Skip to main content

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 21/09/2022 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत. --- आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा! - केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप ऑपइंडियाची बातमी एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:

वाचने 18701
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु श्रीरामदास स्वामी यांच्या बद्धल रोचक माहिती वाचनात आली, ती इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥

सध्या कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या ज्या ज्या नेत्याने अर्ज दाखल केले आहेत, ते नेते सोनिया गांधी, प्रियंका गांधी व राहुल गांधी यांची, इतकी वारेमाप स्तुती मिडियात करत आहेत ते पाहून असे दिसतेय की, ही निवडणुक कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी नसून गांधी फॅमिलीचा सर्वात मोठा 'चमचा' कोण यासाठी होत आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

गेहलोटांनी गांधी माता, पुत्र व पुत्रीला जोरदार धोबीपछाड दिला. मुळात दिग्विजय, गेहलोट, खरगे यांच्यासारखे वृद्ध, थकलेले, कारकीर्द जवळपास संपुष्टात आलेले नेते कॉंग्रेस नावाच्या बुडणाऱ्या नौकेला कसे काय किनाऱ्यावर आणणार? थरूर तुलनेने किंचित कमी वयस्कर असले तरी केरळबाहेर त्यांना स्थान नाही आणि त्यांची प्रतिमा खुशालचेंडू, महिलांमध्ये रमणारे अशी आहे. सिंदियांना पक्षाबरोबर घालवून कॉंग्रेसने अश्वप्रमाद केला आहे. सिंदिया, पायलट, रमेश जयराम असे नवे नेतृत्व पुढे आणायला हवे होते. पायलट सिंदियांच्या मार्गाने जाण्याची आता बरीच शक्यता आहे. एकंदरीत नजीकच्या काळात कॉंग्रेस पूर्णपणे संपणार असं दिसतंय. याचा सर्वात मोठा लाभार्थी केजरीवाल असणार.

“जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान https://www.loksatta.com/maharashtra/supriya-sule-reaction-on-rss-ban-d… “केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. ------- पाकिस्तान, PFI वर बंदी बाबतीत, युनो कडे जाते, ही बाब नजरेआड करून चालणार नाही....

In reply to by मुक्त विहारि

मी "रा स्व संघाचा" स्वयंसेवक आहे असे कित्येक नेते अभिमानाने म्हणतात. तसा एक तरी नेता मी "पी एफ आय" चा सदस्य आहे म्हणून शकेल का? सुसु ताईंचे बरोबर आहे हो. दाढी कुरवाळली नाही तर मते कशी मिळणार?

एकंदरीत PFI वर बॅन आणल्याने बर्याच नेत्यांची समिकरण गंडलेली आहेत. आपल्या संपुर्ण आयुष्यात मुसलमानांचा आपल्यासाठी व्होट बँक म्हणुन वापरणार्यांना भाजपा अशी खेळी करेल ह्याची आशंका आली नाही. त्यामुळे बर्याच नेत्यांचा तोल सुटला.

मुस्लीम बहुल राष्ट्रांचा मोदी सरकारवर निशाणा; या निर्णयामुळे टीकेची झोड… https://www.tv9marathi.com/international/pakistan-other-muslim-countrie… मोदी सरकार, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे ...

“आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने सांगितला घटनाक्रम https://www.loksatta.com/maharashtra/after-fir-filed-against-chhagan-bh… No Comments

मातोश्री’वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; खोक्यांवरून शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप "'मातोश्री'वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; खोक्यांवरून शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप | Mp prataprao jadhav attacks uddhav thackeray | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/politics/mp-prataprao-jadhav-attacks-uddhav-…

भारताने चीनला दिली मात ! काल व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या सर्वसाधारण परिषदेत यूएस-यूके-ऑस्ट्रेलिया न्यूक्लियर पाणबुडी कराराच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा चीनचा प्रयत्न रोखण्यात भारताच्या कुशल मुत्सद्देगिरीने मदत केली. ऑस्ट्रेलियाला अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या पुरवण्याच्या मागणीसाठी चीनने AUKUS विरोधात ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी सांगितले की, मसुद्याला बहुमत मिळू नये यासाठी भारताने अनेक IAEA सदस्य देशांसोबत काम केले आहे. IAEA द्वारे तांत्रिक मूल्यमापनाची योग्यता ओळखून भारताने पुढाकाराचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन घेतला. भारताच्या विचारात घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक लहान देशांना चीनच्या प्रस्तावावर स्पष्ट भूमिका घेण्यास मदत झाली. आपल्या ठरावाला बहुमत मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर चीनने आपला ठराव मागे घेतला. भारताच्या कुशल आणि प्रभावी मुत्सद्देगिरीचे IAEA सदस्य राष्ट्रांनी, विशेषतः AUKUS भागीदारांनी मनापासून कौतुक केले. https://newsonair.gov.in/Main-News-Details.aspx?id=448632 https://youtu.be/VhOFJVAUo70

भारताने चीनला दिलेल्या धक्क्यामूळे डॉ जयशंकर साहेबांच आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.

मोठी बातमीः 25 वर्षात इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट? ‘हे’ शहर धर्मांधतेचं हब बनवण्याचा होता कट.. धक्कादायक खुलाशात आणखी काय? https://www.tv9marathi.com/national/pfi-aims-to-make-islamic-country-in… औरंगाबाद शहर हे धर्मांधतेचं हब बनवण्याचा PFI कट होता. एटीएसने केलेल्या दाव्यानुसार, औरंगाबादमध्ये अटक केलेल्या चौघांपैकी एकजण अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे. त्याच्याकडे 19 पानांचं हस्तलिखित दस्तावेज सापडलं आहे…. या दस्तावेजानुसार, 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं पीएफआयचं मिशन होतं, यासाठी विविध ठिकाणी एनजीओ उघडल्या जात होत्या, असं एटीएसने कोर्टात म्हटलंय. --------- परमपूज्य केजरीवाल, परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष आता काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ....

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मोठी घोषणा; बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने "Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मोठी घोषणा; बाळासाहेबांच्या नावे सुरू होणार दवाखाने | Sakal" https://www.esakal.com/maharashtra/cm-eknath-shinde-big-announcement-be… उत्तम निर्णय .....

In reply to by मुक्त विहारि

भाजप जितक्या लवकर बाळ ठाकरेंचे गुणगान, बाळ ठाकरेंची कधीतरी कोठेतरी केलेली वक्तव्ये, बाळ ठाकरेंचे दाखले, बाळ ठाकरे म्हणजे देवतासमान महापुरूष, हिंदुहृदयसम्राट वगैरे थांबवून त्याऐवजी स्वपक्षीय नेत्यांबद्दल बोलतील तितक्या लवकर भाजपची घसरण थांबेल. ठाकरे नावाच्या मानसिक गुलामगिरीतून भाजपने तात्काळ मुक्त होणे आवश्यक आहे.

In reply to by मुक्त विहारि

असू देत की. शिवसेना असताना ते तुम्हाला मत देणारेत का? आणि दाखले देण्यासाठी तुमच्याकडे एकही नेता नाही का? दाखलेच द्यायचे असतील तर ते वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, मोदी, सावरकर इ. चे द्या की. तसेही बाळ ठाकरे भाजपला कायम लाथा घालून शिव्या देत अत्यंत अपमानास्पद वागणूक द्यायचे. तरीही त्यांचा उदोउदो कशासाठी?

In reply to by श्रीगुरुजी

त्या त्या राज्यात, त्या त्या राज्यातीलच नावे लागतात... लचित बडफुकन, हे प्रति छत्रपती शिवाजी महाराज असले तरी, लचित बडफुकन हे नांव, आसाम व्यतिरिक्त कुठेच चालणार नाही...

In reply to by मुक्त विहारि

असं काही नाही. मोदी या अमहाराष्ट्री नावावर भाजपच्या बरोबरीने सेनेलाही मते मिळतात. विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी २०१४ मध्ये झाली होती ज्यात भाजपने बाळ ठाकरे नाव न वापरता मोदींचे नाव वापरले होते. दुर्दैवाने नंतरच्या काळात भाजप नेत्यांनी बाळ ठाकरेंचा उदोउदो करीत पक्ष मातोश्रीच्या गोठ्यात नेऊन बांधला आणि सत्ता घालवून बसले. निदान आतातरी सुधारा. सेना नेते भाजपच्या एकाही आजीमाजी नेत्याला शष्प किंमत देत नाहीत. मग तुम्हालाच वारंवार एवढी उबळ का येते?

In reply to by श्रीगुरुजी

पण, निव्वळ मोदी, योगी, तेजस्वी सुर्या ह्या नावांनी महाराष्ट्र राज्यात भाजपला मते मिळणार नाहीत .... शिवसेनेला देतील, छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव सुरवातीला आणि अजूनही घ्यावे लागतेच की.... असो, तुमच्या बरोबर चर्चा करतांना, पुलंचा एक लेख आठवला ... निवडणूका आणि भाषणे, असा मी असा मी, ह्या पुस्तकांतला त्या काळांत, महात्मा गांधी हे नांव प्रचलित होते तसेच सध्या, बाळासाहेब ठाकरे हे नांव प्रचलित आहे तुम्हाला पटो की न पटो... पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे... राज ठाकरे यांना, माझे नांव वापरून मते मागायची नाहीत, ही अट खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच, उगाच टाकली नाही ....

In reply to by मुक्त विहारि

पण, निव्वळ मोदी, योगी, तेजस्वी सुर्या ह्या नावांनी महाराष्ट्र राज्यात भाजपला मते मिळणार नाहीत .... मोदी हे नाव वापरूनच २०१४ पासून भाझप.व सेनेला मते यिळालीत. पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे... अत्यंत चुकीचा व हास्यास्पद समज आहे. बाळ ठाकरेंना स्वत:च्या हयातीत सुद्धा स्वबळावर जास्तीत जास्त १ आमदार निवडून आणता आला होता. १९८९ मध्ये भाजपने युती करण्याचा गंभीर अश्वप्रमाद केला नसता तर आजसुद्धा सेनेचा जास्तीत जास्त १ आमदार असता. राज ठाकरे यांना, माझे नांव वापरून मते मागायची नाहीत, ही अट खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच, उगाच टाकली नाही .... हास्यास्पद. जसं काही चुलत्यांचं नाव वापरलं असतं तर राज ठाकरेंना भरपूर मते मिळाली असती.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी हे नाव वापरूनच २०१४ पासून भाझप.व सेनेला मते यिळालीत. २०१४ ला शिवसेना भाजप युती तूटली होती. सेनेचे तेव्हा ६३ आमदार जिंकले. ते मोदींमूळे?

In reply to by मुक्त विहारि

पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे... >>>> मला चांगलं आठवतंय. १९९५ सालच्या निवडणूकीत बाळासाहेबांनी महाराष्ट्र एकहाती पिंजून काढला होता. महाराष्ट्रभर स्विकारला जावा असा एकही नेता तेव्हा भाजपकडे नव्हता. आजही नाही. आजही मोदी नावावर मते मागावी लागतात. फडणवीस ही प्रत्येक भाषनात मोदी नावाचा जप करत असतात. तेव्हा (१९९५) साली महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब नी शरदपवार हे दोनच लोकनेते होते. बाळासाहेबांच्या एकहाती प्रचारामूळे १९९५ साली भाजपचे ६५ आमदार जिंकले होते. बाळासाहेबांचा तो झंजावात पाहूनच भाजपला सेनेपुढे नमते घ्यावे लागले. आजही घ्यावे लागते. बाळासाहेबांची तेव्हाची भाषणे फार प्रभावी होती. मी स्वतः मूंबईत अनेक ठिकाणी ऐकली होती. पवारांच्या भाषणोही ऐकली होती. तेव्हा पवारांचं एक वाक्य चूकलं नी सत्ता गेली. आजही भाजपच्या आमदारांची सूज दिसते ती ईडी च्या भितीने भरती झालेल्या भ्रष्टांमूळे. स्वतः सभा घेऊनही मोदी छत्रपतींच्या वंशजाला निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे तूमचं “पुढील तीन पिढ्या तरी, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावे, महाराष्ट्र राज्यात, मते मागीतली जातील आणि हे भाजप ओळखून आहे...” हे वाक्य शंभर टक्के खरंय.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपच्या एकाही आजीमाजी नेत्याला शष्प किंमत देत नाहीत. भाजपमध्ये किंमत द्यावा असा एकही नेता नाहीये. मोदींचे स्वतचे अनेक दावे खोटे असल्याचे ऊघड झालंय.

In reply to by श्रीगुरुजी

दाखलेच द्यायचे असतील तर ते वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, मोदी, सावरकर इ. चे द्या की.
वाजपेयींचा काय दाखला देनार? अतिरेकी कंधारला सोडून मर्दूमकी गाजवली हा की सैन्याला कारगील वेळी सिमापार करू दिली नाही हा? संसद हल्ला नी ताजमहलमध्ये नमाज परवानगी देनारे वाजपेयीच होते. … असो. अडवाणींचा काय दाखला देनार? आम्ही बाबरी पाडलीच नाही असं म्हणनारा हिंदूत्ववादी? सुषमा स्वराज?? ह्या बाईंच कर्तृत्व काय आहे नेमकं? बाकी शामाप्रसाद मुखर्जी ना दिनदयाळ ऊपाध्याय हे भाजपशी संबंधीत होते हे कुणाला ठाऊकतरी आहे का? मोदी?? मोदींचे अनेक दावे खोटे ठरलेत. त्यांच्या डिग्री पासून तर वडनगरला चहा विकेपर्यंत. त्यांच्या सख्ख्या भावाने सांगीतलंय की मोदींनी कधीही चहा विकला नाही. मोदीनी किती वर्षे भिक मागीतली ह्या बाबतीत ते स्वतःही ठाम नाहीत. एका विडीओत ५ वर्षे सांगीतलेय ते दुसर्यात ३५ वर्षे. बाळासाहेब ठाकरे हे नावच भाजपला घ्यावे लागनार. दुभत्या गायीच्या लाथा खाव्या लागतात तसंच भाजप बाळासाहेबांच्या लाथा खात होती.

In reply to by पॉल पॉट

मोदी?? मोदींचे अनेक दावे खोटे ठरलेत. त्यांच्या डिग्री पासून तर वडनगरला चहा विकेपर्यंत दिल्ली विद्यापीठाने हि खाजगी माहिती असल्याने माहितीच्या अधिकारात देण्यास नकार दिल्याने अजून त्यांच्या डिग्रीच्या खोटेपणा सिद्ध झाला नाही. जी व्यक्ती डिजिटल कॅमेराचा शोध लागण्यापूर्वी टाइम मशिन वापरून असे फोटो काढू शकते अशा व्यक्तीच्या डिग्रीबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांच्या बुध्दीची कीव येते.

“नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजब दावा https://www.loksatta.com/maharashtra/lampi-virus-spread-after-modi-gove… ------ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

शिवाजी पार्क मैदान प्रकरणापाठोपाठ ऋतुजा लटके प्रकरणातही शिंफ सरकार तोंडावर आपटले. यातून ऋतुजा लटकेंनाच सहानुभूती मिळाली आहे. नशीबाने पावणेतीन वर्षांनंतर सत्ता मिळाल्यावर काही भरीव काम करण्याऐवजी फालतू गोष्टींवरच भर दिला की असंच वारंवार आपटावं लागणार. आपल्या पहिल्या ५ वर्षात बहुतेक वेळ कारस्थाने करून पक्षांतर्गत विरोधक संपवून सत्ता घालविल्यानंतर आतासुद्धा काम न करता अत्यंत फालतू गोष्टींवरून कारस्थाने सुरू आहेत. ठाकरे सरकार पावणेतीन वर्षे फक्त विरोधकांना व टीकाकारांंच्ये मागे लागले होते व वारंवार न्यायालयाकडून थपडा खात होते. शिंफ सरकार फक्त सेनेच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यात धन्यता मानत आहे व त्यामुळे न्यायालयाकडून थपडा खात आहे. हे सरकार खड्ड्यात जाण्याच्या दृष्टीने वेगात मार्गक्रमणा करीत आहे.

आज वाचलेला एक कायप्पा फोरवर्ड "एका विधवेवर चालून आलात? पराजित झालात तर अब्रु जाईल", अहिल्यादेवी होळकर.. ...मग राघू पेशवे माघारी फिरले.:)

In reply to by पॉल पॉट

एका विधवेच्या विरोधात जाऊन अख्खा पक्ष कुणी काढला याचा फॉरवर्ड पण आला नाही वाटतं? लटके वहिनी जर शिंदे गटात असत्या आणि निवडणूक लढवत असत्या तर गद्दार महाराष्ट्रद्रोही अशी शेलकी विशेषणे लावून म वि आ चा उमेदवार उभा केला असता आणि प्रचाराचा शिमगा केला असता. कमाईग अशाच कोणत्यातरी निवडणुकीत एका विधवेच्या विरुद्ध आपला उमेदवार उभा करून श्री शरद पवार यांनी जंग जंग पछाडून त्यांना पराभूत केले होते. नाव आठवले कि सांगतो तेंव्हा इतिहासातील दाखले सोडून द्या

In reply to by सुबोध खरे

आधी झालेल्या तीन पोटनिवडणूकांत ऊमेदवार ऊभा केला भाजपने तेव्हा संस्कृती नाही आठवली. आता शिवसेनेची ताकद पाहून मैदानातून पळ काढला. सोयीने हिंदूत्व आठवतं भाजपेयींना तसं सोयीने संस्कृती आठवली. बाकी त्या बाईच्या ऊमेदवारीत काड्या करन्यात आल्या. राजिनामा स्विकारला गेला नाही तेव्हा मात्र संस्कृती कुठे माती खायली गेली होती?? राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पळ काढला. अनेक प्रलोभने देऊनही श्रीमती लटके भाजप किंवा शिंदे गटात गेल्या नाहीत न्हणून पळ काढावा लागला भाजपला.

In reply to by पॉल पॉट

एका विधवेच्या विरोधात जाऊन अख्खा पक्ष कुणी काढला याचा फॉरवर्ड पण आला नाही वाटतं? लटके वहिनी जर शिंदे गटात असत्या आणि निवडणूक लढवत असत्या तर गद्दार महाराष्ट्रद्रोही अशी शेलकी विशेषणे लावून म वि आ चा उमेदवार उभा केला असता आणि प्रचाराचा शिमगा केला असता. कमाईग अशाच कोणत्यातरी निवडणुकीत एका विधवेच्या विरुद्ध आपला उमेदवार उभा करून श्री शरद पवार यांनी जंग जंग पछाडून त्यांना पराभूत केले होते. नाव आठवले कि सांगतो तेंव्हा इतिहासातील दाखले सोडून द्या

In reply to by सुबोध खरे

कधी कधी, माघार घेण्यात शहाणपणा असतो आणि हा शहाणपणा माननीय शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी देखील दाखवला आहेच की ... अंधेरी निवडणूक ही एक लिटमस टेस्ट म्हणून कॉंग्रेसला द्यायला नको होती आणि तेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने केले. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने, मुंबई महानगर पालिका, हेच सध्या पुरते ध्येय ठेवले आहे. मुरजी पटेल यांच्या निष्ठेची लिटमस टेस्ट करून झाली, ही एक बाजू आणि निवडणूकीत कुठल्या वाॅर्डातून किती मते लटके ताईंना मिळतात? ही दुसरी बाजू झाली. तिसरी महत्वाची बाजू म्हणजे, भाजपचे निर्णय, केंद्रीय पातळीवर घेतले जातात, हे परत एकदा योग्य त्या व्यक्तींपाशी पोहचवले गेले, मग त्या व्यक्ती अंतर्गत असोत किंवा बाहेरील. चौथी महत्वाची बाजू म्हणजे, शिंदे गटाला, तयारी साठी पुरेसा वेळ आणि मतदारांच्या कलाचा अंदाज यायला हवा... वजीराला वाचवायला प्यादीच बळी जातात.तसेच, एका जागेने भाजपचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे, काहीच नुकसान झाले नाही. अर्थात, काहीही झाले तरी, माननीय उद्धव ठाकरे गटाला आता कॉंग्रेसचेच बोट पकडून चालणे भाग पडणार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मजा बघत बसणार... बाय द वे, एक सुंदर सिनेमा आठवला The man from Nowhere. जरूर बघा ....

In reply to by मुक्त विहारि

कधी कधी, माघार घेण्यात शहाणपणा असतो माघार घेणे नी पळपूटेपणा करणे ह्यात फरक असतो. माघार निवडणूक जाहीर झाल्याबरोबर घेता येते. आन वेळी केला जातो तो पळपुटेपणा. अर्थात, काहीही झाले तरी, माननीय उद्धव ठाकरे गटाला आता कॉंग्रेसचेच बोट पकडून चालणे भाग पडणार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मजा बघत बसणार... सेना आणी शिंदे गटात फरक आहे.

In reply to by मुक्त विहारि

अशीही लाल ! तशीही लाल .. जिंकलो तरी लाल ... हरलो तरी लाल.. पुढून लाल , मागून लाल .. लाल लाल लाले लाल !

In reply to by कपिलमुनी

परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष यांची अशीच परिस्थिति आहे...

In reply to by मुक्त विहारि

अशीही लाल ! तशीही लाल .. जिंकलो तरी लाल ... हरलो तरी लाल.. पुढून लाल , मागून लाल .. लाल लाल लाले लाल !

In reply to by सुबोध खरे

गांधी कॉंग्रेस, पवार कॉंग्रेस, ममता कॉंग्रेस इत्यादी एका माणसाच्या हातातील पक्ष, लगेच निर्णय घेऊ शकतात. पण, समितीला निर्णय घ्यायला वेळ लागतो .... हा मुलभूत फरकच, काही लोकांना पटत नाही.... एखाद दोन माणसांच्या हाती पक्ष गेला की काय होते? हे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या निर्मितीने दाखवले आहेच की, आणि गेला बाजार काश्मीरचा प्रश्र्न युनोत नेऊन, हे सिद्ध पण केले आहेच.... वरील चर्चा ही , सुबोध खरे यांच्या बरोबर करत आहे. नसता चोंबडेपणा करायला येऊ नये ....

In reply to by मुक्त विहारि

गांधी नेहरू आडनाव सोडले तर काँग्रेस, ममता शिवाय तृणमूल, ठाकरे आडनावाशिवाय शिवसेना किंवा पवार कुलोत्पन्न सोडून राष्ट्रवादी पक्ष हा त्या त्या त्या पक्षाच्या कार्यकारिणीला मान्य होतोय का? १९९८ पासून श्रीमती सोनिया गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत मधली २ वर्षे (२०१७-१९) राहुल गांधींचा "प्रयोग" सोडला तर. अटल बिहारी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण जे पी नड्डा, वेंकय्या नायडू, राजनाथ सिंह, अमित शाह या पैकी एकाचे ही दुसर्याशी जवळचे किंवा लांबचे नाते नव्हते/ नाही. आणि यापैकी एकाचेही सुपुत्र किंवा सुकन्या नजीकच्या भविष्यकाळात पक्षाचे नेतृत्व करण्याची शक्यता नाही. बाकी गुलामी ची वृत्ती रक्तातच मुरली असली कि गुलामीचे फायदे आणि स्वातंत्र्याचे तोटेच जास्त दिसत राहतात आणि त्याला साधा उपाय नाही

In reply to by सुबोध खरे

संघात हा अशीच परिस्थीती आहे. ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा सरसंघचालक केला जात नाही. बाकी शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष अनूक्रमे बाळासाहेब नी पवारांनी राबून वाढवलेत ते इतर कोणाला का द्यावेत?? भाजप हा खिचडी नेत्यांची पक्ष आहे. एकमेकांचे काटे काढत लोक वर जातात भाजपात. मोदी विरूध्द संजय जोशी, मोदी विरूध्द अडवाणी, फडणवीस विरूध्द मूंडे, तावडे, पंकजाताई, बावनकूळे. अमीत शहा विरूध्द फडणवीस असं पक्षांतर्गत खूनशी राजकारण भाजपातच पहायला मिळते.

In reply to by पॉल पॉट

भुजबळ नव्या अवतारात आलेले दिसत आहेत. तोच द्वेष तोच भंपक युक्तिवाद तोच मुद्दा भरकटवणे राजकीय पक्षाच्या अध्यक्षांबद्दल चर्चा असताना नको तरी नाक खुपसणे

In reply to by सुबोध खरे

कोण भूजबळ? काय भंपक युक्तिवाद? काय मूद्दा भरकटवला? बहुतेक संघाचे सर्व अध्यक्ष ब्राम्हण का? ह्या कळीच्या प्रश्नावरून काढता पाय घ्यायचा हा फोल प्रयत्न असावा का?

In reply to by सुबोध खरे

खासगी चर्चा करायची असेल तर व्यनी खेळावे.. सार्वजनिक पटलावर आला की चर्चा ही सार्वजनिक होणारच... परा च्या भाषेत खिडकीत बसलात की लोक शुक शुक् करणारच

In reply to by पॉल पॉट

ब्राम्हण जातीशिवाय इतर जातीचा सरसंघचालक केला जात नाही केवळ जातीवर आधारित असा द्वेषमूलक प्रश्न होता म्हणून मी पास दिला होता असो प्रा. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या हे १९९४ ते २०० पर्यंत सरसंघचालक होते ते जनेयुधारी ब्राम्हण होते काय हो? नाही म्हणजे आजकाल पारशी/ मुसलमान आजोबांची नातवंडे स्वतः;ला जनेयुधारी ब्राम्हण म्हणवून घेताना दिसतात म्हणून विचारले

In reply to by सुबोध खरे

पारशी/मुसलमान आजोबा ? शहाणी सुरती माणसे सुद्धा व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी स्नातक असतात असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

पारशी/मुसलमान आजोबा ? शहाणी सुरती माणसे सुद्धा व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी स्नातक असतात असे दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की सगळे कसे छानच आहे असे दिसते किंवा तसे नाटक करता येते, स्त्री/पुरुष श्रीगुरुजी. (अपमानित होण्याची गरज नसावी, होय ना ?)

In reply to by कॉमी

बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की सगळे कसे छानच आहे असे दिसते किंवा तसे नाटक करता येते, स्त्री/पुरुष श्रीगुरुजी. (अपमानित होण्याची गरज नसावी, होय ना ?) बुद्धी बंद केली, डोळे बंद केले की कटू वाटणाऱ्या सत्य गोष्टींना नाकारावं लागतं ना, स्त्री/पुरुष/अजून काही तरी कॉमी. (शरम वाटण्याची गरज नसावी, होय ना ?)