ताज्या घडामोडी मे २०२२

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
1 May 2022 - 5:32 pm

गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.

निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.

https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor-...

प्रतिक्रिया

राज ठाकरे साहेबांनी bjp ल अनुकूल भूमिका घेतली .मराठी पना सोडून हिंदुत्व घेतले.
Bjp नी पाळलेल्या न्यूज चॅनेल नी त्यांना डोक्यावर घेतले.
हेच न्यूज चॅनल राज ठाकरे वर टीका करण्यात सर्वात पुढे असायचे.
त्यांनी आयोद्या मध्ये जाणार असे जाहीर केले आणि bjp चाचा एक किरकोळ आमदार ब्रीज भूषण ह्यांनी राज ठाकरे ना धमकी दिली पहिली उत्तर भारतीय लोकांची माफी मागा.
कारण राज ठाकरे नी उत्तर भारतीय लोकांच्या अतिक्रमणावर टीका केली होती.
ब्रीज भूषण.
योगी नी पाठिंबा देवू किंवा आर्मी नी सुरक्षा पुरवू राज ठाकरे माफी मागत नसतील तर ते aayodhya मध्ये येवू शकणार नाही.
यूपी पोलिस आणि भारतीय आर्मी इतकी कमजोर आहे का जी अतिशय किरकोळ आमदार खासदार जो काही असेल तो .
त्यांना चॅलेंज करू शकतो
योगी,मोदी,अमित जी ह्यांना चॅलेंज करू शकतो.
Ed,Nia,Cbi, सर्व पाठी लागतील पूर्ण आयुष्य तुरुंगात जाईल.
म्हणजे हा brijbhushan जो काही फेकत आहे ते bjp च्या इशाऱ्यावर च.

sunil kachure's picture

10 May 2022 - 1:28 pm | sunil kachure

एक किरकोळ आमदार,खासदार नी दिलेल्या धमकी मुळे राज ठाकरे aayodhya दौरा रद्द करतील ?
राज ठाकरे माफी मागतील?
राज ठाकरे माफी वैगेरे काही मागणार नाहीत ते aayodhya मध्ये जातील?

माझा अंदाज आहे .राज ठाकरे माफी पण स्पष्ट मागणार नाहीत,शब्द फिरवून थोडी भूमिका बदलतील
आणि aayodhya मध्ये जातील.
तो किरकोळ,आमदार,खासदार त्या वर च खुश होईल आणि विरोध करणारं नाही .
राज ठाकरे ना इजा होणे म्हणजे काय ह्याचा अर्थ नक्कीच त्यांना माहीत आहे..
इथे तत्वाची लढाई मुळात च नाही.
राजकीय खेळी आहेत
सर्व प्यादे आहेत.
किंग वेगळाच आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 May 2022 - 1:24 pm | चंद्रसूर्यकुमार

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंडविधानातील कलम १२४(अ) म्हणजे देशद्रोहाचे कलम स्थगित केले आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत या कलमांतर्गत कोणताही गुन्हा नोंदवता येणार नाही असा आदेश दिला आहे.

मला वाटते की हे एक चांगले पाऊल आहे. कारण देशद्रोह या गुन्ह्याचा आरोप कोणावरही हवेत ठेवता येणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीवर दुसरा कोणतातरी आरोप असेलच. उदाहरणार्थ दहशतवादी संघटनांशी संबंध असणे, अशा हिंसक कारवायांमध्ये भाग घेणे वगैरे. असा आरोप ठेवला म्हणजे तो देशद्रोहाचाच आरोप आहे हे सामान्यांनाही समजेल. पण असा कोणताही आरोप नसेल तर मग नुसता हवेतला देशद्रोहाचा आरोप कसा ठेवणार? तसा आरोप ठेवल्यास तो राणा दांपत्याविरोधात 'मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणू असे म्हटले' (प्रत्यक्ष हनुमान चालिसा म्हटलीच नाही) म्हणजे देशद्रोह झाला असा हास्यास्पद प्रकार होईल.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की कलम १२४(अ) बरोबर दुसर्‍या कोणत्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल तर मग कलम १२४(अ) ची गरज नाही. आणि तसा नसेल तर मग महाविकास आघाडी सरकारने राणा दांपत्यावर ते १२४(अ) कलम लावले तसा हास्यास्पद प्रकार होईल. तेव्हा ते कलम भारतीय दंडविधानातून काढून टाकले तरी काही हरकत नसावी.

यासाठी संदर्भ म्हणून भारतीय दंडविधानातील कलमे बघत होतो. १२४ च्या पुढचेच कलम १२५ आहे "Waging war against any Asiatic Power in alliance with the Government of India". म्हणजे भारताचा मित्रदेश असलेल्या कोणत्याही आशियाई देशाविरोधात कारवाई करणे हा भारतात गुन्हा आहे. म्हणजे भारताचा मित्रदेश असलेल्या कोणा आफ्रिकन किंवा इतर खंडातील देशाविरोधात कारवाई केली तर चालणार का? दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध काळानुरूप बदलत असतात. १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत भारत आणि चीनचे वरकरणी गळ्यात गळे होते पण नंतर, विशेषतः १९६२ नंतर चीन आपला शत्रू झाला. तसे समजा भारताचे कोणत्या देशाबरोबर झाले आणि समजा पूर्वी मित्र असलेला देश आता शत्रू झाला. तसे असेल तर समजा पूर्वी त्या देशाविरोधात कारवाया केला म्हणून दाखल झालेला गुन्हा कोर्टात जाईपर्यंत तो देश शत्रू झाला असेल तर मग संबंधित व्यक्तीला निर्दोष सोडणार का?

भारतीय दंडविधान १८६० मध्ये म्हणजे तत्कालीन गरजांना अनुसरून केले आहे. त्यात अशी काही कलमे असतील तर ती बदलायला हरकत नसावी.

कॉमी's picture

11 May 2022 - 8:31 pm | कॉमी

चांगले झाले.

sunil kachure's picture

11 May 2022 - 1:43 pm | sunil kachure

जग जवळ आले आहे.हे जग म्हणजे एक कुटुंब झाले आहे.असे आपण म्हणतो.
तेव्हा देश निष्ठा ह्या प्रकार ला पण काहीच किंमत नसते..चीन मध्ये covid च्या नावाखाली अनंत अत्याचार जनतेवर केंद्र सरकार करत आहे,उत्तर कोरिया तेच करत आहे.
त्यांनी देशाविरुद्ध का बोलू नये.
आणि तो गुन्हा कसा काय?

sunil kachure's picture

11 May 2022 - 1:44 pm | sunil kachure

जग जवळ आले आहे.हे जग म्हणजे एक कुटुंब झाले आहे.असे आपण म्हणतो.
तेव्हा देश निष्ठा ह्या प्रकार ला पण काहीच किंमत नसते..चीन मध्ये covid च्या नावाखाली अनंत अत्याचार जनतेवर चीन सरकार करत आहे,उत्तर कोरिया तेच करत आहे.
त्यांनी देशाविरुद्ध का बोलू नये.
आणि तो गुन्हा कसा काय?

sunil kachure's picture

11 May 2022 - 2:05 pm | sunil kachure

राज्य द्रोह आणि देशद्रोह ह्याची.
१) जे राज्याच्या हीता विरुद्ध वर्तन करतात,कृत्य करतात ते राज्य द्रोही.
ह्या मध्ये राज्यसरकार पण येते.
राज्याच्या हिता विरुद्ध राज्य सरकार निर्णय घेत असेल तर ते राज्य द्रोही च .
पूर्ण साकार वर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
२)राष्ट्र द्रोही.
राष्ट्राचे हीत धोक्यात येईल असे विचार व्यक्त करणे,संघटना बनवणे तशी कृती करणे हा राष्ट्र द्रोह च.
ह्या मध्ये केंद्र सरकार पण दोषी मध्ये असू शकत.
४)राज्य असू किंवा केंद्र सरकार विरोधी बोलणे हा कोणताच द्रोह नाही तो हक्क आहे.पण मर्यादित.खोटे आरोप नाहीत.
केंद्र सरकार देशविरोधी वागत असेल आणि जनता सशस्त्र किंवा शांत पने विरोध करत असेल तर तो राष्ट्र द्रोह असूच शकत नाही.

मोहालीच्या पोलिस मुख्यालयावर खालिस्तानी अतिरेक्यांनी चालच्या वहानातुन रॉकेट प्रॉपेल्ड बॉंबचा मारा केला. तो बाँब काचा फुटुन ऑफिस मध्ये पडला पण त्याचा सुदैवाने स्फोट झाला नाही. ह्या प्रकरणात कोणतीही जिवित हानी झालेली नाही अस कळलय !

मोहालीच्या पोलिसांना ह्या घटनेचा पत्ताच नव्हता. मोहालीच्या नगर पालिकेच्या महीला स्वच्छता कर्मचार्याने खालिस्तानी अतिरेक्यांनी रत्यात टाकुन दिलेला बाँब
रॉकेट प्रॉपेलर निदर्शनास आणुन दिला. इतके प्रकरण होत असताना मोहालीचे पोलिस तजिंदर बग्गाला पकडायला दिल्लीत गेलेले होते.

ह्याच्या आदल्या दिवशीच हरियाणाच्या विधान सभेच्या ईमारतीच्या संरक्षक भींतीवर खालिस्तानच्या अतिरेक्यांनी रात्री येऊन खालिस्तानचे झेंडे लावलेले होते जे दुसर्या दिवशी सकाळी लोकांना आढलेले होते.

पंजाब मध्ये गेल्या काही दिवसात बरेच टिफीन बाँब आढ ळुन आलेले आहेत. त्यातले बरेचसे पाकिस्तानातुन ड्रोनच्या मदतीने सिमेपार पोहोचवलेले होते. त्यातले काही टीफीन बाँब सध्या बेपत्ता आहेत.

एकंदरीत देशात खालिस्तानच्या अतिरेक्यांचा उपद्रव वाढु लागलेला आहे.

निनाद's picture

12 May 2022 - 7:34 am | निनाद

एकुण पंजाब मध्ये येत्या काळात या बाँब वगैरे प्रकरण आणि त्यात अडकलेले या सर्वांकडे कानाडोळा केला जाईल असे दिसते. आपचे खलिस्तान प्रेम सर्वाना माहित आहे. केजु त्यांच्या घरी रहायला जायचा तर अजून काय पुरावे हवेत? आणि त्यात त्यांना निवडणुकीचा पैसा पुरवणारे तेच होते हे पण उघड गुपित आहे. मग त्यांच्यासाठी काम करणारे सरकार आले आहे तर ते फायदा घेणारच!

वामन देशमुख's picture

11 May 2022 - 5:56 pm | वामन देशमुख

‘दम असेल तर ताजमहलचं मंदिर बनवून दाखवा’, मेहबूबा मुफ्ती यांचं भाजपाला आव्हान

देशातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर आता ताजमहालबाबत वाद सुरू झाला आहे. भाजपा नेते रजनीश यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून ताजमहाल प्रत्यक्षात तेजो महाल असल्याचा दावा केल्याने वाद वाढत आहे. त्यांनी ताजमहालच्या तळघरातील २२ खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. या वादात आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ताजमहालबाबत भाजपला आव्हान दिलं आहे.

---

अर्थात, सध्याचे केंद्रीय राज्यकर्ते ताजमहालाची घरवापसी, काशी-मथुरेचा जीर्णोद्धार वगैरे काही करणार नाहीत याची खात्री आहे.

---

आठ वर्षांत ज्यांना पाठ्यपुस्तकांतील धडे सुधारता आले नाहीत ते ताजमहालला तेजोमहालय काय करणार?

---

नुसती सत्ता मिळून भागत नाही, त्या सत्तेचा आपले व्यक्त-अव्यक्त हेतू सध्या करण्यासाठी योग्य तो वापर करण्याची हिम्मत असावी लागते.

ओमिड्यार नेटवर्क हे भारतातील अनेक प्रकाशनांना निधी पुरवण्यासाठी ओळखले जाते. गृह मंत्रालयाच्या (MHA) FCRA विभागात काम करणार्‍या ६ सरकारी अधिकार्‍यांसह ३६ व्यक्ती/संस्था आणि NIC च्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंतच्या झडतीदरम्यान, हवाला चॅनेलद्वारे सुमारे २ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले आहेत.

ओमिड्यार नेटवर्क हे भारतातील अनेक प्रकाशनांना निधी पुरवण्यासाठी ओळखले जाते. हे न्युज लोंड्री Newslaundry, स्क्रोल डॉट इन हे यांच्या पैसे पुरवण्याचा यादीत आहेत. यावरून समजून जावे की हे लोक काय आहेत. यांना Governance and Citizen Engagement मध्ये फार रस आहे. त्यातही यांचे टारगेट हे लहान शहरातील लोक हे आहे.

यांच्या वर बेकायदेशीर पद्धतीने काम करण्यासाठी लाच दिल्याच आरोप आहे. मंत्रालयाने FCRA तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि लाचेच्या बदल्यात परवाने वाटप केल्याबद्दल त्यांचे अधिकारी आणि NGO विरुद्ध तक्रार दाखल केली होती. गृह मंत्रालयाच्या (MHA) FCRA विभागात काम करणार्‍या ६ सरकारी अधिकार्‍यांसह ३६ व्यक्ती/संस्था आणि NIC च्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे.

ओमिड्यार नेटवर्क हे डाव्या संस्थांना पैसे पुरवणारी संस्था आहे. म्हणजे उद्या भानगड झाली की हे नामानिराळे राहू शकतात. पण हा डाव भारतात फसला असावा.

पुर्वी हे उघड झाले आहे की ओमिड्यार ग्रुप हाच फॉरबिडन स्टोरीज (FS) ला देणगी देणाऱ्यांपैकी एक आहे. ही एक संशयास्पद संस्था आहे. यांचा मूळ उद्देश शासनात बदल करणे आणि जगभरातील देशांमध्ये डावी सरकारे स्थापित करणे आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) आणि फ्रीडम व्हॉइसेस नेटवर्क द्वारे FS लाँच केले गेले. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही तीच संघटना आहे जिने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्यासाठी खोटा 'प्रेस फ्रीडम इंडेक्स' आणला होता.
भारताला यात प्रामुख्याने असे चित्रित केले की जेथे पत्रकारांना लक्ष्य केले जाते आणि त्यांचा छळ केला जातो. मग यावर एक मोठे कँपेन चालवले गेले होते.

पण घोळ असा झाला की यात असलेले पत्रकार हे नेमके काँग्रेस प्रणित राज्यातले निघाले. उरलेले आणि जम्मू आणि काश्मीरचे दहशतवाद्यांसाठी काम करत होते
असे पत्रकार निघाले. त्यामुले मग घाई घाईने हे प्रकरण आवरते घेण्यात आले होते.

राज ठाकरे ह्यांनी मराठी पना सोडून हिंदुत्व घेतलें
त्यांची मर्जी.
अयोध्या मध्ये ५ तारखेला जाणार असे जाहीर केले.
Bjp शासित जंगल राज म्हणून प्रसिद्ध असलेल्या यूपी मधील एक बाहुबली bjp आमदार.
"राज ठाकरे ना यूपी पोलिस नी security देवू ध्या किंवा भारताच्या लष्करी security देवू ध्या त्यांना अयोध्या मध्ये येवू देणार नाही"
भारताच्या लष्कर लं एक किरकोळ लोक प्रतिनिधी आव्हान देत असेल तर भारतीय लष्कर कमजोर असले पाहिजे...
एक किरकोळ लोकप्रतिनिधी आव्हान देण्याचे daring करतो मग आपण.
चीन ,पाकिस्तान बरोबर तरी लढू का?
नेपाल पण भारी पडेल.
यूपी पोलिस इतकी नालायक आहे का?
महाराष्ट्र मध्ये अनेक अर्धवट यूपी,बिहारी नेते आले राज्याची बदनामी केली तर महारष्ट्र पोलिस नी त्यांना सुरक्षा दिली.

भारतीय लष्कर आमच्यासमोर टिकणार नाही असा त्यांचा दावा नसून, भारतीय लष्कर जरी आले तरी आम्ही हलणार नाही- असे त्यांचे म्हणणे आहे. गेले तर आमच्या प्रेतांवरून जावे लागेल असे ते अनेकवेळेस म्हणले आहेत.

माझे मत-
भारतीय नागरिक भारतात कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेला थांबवायचा हक्क त्या व्यक्तीस नाही. मात्र, भारतीय नागरिक भारतात कोठेही नोकरी धंदा सुद्धा करू शकतो. उत्तर भारतीयांना, खास करून युपी बिहार मधल्या लोकांना मारहाण करणे, त्यांना भय्या भय्या म्हणून हिणवणे- हे ज्या माणसाला मान्य असेल, तो आज कोणत्या तोंडाने बोलू शकतो ?

श्री ब्रिजभूषण ह्यांच्या भावनांना तरी आपला फुल सपोट आहे. त्यांनी माफी मागण्याची अपेक्षा केली आहे त्यात काहीच गैर नाहीये. बरं ते म्हणतायत- "मनसे पक्षाने उत्तर भारतीय लोकांना चुकीची वागणूक कधीच दिली नाही, आणि यापुढेही देणार नाही" इतके म्हणायची त्यांची अपेक्षा आहे. माझ्या दृष्टीने रास्तच आहे बुवा. पण त्यासाठी अयोध्येत राडा व्हावा, लोकं मरावीत असे वाटत नाही. त्यांनी त्यांचा निषेध सर्वांना गोळा करून सिम्बॉलीकली दाखवावा.

श्रीगुरुजी's picture

12 May 2022 - 4:44 pm | श्रीगुरुजी

ब्रिजभूषण यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची पंचाईत झाली आहे. अयोध्येत गेले तर प्रचंड विरोध होणार व तेथील पोलिस महाराष्ट्रातील नसल्याने धुडगूस घालता येणार नाही आणि दौरा रद्द केला किंवा उत्तर भारतीयांची माफी मागितली तर नाचक्की होणार . त्यामुळे गुपचुप फडणवीसांमार्फत योगींना गळ घालून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल.

लग्न समारंभ असलेल्या एखाद्या कार्यालयाच्या बाहेर घोळके जमा होतात किंवा गुरूवारी दत्ताच्या मंदिराबाहेर जसे घोळके उभे असतात, तसेच अयोध्येत श्रीराममंदीराचे काम पूर्ण होत असताना भोंदू श्रीरामभक्तांची गर्दी वाढायला लागली आहे. यातील काही जण तर या मंदिराच्या विरोधात होते तर काही जणांचा मंदिरनिर्माणात शून्य सहभाग होता तर काही जण यापूर्वी उभ्या आयुष्यात कधीही अयोध्येत गेले नव्हते. पण आता मात्र आपण श्रीरामभक्त आहोत याचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे व त्यामुळेच जो तो अयोध्येत जात आहे.

प्रदीप's picture

12 May 2022 - 8:12 pm | प्रदीप

आवडला.

श्रीगुरुजी's picture

12 May 2022 - 9:19 pm | श्रीगुरुजी

उद्धव ठाकरे व रोहीत पवार अयोध्येत जाऊन आले. आता राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले अयोध्येला निघालेत. यातल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा श्रीराममंदीराला विरोध होता तर शिवसेनेचा विरोध नव्हता पण श्रीराममंदीर आंदोलनात शून्य सहभाग होता.

पण आता हे सर्वजण अयोध्येत जाण्यासाठी कासावीस झालेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2022 - 9:56 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेनेचा विरोध नव्हता पण श्रीराममंदीर आंदोलनात शून्य सहभाग होता. :) ह्याला विनोद म्हणून घ्यावे का? शिवसेना आणी राममंदिर ह्यांचा संबंध युपीवालेही सांगतील. द्वेषात तुम्ही काहीही ठोकत असतात गुरूजी.

ब्लॅक मनी नष्ट करण्यासाठी नोट बंदी.
असे दावे केले होते ना?,
ब्लॅक मनी बंद झाला का,नाही ना.
सर्वांची साथ ,सर्वांचा विकास.
झाला का सर्वांचा विकास.
कोर्टात तर आम्ही बाबरी मशीद पाडण्यात सहभागी च नव्हतो असा युक्तिवाद झाला म्हणून तर निर्दोष सोडले ना कोर्टाने.

श्रीगुरुजी's picture

20 May 2022 - 10:46 am | श्रीगुरुजी

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द

https://www.lokmat.com/maharashtra/mns-chief-raj-thackeray-visit-likely-...

उत्तर प्रदेश म्हणजे महाराष्ट्र नाही, तेथे आपली दादागिरी चालणार नाही हे लक्षात आलेलं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

20 May 2022 - 11:25 am | श्रीगुरुजी
अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2022 - 9:59 pm | अमरेंद्र बाहुबली

राज ठाकरे अयोध्येत गेले तरी काहीही फरक पडनार नाही. तिथे राज ठाकरेंना विरोध करण्याचे “परिणाम” ऊत्तर भारतीय चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे ब्रिदभूषण सारखे किरकोळ लोक फार तर बोंबलतील. जोरदार हल्ला वगैरे केला तर परत मुंबईतून गाड्या भरून भरून पळावे लागेल ऊभांना.

sunil kachure's picture

13 May 2022 - 9:26 pm | sunil kachure

राज ठाकरे 5 तारखेला अयोध्येत गेले .तर काय होईल
त्यांच्यावर हल्ला होईल .ब्रीज भूषण ह्या bjp आमदार कडून.त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे पूर्ण भारताला माहीत आहे.
पण bjp मध्ये प्रवेश केला जी वाल्याचा वाल्मिकी होतो.
ही जादू आता कली युगात पण होत आहे.
राज ठाकरे गेले आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर
त्याचे परिणाम दोन्ही राज्यांना भोगावे लागतील आणि ते देश सहन करू शकणार नाही
त्या पेक्षा केंद्र सरकार नी खास सुरक्षा राज ठाकरे यांना यूपी दौऱ्यात पुरवावी.
हे शहान पणाचे असेल.

sunil kachure's picture

12 May 2022 - 8:12 pm | sunil kachure

महाराष्ट्रात श्री रामाची किती मंदिर असतील.खूप कमी असतील.महाराष्ट्र मध्ये बाकी देव देवतांची मंदिर जास्त आहेत .हिंदुत्व दाखवण्यासाठी अयोध्येत जाण्याची काहीच गरज नाही.पंढरपूर ल किंवा तुळजापूर ला किंवा कोल्हापूर ल गेले तरी चालते.आणि लोक तिथेच जातात .

sunil kachure's picture

13 May 2022 - 2:18 pm | sunil kachure

दक्षिण भारतातील राज्य प्रमाणे महाराष्ट्र वागत नाही तो पर्यंत महाराष्ट्र बलाढ्य होणार नाही.
१)हिंदी भाषेचा पूर्ण त्याग
२)राम मंदिर,अयोध्या, काशी अशा कोणत्याच उत्तर भारतातील समस्येत सहभागी न होणे.
३)कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा आणि महाराष्ट्र चा काही संबंध नाही.त्यांच्या सीमा खूप लांब आहेत.

वामन देशमुख's picture

13 May 2022 - 4:48 pm | वामन देशमुख

कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा आणि महाराष्ट्र चा काही संबंध नाही.त्यांच्या सीमा खूप लांब आहेत.

अरे देवा!
मिपानं अधोगतीचा रसातळ गाठलाय.

सोडून द्या ते अर्धे राऊत आहेत.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 May 2022 - 6:51 pm | चंद्रसूर्यकुमार

की राऊत हे अर्धे कचुरे/राजेश१८८ आहेत?

:)

ते मिपा चे अर्धे राऊत आहेत, त्यामुळे ते अस बोलू शकतात.

श्रीगुरुजी's picture

13 May 2022 - 7:26 pm | श्रीगुरुजी

या राऊत-पटोले जोडीकडे दुर्लक्ष करा. मी तर त्यांचा एकही प्रतिसाद वाचत नाही.

डँबिस००७'s picture

14 May 2022 - 1:57 pm | डँबिस००७

:-)

त्यामुळे, वेगळी विचारसरणी असलेल्या लोकां बरोबर वाद घालण्यात अर्थ नाही ....

कॉमी's picture

14 May 2022 - 6:34 pm | कॉमी

नका वाद घालू, पण परत परत सांगणे गरजेचे आहे काय ?

जेम्स वांड's picture

14 May 2022 - 7:39 pm | जेम्स वांड

लॉल !

मुक्त विहारि's picture

15 May 2022 - 6:46 pm | मुक्त विहारि

काही लोचट माणसे, हाकलले तरी परत येताततच...

आणि अशा वेळी, आपली भुमिका परत परत मांडणे, भाग पडते....

अर्थात, आपल्या सारख्या सुज्ञ माणसांची गोष्ट वेगळी आहे

कारण, जेंव्हा दोन व्यक्ती आपापसात काही चर्चा करत असतील तर, आपण चोंबडेपणा करायला जाऊ नये, इतपत तारतम्यता तरी तुम्हाला नक्कीच आहे....

कॉमी's picture

15 May 2022 - 7:58 pm | कॉमी

विहारी जी, वामन जी को उपप्रतिसाद दे,
तो वह चर्चा होती है।
मैं विहारी जी को उपप्रतिसाद दू तो साला,
वह चोंबडेपणा होता है ।

डँबिस००७'s picture

15 May 2022 - 5:06 pm | डँबिस००७

100% सहमत !
दुर्लक्षातुन मन: शांती !!

sunil kachure's picture

13 May 2022 - 10:38 pm | sunil kachure

https://www.aajtak.in/crime/big-crime/story/up-banda-bikru-attack-on-pol...

यूपी सारख्या जंगल राज असलेल्या राज्याची तुलना आपलेच अती शाहणें अती उत्तम राज्य महारष्ट्र शी करतात.
योगी सारख्या fail मुख्य मंत्री ची तुलना ठाकरे शी करतात.
वरील बातमी वाचा.
अशा घटना तिथे सर्रास घडतात .माझ्या महाराष्ट्रात असले प्रकार घडत नाहीत.

सुक्या's picture

13 May 2022 - 10:54 pm | सुक्या

https://auto.economictimes.indiatimes.com/news/passenger-vehicle/cars/te...

मागे या बाबतीत थोडी चर्चा झाली होती. आयात शुल्कात सवलत मागण्याच्या टेस्ला (पर्यायाने मस्क) च्या दबावाला बळी न पडता, "भारतात विकला जाणारा माल भारतातच बनायला हवा" या मताशी ठाम राहणार्‍या भारत सरकारचे आभार मानायला हवेत. भारत इतर देशांचे डंपिंग ग्राउंड नाही हे ठणकाउण सांगितल्याबद्दल अभिनंदन.

टेस्ला या घडीला आघाडीची ईलेक्ट्रिक कार बनवणारी कंपणी असली तरी ती एकच कंपनी नाही. टेस्लाला भारतात पर्यायी कंपणी येउ शकते. पण गमावलेला रोजगार परय यायला खुप वेळ लागेल ...

डँबिस००७'s picture

14 May 2022 - 1:56 pm | डँबिस००७

१०० % सहमत

सुबोध खरे's picture

14 May 2022 - 7:27 pm | सुबोध खरे

टेस्ला भारतात आली नाही तर भारताला शष्प फरक पडणार नाही.

सत्तर च्या दशकात मारुतीला तंत्रज्ञानासाठी जगातील कंपन्यांशी संपर्क चालू असताना फॉक्स वागेन या कंपनीने भारत आमचे तंत्रज्ञान वापरण्याइतका परीपक्व (MATURE ) झालेला नाही अशी दर्पोक्ती केली होती आणि हि त्यांना किती प्रचंड महाग पडली हे काही काळाने सिद्ध झाले.

याउलट सुझुकी हि इतर कंपन्यांच्या तूलनेत खूप छोटी असलेली कंपनी भारतात अद्ययावत तंत्रज्ञान घेऊन आली आणि भारतात गाड्या उत्पादन करून जगभरातील मोठ्या कंपन्यांना निर्यात करण्याइतकी मोठी झाली.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

आभार त्या संजय गांधींचे ज्यांना मारूतीसारखी कंपनी सरकारात ऊभी केली. कंपन्या विकणं सोप्पय ऊभ्या करणं कठीण.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 May 2022 - 8:20 pm | चंद्रसूर्यकुमार

प्रत्येक वेळेस अडाण्यासारखं काहीतरी बोलायलाच पाहिजे असा काही नियम आहे का?

या मनुष्याची इतकी बाष्कळ बडबड यावेळी अगदी असह्य झाल्याने हे लिहावे लागत आहे.

धनावडे's picture

14 May 2022 - 9:44 pm | धनावडे

अस कस ते Upsc / mpsc ची तयारी करतायत त्यातून त्यांना हे दिव्य ज्ञान प्राप्त झालय.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 9:51 pm | अमरेंद्र बाहुबली

नावडतीचे मीठ अळणी. जे खरं ते ही पचवायला कठीण जातंय भक्ताना. मारूतीचा आणी संजय गांधींचा संबंधं नाही?? की स्विकारीयचा नाही??

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 9:40 am | सुबोध खरे

कंपन्या विकणं सोप्पय ऊभ्या करणं कठीण.

ते याबद्दल लिहीत आहेत. तोट्यात चाललेल्या कंपन्या विकल्या तर काय वाईट आहे?

का म्हणून सामान्य जनतेच्या करातुन सरकारने सार्वजनिक कंपन्या पोसायच्या

Air India’s accumulated losses rose to ₹77,953 crore in the year ended 31 March 2021

भारतातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर ५५० रुपयांचा तोटा कशासाठी?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी( प्रफुल्ल पटेल) यांनी केलेली घाण सामान्य जनतेने सोसायची

मुळात एअर इंडिया हि कंपनी सरकारने स्थापलेली नव्हतीच तर ढापलेली होती.

हीच स्थिती सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि विमा कंपन्यांची आहे. पण

पण तुम्ही याबद्दल काही बोलणार नाही कारण हिरवा चष्मा लावला आहे.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 9:45 am | काड्यासारू आगलावे

ते याबद्दल लिहीत आहेत. तोट्यात चाललेल्या कंपन्या विकल्या तर काय वाईट आहे? तोट्यातल्याच कंपना विकल्या का? फायद्यातील कंपन्याही विकल्या आहेतच. कंपन्या तोटात का आहेत? त्यांना सरकारने फायद्यात का आणले नाही? संजय गांधींनी स्थापलेली मारूतीची प्रगती पाहीली होती का आपण?

सुबोध खरे's picture

17 May 2022 - 9:37 am | सुबोध खरे

संजय गांधींनी स्थापलेली मारूतीची प्रगती पाहीली होती का आपण?

नुसते वायबार काढण्यापेक्षा अभ्यास वाढवा

मग त्यातील सरकारची भागीदारी का विकली काँग्रेस ने

The success of the joint venture led Suzuki to increase its equity from 26% to 40% in 1987, and to 50% in 1992, and further to 56.21% as of 2013

सध्या मारुती मध्ये विदेशी भांडवल ८० टक्के का आहे?

संजय गांधींनी काढलेली कंपनी आहे ना मग काँग्रेस सरकारने का विकली सुझुकीला?

चंद्रसूर्यकुमार's picture

17 May 2022 - 10:34 am | चंद्रसूर्यकुमार

आधी मुळात संजय गांधी हयात असताना त्यांना उद्योजक म्हणून कोणताही अनुभव नसताना त्यांच्या मारूती कंपनीसाठी सरकारी बँकांमधून कशी वारेमाप कर्जे दिली गेली, त्याविरूध्द तक्रार करणार्‍या एस.जगन्नाथन या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला कसे पदावरून हटविले गेले, हरियाणात मानेसरला सध्याही मारूतीचा कारखाना ज्या जमिनीवर आहे ती जमिन बन्सीलालांच्या कृपेने कशी संजय गांधींच्या घशात घातली गेली वगैरे गोष्टी या गृहस्थांना माहित असतील याची सुतराम शक्यता वाटत नाही. दुसरे म्हणजे संजय गांधींचा मृत्यू कधी झाला, तोपर्यंत मारूतीने जनतेच्या पैशाची कशी नासाडी केली होती यामुळे प्रचंड टीका होत होतीच त्या टीकेची धार बोथट करायला म्हणून की काय इंदिरा गांधींच्या सरकारने मारूतीच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला- तो नक्की कधी घेतला, तो निर्णय घेतले तेव्हा संजय नक्की कुठे होते, संजय हयात असताना मारूतीची अवस्था काय होती, पुढे सुझुकीशी सहकार्य केल्यावर, त्यांचे भागभांडवल आल्यानंतर आपण आता बघत आहोत ती मारूतीची प्रगती झाली आणि त्या प्रगतीत संजय गांधींचा सुतराम सहभाग नव्हता वगैरे गोष्टींविषयी संबंधित सदस्य अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण अनभिज्ञ आहेत हे नक्की.

गेले कित्येक महिने या सदस्यांच्या बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष करत होतो पण "संजय गांधींनी सरकारमध्ये स्थापन केलेली मारूती" हे तारे तोडलेले बघितल्यावर मात्र अगदी अजिबात राहवले नाही.

जेम्स वांड's picture

17 May 2022 - 7:59 am | जेम्स वांड

कोण अभ्यासक्रम कसा पाहतो अन तो वाचून स्वतःला काय समजतो ह्याला अभ्यासक्रम उत्तरदायी नसतो. ती प्रत्येकाची वैयक्तिक पापं

sunil kachure's picture

14 May 2022 - 10:14 pm | sunil kachure

टेस्ला च्या गाडी ल प्रचंड मागणी आहे .
टेस्ला ची मागणी होती.
1) ते भारतात चीन किंवा अमेरिकन कारखान्यातून गाड्या इम्पोर्ट करतील अशी विक्तील.
कर जास्त लावू नका.
भारत सरकार ची पॉलिसी तुम्ही तयार गाड्या इथे मागवल्या आणि विकल्या तर १००% कर लावला जाईल.
100% किंवा त्या पेक्षा जास्त कर विविध इम्पोर्टेड car वर आहे तरी त्यांची मागणी कमी नाही.
टेस्ला लं मागणी असेल.
2)भारतात फक्त असेंबल करू कार कर कमी करा त्या साठी पण भारत सरकार तयार नाही.
इथेच उत्पादन करावे हा हट्ट.
इम्पोर्ट करून इथे विक्री केली तरी विविध show room,service center द्वारे रोजगार निर्मिती होईल च.
आणि सरकार ला टॅक्स पण मिळेल.
टेस्ला ची क्रेझ लोक इम्पोर्ट tax भारतील.
तिचे काही नुकसान होणार नाही.उलट भारतात चांगल्या car मोठ्या किमतीत विकत घ्याव्या लागतील लोकांना.