पी एच डी

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in काथ्याकूट
18 Aug 2022 - 1:56 pm
गाभा: 

व्यावसायिक गरज म्हणून सहा वर्षांपूर्वी मी व्यवस्थापन या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी केली. त्या वेळी पण आवडत्या विषयावर अभ्यास करण्याचे समाधान मिळाले, नाही असे नाही, पण त्याच वेळी आपल्या अधिक आवडत्या विषयावर मराठीतून पीएच.डी करायला मिळाली तर काय बहार येईल असेही मनात येऊन गेले.
माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला. सहा वर्षे काम केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मला 'जी.ए.कुलकर्णी यांचे साहित्य : कन्नड मराठी सांस्कृतिक अनुबंध' या प्रबंधासाठी 'विद्यावाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली.
या वयात हे काम करता आले, हे समाधान अपार आहे.
मला बळ आणि सदिच्छा देऊ केलेल्या असंख्य शुभचिंतकांचा मी आभारी आहे. या प्रबंधाचे पुस्तक करता आले तर अधिक समाधान वाटेल.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

18 Aug 2022 - 2:01 pm | क्लिंटन

हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव.

डबल डॉक्टर, वाह. मनापासून अभिनंदन.

सतत नवे आत्मसात करण्याची ही इच्छा अत्यंत अनुकरणीय.

वामन देशमुख's picture

18 Aug 2022 - 2:11 pm | वामन देशमुख

मनःपूर्वक अभिनंदन!

सौंदाळा's picture

18 Aug 2022 - 2:20 pm | सौंदाळा

अभिनंदन रावसाहेब.
तुम्ही वाचकांच्या मनात उत्तम लेखक म्हणून आहातच त्यावर विद्यापीठाची मोहोर लागली.
मिपावर तुमचे लेख वाचण्यास उत्सुक आहे.

सरिता बांदेकर's picture

18 Aug 2022 - 2:42 pm | सरिता बांदेकर

हार्दिक अभिनंदन.

हार्दिक अभिनंदन डबल डॉक्टरेट साठी

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2022 - 2:52 pm | कर्नलतपस्वी

नशीबवान आहात, शिक्षणाची आवड आणी संधी आपल्या कडे आहे आणी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहात.प्रशंसनीय.

उपलब्धी बद्दल अभिनंदन पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.

विजुभाऊ's picture

18 Aug 2022 - 2:52 pm | विजुभाऊ

अभिनंदन संजोप सर.
मिपावरून अदृष्य झालाय तुम्ही . आता पुन्हा लिहीते व्हा अशी विनंती करतो

Bhakti's picture

18 Aug 2022 - 3:25 pm | Bhakti

माझ्याकडे मराठीतली एम.ए. किंवा एम. फिल. ही पदवी नाही, पण आधीच्या पदव्यांच्या आधारावर मला मौखिक परीक्षेसाठी बसण्याची परवानगी मिळाली. माझे तोपर्यंत झालेले काम बघून मराठी विभागाने मला पीएच.डी.साठी प्रवेश दिला.

वाह! उल्लेखनीय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2022 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा....!
प्रबंधांचे पुस्तक व्हावे यासाठीही शुभेच्छा...!

आमच्या विद्यापीठात प्रबंधाचे पुस्तक करण्यासाठी विद्यापीठा ग्रँटही देते.
केवळ माहितीस्तव.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2022 - 5:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

मिपाला प्रा डाँ नंतर आता डॉ डॉ पण मिळाले
पैजारबुवा,

नि३सोलपुरकर's picture

18 Aug 2022 - 4:17 pm | नि३सोलपुरकर

हार्दिक अभिनंदन.सर

खेडूत's picture

18 Aug 2022 - 4:20 pm | खेडूत

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

पी हेच डीला एकलव्य मोडमध्ये काम करायला लागतं असे ऐकले आहे.
आता इकडेही लिहायला आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा.

चिन्मना's picture

18 Aug 2022 - 4:24 pm | चिन्मना

डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुमच्या मनात प्रबळ इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याची चिकाटी पण होती त्यामुळेच हे साध्य होवू शकले.

प्रदीप's picture

18 Aug 2022 - 4:35 pm | प्रदीप

जी. ए. तुमच्या जुन्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या विषयांत अगदी प्रबंध लिहून पी. एच. डी. मिळवल्याबद्दल कौतुक व हार्दिक अभिनंदन.

हा प्रबंध कुठे वाचता आला तर आनंद होईल.

श्वेता व्यास's picture

18 Aug 2022 - 4:53 pm | श्वेता व्यास

हार्दिक अभिनंदन !

कुमार१'s picture

18 Aug 2022 - 5:24 pm | कुमार१

हार्दिक अभिनंदन !

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन !
&#🌹
हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन डॉ डॉ विद्यावाचस्पती सन्जोप राव !

सोत्रि's picture

18 Aug 2022 - 8:05 pm | सोत्रि

संजोपराव,

डबल डॉक्टरेटबद्दल हार्दिक अभिनंदन !

- (संजोपरावांच्या लेखनाचा पंखा) सोकाजी

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Aug 2022 - 8:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

सन्जोपराव यांच्या लेखनाबद्दल फक्त ऐकुन आहे. कोणी त्याची लिंक देउ शकेल का ईथे?

सुखी's picture

18 Aug 2022 - 8:16 pm | सुखी

अभिनंदन...

इथे परत लिहिते व्हा __/\__

पुंबा's picture

19 Aug 2022 - 6:40 am | पुंबा

हार्दिक अभिनंदन!!

कंजूस's picture

19 Aug 2022 - 8:22 am | कंजूस

हार्दिक अभिनंदन डॉ.डॉ.संजोप राव.
-------------
पुस्तकासाठी बरेच पर्याय आहेत. विकायचे असेल A/नसेल Bतर दोन्हीही. ओडिओ बुकही.

A - फ्री डाउनलोड साठी google driveवर टाकणे.
A1चित्रं नसतील तर टेक्स्ट फाईल
A2पीडीएफ फाईल
A3ओडीओ फाईल
AT - blogger / WordPress

B -विकणे
B1 प्रकाशक बघणे
B2 - KDP Kindle Direct Publishing. Kindle help pageवर माहिती दिली आहे.

गामा पैलवान's picture

19 Aug 2022 - 6:08 pm | गामा पैलवान

डॉक्टर संजोप रावांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान केल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे अभिनंदन.
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

23 Aug 2022 - 1:51 pm | विवेकपटाईत

अभिनंदन.