ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

Primary tabs

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
12 Sep 2022 - 10:17 pm

न्यायाधीशांनी निकाल वाचला.
'त्या' पाच महिला नाचल्या.

मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग.
म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग

ओवैसी ने केला थयथयाट.
1991 चा कायदा त्याला पाठ

'औवैसी, तू कितनी भी पटक ले'
आताआहे हिंदू जनमत सटकले

औरंग ने काढले होते फर्मान
त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण

एक मंदिर-भिंत तशीच ठेवली
हिंदू-जखम धगधगत ठेवली

कसले दाखले अन कसले पुरावे
उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे

शतकातून मग एक लोकोत्तर नेता
370, राममंदिर,आता काशी घेता

याआधी न्यायदेवता होती आंधळी
कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी

आज हसला असेल तो शिव-नंदी
संपलीती वोटबँक राजनीती गंदी

आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे
ज्यांनी केलंअपील पूजा करण्याचे !!

माझी कविताधर्मइतिहास

प्रतिक्रिया

छान व न्यायाधीशांचे आभार!!

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2022 - 5:20 pm | चौथा कोनाडा

छानच की !

सौंदाळा's picture

13 Sep 2022 - 5:54 pm | सौंदाळा

सुंदर कविता.
येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.

या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.

सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Sep 2022 - 9:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

समयोचित आणि चपखल
पैजारबुवा,