ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in राजकारण
21 Sep 2022 - 5:30 pm

आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे.

नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत.

---

आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा!

- केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप

ऑपइंडियाची बातमी

एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:

प्रतिक्रिया

अरविंद केजरीवाल का वक्फ बोर्ड को संबोधित करता हुआ वीडियो सोशल मीडिया पर हुआ वायरल,केजरीवाल ने मुकेश अंबानी का घर तोड़ कर वक्फ बोर्ड को देने की कही बात

https://www.pyarahindustan.com/national/video-of-arvind-kejriwal-address...

अरविंद केजरीवाल कहते है की जब भी जरुरत पड़े आपको तन, मन ,धन से केजरीवाल जी और दिल्ली सरकार वक्फ बोर्ड के साथ है,बॉम्बे के अंदर इस देश का जो सबसे अमीर आदमी है बता दे उसका घर वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी पर बना हुआ है। वह की सरकार की हिम्मत नहीं उसको कुछ कर दे। हमारी सरकार अगर वहा होती तो उसकी प्रॉपर्टी तुड़वा देता मैं ,जो भी वक़्फ बोर्ड को जरुरत होगी दिल्ली सरकार साथ है।

क्लिंटन's picture

29 Sep 2022 - 5:55 pm | क्लिंटन

नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तश्रुंगी गडावर दसर्‍याच्या दिवशी बोकडाचा बळी द्यायची परंपरा होती. २०१६ मध्ये हा प्रकार बंद करण्यात आला होता तो पुन्हा सुरू करायची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. भारताच्या राज्यघटनेत प्राण्यांविषयी संवेदनाशील वर्तणूक ठेवावी असे नागरिकांचे कर्तव्य आहे असे उगीचच वाटत होते.
या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन तो फिरवायला हवा. यज्ञाच्या वेळेस प्राण्यांचा बळी द्यायच्या प्रथेमुळे अगदी गौतम बुध्दसुध्दा व्यथित झाले होते असे वाचले आहे. त्यानंतर अडीच हजार वर्षांनंतरही अजूनही तोच प्रकार कुठेकुठे चालू असतो आणि असल्या गोष्टी न्यायालयात जातात आणि टिकतात हे दुर्दैव.

https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/the-high-court-has-allow...

जर एकूण प्राणी मारून खायला परवानगी असेल तर "प्राण्यांबद्दल संवेदनशीलता" म्हणून धार्मिक कारणासाठी प्राणी मारणे कसे बंद करता येईल ?

आणि मला नक्की माहित नाही, पण बळी दिलेल्या प्राण्यांचे मांस खातातच ना ? मग एकुणात फरक काय राहतो बळी देणे आणि नॉर्मल मारून खाण्यात ?

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2022 - 7:06 pm | श्रीगुरुजी

प्राणी स्वत:लाच खाण्यासाठी हवे असतात. कदाचित मनातील अपराधी भावनेमुळे देवाला भागीदार करीत असावे.

एकंदरीत हा अत्यंत वाईट निर्णय आहे. वाचून अत्यंत संताप आलाय.

कॉमी's picture

29 Sep 2022 - 7:14 pm | कॉमी

हे काय पटले नाही. मटण खाण्यासाठी वर्षभर थांबून फक्त बळी दिलेले मटण खाल्ले जाते असे काही असते तर "मनातली अपराधी भावना, देवाला भागीदार" वैगेरे पटले असते, पण तसे काही नसते.

आग्या१९९०'s picture

29 Sep 2022 - 7:42 pm | आग्या१९९०

मांसासाठी प्राणी कत्तल करण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. सार्वजनिक ठिकाणी तर प्राणी कत्तलीला कायदेशीर परवानगीच नाही. कत्तलखान्यातही स्वच्छतेचे नियम पाळावे लागतात. मंदिरात हे सर्व पाळले जाऊच शकत नाही. आरोग्याचा विचार केल्यास अशी परवानगी देणे योग्य नाही.

कॉमी's picture

29 Sep 2022 - 7:55 pm | कॉमी

हे पटले.

कपिलमुनी's picture

29 Sep 2022 - 8:06 pm | कपिलमुनी

सनातन हिंदू धर्मात बळी देण्याची प्रथा आहे .
न्यायलयाने ती चालू ठेवून उत्तम काम केले आहे.

जय सनातन धर्म

ते टिका वगैरे ठीक आहे, पण निदान माहिती तरी करून घ्यावी आधी.

यज्ञसंस्कृतीत अजबळी अशी प्रथा आहे हे खरे.
पण अज या शब्दाचे दोन अर्थ आहेत - अज म्हणजे जसे बकरा/बोकड तसेच, अज म्हणजे शिजवलेला तांदूळ (ओदन, भात) सुद्धा होतो.

आता यज्ञात नक्की काय बळी म्हणून दिल्या जायचे हे ना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले ना मी.
त्यामुळे जोवर काही सज्जड माहिती हाती लागत नाही तोवर उगाच पिंका टाकण्यात हशील नाही असे सांगावेसे वाटते. बाकी चालू आहेच, असू देत.

क्लिंटन's picture

3 Oct 2022 - 6:20 pm | क्लिंटन

पण अज या शब्दाचे दोन अर्थ आहेत - अज म्हणजे जसे बकरा/बोकड तसेच, अज म्हणजे शिजवलेला तांदूळ (ओदन, भात) सुद्धा होतो.

नुसत्या याच उदाहरणात नाही तर इतर अनेक ठिकाणी एखादी गोष्ट अमुकतमुक अशी असली तरी त्यामागचा गूढ अर्थ वेगळाच आहे असे म्हणत काहीही समर्थन केले जाते. अत्री ऋषी मधील त्री म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि अत्री म्हणजे या तीन मूळ कणांच्या पलीकडे गेलेला असा भन्नाट गूढ अर्थ मी ऐकला आहे. ग्रहण म्हणजे राहूकेतू सूर्याला गिळतात याचाही 'अमुक एखाद्या अँगलने बघितले तर खरोखर सूर्य गिळला जात आहे असे वाटते' असा गूढ अर्थही मी आमच्याच नात्यातील एका कट्टर धर्माभिमान्याकडून ऐकला आहे. प्रत्येक वेळेस गूढ अर्थच. साधे अर्थ आहेत कुठे? या प्रकारामुळे आपले, म्हणजे हिंदू समाजाचे नुकसान झाले आहे असे वाटत नाही का? असले काहीतरी बोलून आपणच आपल्याला हास्यास्पद बनवत असतो हे त्यांच्या कधीतरी लक्षात यावे ही अपेक्षा.

राघव's picture

3 Oct 2022 - 9:26 pm | राघव

खरंय, कोणत्याही रूढी परंपरांना शास्त्रीय परिमाण लावून दाखवलेच पाहिजे या अट्टाहासातून हे सर्व चालत असते.
पण असे करतांना आपण स्वतःच एका न्यूनगंडाला जोपासत असतो हे कळत कसे नाही, ते समजत नाही.

मी म्हणतो शात्रीय परिमाणं लावून काही सिद्ध करून दाखवायची गरजच काय? नाही पटणार काहींना तर नको करू देत ना.. ज्याला करायचं तो करेल. एवढी कसली भिती आहे तेच मला समजत नाही.

Operation Garuda : ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई, १७५ जणांना अटक; इंटरपोलचाही मोहिमेत समावेश!

https://www.loksatta.com/desh-videsh/operation-garuda-cbi-ncb-police-con...

अतिशय उत्तम....

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2022 - 9:15 pm | श्रीगुरुजी

२००५ मध्ये नाशिक साहित्य संमेलनाचा मांडव घालण्यापूर्वी मराठी साहित्य परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडावे यासाठी मांडव टाकण्याच्या जागेवर ४ बोकड ठार मारले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष पुरोगामी लेखक केशव मेश्राम होते. या मूर्खपणाला अर्थातच एकाही निधर्मांधाने विरोध केला नव्हता.

२०२१ मध्ये पुन्हा एकदा नाशकात साहित्य संमेलन झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष वैज्ञानिक जयंत नारळीकर होते. विज्ञानवादी अध्यक्ष असल्याने संमेलनाची सुरूवात करताना श्रीफळ वाढविण्याला काही निधर्मांधांनी विरोध केला होता कारण त्यांच्या मते श्रीफळ वाढविणे ही अंधश्रद्धा आहे..

मदनबाण's picture

29 Sep 2022 - 10:18 pm | मदनबाण

गेल्या काही वर्षात हे उघड झाले होते की इस्लामी जिहादी लांडगे आपली विखारी वासना भागवण्यासाठी हिंदुंच्या पवित्र नवरात्र उत्सवात चालणार्‍या गरबा मध्ये येऊन त्यांचे सावज शोधायला येऊन लव्ह जिहाद करत होते. या वेळी देखील या गोष्टीत बदल दिसला नाही, फरक इतकाच कि त्यांना योग्य प्रसाद वेळीच देण्यात आला आहे.

अधीकचे संदर्भ :-
Guddu, Bablu…: 7 Muslim youths enter garba pandal in Indore under Hindu names, caught filming girls
गरबा पंडाल में फोटो-वीडियो बना रहे थे मुस्लिम युवक, पूछने पर गलत नाम बताए, जेल भेजा

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥

मुक्त विहारि's picture

30 Sep 2022 - 8:39 am | मुक्त विहारि

धन्यवाद

प्रसाद_१९८२'s picture

30 Sep 2022 - 12:02 pm | प्रसाद_१९८२

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
हिंंदूच्या धार्मिक सणांनिमित्त निघणार्‍या मिरवणुकांवर, दगडफेक व हल्ले करणारे हे हिरवे जिहादी, गरबा व दांडीयात कोणत्या हेतूने येतात हे उघड आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे देखील असाच चोप यांना द्यावा.

https://www.loksatta.com/desh-videsh/pfi-conspiracy-attack-judges-police...

परमपूज्य राहुल गांधी, परमपूज्य केजरीवाल, PFI बद्दल काय म्हणतात? हे वाचणे रोचक ठरेल ...

मुक्त विहारि's picture

30 Sep 2022 - 9:00 am | मुक्त विहारि

PFI पर ऐक्शन से बौखलाया पाकिस्तान, संयुक्त राष्ट्र के सामने लगा गिड़गिड़ाने

https://www.livehindustan.com/international/story-pakistan-stunned-by-ac...

ह्यातच, PFI आणि पाकिस्तान, यांचे संबंध कसे आहेत? हे मला तरी समजले ...

मुक्त विहारि's picture

30 Sep 2022 - 9:21 am | मुक्त विहारि

Asaduddin Owaisi : PFI वर पाच वर्षांची बंदी; ओवैसी संतापून म्हणाले, एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर..

https://www.google.com/amp/s/www.esakal.com/amp/desh/aimim-chief-asadudd...

मी तरी, MIM ला कधीच मत देणार नाही ....

क्लिंटन's picture

30 Sep 2022 - 1:19 pm | क्लिंटन

मी तरी, MIM ला कधीच मत देणार नाही ....

तुम्ही MIM सोडून इतर कोणालाही मत देणार नाही असे जरी म्हटलेत तरी त्यावर कोणाचाच- अगदी ओवेसीचाही विश्वास बसायचा नाही :)

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु श्रीरामदास स्वामी यांच्या बद्धल रोचक माहिती वाचनात आली, ती इथे देत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥

प्रसाद_१९८२'s picture

30 Sep 2022 - 4:46 pm | प्रसाद_१९८२

सध्या कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक होत आहे.
या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या ज्या ज्या नेत्याने अर्ज दाखल केले आहेत, ते नेते सोनिया गांधी, प्रियंका गांधी व राहुल गांधी यांची, इतकी वारेमाप स्तुती मिडियात करत आहेत ते पाहून असे दिसतेय की, ही निवडणुक कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी नसून गांधी फॅमिलीचा सर्वात मोठा 'चमचा' कोण यासाठी होत आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2022 - 4:57 pm | श्रीगुरुजी

गेहलोटांनी गांधी माता, पुत्र व पुत्रीला जोरदार धोबीपछाड दिला. मुळात दिग्विजय, गेहलोट, खरगे यांच्यासारखे वृद्ध, थकलेले, कारकीर्द जवळपास संपुष्टात आलेले नेते कॉंग्रेस नावाच्या बुडणाऱ्या नौकेला कसे काय किनाऱ्यावर आणणार? थरूर तुलनेने किंचित कमी वयस्कर असले तरी केरळबाहेर त्यांना स्थान नाही आणि त्यांची प्रतिमा खुशालचेंडू, महिलांमध्ये रमणारे अशी आहे. सिंदियांना पक्षाबरोबर घालवून कॉंग्रेसने अश्वप्रमाद केला आहे. सिंदिया, पायलट, रमेश जयराम असे नवे नेतृत्व पुढे आणायला हवे होते. पायलट सिंदियांच्या मार्गाने जाण्याची आता बरीच शक्यता आहे.

एकंदरीत नजीकच्या काळात कॉंग्रेस पूर्णपणे संपणार असं दिसतंय. याचा सर्वात मोठा लाभार्थी केजरीवाल असणार.

“जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

https://www.loksatta.com/maharashtra/supriya-sule-reaction-on-rss-ban-de...

“केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी.

-------

पाकिस्तान, PFI वर बंदी बाबतीत, युनो कडे जाते, ही बाब नजरेआड करून चालणार नाही....

सुबोध खरे's picture

1 Oct 2022 - 10:20 am | सुबोध खरे

मी "रा स्व संघाचा" स्वयंसेवक आहे असे कित्येक नेते अभिमानाने म्हणतात.

तसा एक तरी नेता मी "पी एफ आय" चा सदस्य आहे म्हणून शकेल का?

सुसु ताईंचे बरोबर आहे हो.

दाढी कुरवाळली नाही तर मते कशी मिळणार?

डँबिस००७'s picture

30 Sep 2022 - 9:59 pm | डँबिस००७

एकंदरीत PFI वर बॅन आणल्याने बर्याच नेत्यांची समिकरण गंडलेली आहेत.
आपल्या संपुर्ण आयुष्यात मुसलमानांचा आपल्यासाठी व्होट बँक म्हणुन वापरणार्यांना भाजपा अशी खेळी करेल ह्याची आशंका आली नाही.
त्यामुळे बर्याच नेत्यांचा तोल सुटला.

मुस्लीम बहुल राष्ट्रांचा मोदी सरकारवर निशाणा; या निर्णयामुळे टीकेची झोड…

https://www.tv9marathi.com/international/pakistan-other-muslim-countries...

मोदी सरकार, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे
...

“आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने सांगितला घटनाक्रम

https://www.loksatta.com/maharashtra/after-fir-filed-against-chhagan-bhu...

No Comments

मातोश्री’वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; खोक्यांवरून शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

"'मातोश्री'वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; खोक्यांवरून शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप | Mp prataprao jadhav attacks uddhav thackeray | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/politics/mp-prataprao-jadhav-attacks-uddhav-t...

डँबिस००७'s picture

2 Oct 2022 - 2:05 pm | डँबिस००७

भारताने चीनला दिली मात !

काल व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या सर्वसाधारण परिषदेत यूएस-यूके-ऑस्ट्रेलिया न्यूक्लियर पाणबुडी कराराच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा चीनचा प्रयत्न रोखण्यात भारताच्या कुशल मुत्सद्देगिरीने मदत केली. ऑस्ट्रेलियाला अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या पुरवण्याच्या मागणीसाठी चीनने AUKUS विरोधात ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी सांगितले की, मसुद्याला बहुमत मिळू नये यासाठी भारताने अनेक IAEA सदस्य देशांसोबत काम केले आहे. IAEA द्वारे तांत्रिक मूल्यमापनाची योग्यता ओळखून भारताने पुढाकाराचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन घेतला. भारताच्या विचारात घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक लहान देशांना चीनच्या प्रस्तावावर स्पष्ट भूमिका घेण्यास मदत झाली. आपल्या ठरावाला बहुमत मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर चीनने आपला ठराव मागे घेतला. भारताच्या कुशल आणि प्रभावी मुत्सद्देगिरीचे IAEA सदस्य राष्ट्रांनी, विशेषतः AUKUS भागीदारांनी मनापासून कौतुक केले.
https://newsonair.gov.in/Main-News-Details.aspx?id=448632
https://youtu.be/VhOFJVAUo70

वामन देशमुख's picture

2 Oct 2022 - 8:36 pm | वामन देशमुख

भारताने चीनला दिली मात !

सदर विषयाची पुरेशी माहिती / अभ्यास नाही. पण भारत देशाचे अभिनंदन!

डँबिस००७'s picture

2 Oct 2022 - 2:07 pm | डँबिस००७

भारताने चीनला दिलेल्या धक्क्यामूळे
डॉ जयशंकर साहेबांच आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.

कपिलमुनी's picture

2 Oct 2022 - 10:49 pm | कपिलमुनी

gandhi

आग्या१९९०'s picture

2 Oct 2022 - 11:25 pm | आग्या१९९०

गुजरात जनतेला दिल्ली पंजाबच्या रेवड्या आवडू लागल्या.

मोठी बातमीः 25 वर्षात इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट? ‘हे’ शहर धर्मांधतेचं हब बनवण्याचा होता कट.. धक्कादायक खुलाशात आणखी काय?

https://www.tv9marathi.com/national/pfi-aims-to-make-islamic-country-in-...

औरंगाबाद शहर हे धर्मांधतेचं हब बनवण्याचा PFI कट होता.

एटीएसने केलेल्या दाव्यानुसार, औरंगाबादमध्ये अटक केलेल्या चौघांपैकी एकजण अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे. त्याच्याकडे 19 पानांचं हस्तलिखित दस्तावेज सापडलं आहे…. या दस्तावेजानुसार, 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं पीएफआयचं मिशन होतं, यासाठी विविध ठिकाणी एनजीओ उघडल्या जात होत्या, असं एटीएसने कोर्टात म्हटलंय.

---------

परमपूज्य केजरीवाल, परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष आता काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ....

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मोठी घोषणा; बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने

"Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मोठी घोषणा; बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने | Sakal"

https://www.esakal.com/maharashtra/cm-eknath-shinde-big-announcement-bef...

उत्तम निर्णय .....

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 6:52 pm | श्रीगुरुजी

भाजप जितक्या लवकर बाळ ठाकरेंचे गुणगान, बाळ ठाकरेंची कधीतरी कोठेतरी केलेली वक्तव्ये, बाळ ठाकरेंचे दाखले, बाळ ठाकरे म्हणजे देवतासमान महापुरूष, हिंदुहृदयसम्राट वगैरे थांबवून त्याऐवजी स्वपक्षीय नेत्यांबद्दल बोलतील तितक्या लवकर भाजपची घसरण थांबेल. ठाकरे नावाच्या मानसिक गुलामगिरीतून भाजपने तात्काळ मुक्त होणे आवश्यक आहे.

मुक्त विहारि's picture

3 Oct 2022 - 7:27 pm | मुक्त विहारि

बाळासाहेब ठाकरे, ह्यांना मानणारे खूप मतदार अजूनही आहेत...

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 7:32 pm | श्रीगुरुजी

असू देत की. शिवसेना असताना ते तुम्हाला मत देणारेत का? आणि दाखले देण्यासाठी तुमच्याकडे एकही नेता नाही का? दाखलेच द्यायचे असतील तर ते वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, मोदी, सावरकर इ. चे द्या की. तसेही बाळ ठाकरे भाजपला कायम लाथा घालून शिव्या देत अत्यंत अपमानास्पद वागणूक द्यायचे. तरीही त्यांचा उदोउदो कशासाठी?

त्या त्या राज्यात, त्या त्या राज्यातीलच नावे लागतात...

लचित बडफुकन, हे प्रति छत्रपती शिवाजी महाराज असले तरी, लचित बडफुकन हे नांव, आसाम व्यतिरिक्त कुठेच चालणार नाही...

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 7:58 pm | श्रीगुरुजी

असं काही नाही. मोदी या अमहाराष्ट्री नावावर भाजपच्या बरोबरीने सेनेलाही मते मिळतात. विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी २०१४ मध्ये झाली होती ज्यात भाजपने बाळ ठाकरे नाव न वापरता मोदींचे नाव वापरले होते. दुर्दैवाने नंतरच्या काळात भाजप नेत्यांनी बाळ ठाकरेंचा उदोउदो करीत पक्ष मातोश्रीच्या गोठ्यात नेऊन बांधला आणि सत्ता घालवून बसले. निदान आतातरी सुधारा. सेना नेते भाजपच्या एकाही आजीमाजी नेत्याला शष्प किंमत देत नाहीत. मग तुम्हालाच वारंवार एवढी उबळ का येते?

पण, निव्वळ मोदी, योगी, तेजस्वी सुर्या ह्या नावांनी महाराष्ट्र राज्यात भाजपला मते मिळणार नाहीत ....

शिवसेनेला देतील, छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव सुरवातीला आणि अजूनही घ्यावे लागतेच की....

असो,

तुमच्या बरोबर चर्चा करतांना, पुलंचा एक लेख आठवला ... निवडणूका आणि भाषणे, असा मी असा मी, ह्या पुस्तकांतला

त्या काळांत, महात्मा गांधी हे नांव प्रचलित होते

तसेच सध्या, बाळासाहेब ठाकरे हे नांव प्रचलित आहे

तुम्हाला पटो की न पटो...

पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे...

राज ठाकरे यांना, माझे नांव वापरून मते मागायची नाहीत, ही अट खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच, उगाच टाकली नाही ....

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 8:38 pm | श्रीगुरुजी

पण, निव्वळ मोदी, योगी, तेजस्वी सुर्या ह्या नावांनी महाराष्ट्र राज्यात भाजपला मते मिळणार नाहीत ....

मोदी हे नाव वापरूनच २०१४ पासून भाझप.व सेनेला मते यिळालीत.

पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे...

अत्यंत चुकीचा व हास्यास्पद समज आहे. बाळ ठाकरेंना स्वत:च्या हयातीत सुद्धा स्वबळावर जास्तीत जास्त १ आमदार निवडून आणता आला होता. १९८९ मध्ये भाजपने युती करण्याचा गंभीर अश्वप्रमाद केला नसता तर आजसुद्धा सेनेचा जास्तीत जास्त १ आमदार असता.

राज ठाकरे यांना, माझे नांव वापरून मते मागायची नाहीत, ही अट खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच, उगाच टाकली नाही ....

हास्यास्पद. जसं काही चुलत्यांचं नाव वापरलं असतं तर राज ठाकरेंना भरपूर मते मिळाली असती.

मुक्त विहारि's picture

3 Oct 2022 - 8:58 pm | मुक्त विहारि

पास

तुम्ही तुमच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी सुखी

पॉल पॉट's picture

3 Oct 2022 - 10:24 pm | पॉल पॉट

मोदी हे नाव वापरूनच २०१४ पासून भाझप.व सेनेला मते यिळालीत.
२०१४ ला शिवसेना भाजप युती तूटली होती. सेनेचे तेव्हा ६३ आमदार जिंकले. ते मोदींमूळे?

पॉल पॉट's picture

4 Oct 2022 - 12:01 am | पॉल पॉट

पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे... >>>>
मला चांगलं आठवतंय. १९९५ सालच्या निवडणूकीत बाळासाहेबांनी महाराष्ट्र एकहाती पिंजून काढला होता. महाराष्ट्रभर स्विकारला जावा असा एकही नेता तेव्हा भाजपकडे नव्हता. आजही नाही. आजही मोदी नावावर मते मागावी लागतात. फडणवीस ही प्रत्येक भाषनात मोदी नावाचा जप करत असतात. तेव्हा (१९९५) साली महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब नी शरदपवार हे दोनच लोकनेते होते. बाळासाहेबांच्या एकहाती प्रचारामूळे १९९५ साली भाजपचे ६५ आमदार जिंकले होते. बाळासाहेबांचा तो झंजावात पाहूनच भाजपला सेनेपुढे नमते घ्यावे लागले. आजही घ्यावे लागते. बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे फार प्रभावी होती. मी स्वतः मूंबईत अनेक ठिकाणी ऐकली होती. पवारांच्या भाषणोही ऐकली होती. तेव्हा पवारांचं एक वाक्य चूकलं नी सत्ता गेली. आजही भाजपच्या आमदारांची सूज दिसते ती ईडी च्या भितीने भरती झालेल्या भ्रष्टांमूळे. स्वतः सभा घेऊनही मोदी छत्रपतींच्या वंशजाला निवडून आणू शकले नाहीत.
त्यामुळे तूमचं “पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे...” हे वाक्य शंभर टक्के खरंय.

पॉल पॉट's picture

3 Oct 2022 - 10:25 pm | पॉल पॉट

भाजपच्या एकाही आजीमाजी नेत्याला शष्प किंमत देत नाहीत.
भाजपमध्ये किंमत द्यावा असा एकही नेता नाहीये. मोदींचे स्वतचे अनेक दावे खोटे असल्याचे ऊघड झालंय.

दाखलेच द्यायचे असतील तर ते वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, मोदी, सावरकर इ. चे द्या की.

वाजपेयींचा काय दाखला देनार? अतिरेकी कंधारला सोडून मर्दूमकी गाजवली हा की सैन्याला कारगील वेळी सिमापार करू दिली नाही हा? संसद हल्ला नी ताजमहलमध्ये नमाज परवानगी देनारे वाजपेयीच होते. … असो.
अडवाणींचा काय दाखला देनार? आम्ही बाबरी पाडलीच नाही असं म्हणनारा हिंदूत्ववादी?
सुषमा स्वराज?? ह्या बाईंच कर्तृत्व काय आहे नेमकं?
बाकी शामाप्रसाद मुखर्जी ना दिनदयाळ ऊपाध्याय हे भाजपशी संबंधीत होते हे कुणाला ठाऊकतरी आहे का?
मोदी?? मोदींचे अनेक दावे खोटे ठरलेत. त्यांच्या डिग्री पासून तर वडनगरला चहा विकेपर्यंत. त्यांच्या सख्ख्या भावाने सांगीतलंय की मोदींनी कधीही चहा विकला नाही. मोदीनी किती वर्षे भिक मागीतली ह्या बाबतीत ते स्वतःही ठाम नाहीत. एका विडीओत ५ वर्षे सांगीतलेय ते दुसर्यात ३५ वर्षे.

बाळासाहेब ठाकरे हे नावच भाजपला घ्यावे लागनार. दुभत्या गायीच्या लाथा खाव्या लागतात तसंच भाजप बाळासाहेबांच्या लाथा खात होती.

आग्या१९९०'s picture

4 Oct 2022 - 12:38 am | आग्या१९९०

मोदी?? मोदींचे अनेक दावे खोटे ठरलेत. त्यांच्या डिग्री पासून तर वडनगरला चहा विकेपर्यंत
दिल्ली विद्यापीठाने हि खाजगी माहिती असल्याने माहितीच्या अधिकारात देण्यास नकार दिल्याने अजून त्यांच्या डिग्रीच्या खोटेपणा सिद्ध झाला नाही. जी व्यक्ती डिजिटल कॅमेराचा शोध लागण्यापूर्वी टाइम मशिन वापरून असे फोटो काढू शकते अशा व्यक्तीच्या डिग्रीबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांच्या बुध्दीची कीव येते.