श्री योगेश चिथडे-एक द्रष्टा

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
22 Jul 2022 - 11:56 am

mipa****** mipa

mipa***** mipa

माणसाच्या जीवनात प्राणवायूची खरी किंमत काय आहे करोनाच्या काळात सर्वानाच कळून चुकले.

एक सैनिक जो देशाच्या उच्चतुंगता भागात कार्यरत आसतो त्याला प्राणवायूची किंमत काय आसते ते पावलो पावली समजते.

काही सामान्य व्यक्ती समाजाला अनोळखी आसतात. गुपचूप, गाजावाजा न करता सामाजीक बांधिलकी जपत आसतात. त्यांचे असामान्य कर्तृत्व जेंव्हा समाजा समोर येते तेंव्हा, बाकीबाब, कवीवर्य बा भ बोरकरांची कवीता आठवते आणी दोन्ही कर आपोआप जुळतात.

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती"

काश्मीरमधील उच्चतुंगता भागात सेनेच्या जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे, यासाठी सियाचिन आणी कुपवाडा इथे दोन कोटी रूपये खर्चून ऑक्सिजन प्रकल्प श्री योगेश चिथडे आणी सौ.सुमेधा चिथडे यांच्या प्रयत्नातून उभारला गेला व देशाला समर्पित केला. श्री योगेश चिथडे सुरुवातीला हवाई दलात कार्यरत होते. तेथील आठ वर्षांच्या सेवेनंतर ते स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये रुजू झाले. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी समाजाने काही तरी केले पाहिजे, या भावनेतून १९९९ मध्ये पत्नी सुमेधा यांच्या साथीने त्यांनी 'सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन'ची (सिर्फ) स्थापना केली. "लोग जुडते गये कारवाॅ बनता गया"

हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना मदत करणे, वीरनारींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. स्वतःच्या आर्थिक योगदानाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून निधी जमवून सामाजीक बांधिलकी या भावनेतून एवढे मोठ्ठे कार्य आपल्या ६१ वर्षाच्या छोट्याश्या आयुष्यात करून समाजा समोर एक आदर्श सोडून निजधामास निघून गेले.

कै.योगेश चिथडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच बुधवारी २०-७-२०२२ सायंकाळी उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई-वडील, बहीण,पत्नी सुमेधा, मुलगा हृषीकेश असा परिवार आहे. चिथडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मी स्वतः सेना विकीत्सा कोर मधे होतो आणी प्राणवायूच्या सिलेंडरची पुरवठा शृंखला किती लांब आणी दुश्कर होती याची चांगलीच कल्पना आहे. तंगधार सारख्या देशातील इतर भागाशी सहा महिने दळणवळण खंडित आसणाऱ्या भागात प्राणवायुचे भंडारण (Storage) आणी पुरवठा एक वेगळेच आव्हान होते.तीन वर्ष आशा दुर्गम भागात काम केल्यामुळे हा ऑक्सिजन प्रकल्प सैन्य आणी स्थानिक लोकांसाठी किती मोठ्ठे वरदान आहे याची चांगलीच कल्पना आहे.आशा या द्रष्ट्या ,महान योगेश चिथडे व त्यांच्या साथीदारांना मानाचा मुजरा. परमेश्वराने योगेश चिथडे यांना आजुन आयुष्य द्यायला हवे होते. ईश्वरेच्छा बलियसीः , पुण्यात्म्याला माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

व्यक्तिचित्रणबातमी

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

22 Jul 2022 - 12:03 pm | कुमार१

योगेश चिथडे व त्यांच्या साथीदारांना मानाचा मुजरा.
>>>+1111
आदरांजली !

मुक्त विहारि's picture

22 Jul 2022 - 12:07 pm | मुक्त विहारि

महान योगेश चिथडे व त्यांच्या साथीदारांना मानाचा मुजरा.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jul 2022 - 12:42 pm | अमरेंद्र बाहुबली

योगेश चिथडे यांना भावपुर्ण श्रध्दांजली. हे खरे हीरो आहेत समजातले. पद्मश्री वगैरे पुरस्कार अश्या लोकांना मिळायला हवेत पण कंगना सारख्यांना मोदी सरकार देते.

भावपूर्ण श्रद्धांजली. __/|\__
खूप महत्वाचे योगदान!

चौथा कोनाडा's picture

22 Jul 2022 - 1:19 pm | चौथा कोनाडा

🙏

सुंदर संकलन आणि लेखन, कर्नल साहेब !

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

सुजाण नागरिक सैनिक आणि सैन्याच्या पाठीशी असतात याचे उत्तुंग उदाहरण म्हणजे योगेश चिथडे आणि सहकारी !

महान योगेश चिथडे व त्यांच्या सहकार्‍यांना मानाचा मुजरा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2022 - 1:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्या मानाने लवकर गेला...

भावपूर्ण आदरांजली

पैजारबुवा,

अनिंद्य's picture

22 Jul 2022 - 1:35 pm | अनिंद्य

हे लोक खरे सायलेंट हिरो !

कोट्यवधींचे बजेट उपलब्ध असतांना भारतीय सैन्याला ऑक्सिजन पुरवठ्यासारख्या महत्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी श्री चिथडे यांच्या दोन कोटी रुपयांच्या व्यक्तिगत योगदानाची गरज पडली याचे वाईट वाटले.

त्यांना श्रद्धांजली _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jul 2022 - 2:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

योगेश चिथडेना भावपूर्ण आदरांजली!!

सौंदाळा's picture

22 Jul 2022 - 2:42 pm | सौंदाळा

वर्तमानपत्रात बातमी वाचली होती.
चिथडे यांनी निस्पृह कार्य केले. भावपूर्ण श्रध्दांजली.

स्वधर्म's picture

22 Jul 2022 - 4:10 pm | स्वधर्म

खरंच, अशी मोठी माणसे हीच खरी देशाची संपत्ती आहे. केंद्र सरकारने प्राणवाय़ूची व्यवस्था करायला हवी होती.

गामा पैलवान's picture

22 Jul 2022 - 7:25 pm | गामा पैलवान

श्री. योगेश चिथडे यांना श्रद्धांजली. __/\__ त्यांना शांती व सद्गती लाभो. त्यांचं काम स्फूर्तीदायक आहे. सरकारला हे आधीच का सुचलं नाही, हे कोडंच आहे.

असो.

या निमित्ताने सियाचेन येथील सैनिकांना इंधनाचे पंप पुरवणारे मिपाकर उद्योजक सुधीर मुतालिक यांची आठवण झाली. त्यांना दीर्घायु लाभो.
-गा.पै.

अनन्त अवधुत's picture

22 Jul 2022 - 8:50 pm | अनन्त अवधुत

श्री. योगेश चिथडे यांना आदरांजली. त्यांना सद्गती लाभो. __/\__

सरिता बांदेकर's picture

22 Jul 2022 - 8:57 pm | सरिता बांदेकर

भावपूर्ण श्रद्धांजली.

यश राज's picture

22 Jul 2022 - 8:59 pm | यश राज

श्री. योगेश चिथडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

जेम्स वांड's picture

24 Jul 2022 - 9:48 am | जेम्स वांड

श्री योगेश चिथडे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सुरसंगम's picture

24 Jul 2022 - 10:05 am | सुरसंगम

अलौकिक कार्य. ही अशी लोकं लवकर का बरं जातात.
त्यांना विनम्र अभिवादन.

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2022 - 11:15 am | धर्मराजमुटके

योगेश चिथडे यांना भावपूर्ण आदरांजली!!

अवांतर :

मी स्वतः सेना विकीत्सा कोर मधे होतो

विकित्सा कोर म्हणजे काय ? माझ्या आजवरच्या वाचनात हा शब्द कधी आला नाही म्हणून विचारतो आहे.

जेम्स वांड's picture

24 Jul 2022 - 11:52 am | जेम्स वांड

ते आर्मी मेडिकल कोर म्हणतायत.

कर्नल सर आर्मी डॉक्टर होते काय तुम्ही?

कर्नलतपस्वी's picture

24 Jul 2022 - 6:23 pm | कर्नलतपस्वी

मी डॉक्टर नाही,प्रशासन, व्यवस्थापन अधिकारी होतो.

कर्नलतपस्वी's picture

24 Jul 2022 - 5:46 pm | कर्नलतपस्वी

आर्मी मेडिकल कोअर.

अनन्त्_यात्री's picture

24 Jul 2022 - 12:16 pm | अनन्त्_यात्री

श्री. योगेश चिथडे यांना श्रद्धांजली.

कानडाऊ योगेशु's picture

24 Jul 2022 - 10:53 pm | कानडाऊ योगेशु

श्री.योगेश चिथडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.!

कै. श्री. चिथडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

श्री. योगेश चिथडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

चलत मुसाफिर's picture

26 Jul 2022 - 6:54 pm | चलत मुसाफिर

यांचा मुलगा हृषीकेश स्वतः सेनाधिकारी आहे