त्यांनी हिंदीत का बोलावं?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
11 Apr 2022 - 6:52 pm
गाभा: 

तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-diff...

या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.

आता प्रश्न असे आहेत.

१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?

२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?

३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?

४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?

५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

प्रतिक्रिया

स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे.

ही सुरुवातीची पायरी आहे.. सुरवातीला असे वरवर सामान्य भासणारे, हितद्वेषी न वाटणारे आवाहन करायचे आणि मग सगळे लोक हिंदी शिकलेत की हळूहळू एकेक मुद्दा पुढे रेटायचा असा मोठा कार्यक्रम (अजेंडा) असू शकतो.

यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.

मुळात असे काही आवाहन करायचे कारणच काय ?लोक आपापल्या पद्धतीने मार्ग काढतातच की .. आताही दोन भिन्न राज्यातील एकमेकांची स्थानिक भाषा न जाणणारे लोक - आपापसात हिंदी बोलतच नाहीत , फक्त इंग्लिशच बोलतात असं काही नाहीये .. कधी इंग्लिशमध्ये बोलत, कधी हिंदीत संवाद साधत तर कधीअन्य कोणतीतरी भाषा बोलत किंवा एकमेकांची भाषा शिकून तोडकी-मोडकी बोलत तर क्वचित प्रसंगी एखादा दुभाषा मध्ये घेत मार्ग काढतातच .. आता तर इंटरनेटमुळे गुगल ट्रान्सलेटर सारखे अ‍ॅप वा फोनवरुन हवे ते चित्र दाखवत संभाषण करण्याची सोय उपलब्ध आहे. मला आठवते एकदा चेन्नईजवळ मी अल्पकालीन वास्तव्यास असताना घसा दुखू लागल्याने मला ओवा हवा होता तेव्हा मी ओव्याचे चित्र स्थानिक दुकानदाराला दाखवून ओवा मिळवला होता.
जवळपास सर्वच राज्यात इतर राज्यातून स्थलांतर केलेले लोक आहेत... कोणतेही व्यवहार थांबलेले नाहीत. थोड्याफार अडचणी येत असतील पण व्यवहार पुढे सरकतातच. मग आता मुद्दाम आवाहन करायचे कारणच काय ? नीती आयोग वा कुठल्या आयोगाने तर म्हंटले आहे का की सगळ्या राज्यातील लोकांना एक भाषा येत नसल्याने देशाचा जीडीपी खाली घसरला वगैरे.. ?
आणि आवाहन करायचेच होते तर लोकांना असेही म्हणा ना की तुम्ही दुसर्‍या राज्यात दीर्घकालीन वास्तव्यास असाल , स्थलांतरित झाला असाल तर तिथली स्थानिक भाषा आवश्य शिकून घ्या, त्या भाषेचाही आदर करा. असं आवाहन का केलं नाही अमित शहांनी लोकांना- त्यातही हिंदी भाषिक लोकांना ?
विरोध हिंदी भाषेला नाहीये तर "इतर भाषिकांनी हिंदी आवर्जुन शिकावी आणि हिंदी भाषिकांनी मात्र वर्षानुवर्षे दुसर्‍या राज्यात राहून स्थानिक भाषा शिकण्यात स्वारस्य दाखवू नये, स्थानिक भाषेचा आदर करु नये " या दुटप्पी धोरणाला विरोध आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 7:23 pm | चेतन सुभाष गुगळे

सध्या भारतीय प्रशासकीय सेवा मार्फत आयएएस दर्ज्याचे अधिकारी निवडले जातात. कालांतराने हिंदीचे प्राबल्य वाढले की निम्न दर्जाचे कर्मचारी देखील अशाच प्रकारच्या आयोगामार्फत घेण्याचे धोरण आखून राज्य पातळीवरील नोकर भरतीचे अधिकार संपवुन टाकायचे आणि हिंदी भाषिक पट्ट्यातील तरुणांना सरावाची भाषा असल्याने इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक फायदा मिळेल असे बघायचे. हिंदी भाषिक पट्ट्यात सरकारी नोकरीचे आकर्षण परंपरागत आहे. नोकरीची हमी, कमी श्रम, आता तर पगार पण आकर्षक, काही ठिकाणी वरकड कमाईची संधी आणि लग्नाच्या बाजारात सरकारी नोकरीचे आकर्षण हे असे सर्व घटक आहेत. हा कावेबाजपणा वेळीच ठेचला पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 7:20 pm | अमरेंद्र बाहुबली

फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे
का??
तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?

आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी
हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली

खोटे आकडे. हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही.
मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते. मग ही आकडेवारू कुठून आणलीय??

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 8:06 pm | चेतन सुभाष गुगळे

हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही.
मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते.

हा माझाच मुद्दा तुम्ही पुन्हा अधोरेखित करताय. त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात.

इतकंच काय गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागातही दुसरी भाषा म्हणून हिंदी बोलली जाते.

मग ही आकडेवारू कुठून आणलीय??

अर्थातच दुसरी भाषा असली तरी त्यांना हिंदी येते म्हणून त्यांचादेखील या आकडेवारीत सामावेश केलेला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 11:09 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी द्वितीय
स्थानावर असूनही त्याना सरसकट हिंदी भाषाक धरलंय ह्यावरूनच ती आकडेवारी खोटीय.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 10:07 am | चेतन सुभाष गुगळे

खर्‍या आकडेवारीची लिंक असेल तर द्या.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 9:35 am | उपयोजक

त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात.

मिळतीजुळती असणे आणि बर्‍यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बर्‍याच लोकांना मालवणी आणि प्रमाण मराठीत बोलता येणे फार अवघड जाऊ नये. याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का? ती जर पूर्णत: वेगळी असेल तर भाषावार प्रांतरचनेदरम्यान सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात का सामील केला असेल?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 10:11 am | चेतन सुभाष गुगळे

मिळतीजुळती असणे आणि बर्‍यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का?

याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का?

मिळतीजुळती, बर्‍यापैकी फरक, बर्‍यापैकी फरक

हेच तीन निकष लावून तर इंग्रजी ऐवजी द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा आग्रह धरला जातोय. इंग्रजी ही स्थानिय भाषांना पूर्णतः परकी आहे तर हिंदी बर्‍यापैकी जवळची. मराठीला तर खूपच जवळची.

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Apr 2022 - 8:17 pm | चेतन सुभाष गुगळे

तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?

इंग्रजीशी तरी काय संबंध? जे कॉलेजला गेलेत, इंजिनिअरींग मेडिकल सायन्स कॉमर्स वगैरे शिकलेत त्यांच्यातले सर्वच्या सर्व देखील अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाहीत. इतर मंडळी जसे की शेतकरी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, ड्रायव्हर, हमाल वगैरेंना तर इंग्रजी किती अवघड जाईल. हिंदी तूलनेने सोपीच की इंग्रजीपेक्षा.

हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??

लिपी आणि उच्चारण यात सुलभता आहे. हरियाणवी / राजस्थानी मध्ये बाणातला ण, मराठी आणि दक्षिणी भाषांमध्ये असलेलं ळ असली उच्चारायला अवघड अक्षरं हिंदीत नाहीत म्हणून. मी मारवाडी भाषिक जैन असून अनेकदा मला गुजराती लोकांच्या सोबत संपर्क करावा लागतो. गेली किमान पस्तीस वर्षे अधूनमधून गुजराती कानावर पडते आहे. काही शब्द समजले तरी पूर्ण वाक्य समजत नाही, स्वतः जुळवून बोलणे तर कधीच शक्य नाही. त्यामुळे गुजराती कधीच सोपी वाटली नाही. बेळगाव मध्ये तीन महिने राहिलो पण अनेकदा ऐकूनही एकही कन्नड शब्द समजला नाही. धुळ्यात दोन वर्षे राहूनही अहिराणीतले काही शब्द समजले. पूर्ण वाक्य समजणे बोलणे हे काही जमले नाही. हिंदी मात्र शेजारी आणि दूरचित्रवाणी + आकाशवाणी + चित्रपट यांच्यामुळे फारच लवकर आत्मसात केली.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 9:28 am | उपयोजक

फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.

हिंदीच का?

सुखीमाणूस's picture

16 Apr 2022 - 5:31 am | सुखीमाणूस

Official Language = राष्ट्रभाषा असे नाही तर.

https://knowindia.india.gov.in/national-identity-elements/
या लायनीत राष्ट्रभाषा हिन्दी असे शिकल्याचे आठवते.
आणि शालेय स्तरावर हिन्दी च्या नव्हे राष्ट्रभाषा हिन्दी च्या परिक्शा असायच्या. अजुन चालु आहेत का? सध्या Olympiad चा जमाना आहे.
महात्मा गान्धी यानी दक्शिण भारतात हिन्दी प्रसार करायला विशेष प्रयत्न केले होते.
https://en.wikipedia.org/wiki/Dakshina_Bharat_Hindi_Prachar_Sabha
अमित शहा आता गान्धीजीन्च्या मार्गाने जात आहेत बाकी विचारान्चा विरोध असला तरी.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2022 - 7:14 am | श्रीगुरुजी

घटनेनुसार हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा नाही. परंतु मुद्दाम हिंदीचा उल्लेख खोडसाळपणे राष्ट्रभाषा असा काही जण करतात. हिंदीच्या परीक्षा घेणाऱ्या संस्थेचे नाव खोडसाळपणे राष्ट्रभाषा प्रचार समिती असे ठेवले आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसली तरी हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे असे जनतेच्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः सुरूवातीच्या काळात हे प्रयत्न जोरदार सुरू होते. परंतु हिंदीला सुरूवातीपासूनच तामिळनाडूचा विरोध. होता. सुदैवाने आता सर्व दक्षिण भारतात, बंगालमध्ये व महाराष्ट्रातही हिंदीला विरोध होत आहे. त्यामुळेच जाहिराती, समाजमाध्यमे, आंतरजाल, कंपन्यांची मदत केंद्रे आता मराठीतूनही सेवा देतात. समोरच्याने हिंदीत सुरूवात केली तरी मी मराठीचा आग्रह धरतो व बहुतेक वेळा तो मान्य होतो. तो मान्य नाही झाला तर संभाषण बंद करतो.

sunil kachure's picture

16 Apr 2022 - 9:55 am | sunil kachure

आज काल कोणत्या ही भाषेचे कोणत्या ही भाषेत रुपांतर करण्याची सुविधा .पोर्टेबल उपकरण बनवणे काही अवघड नाही.
हिंदी ही भाषा आहे.पण जे हिंदी ची तळी उचलत आहेत .केंद्रीय सरकार हे असले उद्योग नेहमीच करते.
मग कोणत्या ही पक्षाचे असावे.
त्या आडून ह्यांचा स्वार्थ असतो,मागास हिंदी भाषिक लोकांना हिंदी मान्य झाली की देश भर घाम करायला मोकळे रान मिळते.
हिंदी भाषिक लोकांनी त्यांची राज्य ना राहण्याच्या लायकीची ठेवली आहेत ना रोजगार,शिक्षणाचा.
ना ह्या राज्यात कायदा सू व्यवस्था चांगली.

बेशिस्त राज्य आहेत सर्व हिंदी भाषिक.
हिंदी सर्वांनी मान्य केली की हे सर्व पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा बनवणार.
विरोध त्याला आहे.

समजा हिंदी ला विरोध केला तर पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा बनण्यापासून वाचेल काय ?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 10:06 am | चेतन सुभाष गुगळे

इंग्रजी जेव्हा कामकाजाची भाषा बनली तेव्हा मुंबईत कामचलाऊ इंग्रजी ज्ञानाच्या जोरावर मद्राशांनी (त्या काळी सरसकट सर्व दक्षिण भारतीयांना महाराष्ट्रात असेच संबोधले जाई) स्टेनो टायपिस्ट पी ए अशा नोकर्‍या पटकावल्या. शिवसेनेला मग हटाव लूंगी बजाव पूंगी अशी मोहीम राबवायची संधी मिळाली. या संधीतूनच बस्तान बांधलेली शिवसेना आता हिंदीविरोध आणि दाक्षिणात्यांबाबत पुळका दाखविते आहे.

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2022 - 7:34 pm | धर्मराजमुटके

चर्चेतून मराठी भाषिकांचा हिंदी नको हा आग्रह पोहोचला. हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ?

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ? नकोच आहे पर्याय. पर्याय का हवा?

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2022 - 7:41 pm | धर्मराजमुटके

पर्याय का हवा?

समजले नाही. म्हणजे पर्याय का नको ?

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2022 - 8:50 pm | श्रीगुरुजी

मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा माझ्यासाठी पुरेश्या आहेत. हिंदीची अजिबात गरज नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 11:11 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्यासाठी देखील. भत्तर भारतीय मजूरांच्या सोयीसाठी अहिंदी भाषकांना हिंदी शिकावी हे सांगनार्यांची किव येते.

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2022 - 5:54 pm | चौथा कोनाडा

आणि दक्षिणीलोक, इतर साहेब लोक यांच्याशी बोलताना इंग्रजी बोलताना खुप सोयीचे पडते या बद्दल विशेष कौतुक करायला पाहिजे.
कितीही केले तरी शेवटी कष्टकरी लोक क्षुल्लकच ना !

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Apr 2022 - 5:59 pm | चेतन सुभाष गुगळे

साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच. गरीब मजूराकडून काय मिळणार? फक्त प्रेमाचे दोन शब्द?

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2022 - 8:08 pm | श्रीगुरुजी

साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच.

भ्रम आहे. इंग्लिशमध्ये बोलून साहेबाची चमचेगिरी करण्याचे दिवस साहेबाबरोबरच गेले. आता बढतीसाठी वेगळी कौशल्ये लागतात. गरीब मजुराकडून प्रेमाचे शब्द मिळतात हासुद्धा अजून एक भ्रम.

कॉमी's picture

21 Apr 2022 - 6:27 pm | कॉमी

आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते.

भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

21 Apr 2022 - 6:33 pm | चेतन सुभाष गुगळे

प्रतिसादातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2022 - 7:14 pm | अमरेंद्र बाहुबली

आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते.

भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही.
आक्षेप. आपल्या देशातील जास्तीत जास्त मानवी पैदास केलेल्या राज्यांची भाषा असा शब्द हवा. मग ह्या हिशेबाने

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2022 - 8:10 pm | श्रीगुरुजी

आम्ही इंग्लिशला अजिबात कवटाळत नाही. मी महाराष्ट्रात सर्वत्र फक्त मराठी वापरतो. महाराष्ट्राबाहेरील अमराठी लोकांशी बोलताना इंग्लिश.

sunil kachure's picture

21 Apr 2022 - 8:20 pm | sunil kachure

Tool म्हणून योग्य भाषा वापरली जात आहे.ती हिंदी च असावी असा हट्ट का?
गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात?
हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे.
एकच देश,आपल्याच देशातील.
हे शब्द वापरूच नका.
बाकी ज्या असंख्य भाषा आहेत त्या देशातील च भाषा आहेत ह्याची जाणीव का हीत नाही.
एकमेव हिंदी हीच भाषा देशात नाही.
50% लोक हिंदी समजत नाहीत.

गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात?

गृहमंत्र्यांनी स्थानिक भाषेसोबत कोणती भाषा वापरावी यावर उपदेश दिलेला. स्थानिक भाषेऐवजी नाही. मग हिंदीच का ह्याचे साधे सरळ उत्तर आहे भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी.

हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे.

लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.

एकच देश,आपल्याच देशातील.
हे शब्द वापरूच नका.

हे शब्द कोणीही वापरले नाहीयेत. अमित शहांच्या सल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक भाषा प्रथम स्थानिच होत्या.

50% लोक हिंदी समजत नाहीत.

करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Apr 2022 - 10:14 am | अमरेंद्र बाहुबली

भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी. हे कोणी ठरवलं? भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.
लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.
लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?

करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.
नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.

भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.

१. भारतात सर्व भाषांमध्ये हिंदी सगळ्यात जास्त लोकांना बोलता येते.
२. भारतात हिंदी बोलता येणाऱ्या लोकांपेक्षा हिंदी न बोलता येणारी लोकं जास्त आहेत.

वरकरणी विरोधाभास वाटला तरी दोन्ही वाक्यांमध्ये विरोधाभास नाहीये. दोन्ही खरी वाक्ये आहेत.
भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे.
अशी दुसरी कोणतीही भाषा भारतात नाही जी ४३.६३% किंवा जास्त भारतीय नागरिकांना बोलता येते. याचा अर्थ ती "सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा आहे".

हे कोणी ठरवलं

जनगणनेमधून आलेली आकडेवारी आहे. इथे बघा. विकिपीडिया वर विश्वास नसल्यास सेन्सस वेबसाईट वरून एक्सेल फाईल डाउनलोड करा, आणि तपासा.

नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.

आणखी काय नीट पाहायचे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Apr 2022 - 10:57 am | अमरेंद्र बाहुबली

भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. ही आकडेवारी खोटी आहे. हिंदी ईतर राज्यांवर लादण्यासाठी अशी खोटी माहीती खुद्द सरकारच पसरवते. हिंदी भाषीक राज्ये न्हणून जी काज्ये गणली जातात ची देखील हिंदी बोलत नाहीत. ईतर भारताचा प्रश्नच नाही.

कशावरून खोटी ? तुमच्या नाजूक भावनांना धक्का बसतो म्हणून आकडेवारी खोटी होत नसते. भारत सरकारच्या अकडेवारीला खोटे म्हणायला भरपूर पुरावे लागतात. उगाच उठले आणि खोटे म्हणले असे सांगता येत नाही. काही ठळक पुरावे असतील आकडे खोटे असण्यासाजे तर द्या.

बर, आकडे खोटे आहेत तर खरे आकडे द्या म्हणल्यावर तुम्ही गप्प होता.

लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?

स्थानिक भाषेनंतर, ज्यांना स्थानिक भाषा येत नाही, त्यांसाठी दुसरी भाषा कुठली असावी हे ठरवण्यासाठी ज्यांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना काय बोलता येते हेच पहावे लागेल. मग जर उत्तर भारतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत हे तर हिंदी वापरण्यासाठीचे आणखी एक सबळ कारण झाले. दुसरी भाषा म्हणून इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. हिंदी लादून कुठे घेत आहात, व्यवहार स्थानिक भाषेतच होणार आहेत. आणि हो, ती लोकं आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Apr 2022 - 11:00 am | अमरेंद्र बाहुबली

इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. चुकीची माहीती. कुत्र डुकरासारखी मानवी पैदास तेली म्हणून युपी बिहारची भाषा देशावर लादून घ्या हे सांगणे मुर्खपणाचे आहे. हिंदी दहा मधल्या चार ते पाच जणांना यायची शक्यता आहे ही देखील चुकीची माहीती.

sunil kachure's picture

22 Apr 2022 - 11:56 am | sunil kachure

सहज विचार केला तरी लक्षात येईल मराठी मुस्लिम पण जेव्हा कागद मातृभाषा कोणती ह्या पर्याय पुढे हिंदी किंवा उर्दू लिहतात.
पण त्यांची मातृभाषा खूप वर्ष महाराष्ट्रात राहतं असल्या मुळे खरे तर मराठी असते.
पण मुस्लिम धर्म बरोबर हिंदी,उर्दू भाषा असे समीकरण त्यांच्या डोक्यात असते.
त्या मुळे अशा पाहणीचे अंदाज चुकीचे असतात.
तेच इतर भाषिक गट विषयी पण होते.
पिढ्यान् पिढ्या गुजराती भाषा असणारे दुसऱ्या राहतं राहतं असले आणि एका पॉइंट वर त्यांना गुजराती येत पण नसेल तरी ते मातृभाषा ह्या coloum समोर गुजराती च लीहणार.
हे सर्व भाषिक लोकांना लागू आहे.
ह्या मुळे आकडेवारी चुकीची असू शकते.

भाषेचा दुस्वास करु नये हे मान्यच.. मग हे अहिंदी भाषांनाही लागू व्हावं .. हिंदी भाषिकांनी मराठी वा इतर अहिंदी भाषांना कमी लेखून त्यांचा दुस्वास करु नये.. ज्या राज्यात आपण दीर्घकाळ राहतो तेथली भाषा आपुलकीने शिकण्याचा प्रयत्न करावा. .. हिंदी भाषिक राज्यांत जावून सहसा कुणी म्हणत नाहीच की मी हिंदी बोलणार नाही वा शिकणार नाही.. पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ?

आज देशात अशी अवस्था आहे .जी राज्य परिपक्व विचार करून राज्याची प्रगती होण्यासाठी झटत आहेत ते शिक्षा भोगत आहेत.
परिपक्व वागणे म्हणजे गुन्हा करणे आणि
त्या बध्दल शिक्षा पण मिळणे अशी अवस्था आहे.
1) महाराष्ट्र सहित दक्षिण भारताने लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी योग्य दिशेने पावलं टाकली.आणि ह्या राज्यातील सुजाण नागरिक नी सहकार्य पण केले.

परिणाम काय .
बेशिस्त ,कायदे बिलकुल न पाळणाऱ्या राज्यातील लोकसंख्या प्रचंड वाढली आणि ह्याचे त्यांना बक्षीस म्हणून लोकसभेत जास्त प्रतिनिधित्व पण मिळेल तयारी चालू च आहे.
परत ही बेशिस्त वागणाऱ्या राज्यातील वाढलेली लोकसंख्या पोसण्याची जबाबदारी पण ह्याच शिस्त पाळणाऱ्या राज्यावर च पडली.
२) देशात हिंदी जास्त बोलली जाते म्हणून शिस्तीत राहणाऱ्या राज्यांवर त्यांची भाषा पण लादयाला हे तयार च आहेत.
३) ज्या राज्यांनी योजनाबध्द रीती नी राज्य इण्डस्ट्री मध्ये प्रगत व्हावीत म्हणून योजना राबवल्या ,लोकांच्या जमिनी ताब्यात घेवुन नवी मुंबई सारखी शहर वसवली.
बंगलोर ,हैद्राबाद नी उद्योग धंदे वाढतील असे प्रयत्न केले.
परिणाम काय.
बेशिस्त राहणाऱ्या,जातीयवादी राजकारण च फक्त करणाऱ्या ,कोणत्याच शासकीय योजना पूर्ण म करणाऱ्या राज्यातील लोंढे च लोंढे ह्या राज्यात आले.
चांगल्या कामाचे बक्षीस मिळते पण आपल्या देशात चांगले काम करेल त्याला शिक्षा मिळते अशी अवस्था आहे.

बापूसाहेब's picture

21 Apr 2022 - 8:59 pm | बापूसाहेब

पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ?
प्रचंड सहमत.
आमच्याकडे मारवाडी भाडेकरू आहेत. ३ वर्षे होतील. अजूनही हिंदी बोलतात. मराठी शिकण्याचा प्रयत्न शून्य. कारण काही अडतच नाही...

एकदा मुलाच्या एडमिशन बाबत बोलणं चालू असताना बोलले की हम तो बच्चे के लिये इंग्लिश मिडयम school देख रहे है. मराठी की हमे कोई जरुरत नही है.

त्यांनी मुलाला कोणत्याही मिडीयम मध्ये शिकवावे पण शेवटचे वाक्य खटकले. इथे येऊन पैसा कमवा. रिसोरसेस वापरा.. पण इथली भाषा शिकू नका. हाच न्याय इतर राज्यात चालेल का. ???

लोकांनी इथे येऊ नये असे नाही. या रहा .. पण इथल्या भाषेचा आदर ठेवून बोला. शिका. भले वेळ लागेल.. परंतु २-२ पिढ्या जातात पण तरीही ते भाषा शिकण्यास उत्सुक नसतात. उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा....

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2022 - 9:03 pm | श्रीगुरुजी

अमराठींना भाड्याने जागा देऊ नये.

सुरिया's picture

21 Apr 2022 - 10:13 pm | सुरिया

त्यासाठी घरमालक ही तितकाच तत्वनिष्ठ लागतो. ५०० रुपये दरमहा जास्त मिळाले तर मी मराठी हे तत्त्व मेरा भारत महान ते वसुधैव कुटुंबकम असे उन्नत होते.

sunil kachure's picture

21 Apr 2022 - 10:38 pm | sunil kachure

आर्थिक फायदा दिसला की सर्व तत्व गळून पडतात.
भाषा अभिमान,संस्कृती अभिमान,राज्य प्रेम .
सर्व बाजूला ठेवले जाते.
आणि हा गुण सर्व भाषिक लोकात आहे
मराठी लोकात जरा जास्त आहे.

मारवाडी, जैन मंडळी .
नॉनव्हेज च्या नावाने बोट मोडत असतात.
नॉनव्हेज पदार्थ आणि ते खाणारी लोक ह्यांचा द्वेष करतात.
पण कित्येक लोकांची दुकान,धंद्याची जागा .
अशा ठिकाणी आहेत तिथे नॉनव्हेज खाणारे आणि विकणारे पण असतात.

त्यांना तिथे बिलकुल त्रास होत नाही.
कारण आर्थिक लाभ तिथेच होत असतो.
पण त्यांच्या सोसायटी मध्ये किंवा त्यांची लोकसंख्या ज्या भागात जास्त आहे तिथे मात्र त्यांचे नियम लागू.
Ladies बार जेव्हा मुंबई मध्ये चालू होते तेव्हा त्या मुलींना खोली भाड्याने देण्यात मराठी लोक च पुढे होते.
कारण थोडे जास्त भाडे मिळत होते.

मराठी लोकात extraordinary देश प्रेम असते .आणि खूपच हिंदी प्रेम असते.
हिंदी बोलणे म्हणजे काहीतरी भूषण आहे असे काही मराठी लोकांना वाटत.
त्या मुळे ह्या अमराठी लोकांस मराठी शिकण्याची गरज वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2022 - 10:15 pm | श्रीगुरुजी

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू असताना नेहरूंनी मुंबई महाराष्ट्रात असण्यास विरोध केला होता व मुंबई स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हा नेहरूंना विरोध करण्याऐवजी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हटले होते.

एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.

माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. त्यामुळे anecdotes वर विश्वास ठेवू शकत नाही. किती लोकांना वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही मला सांगता येणार नाही. अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहे. त्याला मराठी बोलायचे दूर, घरातून बाहेर सुद्धा पडावे लागत नाही. त्याला बाजारातून योग्य दरात भाजी आणणे सुद्धा बहुतेक जमणार नाही.

माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात.

माझा मुद्दा गुजराथींबद्दल नव्हताच. गुजराथी, दाक्षिणात्य लोक मराठी शिकतात आणि आवर्जुन बोलायचा प्रयत्नही करतात हे मी पाहिले आहे. मुद्दा म.प्र, उ.प्र, बिहार येथील हिंदी भाषिकांबद्दल होता. ते मराठीचा तिरस्कार करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. अगदी पुण्यातले अनुभव आहेत हे. एखाद्या ५-६ जणांच्या घोळक्यात एखाद-दुसराच हिंदी भाषिक असेल आणि बाकीचे मराठी भाषिक मराठीतून अनौपचारिक गप्पा मारत असतील तरी हे हिंदी भाषिक लगेच रडका सूर लावणार "अरे आप हिंदी मे बात करो ना" जसं काही मराठी कानावर पडल्याने ह्यांच्या कानाची जळजळ होते.

अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहे

पंजाबी राजीव भाटिया (अक्षय कुमार ) हा छान मराठी बोलू शकतो.

पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.

भाषेला विरोध नाहीये... सक्तीला विरोध आहे. आणि हिंदी भाषिकांच्या मग्रुरीला विरोध आहे.
भाषेला विरोध नाहीये तर आपली मराठी भाषेची अस्मिता गमावण्याला विरोध आहे.

कॉमी's picture

22 Apr 2022 - 11:16 am | कॉमी

सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीये.

Hindi should be accepted as alternative to English, and not to regional languages

ही शहांची थेट क्वोट आहे. ह्यातले दुसरे वाक्य हि पूर्ण चर्चा थांबवायला खरं तर पुरेसे आहे असे मला वाटते.

अक्षय कुमार बोलतो तर छानच आहे.

आणि मराठी शिकायची नसल्यास त्यात काही वावगे नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. पण ही चर्चा त्यावर नाही असे मला वाटते. हि चर्चा सेकंडरी भाषा कोणती वापरावी ह्यावर आहे.

बाकी मराठी बोलणाऱ्या लोकांवर दमदाटी होत असल्यास तेही चुकीचेच आहे.

तर्कवादी's picture

22 Apr 2022 - 6:43 pm | तर्कवादी

सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीये

ओके.. अप्रत्यक्ष सक्ती (म्हणजे सध्या आवाहनाच्या .. माफ करा सुझावच्या रुपात असली तरी) कशी होवू शकते वा स्थानिक भाषेचे खच्चीकरण कसे होवू शकते ते विस्ताराने सांगतो.
समजा अ नावाचा बंगाली व्यक्ती आहे - तो बंगाली प्रथम भाषा असल्याने बंगाली शिकलेला आहेच तसेच डेस्क जॉब करणारा सुशिक्षित असल्याने पोटापाण्याकरिता म्हणून इंग्लिशही शिकला आहे.
आता तो तामिळनाडूतल्या अशा शहरात स्थलांतरीत होतो जेथे अनेक विविधभाषी लोक नाहीत (तसे चेन्नईतही तामिळ शिवाय कठीणच- पण असे शहर घेवू ज्यात इतर भाषिक हे चेन्नईपेक्षाही कमी असतील - मदूराई कदाचित ठीक राहील ?) तर तिथे तो ब तामिळ या व्यक्तीला भेटतो - ब ला तामिळ प्रथम भाषा असल्यामुळे येतेच पण तो ही सुशिक्षित असल्याने इंग्लिशदेखील येते. इंग्लिशमध्ये संवाद साधत अ व ब ची मैत्री होते. पण शहरात बाकी अनेकांना इंग्लिश फारशी येत नसल्याने (रिक्षावाले, विविध विक्रेते, इस्टेट एजंट ई ) अ ची अडचण होतेच आहे. मग तो ब ची मदत घेत या अडचणीतून मार्ग काढतो पण त्याचबरोबर आपल्याला इथे दीर्घकाळ वास्तव्य करायचे असल्याने थोडीफारतरी तामिळ शिकल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला समजते आणि तो हळूहळू ( ब च्या मदतीने किंवा इतर मार्ग वापरुन) तामिळ शिकू लागतो. पुढे तो स्वतःच्या मुलाला इंग्लिश शाळेत घालतो (आजकालच्या आसपास दिसणार्‍या प्रथेप्रमाणे तामीळनाडूतही तामिळ भाषेतून शिक्षण कमी झाले असावे असे मानून मी हे लिहिले आहे... )तिथे इंग्लिश सोबत द्वितीय भाषा तांमिळ असते पण यास अ ची हरकत नाही.. कारण त्या शहतात दीर्घकाळ वास्तव्यास रहायचे तर तामिळ यायलाच हवे हे तो जाणून आहे. म्हणूनच आपल्या शाळेत तामिळ शिकावे लागू नये म्हणून तो धडपडत नाही, शाळेवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दबाव आणत नाही की आयसीएसई किंवा दुसर्‍या इंटरनॅशनल शाळांच्या मागे लागत नाही.. थोडक्यात तो हळूहळू तामिळ भाषेला आपलंसं करतो. पण यात तो कुठेही हिंदी शिकत नाही. किंवा त्याच्या सोयीकरिता अनेक स्थानिकांना (ब सारख्यां सुशिक्षितांचा अपवाद वगळता) इंग्लिश शिकावे लागत नाही.. की हिंदीही शिकावे लागत नाही .. ते अनेक स्थानिक वर्षानुवर्षे स्वतःच्या भाषेतूनच बोलतात.. ज्यांना सर्व जगाचे ज्ञान मिळवायचे नाहीये त्यांना इंग्लिशची सक्ती कुणी करत नाहीच. स्मार्टफोनची भाषाही स्थानिक लावता येते पण सगळेच अ‍ॅप स्थानिक भाषेत नसल्याने वा स्थानिक मोबाईल वापरण्यापुरते किरकोळ प्रमाणात थोडेसे इंग्लिश शिकावे लागते तितकेच

हेच जर अमित शहांचे आवाहन अगदी गांभीर्याने मानायचे तर अ आणि ब ला ही स्वतःची प्रथम भाषा व इंग्लिश या बरोबरच हिंदीही शिकावी लागेल. मदुराई शहरातल्या अनेक व्यापार्यांना, सेवा देणार्‍या व्यक्तींना कधीतरी कुणी अ येणार ज्याला तामिळ येत नाही त्याच्याशी व्यवहार करण्याकरिता म्हणून हिंदी शिकावे लागेल. याउलट तो अ "मला हिंदी येतंय आणि इथे हिंदी मध्ये काम होतंय तर कशाला शिकू तामिळ" असा विचार करत तामिळ भाषा शिकण्यात रस घेणार नाही. पुढे त्याच्या मुलांना शाळेत घालताना तो इंग्लिश शाळेत घालेल आणि दुसरी भाषा म्हणूनही तामिळ असेल तरी ती टा़ळता येईल का हे बघण्याकडेच त्याचा कल असेल किंवा टाळता आली नाही तरी जेमतेम उत्तीर्ण होण्याकदे कल असेल . हळूहळू असे परभाषिक स्थलांतरित तेथे वाढू लागतील आणि त्यांच्या सोयीकरिता म्हणून अमित शहांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक लोक हिंदी शिकत राहतील तर मात्र बहुतांशी स्थलांतरित मात्र तामिळ शिकणार नाहीतच. हळूहळू असे होईल की १००० लोकसंख्येपैकी समजा ७०० लोक मूळ स्थानिक असतील तर त्यातले काही विरोधक सोडलेत तरी ६५० लोक आता हिंदी शिकलेले असतील तर उरलेल्या ३०० बिगर तांमिळ स्थलांतरितांपैकी जेमतेम ५० जणांना मोडकं तोडकं तामिळ येत असेल तर २५० लोकांना अजिबात येणार नाही. तर आता ९५० लोकांना हिंदी येत असेल तर तामिळ ७५० लोकांना येत असेल .. तसेच सगळे व्यहवार हिंदी भाषेतून होवू शकत असतील तर मग हिंदी संख्यात्मक प्राबल्यही वाढेल आणि व्यावहारिक महत्वही. हळूहळू हिंदी ही व्यवहाराची मुख्य भाषा होईल व ज्या भाषेशी अर्थकारण जोडलंय त्या भाषेचं महत्व वाढून स्थानिक भाषेचं महत्व कमी होईल. शाळेत, स्थानिक व्यवहारात, सोसायटीच्या मिटींगमध्ये हे हिंदी भाषिक तामिळ पेक्षा हिंदीतच संभाषण व्हायला हवं म्हणून जोर देत राहतील...
बाकी यासगळ्यामुळे अर्थकारण कसं बदलत जाईल तो वेगळा विषय.. पण आता भाषेपुरतंच लिहितोय...
मुळात आपल्या भागात परराज्यातून १० लोक येणार आणि त्यांना स्थानिक भाषा येत नाही म्हणून १०० लोकांनी एक भाषा का शिकावी ? त्याऐवजी त्या १० लोकांनी स्थानिक भाषा शिकावी हे सयुक्तिक नाही का ?.. [पर्यटन क्षेत्र व पर्यटक म्हणून येणार्‍या लोकांना वगळून इतर स्थलांतरितांबद्दल मी बोलत आहे]

दुसरी भाषा हिंदी की इंग्लिश असा वाद असताना .. अनेकांना दुसर्‍या भाषेची गरजच नाही.. इंग्लिशची सुद्धा नाही. आणि इंग्लिशची जी गरज आहे ती सुद्धा जगातले विविध ज्ञान मिळवण्याकरिता.. आपल्या भागात येणार्‍या परभाषिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून कुणीच इंग्लिश शिकत नाही (पुन्हा पर्यटन क्षेत्रात सेवा देणारे वगळून) तर इंग्लिशमुळे परभाषिकांशी सहज संवाद होण्याची एक शक्यता निर्माण होणे हा एक सहपरिणाम आहे उद्देश नाही..काही प्रतिसादाकांनी म्हंटले आहेच की दाक्षिणात्य लोकांचे इंग्लिश फार काही चांगले नसते , ते अनेक चुका करतात. खरेच आहे ते .. ते स्वतःची भाषा सोडून दुसर्‍ञा भाषेला विनाकारण जास्त महत्व देत नाहीतच.
कोणताही स्थलांतरित असाच उठून स्थलांतर करत नाही.. कुणीतरी त्याला तिथे येण्याकरिता निमंत्रण देते तेव्हाच तो तिथे येतो ना ?मग दुसरी भाषा न येणार्‍या त्या प्रदेशात त्या स्थलांतरिताची सोय कशी करावी , मग त्याला काही काळ तरी गरजेप्रमाणे मदत पुरवावी ही पण त्या निमंत्रकाची जबाबदारी आहे.. उदा: एखाद्या कंपनीने परभाषिकाला नोकरी दिली असल्यास त्याला स्थिरस्थावर होण्यासही मदत करावी, स्थानिक भाषेचे जुजबी ज्ञान त्याला द्यावे, त्याला मदत करण्याकरिता इतर स्थानिक व दुसरी भाषा जाणणार्‍या इतर कर्मचार्‍यांना प्रोत्याहित करावे.

जाता जाता: भारतातील एखाद्या राज्यातील बहुतांशी लोकांना इंग्लिश बोलता येतंय आणि तिथे इंग्लिश बोलून व्यवसाय करणं सोपं आहे म्हणून इंग्लंड, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातून भरभरुन लोक त्या राज्यात स्थलांतरित होणार नाहीत.. !!
[सकाळपासून थोडा थोडा करत हा प्रतिसाद टंकला आहे, त्यामुळे आलेल्या विस्कळितपणाबद्दल क्षमस्व]

उपयोजक's picture

23 Apr 2022 - 1:13 pm | उपयोजक

मार्मिक! व्यवस्थित मांडलंय गणित!

तर्कवादी's picture

23 Apr 2022 - 6:54 pm | तर्कवादी

मार्मिक! व्यवस्थित मांडलंय गणित!

धन्यवाद उपयोजक..
एकूणात मुद्दा हाच आहे की वरवर जरी अमित शहांच्या आवाहनातली मांडणी ही इंग्लिश विरुद्ध हिंदी अशी दिसत असली आणि त्यामुळे सकृतदर्शनी ती जरी स्थानिक भाषेकरिता अपायकारक वाटत नसली तरी अंतिमतः ती स्थानिक भाषा विरुद्ध हिंदी अशीच जाणारी आहे.

सुरिया's picture

22 Apr 2022 - 11:36 am | सुरिया

एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.

पूर्वार्ध एकदम खरा आहे, उत्तरार्ध पटतो आहे.
मारवाडी गुजराती उत्तम मराठी बोलतात हेही खरे आहे पण एक उदाहरण माझ्या शेजारीच आहे. नवरा गुजरातेतुन शिकलेला पण गेली ५ वर्षे जॉबसाठी पुण्यात आहे, बायको जन्मापासून महाराष्ट्रातील गुजराती आहे. नवरा अगदी सुंंदर मराठी बोलतो, सोसायटीत वगैरे आवर्जून मराठी बोलतो त्याउलट त्याची पत्नी कधीही मराठी बोलत नाही किंबहुन ती सदैव मराठी लोक, मराठी परंपरा, येथिल ट्राफिक वर खडे फोडत असते. तेही हिंदीतून.
मला वाटते की एक सिंपल नियम करावा. सर्वच राज्यांसाठी. १ महिन्यापेक्षा जास्त वास्तव्य करायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स इथले हवे असेल, इथली सॅलरी स्लीप हवी असेल, राशन कार्ड, आधार कार्ड, प्रॉपर्टी पेपर्स, व्हिकल आणि अप्लायन्सेस पर्चेस येथे करायचे असेल तर एक कोर्स, परिक्षा आणि सर्तिफिकेट अनिवार्य करावे. हे धोरण सर्वच राज्यांनी कठोरपणे राबवावे. त्यातून रोजगार निर्मीतीही होइल. जर्मनी, फ्रान्स ल जायला ती भास्।आ शिकायला पैसे मोजता तर ज्या राज्यात आपण पैसा कमवायला जातोय तिथली भाषा शिकायला आणि त्यासाठी पैसे खर्चायला हरकत नसावी.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2022 - 1:54 pm | श्रीगुरुजी

Switzerland चे नागरिकत्व हवे असेल तर जर्मन किंवा फ्रेंच येणे सक्तीचे आहे. नुसती भाषा येणे पुरेसे नाही तर घरात बोलताना सुद्धा ही भाषा वापरावी लागते. माझ्या एका ओळखीच्या कुटुंबाने नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मुलांसकट सर्व जण जर्मन शिकले होते. जेव्हा काही अधिकारी घरी चौकशीसाठी आले तेव्हा मुले मराठीत एकमेकांशी बोलताना आढळले. त्यामुळे तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.

धर्मराजमुटके's picture

22 Apr 2022 - 1:59 pm | धर्मराजमुटके

तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.

फारच भयानक. घरात कोणती भाषा बोलायचे याचे पण नियम ? अवघड आहे. उद्या कदाचित घरात भारतीय पदार्थ बनविले म्हणून नागरिकत्व रद्द व्हायचे.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2022 - 2:16 pm | श्रीगुरुजी

नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्ही स्वत:चे वेगळेपण न ठेवता देशाशी समरस होणे सक्तीचे आहे.

sunil kachure's picture

22 Apr 2022 - 2:50 pm | sunil kachure

विषयी मी पण ऐकले आहे जे तिथे जावून आले आहेत त्यांच्या तोंडून
तुम्ही गरीब असा किंवा खूप श्रीमंत तिथे तुम्हाला त्यांचे नियम पाळावेच लागणार.
तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला कोणतीच वेगळी नियम भंग करून सुविधा दिली जाणार नाही.
पर्यावरण विषयी तो देश खूप जागरूक आहे.

खूप कमी भारतीयांना येणारी भाषा

मग संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी. तिच्या इतकी राष्ट्रीय व्याप्ती अन्य कोणत्याच भारतीय भाषेची नाही.

कॉमी's picture

22 Apr 2022 - 8:39 am | कॉमी

कसं काय ? कसली व्याप्ती आलीये संस्कृतला ?
Unless,
कोणालाच बोलता येत नाही अश्या व्याप्ती बद्दल बोलत असाल तर योग्य आहे.

उपयोजक's picture

22 Apr 2022 - 11:38 am | उपयोजक

द्रविड कुळातली सर्वात शुद्ध भाषा तमिळ. आजच्या तमिळ भाषेतही काही संस्कृतोद्भव शब्द आहेत. इतकंच काय पण संस्कृतोद्भव शब्द वाचता यावेत म्हणून तमिळमधे फार पूर्वीपासून मूळ तमिळमधे नसलेल्या अक्षरांचा एक संच ज्याला तमिळमधे ग्रंथाक्षरे म्हणतात तो वापरला जातो आहे. आटोकाट प्रयत्न करुनही तमिळभाषिकांना हे संस्कृतोद्भव शब्द तमिळमधून हुसकून लावणे १००% शक्य झालेले नाही. आणि हे जर तमिळबद्दल असेल तर बाकीच्या भारतीय भाषांमधे संस्कृत शब्दांचे प्रमाण किती असेल तर त्याचं गणित करा.
संस्कृत ही काहिशी क्लिष्ट आहे हे मी नाकारत नाही.पण संस्कृतला व्याप्ती नाही हे तुमची माहिती तद्दन चुकीची आहे. संस्कृत भाषेत जर अजून सोपेपणा आणला तर तिच्यासारखी देश जोडू शकणारी भाषा दुसरी नाही. पण हे प्रत्यक्षात येणे कठीण आहे. पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.

अहो पण कुणालाच बोलता येत नाही की ! मग कसली व्याप्ती असते ? एखाद्या भाषेत संस्कृतचे बरेच शब्द असले म्हणजे संस्कृत या भाषेला व्याप्ती येते काय ? त्या भाषेचे व्याकरण, वापरात नसलेले शब्द- हे लोकांना येत नाही. भाषा म्हणजे फक्त शब्द नसते ना, त्यात व्याकरण आले की.

तुम्ही वेगळ्या अर्थाने व्याप्ती शब्द वापरत आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात.

राष्ट्रभाषा म्हणजे काय हे माहित नसल्याने हिंदीला राष्ट्रभाषा करा असा माझा आग्रह सोडा, इच्छा सुद्धा नाही. सेकंडरी भाषा हिंदी वापरा असे शहा म्हणतात. सेकंडरी भाषा कशासाठी हवीय हेच तुम्ही लक्षात घेत नाही आहात. स्थानिक भाषा ज्यांना येत नाही, त्यांची सोय म्हणून दुसरी एक भाषा कोणती असावी ? तर जी जास्तीत जास्त लोकांना येते ती असावी. संस्कृत तरी कुठे येती त्यांना ! त्यामुळे ज्यांना मराठी येत नाही त्यांना संस्कृत मध्ये कागदपत्रे द्या हे मूर्खपणाचे नाहीये काय ?

पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.

राष्ट्रभाषा करा असा आजिबात आग्रह नाही. सेकंडरी लँग्वेज म्हणून वापरा.

उर्दू अरबीने भरलेली भाषा चालत नाही, पण इंग्लिशने भरलेली इंग्लिशछाप भाषा जी फक्त १० मधल्या १ भारतीयाला येते ती मात्र चालते हे कसे ?

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 9:38 am | उपयोजक

तेलुगू

दुसरी भाषा इंग्रजीच हवी आणि हिंदी नको असा धागाकर्ते आणि इतर काही प्रतिसादकांचा आग्रह आहे.

धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.

तर्कवादी, उपायोजक व अमरेंद्र बाहूबली यांची मते बदलणार नाहीत हे ठाऊक असूनही इतरांकरिता -

पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का?

पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?

म्हणजे गरीब / ज्यांना इंग्रजी ज्ञान नाही असे मजूर वर्गातले दक्षिण भारतीय लोक देखील स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हिंदीचा आधार घेतातच.

एलिट क्लासचे दक्षिण भारतीय लोक देखील हिंदीच्या आधारावर पैसा कमावतातच.

वर मी लिहिलेल्या https://www.misalpav.com/comment/1138188#comment-1138188 या प्रतिसादातील

प्रत्येकाला इंग्रजी शिकणे अवघड आहे त्यापेक्षा हिंदी सोपी आहे. आणि इतकंच आहे तर दक्षिणी भाषेतील चित्रपट मूळ भाषेसोबत फक्त इंग्रजीतच डब करावेत पण नाही ते तर हिंदी प्रमाणेच आता तर थेट भोजपूरीत देखील डब होतात. कारण काय तर ह्या उत्तर भारतीयांच्या खिशातून पैसे हवे आहेत तर मग त्यांच्यापर्यंत पोचायला त्यांच्या भाषेत संवाद साधायला मग या दाक्षिणात्यांचा भाषाभिमान आड येत नाही का?

बाहूबली तुमचा सिनेमा जर फक्त स्थानिक + इंग्रजी भाषेत आणला असता तर इतका प्रचंड व्यवसाय करु शकला असता का? हिंदीत असल्यामुळेच उत्तर भारतातही तो पाहिला गेला. त्यांना जर दाक्षिणात्यांचा द्वेष असता तर त्यांनी सरसकट सर्वच दक्षिण भारतीय चित्रपटांवर ते हिंदीत डब असले तरीही बहिष्कार टाकला असता.

या विधानांचा अजूनतरी कोणी प्रतिवाद केलेला नाहीये. यापूर्वी एका प्रतिसादात ए आर रहमान यांचा उल्लेख आला आहे. त्यांनी देखील डब्ड तसेच स्वतंत्र हिंदी चित्रपटांना संगीत दिल्यानेच अधिक यश कमावले. ज्या गीताकरिता ते आंतराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचले ते गीत देखील हिंदी भाषेत आहे.

The soundtrack won the Golden Globe Award for Best Original Score, BAFTA Award for Best Film Music, and two Academy Awards, one for Best Original Music Score and the other for Best Original Song for "Jai Ho". The soundtrack has also won two Grammy Awards, one for the album itself and another for the song "Jai Ho". The latter song would be reworked by Ron Fair and The Pussycat Dolls into an English language adaptation "Jai Ho! (You Are My Destiny)" which would go on to become and international hit for the group.

https://en.wikipedia.org/wiki/Slumdog_Millionaire:_Music_from_the_Motion...

दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय. महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे.

दक्षिण भारतीयांच्या नादाला लागून महाराष्ट्राने असा विरोध करु नये. दक्षिण भारतीय महाराष्ट्र आणि मुंबईत राहूनही त्यांच्या भाषेचे दडपण आणून सिनेमाचालकांना इथे त्यांच्या स्थानिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित करायला लावतात. चैन्नई / कोचीमध्ये मराठी चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित होतात का?

इतकेच काय पण डीडी डायरेक्ट प्लस ने सर्व भाषांतील काही मोफत वाहिन्यांचे देशभर प्रसारण केले आहे. जेणेकरुन आपण देशाच्या कोणत्याही भागात असलो तरी आपल्या स्थानिक भाषेचे कार्यक्रम तिथे बसून पाहू शकतो. असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2022 - 11:17 am | श्रीगुरुजी

पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत?

मी त्यांच्याशी किंवा अशा सर्वांशी मराठीतच बोलतो व ते त्यांना समजतं. मी कोणाशीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्रात सर्वांशी मराठीत व महाराष्ट्राबाहेर इंग्लिशमध्ये बोलतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 2:28 pm | अमरेंद्र बाहुबली

पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का?

पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?
हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 2:28 pm | अमरेंद्र बाहुबली

पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्‍या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का?

पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?
हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 2:43 pm | उपयोजक

तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 3:25 pm | चेतन सुभाष गुगळे

हा फारच वैयक्तिक आणि तद्दन चूकीचा प्रतिसाद आहे.

माझा जन्म महाराष्ट्रातला आणि आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. ती लिहिता देखील येत नाही.

दहावीपर्यंत मराठी माध्यमात सर्व विषयांचे शिक्षण घेतल्याने लिहायला वाचायला व बोलायला आणि एकूणातच व्यक्त व्हायला मला सर्वात सोपी मराठीच वाटते. इथे मिसळपाव वरच मी कितीतरी मराठी भाषेत लेख लिहिले आहेत. हिंदीत तर एक सुद्धा नाहीये. पण जर मराठी कुठे चालत नसेल तर मग तोंडी संभाषणास दुसरा पर्याय हिंदी आणि तिसरा पर्याय नाईलाजास्तव इंग्रजी असा प्राधान्यक्रम आहे. भाषिय त्रिसूत्री.

मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.

या आरोपाबद्दल बोलायचे तर मी इंग्रजी ऐवजी हिंदी ही बाजू लावून धरलीय मराठी ऐवजी हिंदी अशी नाही. तरी ही असा आरोप होत असेल तर मात्र

जे हिंदी ऐवजी इंग्रजी अशी बाजू लावून धरत आहेत त्यांच्यावर

तुम्ही मूळचे भारतीय असूच शकत नाही अजुनही इंग्रजी गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकले असल्याने तुम्हाला इंग्रजी या परक्या भाषेबद्दल जितकी आत्मियता वाटते तितकी हिंदी या भारतीय भाषेबद्दल नाही.

असा आरोप करावा काय?

पण असा आरोप मी करणार नाही कदाचित माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती व मग मूळतः व्यवहारात मराठीला मी प्राधान्य न देता सरसकट इंग्रजीचा वापर केला असता तरीही माझ्यावर असला गचाळ आरोप आला नसता.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 4:42 pm | अमरेंद्र बाहुबली

आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. चारशे वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन तरी देखील तुम्ही घरात मारवाडीच बोलतात. म्हणजे ४०० वर्षांपासून तुम्ही तुमची मुळ भाषआ जपून ठेवलीय. घरात मराठी बोलावीशी वाटत नाही कारण ती तुमची मातृभाषा नाही. त्यामुळेच मा बोललो का तुम्हाला मराठी विषयी आत्मियता नाही. जशी तुम्हाला मारवाडी प्रिय तशी आम्हाला मराठी.

धर्मराजमुटके's picture

17 Apr 2022 - 4:54 pm | धर्मराजमुटके

अतिशय चुकीचा प्रतिसाद !
चेतन गुगळे हे इथे व्यवस्थित व मुद्देसुद प्रतिसाद देत आहेत. त्यांचा मुद्दा चुकीचा की बरोबर तो वेगळा भाग होऊ शकतो.
त्यांच्या मराठीप्रेमाबद्द्ल शंका घेण्याचे कारण दिसत नाही. घरात मारवाडी बोलतात त्यात टीका करण्यासारखे काही नाही. प्रत्येकाने आपली मातृभाषा जपलीच पाहिजे. मारवाडी समाज महाराष्ट्रातील अनेक छोट्या छोट्या गावांत फार पुर्वीपासून वास्तव्यास आहे आणि त्यांनी तेथील बोलीभाषा आणि रितीरिवाज आत्मसात केलेले मी स्वतः पाहिलेले आहे. जर ते घरात आपली मातृभाषा जपतात तर तो त्यांचा हक्क आहे.
आपले असे तोडून टाकणारे आणि हेटाळणीचे प्रतिसादच तर इतर भाषिकांच्या मनात मराठी माणूस आणि मराठी भाषेविषयी अढी / तिरस्कार उत्पन्न करत नाहित ना याचा विचार करणे गरजेचे आहे. कृपया वैयक्तीक टीका टाळावी ही विनंती.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 5:25 pm | अमरेंद्र बाहुबली

पुण्यात मी पाहतोय. पिढ्यानप्ढ्या राहनारे किराणा दुकान चालवनारे मारवाडी लोक दुकानात कामगारांशी मारवाडीतच बोलतात, गिर्हाईक मराठीत बोलत असेल तरी जाणून बूजून हिंदीतच बोलतात. तेयांना महाराष्ट्र नी मराठी ह्याशा काही घेणंदेणं नसतं. ते फक्त “पैसा कमावणासाठी” आलेले असतात. चेसुगू सरांनी वर सांगीतलंच आहे की ते घरात मराठी बोलत नाहीत मारवाडी बोलतात महाराष्ट्रात येऊन ४०० वर्ष झाले तरी. तब्बल चारशे वर्ष जाऊनही त्यांची मातृभाषआ मारवाडीच राहत असेल तर ह्याला काय म्हणावे? मध्यप्रदेशात मा अनेक मराठी आडनावाची लोक पाहीलात ज्याना मराठीचा गंधही नव्हता कारण त्यांची मातृभाषाकधीच बदलली.
चेसूगु सरांचा हेका हाच आहे की हिंदी ला राष्ट्रभाषा करावी. काही दिवसानी ते म्हणताल की मराठी तसंही कुणी बोलत नाही आता महाराष्ट्राची भाषआ हिंदी करा.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 5:48 pm | चेतन सुभाष गुगळे

फारच हीन पातळीवरचा व्यक्तिगत प्रतिसाद.

आमचे आडनाव देखील बदलले. गुगलिया हे आडनाव जाऊन इथे जसे सांगळे, जगदाळे असे एकारांत आडनाव आहे त्याप्रमाणे ते गुगळे झाले. पण तरीही घरातील भाषा कशी बदलेल? कित्येक मराठी कुटुंबीय इदौर ला आहेत आणि ते पिढ्यान पिढ्या मराठीच बोलतात हे ठाऊक आहे का तुम्हाला?

मराठी विरोधात हिंदी मी कधीच आणलेली नाही पण तुम्ही हिंदी विरोधात इंग्रजी थोपताय म्हणजे

अम्रेंद्र बाहुबली हे असे नाव घेण्यावरुनच (मराठी पात्राचे घेणे नाव का सूचले नाही तुम्हाला?) तुम्ही स्वतःच इंग्रजधार्जिणे गुलाम मनोवृत्तीचे दक्षिण भारतीय भाषिक असण्याची मला खात्री पटत चालली आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 5:49 pm | चेतन सुभाष गुगळे

संतुलित प्रतिसाद आणि वैयक्तिक पाठिंबा दिल्याबद्दल आभार.

कॉमी's picture

17 Apr 2022 - 6:50 pm | कॉमी

सहमत. व्यक्तिगत घसरणे चुकीचे.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 7:22 pm | चेतन सुभाष गुगळे

हे आभार मुद्दाम इथे नमूद करतो आहे कारण बरेचदा लोक दोन जणांचा वाद पाहतात पण तरीही बरोबर असणार्‍याची बाजू घेत नाहीत कारण एक तर मला काय त्याचे ही वृत्ती किंवा मग त्या दुसर्‍या आक्रमक व्यक्तिची भीती.

श्री गुगळे ह्यांच्यावर अशी टिका करण्याचे कोणतीहे कारण नव्हते. श्री गुगळे यांनी बरीच तात्वीक भांडणे केल्याचे मला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मुळ उद्देशावर शंका नक्कीच नाही. आज तर त्यांनी मारवाडी इतिहास सांगितला नसता तर त्यांचे मुळ कोणालाच कळले नसते.
------------
श्री बाहुबली, कदाचित तुम्हाला श्री गुगळे यांचे कडे दोन भाषीक पर्याय (मराठी आणि मारवाडी) उपलब्ध आहेत आणि तुमच्याकडे फक्त एकच मराठी भाषेचा पर्याय आहे. आणि राजस्थानी व गुजराती अगदी स्वतःच्या भाषेपेक्षा हिंदीला प्राधान्य देताना दिसतात. श्री अमित शहा गुजरातचे रहिवासी आहेत. ह्या सर्व गोष्टीमुळे मुळे अशी शंका आली असावी.

गुजराती,मारवाडी हिंदी भाषेला प्राधान्य देतात हे चुकीचे असावे.
गुजराती,मारवाडी जे दुसऱ्या देशात राहतात,दुसऱ्या राज्यात राहतात तेच गुजराती मारवाडी हिंदी चे सर्मथन करतात ते पण त्यांच्या सोयीसाठी.
कारण ते स्वतः दुसऱ्या राज्यात ,देशात असतात.
गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत.
अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.

गुजराती,मारवाडी हिंदी भाषेला प्राधान्य देतात हे चुकीचे असावे.
गुजराती,मारवाडी जे दुसऱ्या देशात राहतात,दुसऱ्या राज्यात राहतात तेच गुजराती मारवाडी हिंदी चे सर्मथन करतात ते पण त्यांच्या सोयीसाठी.
कारण ते स्वतः दुसऱ्या राज्यात ,देशात असतात.
गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत.
अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 6:34 pm | चेतन सुभाष गुगळे

गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत.
अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.

हा तुमचा अंदाज चूकीचा आहे. गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो.

आमच्या राज्यात आला आहात तर फक्त आमच्या स्थानिक भाषेतच नाहीतर इंग्रजीतच बोला अशी दमदाटी गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यांत होत नाही हे स्वानुभावरुन सांगतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली

गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मला

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 7:07 pm | अमरेंद्र बाहुबली

गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मला

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 12:54 pm | चौथा कोनाडा

गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तर ते ही हिंदीत बोलतात असा माझा अनुभव आहे. येत नसेल तरी मोडक्या तोडक्या हिंदीत बोलायचा प्रयत्न करतात !

sunil kachure's picture

18 Apr 2022 - 1:10 pm | sunil kachure

काहीच वर्षापूर्वी गुजरात मध्ये उत्तर भारतीय लोकांना हाकलून देण्यासाठी हिंसक आंदोलन झाले हे विसरलात का,?

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 5:23 pm | चौथा कोनाडा

त्याचा पार्श्वभुमी वेगळी होती, संदर्भ वेगळा होता, असे मुद्दे राजकिय पातळीवर नेऊन त्याचे राजकारण करण्याची

Background :
The 14-months old girl from a Thakor community was allegedly raped by a migrant labourer from Bihar on 28 September 2018.[1][2] He worked at the ceramic factory at Dhundhar village near Himmatnagar, Sabarkantha district in north Gujarat where the incident took place.[1][3] He was arrested by the police next day. It angered the Thakor community which held protests across Gujarat.

बलात्काराच्या पार्श्वभुमीवर पीडतांना न्याय देण्यासाठी काँग्रेस नेत्याने उपोषण करून स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले. त्यात भाषिक वादा पेक्षा "स्थानिकांना रोजगार" हा मुद्दा होता.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 6:30 pm | चेतन सुभाष गुगळे

माझं मराठी वाचून आणि ऐकून अनोळखी माणसाला मी सांगेपर्यंत कधीच कळत नाही की मारवाडी भाषिक आहे म्हणून ....

गुगळे आडनावामुळे मला काय काय अनुभव आले ते कदाचित इथे अस्थानी वाटतील पण तरीही त्यातले काही मांडतो.

दहावीला पी जोग क्लास मध्ये शिकत असताना इंग्रजी भाषेच्या शिक्षिकेने माझा टेस्ट पेपर मला देताना कोपर्‍यात दोन बोटांच्या चिमटीत एखादी किळसवाणी वस्तू धरावी तस धरून उचलला वर "गुगळे? ई.. काय बाई लोकांची आडनावं असतात!" असे उद्गार काढले होते. ती मला काय समजली होती ते काही मला कळले नाही.

पुढे डोंबिवलीतल्या लॉजवर एका तत्वज्ञानावर वादविवादाची हौस असलेल्या एका गृहस्थाने आस्तिक नास्तिक चर्चेत माझ्याबरोबर वाद घालताना माझं मराठी ऐकून मला "गुगळे म्हणजे तुम्ही नक्की कोण हो?" असे अगदी कुतूहलाने विचारले. मी नेमका कोण हे सुरुवातीला सांगितलेच नाही तरी पुन्हा हट्ट करुन स्वतःच्या एका खांद्यावरुन खाली तिरका हात करत तुम्ही एअरिअल वाले का? असे पुन्हा विचारले. मी ऐरिअल वाला नाही असे सांगितल्यावर मग पुन्हा कोणचा हट्टच धरल्यावर जैन मारवाडी सांगितले तर त्याचा कितीतरी वेळ विश्वासच बसला नाही. तुम्ही सदाशिव पेठीच असणार असं मला वाटलं असं पुन्हा पुन्हा म्हणत होता.

मराठीसोबत माझ्यासारख्या मूळ अमराठी माणसाने इतकी आत्मीयता दाखविल्यावरही हे आरोप होणार असतील तर कोण अमराठी भाषिक मराठी कधीतरी शिकेल काय?

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 5:32 pm | उपयोजक

हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे. शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्‍या नोकर्‍यांवर हे हिंदीभाषिक आहेत. रस्त्यांवर हातगाड्यांवर व्यवसाय करणारे भय्ये तर भरमसाठ आहेत. विदर्भात आधीच हिंदीला पायघड्या आहेत,मोठ्या शहरांमधे हिंदी ही मराठीला पर्याय म्हणून उभी राहतेय. आधी स्थानिक भाषेचा खून,भेसळ आणि त्यावर रोजगार हिसकावणे हे प्रकार या हिंदीभाषिकांमुळे घडत आहेत. हिंदीला अजून बळ मिळाले तर तिची मराठीसोबत भेसळ अजून होईल. यामुळे मराठी समृद्ध न होता ती धेडगुजरी होईल.
या सगळ्यामुळे महाराष्ट्रात आणि दक्षिणी राज्यांमधे हिंदीविरोध वाढता आहे. देशभर हिंदी पसरवण्यापेक्षा ज्या राज्यांची ही अधिकृत भाषा आहे त्यांचा विकास का केला जात नाही? जेणेकरुन असे ज्या राज्यात राहतात तिथली भाषा न शिकणारे भाषिक कृतघ्न महाराष्ट्रात येणे थांबेल.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 5:51 pm | चेतन सुभाष गुगळे

हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे.

इंग्रजीने जास्त केले आहे.

शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्‍या नोकर्‍यांवर हे हिंदीभाषिक आहेत.

दक्षिण भारतीयांनीच जास्त नोकर्‍या बळकावल्या आहेत.

हे जुने झाले आता दक्षिण भारत खूप प्रगती करत आहे.
खूप नोकऱ्या तिकडे निर्माण झाल्या आहेत..
मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत..
सर्व बिमरू राज्यातील आहेत .
पण आजुन पण
हिंदी भाषिक राज्य..राजस्थान,यूपी,बिहार mp आहे तिथेच आहेत
मागास....
ह्या राज्य मुळे

भारत प्रगत देशांच्या यादीत येत नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Apr 2022 - 12:02 am | चेतन सुभाष गुगळे

मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत..

इतक्या कमी उत्पन्नावर त्यांचं लक्ष नाही. साहेबाचा पीए वगैरेंसारख्या मोठ्या मिळकतीची पदे त्यांनी बळकावली आहेत मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत. मराठी भाषेचा आणि मराठी जनांचा हेच जास्त अपमान आणि दु:स्वास करतात उत्तर भारतीयांपेक्षाही.

उपयोजक's picture

19 Apr 2022 - 8:41 pm | उपयोजक

माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.

म्हणजे योग्य काय यावर विचार न करता
तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Apr 2022 - 12:12 am | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!

मुद्दा कळला नाही की कळूनही न कळल्याचा आव आणताय? ठळक केलेले शब्दच महत्त्वाचे आहेत कारण तेच भाषेचे भवितव्य ठरविणार आहेत.

माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.

या शब्दांमधून मला हे सांगायचे आहे की मराठी माध्यमात शिकल्याने माझे मराठी उत्तम आहे पण परिणामस्वरुप इंग्रजी कच्चे. जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी. म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले. याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही.

पण आता हिंदी ऐवजी इंग्रजी सक्ती अशीच होत राहिली तर पालक मुलांना टाकणार इंग्रजी माध्यमात. आता याच्या परिणामी मुलांचे मराठी कच्चे राहणार म्हणजे अंतिमतः इंग्रजी आग्रह मराठीलाच भविष्यात बुडविणार.

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2022 - 7:45 am | श्रीगुरुजी

जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी.

मला हिंदीपेक्षा इंग्लिश खूप सोपी वाटते.

म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले.

मी जन्मतःच मराठी आहे.

याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही.

चुकीचे गृहीतक आहे. मी बालवाडीपासून १० पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो व मला मराठी उत्तम येते. परंतु हिंदीच्या तुलनेत इंग्लिश खूपच सोपी वाटते.

धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.

तुम्ही तुमचा हेका सोडत नाही.मग इतरांनी त्यांचा हेका का सोडावा?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 3:27 pm | चेतन सुभाष गुगळे

उपायोजक धागा तुम्हीच काढलाय ना? मग तुमचे मत तुम्ही धाग्यात मांडलेच आहे. काथ्याकूट करायचा असेल तर विरोधी मत स्वीकारा की. तुमचीच री ओढायची असेल तर मग तुमच्या धाग्यावर मी फक्त तुम्हाला सहमती दर्शवायला येईन चर्चा तेव्हाच होईल जेव्हा मी वेगळे मत मांडेन.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 5:38 pm | उपयोजक

विरोधी मतांचा आदर असू शकतो ते स्विकारायचं का नाकारायचं ते ती व्यक्ती ठरवेल. मी तुम्ही हिंदीला विरोध केलाच पाहिजे असा कुठे आग्रह धरलाय? मी माझीच मतं मांडतोय. आणि ती हिंदीविरोधी असल्याने तुम्ही चिडलात. कारण ती मते तुमच्या मताच्या विरोधी आहेत म्हणून. म्हणून तर रागारागात लिहिलंत 'आधीच निष्कर्ष काढलाय म्हणून'. तुमचं मत स्विकारलं की मगच मान्य करणार चर्चा होतेय हे?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 5:52 pm | चेतन सुभाष गुगळे

वैयक्तिक घाणेरडा आरोप करणारे प्रतिसाद वगळता इतर प्रतिसादांना मी संताप व्यक्त केलेला नाहीये.

तर्कवादी's picture

17 Apr 2022 - 4:47 pm | तर्कवादी

दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय

माझ्यामते विरोध हिंदीला नाही.. हिंदीच्या सक्तीला आहे. दोन्ही गोष्टीत फरक आहे.

महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे.

पुन्हा एकदा - हिंदी विरोध आताही नाही आणि नसावा... हिंदीच्या सक्तीला विरोध आहे.
उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रात येवून वर्षानुवर्षे "क्यो सीखनी है हमे मराठी ?" अशा मग्रुरीला - एखाद्या घोळक्यात एखादाच हिंदी भाषिक असूनही इतर मराठी भाषिक मराठीत गप्पा मारु (मी अनौपचारिक गप्पा म्हणतोय हं.. कार्यालयीन बैठकी नाही) लागल्यावर "अरे यार.. हिंदी मे बात करो ना" म्हणत तक्रारीचा सूर लावण्याला विरोध आहे. म्हणजे हिंदी भाषिकांसमोर मराठी बोलणं म्हणजे गुन्हाच झाला का ? याबद्दल काय म्हणणे आहे ?

बाकी आर्थिक फायदा असेल तर मी फ्रेंच भाषेतही एखादा व्हिडिओ वा एखादे लेखन प्रसिद्ध करेन --किंवा माझी व्यक्तिगत आवड म्हणूनही शिकेन ...पण म्हणून कुणी फ्रेंच भाषा सक्तीची केली तर मी कडाडून विरोध करेन.. हा दुटप्पीपणा नसून निवडीचा अधिकार आहे. माझे हिंदी भाषिक मित्र आहेत, मी त्यांच्याशी हिंदीत बोलतो, मी हिंदी चित्रपट, मालिका व गाणी बघतो.. पण ही माझी निवड आहे. .. उद्या कुणी मराठी चित्रपटांवर बंदी घातली तर मी कडाडून विरोध करणारच.

असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?

माझा चन्नईजवळ महिंद्रासिटीत अल्पकाळ वास्तव्यातला अनुभव आहे.. तिथे एका सर्विस अपार्टमेंटमध्ये माझी राहण्याची सोय माझ्या कंपनीकडून करण्यात आलेली होती. त्यावेळी मला काही मराठी मालिका बघण्याची सवय होती. पण तिथल्या टाटा स्काय वर त्या वाहिन्या दिसत नसल्याने मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला असता तिने दहा मिनटात मराठी पॅक जोडून माझी सोय केली.

सुखीमाणूस's picture

17 Apr 2022 - 11:06 am | सुखीमाणूस

इन्ग्रजी ऐवजी हिन्दी वापरा असे म्हणाले आहेत. याचा अर्थ आम्ही तरी जर दोन भिन्नभाषिकाना एकेमेकान्च्या भाषा येत नसतिल तर इन्ग्रजी मधुन बोलण्याऐवजी हिन्दी वापरावे असा घेतला आहे.
यात इतके राजकारण होण्याचे एकच कारण आहे की महाराष्ट्र जर दक्शिणेच्या राज्यान्सारखा भाषाअस्मिता वादी झाला तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली...
पुढची पायरी काय असणार आहे ते देखिल दिसते आहे. या पुर्वीच शेन्डी जानव्याचे राजकारण आम्ही करणार नाही असे मामु म्हणाले आहेतच.
https://www.newindianexpress.com/nation/2021/oct/18/granddads-soft-hindu...
तेव्हा तामिळनाडु च्या भाषिक अस्मितेबरोबर तिथुन अजुन पाठ घेतले जात आहेत ते दिसते आहे. दक्शिणी भाषान्सारखा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणुन प्रयत्न चालु आहेत. शिवाय मराठी सन्स्क्रुतोद्भव नाही असे म्हणणे माण्डणे चालु आहे.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/marathi-language-has-not...
ह्म्म चालायचेच.

पण भारताला परवडणार आहे का नस्ती भाषिक भान्डणे? आपण आधीच जातीपाती मध्ये खुप विभागले गेले आहोत त्यात भाषेची भर कशाला?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 2:31 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली...
शिवसेनेला विरोध म्हणून अनेक भाजप समर्थक मराठीला विरोध करतात. तेयांचा कडे पाहून रडावे की हसावे ते च कळत नाही. हियाबाबत श्रिगुरूजींकडे भाजपेयींनी पहावे, ते सेना विरोधी असूनही कट्टर मराठीवादी आहेत. मराठी मुंबई म्हटलं का सेना आठवते ह्यातच सेनेचं कर्त्तृत्व दिसतं.

धर्मराजमुटके's picture

17 Apr 2022 - 11:06 am | धर्मराजमुटके

धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.

सहमत आहे. तसेही प्रत्येकाची मते ठरलेली असतात. कोणी चर्चेमुळे आपले मत बदलत नाही. त्यामुळे कोणत्याही ठराविक आय डीं ना दोष देता येत नाही.
धागा कोणत्याही सदराखाली काढला तरी त्याकडे केवळ मौजमजा म्हणून पहावे. असेही जालावर लिहिणारे बहुसंख्यांचे पोटापाण्याचे प्रश्न तीव्र नसणारे असतात आणि ज्यांना त्याची भ्रांत आहे त्यांच्याकडे चर्चा करण्याइतका वेळ, वकूब आणि उत्साह नसतो. पुर्वी मलाही अशा चर्चा वाचून आपणही काहितरी लिहावे असा हुरुप येत असे पण आता हे सगळे नको वाटते. लिहिणार्‍यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे किंवा केवळ वाचनमात्र राहणे ही त्यातल्या त्यात सुखासिन पर्याय आहेत.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 2:36 pm | उपयोजक

लिहिणार्‍यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे

म्हणजे आधी लिहावं म्हणून प्रोत्साहन द्यायचं नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं.

चांगलंय. चालू द्या. :(

धर्मराजमुटके's picture

17 Apr 2022 - 4:04 pm | धर्मराजमुटके

माफ करा. पण मी कुणाला रिकामटेकडा म्हटलेल नाहिये. _/\_.

धनावडे's picture

17 Apr 2022 - 11:15 am | धनावडे

इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??

इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??

का बरे ऐकावे ? समालोचन इंग्रजी मधे उपलब्ध आहे ना ? हिंदी मधून ऐकायचे नाही एवढाच तर विषय आहे ना ?

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2022 - 3:46 pm | श्रीगुरुजी

कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार प्रवाह (मराठी) आयपीएल दाखवित नाही.

धनावडे's picture

18 Apr 2022 - 7:40 am | धनावडे

हिट star वर Star sport १ वर मराठी भाषेचा पर्याय आहे. काल संदीप पाटील होते समालोचन करायला.

धनावडे's picture

18 Apr 2022 - 7:40 am | धनावडे

Hot star *

sunil kachure's picture

17 Apr 2022 - 11:24 am | sunil kachure

स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो.
त्या पेक्षा स्थानिक भाषा आणि इंग्लिश ह्या दोनच भाषा आल्या खूप झाल्या .
हिंदी च गरज नाही.
इंग्लिश अशी पण जागतिक भाषा आहे आणि भारताची संपर्क भाषा पण होईल.
इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात.
हिंदी भाषा नकोच.
कशाला हवी.

धर्मराजमुटके's picture

17 Apr 2022 - 11:31 am | धर्मराजमुटके

स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो.

बरोबर आहे. शिवाय स्थानिक भाषा (उदा. मराठी) पण व्याकरणासहित शिकण्याची आवश्यकता नाही. पुर्ण वाक्यात एखाद दुसरा मराठी शब्द असला आणि बाकी इंग्रजी शब्द असले तरी चालून जाण्यासारखे आहे. उदा.उगाच टाईम (वेळ) वाया जातो.
शिवाय विरामचिन्हे खाल्ली तरी चालतात. उदा. कशाला हवी. (?)

इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात.

ह्याबद्द्ल प्रचंड सहमत. आताही इंग्रजी शाळेत जाणारी मराठी मुले आणि त्यांचे पालक आपापसात हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यामुळे इंग्रजी (सॉरी इंग्लिश) बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणार ह्याबद्द्ल सहमत आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 11:36 am | चेतन सुभाष गुगळे

हिंदी एक भारतीय भाषा आणि त्यातही मोठ्या लोकसंख्ये कडून बोलली जाणारी भाषा असली तरी तिला राष्ट्रीय भाषा मानण्यास नकार देतात तेच मूठभर इंग्रजांच्या भाषेला निमूटपणे आंतरराष्ट्रीय भाषा का मानतात?

कॉमी's picture

17 Apr 2022 - 11:42 am | कॉमी

तुमचे प्रतिसाद आवडले.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 11:44 am | चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद.

सतिश गावडे's picture

17 Apr 2022 - 12:28 pm | सतिश गावडे

हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील भारतीय जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते हिंदीत बोलतात की स्थानिक भाषेत बोलतात की मूठभर इंग्रजांची भाषा असलेल्या इंग्रजीत बोलतात?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 1:03 pm | चेतन सुभाष गुगळे

परदेश म्हणजे कोणता देश?

अमेरिका
ब्रिटन
जपान
रशिया
चीन
तैवान
जर्मनी
फ्रान्स
इटली

वरील सर्व आणि इतरही अनेक (फार मोठी यादी होईल) देशांत भारतीय जातात /आहेत. या फार मोठ्या यादीतील मूठभर देशांत मूठभर इंग्रजांची भाषा असलेल्या इंग्रजीत बोलतात.

सतिश गावडे's picture

17 Apr 2022 - 1:58 pm | सतिश गावडे

तुम्ही माझ्या प्रतिसादातील स्थानिक शब्दाला बगल दिलीत म्हणून मूठभर शब्द पुन्हा वापरता आला.

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा बरं :)

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 2:15 pm | चेतन सुभाष गुगळे

विशेषतः ठळक शब्द काय आहेत ते पाहूनच उत्तर दिलं.

सतिश गावडे's picture

17 Apr 2022 - 4:26 pm | सतिश गावडे

तुम्ही प्रश्नाला सोयीस्कर बगल देत आहात म्हणून पुन्हा विचारतो: हिंदी भाषिक भारतीय इंग्रजी न बोलणाऱ्या देशात जेव्हा जातो तेव्हा तो इतरांकडून त्याच्याशी हिंदीत बोलावी अपेक्षा ठेवतो की तो इतरांशी इंग्रजीत/त्या देशाच्या भाषेत बोलतो?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 5:55 pm | चेतन सुभाष गुगळे

या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय आहे? तुमच्या उत्तरानंतर मी माझं उत्तर नक्कीच देईन.

sunil kachure's picture

17 Apr 2022 - 12:38 pm | sunil kachure

संपर्क भाषा म्हणून भारतात बऱ्या पैकी जास्त बोलणारी भाषा म्हणून हिंदी स्वीकारावी.
फक्त भारतातील लोकांस एकमेकाशी संपर्क साधण्यास काही अडचण येवू नये.

हा साफ हेतू असता तर लोक विरोध करणार नाहीत.
का करतील
पण हिंदी भाषा ही देशाची भाषा असावी असे संसदेत,मीडिया मध्ये बोलणे ह्या मागे राजकारण आहे.राजकीय हेतू आहेत.बाकी भारतीय भाषा चा कायदेशीर मार्गनी खून करण्याचा डाव आहे.
मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.
असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही
हिंदी वाले मान्य करतील का बघा.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 2:33 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.

नक्की. इथे एक मराठी भाषक हिंदी ऐवजी तेलुगू भाषा सगळ्या भारतभर संपर्क भाषा म्हणून चालेल असे लिहितात.

असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही.

आहे ना. खुप फरक आहे. मराठी वाले मराठी सोडून हिंदी, इंग्रजी भाषा बोलण्यास जास्त उत्सुक असतात हा मोठा फरक आहे.

हिंदी वाले मान्य करतील का बघा.

हिंदी वाले मान्य करतील काय ते पण बघा आणि तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी पण मराठीला राष्ट्रभाषा म्हणून मान्य करतील काय ते पण विचारा.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 2:23 pm | चेतन सुभाष गुगळे

अमितजींच्या मूळ आवाहनाला जोरदार विरोध केला आहे तो तमिळ भाषिकांनी. याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली. एका दहशतवादी संघटनेच्या नावातच यांच्या भाषेच्या नावाचा शब्द आहे आणि त्या संघटनेचे सदस्य जे आपल्या माजी पंतप्रधानांचे मारेकरी आहेत त्यांना फाशी द्यायचा विषय काढला तरी हे रस्त्यावर उतरुन हिंसक कारवाया करतात त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे?

यांचा नेता मेला / तुरुंगात गेला तरी हे सामूहिक आत्महत्या वगैरे करतात. यांना फार मोठ्या समुपदेशनाची व मानसिक उपचारांची गरज आहे.

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2022 - 2:40 pm | श्रीगुरुजी

याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली.

अत्यंत चुकीची माहिती आहे. श्रीलंकेतील लिट्टे, तुल्फ व इतर तामिळ संघटनांनी सुरू केलेला सशस्त्र लढा हा फक्त भाषेशी निगडीत नव्हता. किंबहुना भाषा हे त्यामागील एक अत्यंत दुय्यम कारण आहे. वंशभेद, तामिळांवरील अत्याचार व अन्याय, वारंवार झालेली तामिळ नागरिकांची हत्याकांडे यामुळे हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 2:39 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे एखादा हिंदी भाषीक सहज मान्य करतो पण मराठी माणूस आजीबात मान्य करत नाही. असा नेभळटपणा मराठी माणसांत का असतो?

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 2:40 pm | उपयोजक

याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता

अर्धवट माहिती आहे तुम्हाला.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 3:32 pm | चेतन सुभाष गुगळे

तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर द्या की असली एकवाक्याची पिंक टाकू नका.

आणि कृपया मला चेगु हे संबोधन वापरु नका. मला आवडत नाही. तुम्ही हवे असल्यास माझे नाव / नाव + आडनाव / नुसतेच आडनाव किंवा तिन्ही एकत्र असे संबोधा. टाईप करायला जड जात असल्यास कॉपी पेस्ट करा पण नावा आडनावातील एकएक अक्षरे घेऊन संबोधन नकोय.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 5:50 pm | उपयोजक

https://en.m.wikipedia.org/wiki/Burning_of_Jaffna_Public_Library

हे वाचा. मग कळेल दुष्ट कोण ते. श्रीलंकेतले तमिळभाषिक की सिंहलीभाषिक श्रीलंकन सरकार?

https://en.wikipedia.org/wiki/Liberation_Tigers_of_Tamil_Eelam

The LTTE has been designated as a terrorist organisation by 33 countries, including the European Union, Canada, the United States, and India.[15]

सिंहली तमिळ या भाषिक संघर्षात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशात आणि इतरत्रदेखील अतिरिकी कारवाया रक्तपात हिंसाचार केला. भारतीया माजी पंतप्रधानांची हत्या केली याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणारच नाही.

आणि अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्‍यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण? तमिळ लोक स्वतःला आधी तमिळ आणि मग भारतीय (?) समजतात. हा विभाजनवादी प्रवृत्ती आहे.

उपयोजक's picture

19 Apr 2022 - 8:31 pm | उपयोजक

अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्‍यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण

लिट्टे ज्यामुळे स्थापन झाली त्या श्रीलंकन सरकारच्या अत्याचारांबद्दल आणि भारताने या वादात तमिळ लोकांना काहीही मदत केली नाही याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीये. श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 11:31 pm | चेतन सुभाष गुगळे

श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.

दुसर्‍या देशाच्या अंतर्गत व्यवहारात का ढवळाढवळ करावी? भारतातील मुस्लिमांनी पाकिस्तानची मदत मागावी का? पाकिस्तानने केली तर आपण शांत बसू का?

तरीही आधी भारताने तशी मदत केली, मग अंगाशी आल्यावर श्रीलंकन सरकारची नाराजी घालविण्याकरिता शांति सेना पाठविली आणि मग लिट्टेची नाराजी ओढवून घेतली जिचा परिणाम श्री. राजीव गांधींच्या हत्येत झाला.

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2022 - 2:44 pm | श्रीगुरुजी

भारतातील कोणत्याही दोन व्यक्तींना ज्या भाषेत एकमेकांशी संवाद करायचा आहे त्यात अमित शहा किंवा इतरांनी पडू नये. त्यांनी हिंदीतच संवाद करावा ही साधी सूचना सुद्धा अत्यंत संतापजनक आहे. त्यांना ज्या भाषेत संवाद करावासा वाटेल ती भाषा त्यांनी वापरावी. इतरांनी त्यात नाक खुपसू नये.

तर्कवादी's picture

17 Apr 2022 - 5:27 pm | तर्कवादी

भारतातील कोणत्याही दोन व्यक्तींना ज्या भाषेत एकमेकांशी संवाद करायचा आहे त्यात अमित शहा किंवा इतरांनी पडू नये. त्यांनी हिंदीतच संवाद करावा ही साधी सूचना सुद्धा अत्यंत संतापजनक आहे.

सहमत. वर एका प्रतिसादात मी म्हंटल्याप्रमाणे दोन व्यक्तींना एकमेकांना सहकार्य करायचं असल्यास त्या वाटेल त्या प्रकारे मार्ग काढतीलच - मग इंग्लिश, हिंदी , स्थानिक भाषा, मोबाईलवरचे अ‍ॅप, इंटरनेटवरुन फोटोज, दुभाषा मित्रांची मदत (आता फोनवर इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप - व्हॉईस मेसेज यामुळे यासगळ्या गोष्टी कितीतरी सोप्या झाल्या आहेतच) अमित शहांनी उगाच चिंता करण्याचं कारण नाही .. अणि साधी सूचना वगैरे काही नसतंच.
निकड/ आवड असल्यावर माणूस कसाही मार्ग काढतोच.. माझे वडील फारसे शिकलेले नाहीत, त्यांचं इंग्लिश फार चांगलं आहे अशातला भाग नाही पण त्यांनी आतापर्यंत इंग्लिश चित्रपट पैसे खर्चुन थिएटरला जावून बघितलेत. या उलट मी मात्र उच्चार नीट कळत नाही म्हणून इंग्लिश चित्रपट बघायचे टाळतो.. किमान इंग्लिश सबटायटल्स तरी असलेले चित्रपटच घरी बघतो , थिएटरला तर स्वतःहून फक्त टायटॅनिक हा एकच इंग्लिश चित्रपट मी आतापर्यंत बघितला आहे.
उद्या अमित शहा म्हणतील इंग्लिश चित्रपटही बघू नका, त्याऐवजी हिंदीच बघा..
जाता जाता :
The Terminal ह्या इंग्लिश चित्रपटाबद्दल सांगायला आवडेल - काही राजकीय व तांत्रिक कारणामुळे अमेरिकेतल्या एका विमानतळावर अडकलेल्या नायकाची ही कथा आहे. इंग्लिश येत नसलेला हा नायक प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत अनेक दिवस विमानतळावरच रहातो त्याची ही कथा आहे.

देशात मराठी लोकांचा द्वेष केला जातो कारण महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रगत राज्य आहे.
महाराष्ट्र शिवाय देशाचा गाडा चालणार नाही.
देशातील कोणताच बिगर हिंदी भाषा असणारा व्यक्ती अमित शाह ह्यांच्या हिंदी विषयी मतचा विरोध च करेल.
फक्त मराठी लोक हे जरा विचित्र च आहेत.
ह्यांना देश पातळीवर नेहमीच द्वेष नी बघितले जाते तरी हे हिंदी चे समर्थन करतात.
आपसात स्वतःची भाषा सोडून हिंदी मध्ये बोलतात.
हिंदी ही राष्ट्भाषा आहे हे देशात फक्त मराठी लोक च समजतात.
बाकी कोणताच हिंदी भाषा नसणार व्यक्ती हिंदी लं राष्ट्र भाषा समजत नाही.
आणि हिंदी थोपवून घेण्यास तयार पण होणार नाही.

सत्य आणि असत्य बेमालूमपणे मिसळलं आहे यात.

देशात मराठी लोकांचा द्वेष केला जातो

जनरलाईज्ड स्टेटमेंट. त्यामुळे या वाक्याला तसा काहीच आधार नाही. देशात प्रत्येक राज्यातील लोकांचा कोणी ना कोणी द्वेष करतोच. आता पंजाब निवडणूकीच्या प्रचारात एका नेत्याने एक बिहारी सौ बिमारी असे विधान केले होते.

महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रगत राज्य आहे.

हे विधान खरं आहे. पण यामागचं कारण मुंबई महाराष्ट्रात आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात उद्योगांची मुख्य कार्यालये आहेत आणि येथून महसूल मिळतो. मुंबईत जेमतेम ३५ टक्के नागरिक मराठी भाषिक आहेत. मुंबईची प्रगती मराठी + इंग्रजी + हिंदी + गुजराती या मिश्रणाच्या जोरावर झाली हे सत्य आहे. या मिश्रणातून हिंदी जरी वगळली तरी प्रगतीचा आलेख बराच खाली येईल.

महाराष्ट्र शिवाय देशाचा गाडा चालणार नाही.

हे संदिग्ध वाक्य आहे. हे असेच अनेक राज्यांबद्दल सांगता येईल. पण तूर्तास महाराष्ट्राचा गाडा मुंबईच्या जोरावर चालतो हे म्हणता येईल. मुंबईचा गाडा चोवीस तास अखंड विजेच्या जोरावर चालतो असेही म्हणता येईल. विजेचा गाडा प्रचंड प्रमाणात विज निर्मिती करणार्‍या विदर्भाच्या जोरावर चालतो असे म्हणता येईल. विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?

देशातील कोणताच बिगर हिंदी भाषा असणारा व्यक्ती अमित शाह ह्यांच्या हिंदी विषयी मतचा विरोध च करेल.

हे विधान खात्रीशीर पणे सत्य मानता येईल काय? गुजराथी, राजस्थानी आणि इतरही असे अनेक बिगर हिंदी भाषिक आहेत ज्यांना इंग्रजीपेक्षा हिंदीत संवाद साधणे सुलभ वाटते.

फक्त मराठी लोक हे जरा विचित्र च आहेत.
ह्यांना देश पातळीवर नेहमीच द्वेष नी बघितले जाते तरी हे हिंदी चे समर्थन करतात.

इथे भाषेच्या द्वेषाबद्दल बोलणं चालू आहे की व्यक्तिच्या द्वेषाबद्दल? हे जे कन्फ्यूजन (मानसिक गोंधळ हा मराठी शब्द आहे पण त्यातून अर्थ तितका थेटपणे पोचत नाही) आहे ते खाली एका स्वतंत्र प्रतिसादात दूर करायचा प्रयत्न करतो.

sunil kachure's picture

17 Apr 2022 - 4:17 pm | sunil kachure

मुंबई मुळे महाराष्ट्र प्रगत आहे असा सर्रास युक्तिवाद केला जातो.
हेतू एकच महाराष्ट्र चे मोठेपण नाकारणे.
1) मुंबई मध्ये मराठी लोकांची संख्या कमी आहे.

देशात कोणी ही नागरिक कोणत्या ही राज्यात जावून राहू शकतो,उद्योग करू शकतो, जागा खरेदी करू शकतो असा नियम आहे.
त्यांना महाराष्ट्रात येण्या पासून रोखण्याचा अधिकार राज्य सरकार लं असता .
तर मुंबई मध्ये मराठी लोकांची संख्या कमी आहे हा युक्तिवाद करता आला असता.
२) मुंबई च्या विकासात गुजराती,मारवाडी,हिंदी भाषा लोकांचा सहभाग आहे.
मुंबई चा विकास चे श्रेय कोणाला प्रथम द्यायचे असेल तर ते ब्रिटिश लोकांना दिले जाईल.
मुंबई मध्ये रेल्वे त्यांनी चालू केली.
समुद्र मार्गे व्यापार त्यांनी चालू केला.
बंदर त्यांनी बांधली.
नाही योजना बद्ध बिल्डिंग,बाकी infrastructure त्यानी निर्माण केले.
मुंबई चा विकास व्हावा म्हणून त्यांनी हे केले.
गुजराती,मारवाडी,हिंदी भाषिक मुंबई च्या विकासात हातभार लावावा म्हणून इथे आले नाहीत.
मुंबई मधील विकासात आपल्याला पण वाटा मिळावा म्हणून आले.
त्या मुळे तुमचा तो पॉइंट पण चुकीचा आहे.
३) २४ तास वीज,प्रतेक घरात पाणी,शांतता.
ह्या तीन गोष्टी असतील तर च कोणत्या ही शहराचा विकास होतो.
आणि ह्या तिन्ही गोष्टी मुंबई मध्ये उपलब्ध करण्याचे श्रेय फक्त महाराष्ट्र चे आहे.
बाकी ह्या मध्ये कोणी भागीदार नाही.
४) मुंबई मुळे महाराष्ट्र श्रीमंत.
मुंबई मधून मिळणारा टॅक्स रुपी फायदा सर्वात जास्त केंद्राला जातो.
आणि तो पैसा केंद्र.
राजस्थान,बिहार,यूपी अशा अनेक गरीब राज्यासाठी खर्च करत असते.
फक्त महाराष्ट्र लाच पैसा मिळतो हे पूर्ण चूक.
५)मुंबई व्यतिरिक्त.
पुणे,नागपूर,नवी मुंबई,ठाणे,औरंगाबाद,नाशिक अशी अनेक शहर महाराष्ट्रात आहेत
दुसऱ्या कोणत्याच राज्यात इतकी प्रगत अनेक शहर असण्याची शक्यता पण नाही.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 5:54 pm | उपयोजक

विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?

मग भाषावार प्रांतरचना केली त्यावेळी सांगायचं होतं वैदर्भ्यांनी 'हिंदी मातृभाषा आहे म्हणून. त्यावेळी काय ते झोपले होते का?"

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 7:00 pm | चेतन सुभाष गुगळे

ते मध्यप्रदेशातच चालले होते. त्यांची मनधरणी करुन त्यांना महाराष्ट्रात ठेवले. आधी जो दर्जा पुण्याला देणार होते तो उपराजधानीचा दर्जा आणि वर्षातून एक अधिवेशन असं गाजर दाखवून त्यांना राज्यात घेतलं त्यांचे ऊर्जा स्त्रोत वापरले पण त्यांना विकासापासून वंचित ठेवलं.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 2:57 pm | उपयोजक

लगेच हिंदीद्वेषी असा काहीजण शिक्का मारायला का पाहतात कोण जाणे. मी स्वत: कितीतरी द.भा लोकांना हिंदी शिकायला जमेल तशी मदत केली आहे.करतो आहे.पण त्यामागे अन्य भाषांप्रमाणे एक भाषा हिंदी असा दृष्टीकोन आहे. विशेष ममत्व वगैरे नाही हिंदीबद्दल. शिवाय माझा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक वर्षे राहणार्‍या कोणाही परप्रांतीयाला तो हिंदीत बोलून मदत मागायला आल्यास त्याला हिंदीतून प्रतिसाद न देऊन मी माझ्यापुरता मराठी बाणा जपतो आहे. जपत राहीन. मग कोणी हिंदीद्वेषी म्हटले तरी पर्वा नाही.

उपयोजक's picture

17 Apr 2022 - 3:12 pm | उपयोजक

हिंदीच्या पसरण्याला मर्यादा येणार?? :)

https://youtu.be/vlzAH84DefA

Bollywood is finished? | How films like KGF, RRR are destroying bollywood's monopoly | Abhi and Niyu

हिंदीचा आधार घेऊनच ना?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 3:55 pm | चेतन सुभाष गुगळे

इथे अनेकांनी भाषा आणि व्यक्तिद्वेष यांची गल्लत केली आहे.

काही कॉम्बिनेशन्स पाहूयात.

हिंदी व्यक्ति आणि मराठी भाषिकांचा द्वेष
हिंदी व्यक्ति आणि मराठी भाषेचा द्वेष
अहिंदी व्यक्ति आणि हिंदी भाषिकांचा द्वेष
अहिंदी व्यक्ति आणि हिंदी भाषेचा द्वेष

आता यात आपण कुठल्या कॅटेगरीत येतो? आपल्यापैकी बहुतेकांची ऑनलाईन फसवणूक कधी ना कधी झाली असेल किंवा आपल्यासोबत निदान फसवणूकीचा प्रयत्न तरी झाला असेल.

क्रेडीट कार्डचा ओटीपी मागून फसविणे किंवा आता नवीनच प्रकार आहे तो म्हणजे क्यू आर कोडद्वारे फसवणूक करणे.

हे फसवणूक करणारे नेहमीच उत्तर प्रदेश किंवा बिहारचे हिंदी भाषिक असतात. अशा लोकांविषयी मलादेखील तिटकारा आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होऊन हे प्रकार कायमचे बंद व्हायला हवे ही माझी देखील इच्छा आहे पण त्यांच्यावरचा राग हिंदी भाषेवर काढून आपण काय साध्य करणार आहोत?

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 4:15 pm | चेतन सुभाष गुगळे

मी धुळ्यात दोन वर्षे वास्तव्य केले तेव्हा एका चाळिशी ओलांडलेल्या इंदौरच्या हिंदीभाषिक मूळच्या यंत्र अभियांत्रिकी विषयातील अभियंता असलेल्या उत्पादन व्यवस्थापका सोबत काम करताना त्याला व्हिजन, ऑब्टेन आणि अशा इतर अनेक आपल्याला साध्यासुध्या वाटणार्‍या इंग्रजी शब्दांचे ज्ञान नसल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केल्यावर असे कळले की त्याने पदविका अभ्यासक्रम देखील हिंदी भाषेतून पूर्ण केला आहे. मग अधिक माहिती घेतली असता हे लक्षात आले की हिंदी भाषिक राज्यांत अनेक ठिकाणी अभियांत्रिकी पदविका व पदवीचे अभ्यासक्रम देखील हिंदीत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने शिक्षण घेतलेल्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान खूपच जेमतेम असते.

त्याचप्रमाणे एका मुंबईस्थित सीएच्या (सनदी लेखापाल) सहाय्यकासोबत अनेकदा संवाद साधताना जाणवले की तो सिर्फ या शब्दाचा उपयोग न करता केवल हा शब्द वापरतो. तसेच त्याच्या बोलण्यात अनेक शुद्ध हिंदी शब्द ऐकू आले. त्याबद्दल अधिक चौकशी केली असता कळले की त्याने राजस्थानातील एका महाविद्यालयातून वाणिज्य (कॉमर्स) शाखेची पदवी हिंदी माध्यमातून घेतली आहे.

आपल्याकडे बहुतेकांचे महाविद्यालयीन शिक्षण हे इंग्रजीतून झाल्याने संवाद साधण्यापुरते इंग्रजी तरी पदवीधारकांना येत असेल असे आपण गृहित धरतो.

अमित शाह हे सामान्य व्यक्ती नाहीत.देशाचे गृहमंत्री आहेत आणि केंद्रात सर्वात महत्वाचे स्थान असलेल्या एका व्यक्ती आहेत.
त्यांना खूप विचार करून बोलणे अपेक्षित आहे.
प्रतेक शब्द हजार वेळा विचार करून उच्चारला पाहिजे.

वक्तव्य.
ते पण संसदेत.
हिंदी भाषेचा वापर संपर्क की(संसर्ग)भाषा म्हणून करावा.
ह्याचा अर्थ ते सरकारी पातळीवर तसा प्रयत्न करणार.
१) त्रि भाषा सूत्र जे देशात आहे ते बंद केले जाईल.हिंदी आणि स्थानिक भाषा असा काही तरी प्रकार.
२)केंद्रीय कामकाज पूर्णतः हिंदी मध्ये.
३)सक्ती नी हिंदी शाळेत.
लोक स्वतः ठरवतील कोणती भाषा संपर्क भाषा असावी म्हणून.
ती संपर्क भाषा प्रत्येकाची वेगळी असेल ती हिंदी च असेल असे नाही.
इथपर्यंत ठीक.
पण सक्ती झाली.
तर मात्र कडवा विरोध होईल.
हिंदुस्तान देशाचे नाव आहे म्हणून सर्वांनी हिंदू धर्म च स्वीकारावा अशी सक्ती केली की जितका तीव्र विरोध होईल त्याच त्याच तीव्रतेचा विरोध हिंदी लादली की होईल.
हिंदी लं विरोध करण्यासाठी ज्या हिंदू देवदेवतांचे जन्म स्थान हिंदी भागात आहे ती दैवते पण नाकारली जातील.
हिंदू म्हणून जो सेतू आहे प्रतेक भाषिक लोकात तोच नाकारला जाईल.
असल्या उद्योगात सरकार नी पडू नये.
महागाई,भ्रष्ट कारभार,तीव्र गरिबी.
हे जे महत्वाचे प्रश्न आहेत देशासमोर ते सोडवावेत.

एकंदरीत सर्व प्रतिसाद वरून निष्कर्ष असा काढता येईल.
१) भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषा विविध भाषिक लोकात संपर्क भाषा म्हणून वापरण्यास हरकत नाही.
पण
हिंदी ची सक्ती नसावी.
लोक च परिस्थिती नुसार संपर्क भाषा ठरवतील सरकार नी हस्तक्षेप करू नये.
२)सर्व भारतीय प्रादेशिक भाषा ना त्यांचा सन्मान मिळालाच हवा.
भारतातील कोणत्याही प्रादेशिक भाषा ह्या देशाच्या अधिकृत भाषा पण असतील त्या सरकारी कामकाज मध्ये वापरण्यास बंदी घालता येणार नाही.शिकवण्यास बंदी घालता येणार नाही.त्या त्या राज्याची भाषा हीच त्या राज्याची अधिकृत भाषा असेल ह्यांची खात्री असावी.
असे संरक्षण असेल तर हिंदी ल भाषा .म्हणून विरोध नाही.
३) संपर्क भाषा कोणती ही असू ध्या,भाषा टिकवणे आपल्यावर अवलंबून आहे.
चेतन ह्यांच्या प्रतिसाद वरून.
ते महाराष्ट्रात ४०० वर्ष पासून राहतात पण त्यांनी त्यांची मारवाडी भाषा टिकवून ठेवली आह

तर्कवादी's picture

17 Apr 2022 - 11:33 pm | तर्कवादी

१) भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषा विविध भाषिक लोकात संपर्क भाषा म्हणून वापरण्यास हरकत नाही.
पण
हिंदी ची सक्ती नसावी.
लोक च परिस्थिती नुसार संपर्क भाषा ठरवतील सरकार नी हस्तक्षेप करू नये.

अगदी सहमत.. हिंदीच्या वापरास हरकत नाहीच.. फक्त सरकारी हस्तक्षेप आणि सक्ती असू नये. हा ज्याचा त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे..

२)सर्व भारतीय प्रादेशिक भाषा ना त्यांचा सन्मान मिळालाच हवा.

अगदी.. आणि हाच सन्मान व्यक्त करण्याकरिता जर अमित शहांनी त्या आवाहनासोबतच "परराज्यात दीर्घकाळासाठी स्थायिक असणारे हिंदी वा इतर भाषिक नागरिक यांनी त्या त्या राज्यातील भाषेचा सन्मान करावा, तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व राज्यातील भाषिक सौहार्द वाढीला लागावे" तर त्यांच्या आवाहनाचे नक्कीच स्वागत झाले असते.

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2022 - 7:23 pm | चौथा कोनाडा

दक्षिणी लोकांचा हिंदीला का विरोध असतो, त्यांची अस्मिता कशी तयार झाली ? हिंदीला प्रामुख्याने कोणते दक्षिणी राज्य विरोध करते ? या जिज्ञासे पोटी काही वाचन सुरू केले होते. त्या अभ्यासातून मी मिपावर रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल यांच्यावर लेखमाला लिहिली होती ती वाचल्यास, त्यांच्या भाषिक टोकदारपणाची मुळं कशी रोवली गेली, त्यावेळचे राजकारण समाजकारण यावर लेखमाला प्रकाश टाकते.

लेख वाचले नसल्यास नक्की वाचा:

१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ?

२. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर

३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण

४. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : द्रविड चळवळ, तमिळींची प्रादेशिक आणि राजकीय अस्मिता

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 7:35 pm | चेतन सुभाष गुगळे

या लेखमालेवरुन लक्षात आले की दाक्षिणात्यांमध्ये असलेला हिंदी विरोध ही एका परक्या देशातून आलेल्या धर्मप्रसारकाने टाकलेली ठिणगी आहे.

खाली उद्धृत केलेली वाक्ये फारच महत्त्वाची आहेत.

याचा परिणाम म्हणून अण्णा दुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवा राजकिय पक्ष १९४९ साली स्थापन केला. तामिळनाडूमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करत द्रविड मुन्नेत्र कळघमने उत्तर भारतीयांच्या कथित वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. पुढे हाच त्यांचा मुख्य मुद्दा बनत गेला. दक्षिणेकडील चार राज्यांचे एकत्रित वेगळे द्रविडनाडू / द्रविडीस्थान हे स्वतंत्र राष्ट्र करावे अशी देखील आणखी एक द्रमुकची मागणी होती. सुरुवातीला स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी फक्त तामिळभाषिक प्रदेशापुरतीच होती, नंतर त्यात इतर चार दक्षिणी राज्यांनाही समाविष्ठ करण्यात आले. पण कालांतराने भाषावार प्रांतरचना झाल्याने आणि भारतातून फुटून स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणे के केंद्रसरकारने अवैध ठरवल्याने ही मागणी द्रमुकला सोडून द्यावी लागली. केंद्र सरकारच्या "त्रैभाषिक" धोरणला अर्थात राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याला) वेळोवेळी नापसंती दर्शवत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला. आणि याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून एनईपी-२०२० या राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील "त्रैभाषिक" सूत्राला (कारण त्यात पुन्हा "त्रैभाषिक" धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्ती होणार म्हणून) त्यांचा विरोध आहे.

आताच मराठी माणसांनी नीट डोळे उघडून पाह्यला हवे अन्यथा दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Apr 2022 - 7:42 pm | अमरेंद्र बाहुबली

हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल. हिंदीला विरोध म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तास खतपाणी घालणे?? व्वा. किती ती विद्वत्ता.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 7:55 pm | चेतन सुभाष गुगळे

आधी ती लेखमाला वाचा मग माझी विद्वत्ता तपासा.