सेक्स फॉर रेकॉर्डस

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
25 Sep 2022 - 8:36 am

वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन-
६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते.

फॅलोपिअन ट्यूब-
फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली. नंतर त्याच्या नावावरून फॅलोपिअन ट्यूब असे नाव पडले.

पोर्नोग्राफी-
वाचक, दर्शक, श्रोता याला कामुक कथा-कादंबऱ्यांतून, कामुक भाषणातून, कामुक चलचित्रपटांतून कामोद्दीपन करणे हा याचा उद्देश असतो. प्रत्यक्षात पोर्नोग्राफीचा अर्थ म्हणजे वेश्येशी शारीरिक संभोगाचे लिखाणातून वर्णन करणे.

कामसूत्र प्रथम इंग्रजीमध्ये रूपांतरीत-
सर रिचर्ड बर्टन यांनी १८८० साली भारतीय कामसूत्राचे इंग्रजीत रूपांतर केले आहे. भारताबाहेर याची यशस्वी विक्री झाली. मूळ भारतीय कामसूत्र १००-४०० A.D. या काळात लिहिले गेले.
◼'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग-
हे नाव कसे पडले याविषयी मतभेद आहेत. चार्ल्स (दुसऱ्या) याच्या काळात डॉ. कंडोम/कंटोन या फिजिशियनवरून हे नाव पडले. १७०६ मध्ये एका कवितेमध्ये 'कंडोम' या शब्दाचा वापर केला गेला. या काळात वाढलेल्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी याचा खूप वापर केला जात होता.

नपुंसकत्वाची पहिली व्याख्या-
१८३३ व १८५८ च्या आवृत्तीमध्ये 'कोपलँडस् डिक्शनरी ऑफ प्रॅक्टिकल मेडिसिन' या शब्दकोशात नपुंसकत्वाची व्याख्या प्रथम प्रकाशित झाली. १९५० साली स्ट्रॉस यांनी 'संभोग' करण्यामधील कमकरता अशी व्याख्या केली. अन्सर्ट जोन्स (१९१८) विरुद्धलिंगी संभोगामध्ये पूर्ण अथवा थोडी ताठरता न येणे व अपेक्षित सुख न मिळणे याला नपुंसकत्व म्हणावे अशी व्याख्या केली.

शिश्नाचे जलद उद्दीपन-
प्रत्येक पुरुषांमध्ये शिश्नाचे उद्दीपन होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागू शकतो. तसेच एका पुरुषामध्ये वय, कालानुसार कामवासनेची पातळी यावर शिश्नाचे उद्दीपन ठरते. किन्से इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात अगदीच लवकर म्हणजे फक्त तीन सेकंदात पुरुषाचे लिंग चांगले उद्दीपित होऊ शकते, असे दिसून आले.

पुरुषांमध्ये जलद कामपूर्ती-
सरासरी १४-१६ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हस्तमैथुनावेळी १० सेकंदांत कामपूर्ती होते. ६.४ टक्के मुले दहा सेकंदापेक्षा कमी वेळेत कामपूर्ती अनुभवतात. इतर मुलांत १ मिनिट लागतो. किन्सेच्या सर्वेक्षणातून असे दिसते की प्रौढांपेक्षा पौगंडावस्थेतील मुलांमध्ये ताठरता लवकर येते.

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

आरोग्यशिक्षणलेखमाहितीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Sep 2022 - 9:56 am | मुक्त विहारि

धन्यवाद

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2022 - 11:08 am | प्रकाश घाटपांडे

आपले आजचा सुधारक मधील या विषयावरील लेखन त्याकाळी वाचलेले आहे. इथे ही त्याच प्रकारचे वैचारिक व विस्तृत लेखन करु शकता. आपला या क्षेत्रातील भारतीय पार्श्वभूमीवरील अनुभव जरुर मांडावेत.

पॉर्न वर लिहिणार आहे इथे...my interest area.

मार्कस ऑरेलियस's picture

25 Sep 2022 - 11:55 am | मार्कस ऑरेलियस

डॉक्टर तुम्ही फारच बाळबोध लेख लिहित आहात , हे म्हणजे लॉर्ड्स स्टॅडियम वर जाऊन एक टप्पा आऊट क्रिकेट खेळण्यासारखे आहे. =))))

तुम्ही बिनधास्त लिहा हो , इथे मॅच्युअर्ड क्राऊड आहे.
हे घ्या तुम्हाला काही फुलटॉस टाकत आहे , जरा सिक्सर बिक्सर मारा >>>

वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन-
६५ - ७५ व्या वर्षी रीतसर इरेकशन येऊ शकते ? रादर ६५-७५ पर्यंत "पिकल्या पानाचा देठ हिरवा" रहावा म्हणुन तरुणपणापासुन काय काळजी घ्यावी ?
६५-७५ व्या वर्षी पुरुषाला कदाचित कामोत्तेजना होईलही पण स्त्रीयांना होऊ शकते ? नसेल होत तर काय करावे ? ६५-७५ व्या वर्षी कोणा नवीन व्यक्तीला पटवणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे ? मग काय ४०-५० व्या वर्षापासुनच "रीटायरमेंट प्लॅनिंग" म्हणुन काही इन्व्हेटमेन्ट करुन ठेवाव्यात काय ?

फॅलोपिअन ट्यूब-
त्याचा आणि लैंगिक जीवनाचा काय संबंध ? मुळात प्रजोत्पादनाच्या पलीकडे जाऊन निखळ सुखासाठी सुख असे लैंगिक सुख असे लोकांना कधी कळणार ? कर्वेंनी ह्यावर काही लिहिले आहे का ? फॅलोपियन ट्युब पेक्षा जी-स्पॉट वर लिहा तुम्ही.

पोर्नोग्राफी-
मग ते योग्य की अयोग्य ? तुमचे मत काय ? इथे फार पुर्वी मोठ्ठा गहजब माजला होता पॉर्न आणि नैतिकता ह्या विषयावर त्याची आठवण झाली. तुम्ही तुमची मते मांडा की ह्या विवादास्पद विषयावर.

कामसूत्र प्रथम इंग्रजीमध्ये रूपांतरीत-
मुळ कामसुत्र अगदी संस्कृत श्लोक आणि मराठी अनुवादासह वाचले असल्याने मी अधिकारवाणीने म्हणु शकतो की - कामसुत्र हा ग्रंथ हिंदु धर्मासारखा आहे . ह्या देशातील बहुतांश लोकांची बौध्दिक कुवत आणि लायकीच नाही तो समजुन घेण्याची. जुडो-ख्रिश्चन मॉरॅलिटिच्या तद्दन बकवास संकल्पनांच्या नादी लागुन आपल्या लोकांनी आपलेच नुकसान करुन घेतले आहे . नुकतेच अंबरनाथ मंदिराबाहेरील शृंगारशिल्पे पाहताना काही ब्लोजॉब्स, काही ४ सम आणि काही चक्क ऑर्जी चे शिल्प निदर्शनास पडले. हजार वर्षांपुर्वी आपल्या पुर्वजांना हे दगडात कोरुन ठेवताना लाज वाटली नाही अन लोकांना नुसते हे काय आहे हे सांगताना लाज वाटते.

'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग-
कंडोम म्हणलं की आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आठवते. =)))) बाकी आमच्या मते स्कोर नॉट आऊट हा सगळ्यात परफेक्ट आहे ;) तुमचा आवडता ब्रँड आणि व्हरायटी कोणती ?

शिश्नाचे जलद उद्दीपन-
हा एक जेन्युईन प्रॉब्लेम आहे , हिप्स डोन्ट लाय अशे शकिराबाईंनी म्हणुन ठेवले असले तरी ते खोटे आहे , डिक डोन्ट लाय हेच सत्य आहे. एखाद्या मुलीला "आपल्याला ती आवडली आहे" हे कळु न देणे हा एक अवघड प्रकार आहे. अशा वेळेला काय करावे ?

पुरुषांमध्ये जलद कामपूर्ती-
नॉर्मली किति वेळ लागतो अ‍ॅडल्ट पुरुषांना कामपुर्तीला ? आणि स्त्रीयांना किती वेळ लागतो ?
-
सिक्सरच्या अपेक्षेत !

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2022 - 1:59 pm | कानडाऊ योगेशु

डॉक्टरसाहेब अंमळ उशीराच आलेत मिपावर. संक्षीसरांच्या जमान्यात आले असते तर रिंग थेअरी फार पुढे गेली असती असे वाटते.
डॉक्टरसाहेबांचा एकुण आवेश पाहता मिपावर सेक्स संदर्भात एक वेगळा विभाग ठेवावा लागेल असे वाटते. अथवा तशी सूचना करुन मी आसनस्थ होतो.

सुरिया's picture

25 Sep 2022 - 2:58 pm | सुरिया

मी आसनस्थ होतो.

.
वाव
चांगला श्रमपरिहार.
बायदवे कुठले आसन त्यातल्या त्यात चांगले म्हणावे योगेश सर?

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2022 - 3:14 pm | कानडाऊ योगेशु

मान गये आपकी हवशी पारखी नजर को सुरियाजी! (ह.घ्या)

जल्ला डॉ पेक्षा तुझाच गो आभास नाही नाही अभ्यास म्हणतोय मी भारीच गं.
तुला मेलीला गं कशाला पाऊणशे वयात कामोत्तेजना हवीये?
तु आपलं एक एक ओवीचं एक एक पानभर बैजवार लेख लिही. आम्ही आहोतंच पारायणं करायला.

जेष्ठ मिपा नागरिकांना संघ,
पुणे बुद्रुक ४०००३०.
स्थापना - माघ २०४३.

(पळा आता नाहीतर डबल सिक्सर अंगावर येईल)

पॉर्न वर मी बरेचं लिखाण केले आहे.2 zoom meet घेतलेत लोकांमधे,drs मध्ये खूप गैरसमज आहेत.. लोकांना पॉर्न चा अभ्यास नाही.

आग्या१९९०'s picture

25 Sep 2022 - 1:41 pm | आग्या१९९०

लोकांना पॉर्न चा अभ्यास नाही.
पॉर्नचा सिलॅबस इतका महाप्रचंड की दहा जन्म घेतले तरी अपुरे पडेल नुसती थिअरी वाचायला. प्रॅक्टिकल साठी अजून किती जन्म घ्यावे लागतील हे व्यक्तीसापेक्ष राहील. जगातील सगळे प्राणिमात्र, वनस्पती, द्रव, धातू, वायू, त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, वस्तू काही म्हणजे काही सोडले नाही पॉर्नने. ह्या विषयावर तुम्ही मिपाकरांची परीक्षा घ्याच. अर्थात मिपा संपादक मंडळाच्या परवानगीने.

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2022 - 2:01 pm | कानडाऊ योगेशु

डॉक्टरसाहेब थेअरी संदर्भात जर काही किस्से आले तर मजा येईल. मिपावरुन अजुन काही डॉक्टर मंडळी आहेत आणि स्वतःचे अनुभव लिहिण्याची त्यांची विशिष्ठ अशी वाचनीय शैली पण आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

25 Sep 2022 - 4:36 pm | मार्कस ऑरेलियस

विशिष्ठ अशी वाचनीय शैली
>>>
हां ना राव . बरेच दिवसात

" मी बोटीवर होतो तेंव्हा "

हे शब्द पाहिले नाहीत मिपावर , फार चुकल्या चुकल्या सारखं होतं.

आमच्या काळंचं मिपा राहिलं नाही आता =))))

राहुल's picture

25 Sep 2022 - 2:48 pm | राहुल

हा हा हा

कंजूस's picture

26 Sep 2022 - 4:21 am | कंजूस

प्रश्न काय आहे? लैंगिक दुर्बलतेवर उपाय का लैंगिक माहिती मनोरंजन?