am | कुमार१

धन्यवाद !
चांगली पूरक माहिती.

या सारखी गर्भावर विपरित परिणाम करणारी औषधे इथे पाहता येतील.

कुमार१'s picture

12 Dec 2022 - 10:10 am | कुमार१

या सारखी >>>
thalidomide सारखी असे वाचावे.

कुमार१'s picture

28 Dec 2022 - 5:33 pm | कुमार१

भाग ३ इथे