नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?

Trump's picture
Trump in काथ्याकूट
6 Jun 2022 - 1:24 pm
गाभा: 

काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्‍या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

30 Jun 2022 - 7:21 pm | डँबिस००७

राजस्तानच्या मा मु गहलोतना ईतक्या दिवसांनी आज कन्हय्यांच्या कुटुंबाची आठवण आली व त्यांनी त्यांची भेट घेतली व ५० लाखाचा चेक दिला.

दोन मारेकर्यांना आज कोर्टात हजर केल.

सुरिया's picture

1 Jul 2022 - 12:04 pm | सुरिया

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला अशा अशांत परिस्थितीबद्दल एकटीला दोषी ठरवत संपूर्ण देशाची माफी मागावी असे सांगितले आहे. सत्तेच्या दर्पाने काहीही बोलण्याचा अधिकार मिळत नाही आणि असे उद्धट वर्तन लाजिरवाणे आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला अशा अशांत परिस्थितीबद्दल एकटीला दोषी ठरवत संपूर्ण देशाची माफी मागावी असे सांगितले आहे. सत्तेच्या दर्पाने काहीही बोलण्याचा अधिकार मिळत नाही आणि असे उद्धट वर्तन लाजिरवाणे आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

नुपुर शर्मा नेमक्या काय बोलल्या होत्या (ते वक्तव्य सर्वोच्च फटकावणीस पात्र आहे कि नाही हा पुढचा मुद्दा) याची माहिती मिळाली का?

आणि आता भाजपाचे तेलंगणातील आमदार राजा सिंग यांना अटक झाली आहे.

हे एक ट्विट:

सूचना: व्हिडिओत अश्लील शब्द आहेत

संबंधित बातमी: https://www.opindia.com/2022/08/raja-singh-blasphemy-sar-tan-se-juda-beh...

तेलंगणा पुलीसांनी काय कलमे लावली आहेत ते माहीत नाही पण भाजपने तातडीने पत्र माध्यमाद्वारे प्रकाशित केले आहे त्यात त्यांना आदरपूर्वक पक्षाच्या घटनेतील नियम XXV 10 (a) ह्याचे उल्लंघन दाखवून त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. उपरोल्लेखित गोष्टींचा खुलासा त्यांच्याकडून २ सप्टेंबर पर्यंत मागवला आहे. कदाचित भाजपाच्या पक्ष घटनेतील नियम स्पष्ट असतील त्यामुळे काय घडले ते येत्या काळात कळेलच.