परिकथेतील राजकुमारी (उत्तरार्ध)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
5 Dec 2008 - 2:09 pm

"आकाश नाउ नो बडी इज अराउंड, यु कॅन कम इन टु माय रुम."
मेसेज वाचला आणी तो सुन्नच झाला. कोण हा आकाश ? येव्ह्ड्या रात्री त्याला रुम मध्ये बोलवण्याचे कारणच काय ? पण ह्या सगळ्याची उत्तरे मिळणे अवघड बनले होते कारण ती आत त्याल टाळायला लागली होती, मेसेजेस आणी फोन तर बंदच पडले होते. तो तिला भेटायचा खूप प्रयत्न करत होता पण दरवेळी ती त्याला टाळत होती. आता मात्र त्याचा धीर खचला, आणी एक दिवस तो सरळ तिच्या कॉलेज मध्ये तिच्या समोर जाउन उभा राहीला. तिच्याकडे बघुन मात्र त्याचा राग क्षणात ओसरला, अरे हि तिच आहे ? का आणी कोण ? डोळ्याखाली काळी वर्तुळे , गालावरचे गुलाब नाहिसे झालेले, ओठ सुकलेला हा चेहरा आपल्या राजकुमारीचा आहे ? काय घडलय असे ? कुठला शाप लागलय हिला ? त्याच्या चेहर्‍यावर अनेक प्रश्न दिसयला लागले. त्याला बघितले आणी तिला एकदम गहिवरुन आले, तोंडातुन शब्दच फुटेनात तिच्या. "चल तुझ्या रूमवर बसुन बोलु." तो. "नको, मला लेक्चर आहे." ती. "लेक्चर आहे का आता त्या रुम वर फक्ता आकाश ला यायला परवानगी आहे?" त्याचा कुच्छीत प्रश्न. तिच्या नजरेत जणु जाळ्यात अडकलेल्या एखाद्या निष्पाप हरिणीची व्याकुळता दाटुन आली.तिने झटकन त्याच्या हाताला धरले, जणु अजुन जखमा नकोत असेच काहिसे तिल सुचवायचे होते. "चल जाउ रुमवर, खरे तर मला त्या रुमवर एक क्षण सुद्धा थांबायला नको वाटते." ती. रुमवर येताच त्यानी आपला सगळा संताप तिच्यावर फेकला, काय वाटेल ते आरोप करुन झाल्यावर मग तो थोडा शांत झाला. "झाले तुझे बोलुन ? मी अशीच आहे रे, मुलांना खेळवणारी, रोज नविन मित्र शोधणारी. आता तुला सगळे कळालेच आहे तर बरेच झाले. मला विसर आणी परत मला त्रास देउ नकोस." ती. ती अशी नाहिये हे त्याला ही चांगलेच ठाउक होते. त्यानी तिचे दोन्हि हात हातात घेतले आणी तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला "सोना, मला सांगणार नाहिस काय झाले आहे ते ? अग वाटेल ते ऐकायची तयारी आहे माझी. पण तु बोल ग, मला माहितिये तु काहितरी लपवत आहेस. बोल तुल माझी शप्पथ आहे." तो गदगदलेल्या सुरात बोलला. येव्हडे ऐकले आणी मग मात्र तिचा बांध फुटला, त्याच्या गळ्यात पडुन ति ओक्साबोक्शी रडायला लागली, तिचा आवेग शांत होइपर्यंत तो तिच्या केसात हात फिरवत राहिला. "मी नाहिरे फसवले तुला, खरच नाही. पण आता मी ति तुझी पहिली सोना नाही रहिले रे, फसवले रे त्यांनी मला, तुझ्या सोनाला पार वेश्या बनवुन टाकले." ती बोलत होती आणी तो सुन्न होउन ऐकत होता.
बहिणी सारख्या तिच्या रुम पार्टनर्स नी तिचा विश्वासघात केला होता. एका रुम पार्टनर चा वाढदिवस साजरा करायला म्हणुन तिच्या दोन्ही रुम पार्टनर, त्यांचे ३ मित्र असे त्यांच्या फ्लॅट मध्ये दाखल झाले. केक बरोबर घेतलेल्या थम्प्सप मध्ये भवतेक त्यांनी काहितरी मिसळले असावे, त्यानंतर आलेल्या गुंगीतुन ति जेव्हा जागी झाली तेव्हा अंगावर फक्त ओरखाडे आणी सिगारेट चे चटके ह्याशिवाय दुसरे काहिच न्हवते ! चवताळुन पोलिस स्टेशनला निघालेली ती, आपले त्या आवस्थेत काढलेले फोटो पाहुन क्षणात हतबद्ध झाली. आणी मग रोज त्या पाशवी अत्याचारांचा खेळ चालु झाला होता. हे सगळे ऐकताना क्षणाक्षणाला त्याच्या मेंदुत संतापाचे स्फोट होत होते, पण तोही तिच्या सारखाच हतबद्ध होता, तिचे फोटो जोवर त्या मुलांकडे होते तोवर काहिहि करणे धोक्याचे होते. दुसरे कुठले 'कॉंटेक्ट' वापरायला तिचा ठाम विरोध होता, खरे तर तिचा आत कोणावर विश्वासच उरला न्हवता. घरी आधिच नाजुक असलेली परिस्थीती तिला घरचा आधार हि घेउ देत न्हवती. तशी राजकुमारी खरच राजकुमारी होती, वडिल दिल्लीच्या राजकारणात मोठी भुमिका बजावत होतेच पण पार्टि फंडाला हि चांगलाच हातभार लावत होते. ह्या वर्षी भवतेक निवडणुकीला उभे हि राहणार होते. तिला सगळ्यात जास्ती काळजी होती ति हिच. हे प्रकरण जर उघडकिला आले तर वडिलांची इतक्या वर्षाची मेहनत तर फुकट जाणार होतिच पण तिच्या हि अब्रुचे धिंडवडे निघणार होते. पण ह्या सगळ्यातुन काहितरी मार्ग काढणे भागच होते. शेवटि महिनाभरासाठी तिने आजारपणाचे ढोंग करुन घरी परत जावे आणी निवडणुका होइ पर्यंत वाट पहावी असे ठरले. पण तिच्या नशिबात तेहि सुख न्हवते, गेल्या गेल्या चारच दिवसातच तिला धमक्यांचे फोन यायला लागले, लवकरात लवकर परत यायचे हुकुम व्हायला लागले. आता मात्र तिचा धीर खचला, पण आता ति एकटी न्हवती. तिने ताबडतोब त्याला फोन केला, तो ही हाततली सर्व कामे सोडुन तिच्या मदतीला धावला. ह्यावेळी मात्र त्यानी तिचे काही एक ऐकुन न घेता तिच्या वडिलांची भेट घेतली, त्यांच्या कानावर सर्व काही घातले. तिचे वडिल हि हे सर्व ऐकुन सुन्न झाले, पण लवकरच त्यांनी स्वत:ला सावरले. त्याचे शतश: आभार मानुन तिचे वडिल पुढच्या "तयारीला" लागले. कोणाला फोन करायचा आणी हे प्रकरण कसे हाताळायचे हे त्यांना चांगलेच माहित होते. थोड्याश्या प्रयत्नां नंतर तिची ह्या प्रकरणातुन व्यवस्थीत सुटका झाली. पण बसलेल्या मानसीक धक्क्यातुन सावरायला मात्र तिला फार वेळ लागला, घडलेले वाईट प्रसंग अजुनही मनातुन जात न्हवते, पुसट होत चाललेले सिगारेटच्या चटक्यांचे डाग अजुनही रात्रि बेरात्री जागे करत होते. अशावेळी तो मात्र भक्कमपणे तिच्या पाठिशी उभा राहिला.ह्या धक्क्यातुन कसेतरी सावरलेले तिचे वडिल आता मात्र तिला पुन्हा परत पाठवायल तयार न्हवते. तो मात्र ठाम पणानी म्हणाला "पाठवा परत तिला काका, तिचे हि मन रमेल आणी दुख: थोडे हलके होइल." "अहो पण ह्यावेळी तुम्ही मदतिला आलात म्हणुन, दरवेळी कोण येणार आहे?" वडिलांचा ठाम विरोध. "असे प्रत्येक वेळीच घडते असे नाहि, आणी ह्यावेळिच का ? मी तर आयुष्यभर मदतीला धावुन यायला तयार आहे. तुमची हरकत नसेल तर." तो हळुवार आवाजात म्हणाला. "काय बोलताय काय तुम्ही? हे येव्हडे सगळे माहित असुन सुद्धा ?" काका अविश्वासानी म्हणाले. "होय काका, आणी हे फ़ार भयंकर होते हे मला हि मान्य आहे, पण न केलेल्या चुकीची शिक्षा तिला अजुन किती भोगायला लागणार ? मी तिच्या मनाच्या सुंदरतेवर प्रेम केले, शरीरावर नाही. आणी ह्या माझ्या निर्णयाला माझ्या घरच्यांची सुद्धा तेव्हड्याच मोकळ्या मनाने संमती आहे." गेले काहि दिवस एका ओझ्याखाली वावरणार्‍या तिच्या वडिलांसाठी तो जणु दुसरा देवदुतच बनुन आला होता. पण तिच्यासाठी मात्र तो होता परिकथेतला राजकुमार, तिच्या शापातुन तिला मुक्त करणारा आणी तिच्या आयुष्यात सुखाचे इंद्रधनुष्य फुलवणारा !!

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

5 Dec 2008 - 2:26 pm | अनिल हटेला

क्या बात है !!

सही रे राजकुमारा !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

टारझन's picture

5 Dec 2008 - 2:28 pm | टारझन

परिकथेतल्या राजकुमारा , गेले २ आठवडे नुसता गांधीवाद आणि आतंकवाद , आतंकवादी कोणाला म्हणावे, आतंकवाद्यांना कसे सुधरवावे .. आणिक कैच्याकै ..
आता तर ते धागे वाचायचा कंटाळा आलेला. पण तुझी कथा भयंकर आवडली.
इतक्या दिवसांनी नविन टेस्ट दिल्याबद्दल "हॉर्डिक ऑबार "
अजुनही येउन देत अशाच कथा !!! "त्या" ने दाखवलेला संयम जबरा होता यार ... मी तर त्या बदमाशांना पोलिस कारवाई नंतर पण नसता सोडला. असो .. तुझा लिहीण्याचा दृष्टीकोण ..

चियर्स

- टारझन

मिंटी's picture

5 Dec 2008 - 2:31 pm | मिंटी

एकदम सहमत टार्‍याशी............

खरच खुप सुंदर कथा आहे....

धमाल मुलगा's picture

5 Dec 2008 - 2:34 pm | धमाल मुलगा

माझी प्रतिक्रिया डोक्यात तयार झाल्याझाल्या त्यानं ती चोरली!!!! :)

असो,
सही आहे रे भिडू!
छान लिहिलंयस. आणि पहिल्या भागातलं ते तीचं वर्णन.....खल्लास! एकदम आवडून गेलं रे भावा :)

येऊदे अजुन

पु.ले.शु.

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 2:34 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

सिद्धू's picture

15 Dec 2008 - 10:03 pm | सिद्धू

मित्रा....लय भारी....एकदमच झकास स्टोरी....

पहिल्या भागातलं ते तीचं वर्णन.....खल्लास! एकदम आवडून गेलं रे भावा

सहमत...१०० टक्के....

स्वप्निल..'s picture

16 Dec 2008 - 4:47 am | स्वप्निल..

राजकुमारा,

तुझी परीकथा मस्तच रे!! गांधीवादातुन सुटलो....अजुन येउ दे..

स्वप्निल

मृगनयनी's picture

16 Dec 2008 - 10:53 am | मृगनयनी

प.रा...... खूप सुन्दर !!!

राजकुमारीला जणु देवदूत भेटला....

एका घाणेरड्या "ट्रॅजिडीवर" देवदूताने विजय मिळवला......
आणि राजकुमारीला वाचवले...

समाजातले हे नराधम, मानवतेला कलन्क आहेत... त्यान्ना नष्ट केलेच पाहिजे...

:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Nov 2014 - 10:11 am | ज्ञानोबाचे पैजार

हे महाशय आजकाल कुठे दडी मारुन बसले आहेत कोण जाणे?

पैजारबुवा,

एस's picture

8 Nov 2014 - 10:18 am | एस

पराचा धागा पाहून क्षणभर उडालो. मग लक्षात आलं हा जुनाच धागा कुणीतरी वर काढला असावा. असो.

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2014 - 10:23 pm | चौथा कोनाडा

सुंदर कथा ! धन्यवाद मित्रानो, धागा वर काढल्या बद्दल !

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2014 - 10:23 pm | चौथा कोनाडा

सुंदर कथा ! धन्यवाद मित्रानो, धागा वर काढल्या बद्दल !