सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

( श्रीवल्ली )

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
24 Jan 2022 - 1:21 pm

२०२१ चा डिसेंबर उजाडला आणि तिसऱ्या आठवड्यात पुष्पा: द राईझ तेलगू भाषेत प्रदर्शित झाला अन पहिल्याच दिवशी जगभरातू १७४ कोटींचा दणदणीत गल्ला जमवला ! सामी, श्रीवल्ली सारखी सुपरहिट गाणी गल्लीबोळात, बस रिक्षात, कॉम्पुटर मोबाईल, टीव्ही ओटीटी इ वर जोरजोरात वाजू लागली. याच्या तामिळ, मल्याळम, हिंदी कन्नड आवृत्याही हिट झाल्या ! सगळी कडून सामी, श्रीवल्ली चे प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले. याचे शॉर्ट्स, रील्स, स्टेट्स व्हिडिओं करायच्या नादी तमाम चाहती जनता लागली ! असलं काही केलं नाही तर लोक मागास म्हणून पाहू लागले !

नव्हते ते फक्त मराठीत, अमरावतीच्या पोराने ते मराठीत आणले, रसिकांनी त्याच्यावर पसंतीची मोहोर उमटवली ! अवघ्या दोन आठवड्यात ५ कोटी व्हियूज चा टप्पा पार केला, लाईक्स ३०० सहस्त्र ! आम्ही पण बघता बघता ऐकता ऐकता या गावरान मराठी श्रीवल्ली प्रेमात पडलो, चक्क आहारी गेलो ! स्वप्नात पण गाणं ऐकू येऊ लागलं ! गाण्याची लिरिक भलतीच आवडली ! गाण्याचे शब्द ऐकता ऐकता डोक्यात कधी जाऊन बसले ते कळलंच नाही !

मिपा वाचताना देखील अधूनमधून या गाण्याचं श्रवण सुरु झालं ! अन एक दिवस चक्क आपले लाडके मिपाकर प्रचेतस उर्फ वल्ली स्वप्नात आले !
आदरणीय प्रचू उर्फ श्री वल्ली !

Valli420

अल्लू अर्जुनच्या जागी दाढीधारी वल्ली दिसू लागले ! चौकडीचा हाफ शर्ट घालून, (प्रसंगी हातातला टॉवेल मिरवत) तीच ती टिपिकल स्टेप करत. पुरातन मंदिरं लेण्याच्या पार्श्वभूमीवर. हंपी, वेरूळ, पाटेश्वर, गोंदेश्वर इथली शिल्पं दिसत होती ! चक्क आत्मुस बुवा नाचत गात होते "श्रीवल्ली, तुझी झलक आगळी, श्रीवल्ली " ! आजूबाजूला नाचायला गणेशा, मुक्त विहारि, पैजारबुवा,अभ्याशेठ, टर्मीनेटर (बायको सह) असली नामचीन गँग ! मी देखील मिपावरून उठून दोनचार स्टेप्स करून हौस भागवून मिपावर परतत होतो ! प्रा डॉ आणि सुबोध खरे देखील दूरवर नाचत होते. चित्रगुप्त, बबन तांबे कॅनवास घेऊन रंग सांडत बसले होते. तिथेच शेजारी मिपाचे प्रख्यातकवि पाषाणभेद कुठल्या तरी गाण्याच्या लिरिक्स लिहीत बसले होते ! चौकस२१२ राजे लालपरीच्या रम्य आठवणी काढण्यात रमले होते. विजुभाऊ ध्रांगध्रा (कंटाळा येईपर्यंत) अजून कसं लांबवायचं याचा विचार करत (शिल्लक असलेले) केस उपटत बसले होते ! गोरगावलेकर, भक्ति, नूतन, मालविका, ज्योती ताई, स्मिताकें इ. (पाण्याचे घडे घेऊन) गरबा स्टाईल स्टेप करत नाचत होत्या ! काय नजारा होता ! "श्रीवल्ली, तुझी झलक आगळी, श्रीवल्ली" पाहताना ब्रम्हानंदी टाळी लागली होती !

मग श्री वल्ली मिपा व्हर्जन सुचलं नसतं तर नवलंच ! अमरावतीच्या पोराचं गाणं ऐकत ऐकत आम्हीही आमच्या मर्यादित प्रतिभेला साजेशे शब्द रचले !
वानगी दाखल पुढील एक कडवे रचले (इतरांना वाव म्हणा किंवा आमच्या प्रतिभेच्या मर्यादा म्हणा!)

Valli421

विकेंडला बुलेट काढून तू हिंडतोस,
लेणी मंदिरं बघत तू फिरतोस,

मिपाकराचचं मागणं हे, भेटावा नेहमी तू,
लै भारी, गुण तुझं, आमा सगळ्याना प्यारा तू,

तुझी झलक आगळी, रे वल्ली
कम्मॉन यू अरली ।। धृ ।।
तुझी झलक आगळी, श्रीवल्ली
वाजव तू मुरली ।। धृ ।।

लेण्याबद्दल विचारले तर तू सांगतोस,
नजर चुकवून दर्पणसुंदरीस तू बघतोस,

सगळी मिपागॅंग
आहे तुझ्या मागे,
पण तू वेडा
दर्पणसुंदरी मागे,

ढुंकूनही नाही बघणार
मॉलच्या समोर,
पण मंदिरं बघतो
अभ्यास कर-करून,

जगू नाही शकणार
शिल्पां विना ही,
त्याला फक्त नशा हीच
दर्पणसुंदरी त्याच्या नजरेत
निरखत तीच राहील,

तुझी झलक आगळी, रे वल्ली
कम्मॉन यू अरली ।। धृ ।।
तुझी झलक आगळी, श्रीवल्ली
वाजव तू मुरली ।। धृ ।।

मिपाकरांनो, कसं वाटलं मिपा श्रीवल्ली व्हर्जन ? रचताय ना पुढची कडवी ?

विनोदलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 1:27 pm | कुमार१

मजा आली ...

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2022 - 8:20 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद कुमार१ !

🙏

सौंदाळा's picture

24 Jan 2022 - 1:54 pm | सौंदाळा

खी खी खी
खुसखुशीत लेख, सगळे डोळ्यासमोर उभे राहिले आणि ज्यांना प्रत्यक्षात भेटलो आहे ते सगळे वल्लीच्या आजूबाजूला नाचताना कल्पना करुन अजून हसतोय.

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2022 - 8:23 pm | चौथा कोनाडा

सगळे वल्लीच्या आजूबाजूला नाचताना कल्पना करुन अजून हसतोय.

😍

मज्जाच मज्जा !
एक कट्टा असाही करायला पाहिजे !

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jan 2022 - 2:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

लैच भारी कल्पना,
वल्लींच्या मागे कैलास लेण्यात पाय फरपटवत नाचताना मजा आली,
लेण्यांबद्दल बोलताना मधेच त्यांनी हनुवटीखालून पालथा हात फिरवत ढ्व्यायलॉगही मारला "मै रुकेगा नही साला..." अन पुढच्या मुर्तीची माहिती सांगु लागले.
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2022 - 4:26 pm | चौथा कोनाडा

पैजारबुवा,

लेण्यांबद्दल बोलताना मधेच त्यांनी हनुवटीखालून पालथा हात फिरवत ढ्व्यायलॉगही मारला "मै रुकेगा नही साला..." अन पुढच्या मुर्तीची माहिती सांगु लागले.

😄

सही हैं भिडू ..... !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2022 - 2:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहा मस्त. मजा आली. कविता, आयडी, वर्णन फोटो लै भारी मजा आली. आपला डार्लिंग प्रचु तसा मिपावर फेमसच आहे. शेवटच्या फोटोत इडिटींग करुन प्रचूचा फोटो पाहिजे होता. वरीजनल आयुष्यात पण आपला प्रचु कृष्णापेक्षा कमी नसावा असे वाटते. सुंदर महिला जशा प्रचुकडे बघत...सॉरी, शब्द रचना चुकु लागली वाटतं. गौळणी जशा डोक्यावर दुध घेऊन मथुरेला जात असायचा तसा आपला कान्हा गाडी घेऊन त्यांना अडवत असेल असे वाटले.

मलाही एक काल्पनिक दळन दळणं आलं.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2022 - 8:01 pm | चौथा कोनाडा

शेवटच्या फोटोत इडिटींग करुन प्रचूचा फोटो पाहिजे होता.

अगदी हाच विचार डोक्यात आलेला, पण ग्रफिक्स एडिटींग मध्ये आमचं डोकं चालत नसल्याने सोडून द्यावं लागलं !

वरीजनल आयुष्यात पण आपला प्रचु कृष्णापेक्षा कमी नसावा असे वाटते. सुंदर महिला जशा प्रचुकडे बघत...सॉरी, शब्द रचना चुकु लागली वाटतं. गौळणी जशा डोक्यावर दुध घेऊन मथुरेला जात असायचा तसा आपला कान्हा गाडी घेऊन त्यांना अडवत असेल असे वाटले.

😂

एक नंबर प्रा डॉ साहेब !
येऊ द्या पुढचं दळण !

विजुभाऊ's picture

24 Jan 2022 - 3:03 pm | विजुभाऊ

ख्या ख्या ख्या
लै भारी.
बिरुटे गुरुजीना कुठल्यातरी बॅचला काहितरी फळ्यावर शिकवताना दाखवा हो.
गेली दोन वर्षे फळ्याला डस्टर आणि खडूचा स्पर्ष नाही झाला त्यांच्या

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा

बिरुटे गुरुजीना कुठल्यातरी बॅचला काहितरी फळ्यावर शिकवताना दाखवा हो.
गेली दोन वर्षे फळ्याला डस्टर आणि खडूचा स्पर्ष नाही झाला त्यांच्या

😲

विजुभाऊ, हा .... हा .... हा .... !

मित्रहो's picture

24 Jan 2022 - 3:34 pm | मित्रहो

लयच भारी कल्पना आणि मस्त शब्द
हे श्रीवल्ली व्हर्जन आवडलं

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2022 - 5:26 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद _/\_ मित्रहो !

टर्मीनेटर's picture

24 Jan 2022 - 3:47 pm | टर्मीनेटर

नशीब माझं आणि अभ्याचं 😀 😀 😀
स्वप्नातसुद्धा पाठदुखीने त्रस्त असलेल्या अभ्या.. आणि मला (आमच्यावरच्या प्रेमापोटी) नागीन डान्स करायला न लावता ‘श्रीवल्ल्ली’ सारख्या संथ गाण्यावरच्या सोप्या स्टेप्स करायला लावल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत 🙏 😀

बाकी खरोखरचा असा धिंगाणा घालायला पण नक्कीच मजा येईल… घ्या जरा मनावर… 👍

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2022 - 6:03 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

25 Jan 2022 - 6:07 pm | चौथा कोनाडा

नागीन डान्स करायला न लावता ‘श्रीवल्ल्ली’ सारख्या संथ गाण्यावरच्या सोप्या स्टेप्स करायला लावल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत

😂

खरंच असा धिंगाणा कट्टा करायला ज्याम धम्म्माल येईल…नुसता कल्ला …
धन्यु टर्मीनेटर

😎

Bhakti's picture

24 Jan 2022 - 5:27 pm | Bhakti

हा हा
भारीच मिपा व्हर्जन!
घरचे अलरेडी पकले आहेत,हे गाणं सतत सध्या ऐकतेय.
गरबा :) :)

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2022 - 8:26 pm | चौथा कोनाडा

घरचे अलरेडी पकले आहेत, हे गाणं सतत सध्या ऐकतेय.

मी ही कंटाळेन लवकरच. हिंदीपेक्षा ओरिजनल तेलगू भारी वाटतेय. मराठी मात्र युथफुल्ल लोभस आहे !

गरबा :) :)

पुढं-मागं कट्टा झाल्यास हे स्किल्स दाखवून द्यावे लागतील !

😀

प्रचेतस's picture

24 Jan 2022 - 6:11 pm | प्रचेतस

कहर आहे सरजी __/\__

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2022 - 5:57 pm | चौथा कोनाडा

धन्स मालक !

🌝

ती वल्ली डॅन्स स्टेप्सची प्रॅक्टीस सुरु ठेवा !

प्रचेतस's picture

25 Jan 2022 - 7:44 pm | प्रचेतस

=))

गोरगावलेकर's picture

25 Jan 2022 - 6:50 am | गोरगावलेकर

लेखात आमचाही नामोल्लेख वाचून गंमत वाटली.

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2022 - 8:29 pm | चौथा कोनाडा

😊

धन्यवाद गोरगावलेकर.

बबन ताम्बे's picture

25 Jan 2022 - 5:26 pm | बबन ताम्बे

प्रवासवर्णने लिहिता लिहिता तुमची गाडी इकडे वल्ली , सॉरी , वळली तर !! व्यक्तीचित्र चांगलेच रंगवले आहे. आमचाही उल्लेख केलात हे वाचून डोळे वल्ले झाले :-)

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2022 - 12:29 pm | चौथा कोनाडा

गाडी वल्ली, डोळे वल्ले झाले .... भारी पंचेस .... आवडले !

🙂

धन्यवाद बबन ताम्बे _/\_

सुखी's picture

26 Jan 2022 - 10:59 pm | सुखी

ख्या ख्या ख्या

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2022 - 12:32 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

🤓

धन्यू सुखी _/\_

nemake_va_mojake's picture

29 Jan 2022 - 8:27 pm | nemake_va_mojake

खल्लास!

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2022 - 8:00 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद नेवामो _/\_

😊

मुक्त विहारि's picture

29 Jan 2022 - 8:52 pm | मुक्त विहारि

एकदम खुसखुशीत

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2022 - 8:01 pm | चौथा कोनाडा

😍

_/\_ धन्यवाद मुवि साहेब !

श्रीरंग_जोशी's picture

31 Jan 2022 - 8:53 am | श्रीरंग_जोशी

पुष्पा चित्रपट व श्रीवल्ली गाणं अजुन पाहिलं नसलं तरी हा लेख वाचताना काल्पनिक प्रसंगाची कल्पना करुन धमाल मजा वाटली.
या लेखामुळेच मराठीतले श्रीवल्ली गाणे पाहायला मिळाले. व नंतर युट्युबच्या सौजन्याने कलाकार जोडप्याची एबीपी माझावरील खालील मुलाखत पाहायला मिळाली.
माझ्या गावाकडचे कलाकार असल्याने अधिकच समाधान वाटले.

चौथा कोनाडा's picture

1 Feb 2022 - 5:19 pm | चौथा कोनाडा

मस्त आहे मुलाखत !
मुलाखतकर्तीने शेवटी गिफ्टस, शॉपींग कुणाला जास्त आवडते असे तिपिकल शहरी प्रश्न विचारले, ऐकून हसू आले !
त्या दोघांचाही गोड चेहरा आणि गावाकडचा साधेपणा भुरळ घालणारा आहे !
....... आणि पोराचा आवाज गाण्यात अतिशय गोड लागलाय !
लोकांनी हे गाणं चांगलंच डोक्यावर घेतलं आहे !

इनस्पायर बाय पुष्पा

भक्ती नाम सुन के
मंदिर का भजन समजा क्या?
शक्ती है आपन शक्ती

😉

चौथा कोनाडा's picture

3 Feb 2022 - 11:48 am | चौथा कोनाडा

भक्ती ....
शक्ती है आपन शक्ती ....

😆

टर्मीनेटर's picture

16 Feb 2022 - 3:53 pm | टर्मीनेटर

आत्ता युट्युब वर हा व्हिडीओ पहिला आणि ह्या धाग्याची आठवण आली... भाऊ कदम रॉक्स 😀

https://youtu.be/Napbi3tNcTY

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2022 - 5:05 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

😂

भारी पंचेस आहेत .... एक से एक .... टोटल धम्माल !