व्यायाम हराम आहे!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
5 Dec 2008 - 11:20 am

सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला.
"लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?''
मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना!
"बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही. वजन वाढेल नाहीतर काय?" बायकोनं अगदी 'असामी'तल्या 'मी' अर्थात धोंडोपंत जोशींच्या बायकोची गादी चालवली.
माझ्या प्रकृतीला नावं ठेवणार्‍या या मित्रानं फार काही मोठा तीर मारला नव्हता.
`लेका, आठवीत असताना तू शर्टाच्या बाहीला शेंबूड पुसायचास आणि गोष्ट सांगायला उभा राहिलास, की दर मिनिटात तीनदा चड्डी सावरायचास,' असं मी त्याला त्याच्या तरुण सेक्रेटरिणीसमोर सांगितलं असतं तर त्याची तिच्यासमोरच चड्डी नसती सुटली? पण सभ्यता सोडून बोलण्याचा अधिकार डॉक्‍टर किंवा वकिलालाच असतो. त्यामुळं मी काही पातळी सोडली नाही.
"हो...थोडं वजन वाढलंय खरं!" मी प्रामाणिकपणानं मान हलवली.
"थोडं? अरे सुजलाहेस सगळीकडून!"अभय एवढ्या जोरात उसळला की मला माझी पोटाची, छातीची, दंडांची, मांड्यांची, पोटर्‍यांची चरबी लोंबते आहे असा भास होऊन त्या 'सुमो' पैलवानाच्या जागी स्वतःचाच चेहरा दिसायला लागला.
"जिने चढताना सुद्धा धाप लागत असेल लेका!"
त्याचा हा हल्ला मात्र मी परतवण्याचा निर्धार केला."अभ्या, डॉक्‍टर झालाहेस म्हणून काही पण बोलशील? काही पण धाप बिप लागत नाही मला! मी ट्रेकिंगला सुद्धा जातो. अगदी साल्हेर, कळसूबाईच्या! तुला वाटतंय तशी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये.""तर तर! गेले ते दिवस! आता वर्षातून एकदा त्या 'ड्यूक्‍स नोज'ला जाता आणि मग अंग धरलंय म्हणून चार दिवस रजा टाकता. मला माहितेय तुमचं 'रेग्युलर ट्रेकिंग'!" बायको नावाची बाई ही नवर्‍याची अब्रू चारचौघांत काढण्यासाठीच असते, या तत्त्वावर हिनं शिक्कामोर्तब केलं.
"तेच म्हणायचंय मला! ये, काट्यावर ये बघू!" अभयनं वजनकाटा पुढे केला. माझ्या अंगावर काटा आला.
"८४ किलो! अरे, काय वजन की काय? आता माझं ऐकायचं. चाळिशी तरी गाठायची आहे ना तुला?" अभयनं निर्वाणीचा इशारा दिला.
पूर्वीच्या बायका नवर्‍याविषयी असा अपशकुनी उल्लेख ऐकला, की कसनुशा होत असत. नवर्‍यानं आपल्या मरणाविषयी उल्लेख केला, तर हातानं त्याचं तोंड बंद करीत. वर आपलं आयुष्य त्याला लाभो, अशी इच्छा व्यक्त करत, असं आमचं मराठी 'सौभाग्य वस्तू भांडार'छाप चित्रपटविषयक ज्ञान आम्हाला सांगतं.आमच्या बायकोनं मात्र, "बघा! हेच सांगत होते ना तुम्हाला?" असं म्हणून मित्रालाच आणखी फूस दिली.
"मी डाएटचा कोर्स देतो तुला. उद्यापासून व्यायाम सुरू कर. किमान दहा किलो वजन कमी केलं पाहिजे तुला." अभयनं फर्मान सोडलं.
कागदावर फराफरा काहीतरी खरडलं. सेक्रेटरीला बोलावून कुठल्या तरी डाएट आणि खादाडी, आरोग्यावरच्या दोन-तीन लेखांच्या प्रिंट आऊट दिल्या. एवढं करून त्याचं समाधान झालं नसावं. मला आणखी काही तोंडी सल्ले दिले. वर, त्याची फीदेखील घेतली. सर्दी-पडशावरचं औषध घ्यायला गेलेला मी मित्राच्या या अमूल्य आणि अनपेक्षित सल्लादानाच्या ओझ्यानं पार वाकून गेलो.
घरी गेल्यापासून बायकोची भुणभुण सुरू झाली... "उद्यापासून व्यायाम सुरू करा. सोनारानंच कान टोचलेत ना आता?""सोनार नाही, डॉक्‍टर होता त." असा माफक विनोद मी करून पाहिला, पण तो तिच्या कानावरून गेला. मलाही एक नवी ऊर्मी आली. पहाटे उठून चालायला जायचं आणि महिनाभरात वजन कमी करून त्या डॉक्‍टरड्याच्या तोंडावर कमी झालेल्या वजनाचं तिकीट फेकायचं, अशी भीष्मप्रतिज्ञा करून टाकली.
दुसर्‍या दिवशी पहाटे पाचचा गजर लावला. झोपेतच तो बंद करून पुन्हा झोपलो. साडेपाचला पुन्हा गजर वाजला. बंद झालेला गजर पुन्हा कसा झाला, असा प्रश्‍न पडेपर्यंत लक्षात आलं, की बायकोनं खबरदारी म्हणून दुसर्‍या मोबाईलवर गजर लावून ठेवला होता. तोही बंद करून पुन्हा मुरगुशी मारली. पाच वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा गजरचा ठणाणा झाला. आता मात्र पुरता वैतागलो. घरात तिसरा मोबाईल कुठून आला, असा शोध घेऊ लागल्यावर समजलं, की हा पहिल्याच मोबाईलवरचा "रिपीट अलार्म' होता. आता उठणं भागच होतं. शिवाय काल रात्री केलेला दृढसंकल्पही डोळ्यापुढे काजव्यासारखा चमकला. बर्‍याच महिन्यांपूर्वी अशाच एका व्यायामाच्या संकल्पाच्या बेसावध क्षणी घेतलेली ट्रॅक पॅंट धुंडाळून काढली. खसाखसा दात घासून, चहाबिहा न पिताच फिरायला बाहेर पडलो. माझ्या कानाशी तीनदा गजर करणारी बायको स्वतः मात्र कुंभकर्णाच्या अवस्थेत होती.
बाहेर पडल्यावर कुठं जायचं ते कळेना। थंडीतलीच धुक्‍याची ती पहाट बघण्याची माझी ही ३४ वर्षांच्या आयुष्यातली दुसरी की तिसरी वेळ होती. पाच वर्षांचा असताना आजोळच्या जत्रेला जाण्यासाठी आईनं पहाटे उठवलं होतं. त्यानंतर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मुहूर्तच आठचा असल्यानं आणि लग्नाला मी उपस्थित राहणं अनिवार्य असल्यामुळं पहाटे उठलो होतो. त्यानंतर थेट आजच! बाकी दिवाळीचा ब्राह्ममुहूर्तही मी कधी पाहिला नव्हता. साक्षात बायकोच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी सिझेरियन सकाळी सात वाजता करण्याचा डॉक्‍टरांचा अट्टाहासही मी मोडून काढला होता. सकाळी सातच्या ऐवजी त्यांनी थेट संध्याकाळी सातची वेळ तेव्हा केली होती...सांगायचा उद्देश हा, की सकाळी बाहेर पडलो, तेव्हा एवढी थंडी आणि धुकं असेल, याची कल्पना नव्हती. उठलोच आहोत तर पर्वतीला जावं, असा निश्‍चय केला. लहानपणी गावी राहायचो, तेव्हा पहाटे बायका उठून घराभोवती आणि वाटेवर सडा-रांगोळी करायच्या. त्यावरून चालताना मंद सुगंधाचा आनंद घेता यायचा. पर्वतीच्या वाटेवरही ही परंपरा पाळली जात होती, पण वेगळ्या अर्थानं. तिथे झोपड्यांतल्या पोरासोरांच्या मलमूत्राचा सडा घातलेला होता आणि त्याच्या उग्र दर्पाने नाकातले केसही करपत होते.कसाबसा जीव आणि नाक मुठीत धरून पर्वती पायथ्यापाशी पोचलो. मोठ्या उत्साहानं चढायला सुरुवात केली. पाचवी-सहावीतल्या विज्ञानातल्या उदाहरणांप्रमाणे, सुरुवातीला जास्त उत्साह, नंतर कमी, नंतर आणखी कमी आणि मग शेवटी गलितगात्र अवस्था, या क्रमानं त्या पायर्‍यांवर चढताना अनुभव आला. पहिल्या पंधरा-वीस पायर्‍यांतच आपल्या बापाला हे झेपायचं नाही, हे लक्षात आलं. तरीही निर्धारानं अर्धी पर्वती चढलोच. तिथे बराच वेळ मुक्काम ठोकून, नव्या उमेदीनं उरलेला टप्पा गाठायचा निश्‍चय वारंवार केला, पण मनानं उभारी घेतली, तरी शरीरानं हाय खाल्ली. थोरल्या माधवरावांना तिथूनच दंडवत घालून परतीच्या वाटेला लागलो.
घरी आलो, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती, पण सभ्यतेच्या मर्यादा आड आल्या.हा प्रकार रोजच व्हायला लागल्यावर पर्वतीचा नाद सोडून द्यावा लागला. एकतर रोजची बारा-चौदा तास झोपायची सोय होत नव्हती. त्यातून पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी उत्साहानं अर्ध्या पायर्‍या चढून गेलो, पण दुसर्‍या दिवशी पाव, तिसर्‍या दिवशी आधपाव, चौथ्या दिवशी सात पायर्‍या, असं करत करत दोन ते तीन पायर्‍यांवरच मी गार व्हायची वेळ आली होती. मग पर्वती रद्द झाली. तरीही, व्यायामाची उमेद मी सोडली नव्हती. कुठं तरी जिम लावावी, असा विचार केला. जवळपास कुठेही सोयीची (अर्थात, कमी त्रासाची) जिम मिळेना. ज्ञानप्रबोधिनीत जायला लागलो. एका मित्रालाही वजन कमी करायची खुमखुमी आली होती.
तिथला इन्स्ट्रक्‍टर नेमका कुठल्या तरी जुन्या ओळखीचा भेटला. आम्ही आलोय म्हटल्यावर त्याच्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं असावं बहुधा. एखादा खाटिक नवा बकरा मिळाल्यावर जेवढा खूश होईल, तेवढाच आनंद त्याला झाला. आम्हाला कसली कसली वजनं उचलायला लावून, कुठली कुठली चक्रं फिरवायला लावून, स्वतः जिमभर उंडारत फिरायचा. बरं, मुला-मुलींची जिमही वेगवेगळी होती. त्यामुळं निदान तो तरी विरंगुळा होईल, हा हेतूही फोल ठरला. सुजलेलं अंग कमी होण्याऐवजी कष्टानं अंगावरच सूज चढलेय, हे लक्षात आल्यावर जिमचा उत्साहदेखील आठ दिवसांत मावळला. तिथले पैसेही फुकट गेले.
"अहो, पोहायला तरी जा आता!'' बायकोनं शेवटचं अस्त्र सोडलं.मग मला तीन-चार वर्षांपूर्वी पंधरा-वीस दिवस कष्ट करून पोहायला शिकल्याची आठवण झाली. तसं, विहिरीत जीव वाचविण्याइतपतच पोहता येत होतं मला, पण एवढ्यात हार पत्करून चालणार नव्हतं. शहरातल्या तमाम स्विमिंग पूलवर जाऊन चौकशी केली. कुणाची वेळ जमणारी नव्हती, तर कुणाची फी अवाच्या सव्वा होती. कुणाचा टॅंकच खराब होता, तर कुणाकडे ऍडमिशन फुल होती. कुणाकडे सध्या जीवरक्षक नव्हते. उगाच टॅंकच्या व्यवस्थापकांचा जीव धोक्‍यात कशाला घाला, असा विचार केला.एस.पी.च्या टॅंकची वेळ जमून आली. तरीही, सकाळी सहाला उठण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार होतं. कारण त्यानंतरची कुठलीच वेळ माझ्या सोयीची नव्हती. ऍडमिशन घेऊन टाकली आणि दुसर्‍या दिवशी जामानिमा करून टॅंकवर धडकलो. सकाळी सहाची गार हवा, वारा आणि बर्फासारखं गार पाणी...आहाहा! काय आल्हाददायक अनुभव हो! अंगाचं नुसतं लाकूड झालं होतं. त्याशिवाय, स्विमिंग टॅंकशी चार वर्षांनी संबंध आलेला...त्यामुळं दर पाच फुटांवर होणारी दमछाक...! काठाकाठानंच पोहलो, तरी पुरेवाट झाली. घरी आल्यानंतर दोन दिवस उठता-बसता नाकी नऊ येत होते. एकदा झोपल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर काही झालो नाही! कुणाकडे वळून बघायचं, तरी मानेला प्रचंड त्रास द्यावा लागत होता.
माझे व्यायामाचे असे अनेकविध चक्षुचमत्कारिक आणि अंगविक्षेपित प्रयोग फसले होते. त्यामुळं सगळे तूर्त थांबवले होते. एके दिवशी सहज टीव्ही बघत बसलो होतो. बाबा रामदेवांचं सप्रयोग व्याख्यान सुरू होतं. त्यांनी प्राणायामाचं महत्त्व सांगितलं. श्‍वास रोखून धरायचा आणि निःश्‍वास टाकण्याचं तंत्र त्यांनी सांगितलं. मला वाटलं, अरे, आपल्याला एवढे दिवस हे का नाही सुचलं?...हिंदी चित्रपटांतले घरच्यांसोबत न बघण्यासारखे अनेक प्रसंग आपण वर्षानुवर्षं श्‍वास रोखून बघत आलो आहोत (आणि नंतर काहीच हाती न पडल्यानं त्याबद्दल पस्तावलोही आहोत!) तसंच, सुटकेचा निःश्‍वास तर प्रत्येक संकटानंतर टाकला आहे! हे आपल्याला जमण्यात काहीच अडचण नाही!!मग त्या दिवसापासून मी बाबा रामदेवांचा परमभक्त झालो. वर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आता श्‍वास रोखून ठेवणं आणि उच्छ्वास टाकणं मला सहजरीत्या जमू लागलं आहे...जय बाबा रामदेव की!
---
(`मनोगत'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख त्यांच्या (आणि मिपा संचालकांच्या) परवानगीने इथे पुनःप्रकाशित करीत आहे.)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ऍडीजोशी's picture

5 Dec 2008 - 1:25 pm | ऍडीजोशी (not verified)

आपण दोघे भाऊ भाऊ :)

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 2:57 pm | विनायक प्रभू

मी असे मनस्ताप नसलेले कॅलरी जाळणारे काही व्यायाम सांगु का?
मग म्हणाल जय विप्र बाबा की
व्यायाम इन्सट्र्क्टर
विप्र.

धमाल मुलगा's picture

5 Dec 2008 - 3:13 pm | धमाल मुलगा

=)) शॉल्लेट्ट!
आणि हे व्यायाम मानसिक ताणही दूर करतात म्हणे!

अभिजीत,
नेहमीप्रमाणे कुरकुरीत लेख!
बाकी, आमचा आणि वजन कमी करण्याचा येत्याच काय पुढच्या सत्तावीस जन्मातही संबंध येईलसं दिसत नाही..

ऍडीजोशी's picture

5 Dec 2008 - 5:57 pm | ऍडीजोशी (not verified)

तू, मी, डोणेंड्र महाराज ह्यांना वजन वाढवायची गरज आहे. आपण वजन-मालेतले निच्चतम मणी आहोत :)

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 5:59 pm | विनायक प्रभू

त्याचे पण लै भारी व्यायाम आहेत.
केंव्हाही कळवा.

धमाल मुलगा's picture

5 Dec 2008 - 6:01 pm | धमाल मुलगा

उद्या बोलुया का ह्याविषयी?
आम्ही म्हणजे सालं, सोनारानं सोनं तराजुत तोलताना वेळेला वजन सापडलं नाही तर आम्हाला बसवावं असले 'धिप्पाड'
अंमळ वजन वाढवायचे मार्ग सुचवा की

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 6:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण ते व्यायाम ऍडीजोशी यांना चालतील का? ;-)

बाकी लेखतर नेहेमीप्रमाणे कुरकुरीत आहेच. मजा आली.

(जिमची रिसीट बाळगणारी) अदिती

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2008 - 7:16 pm | प्रभाकर पेठकर

८४ किलो!
हे वजन जास्त आहे?
अरे एवढ्या वजनापर्यंत मी 'रोडावलो' तर सगळ्या मिपा सदस्यांना, ओली-सुकी, मागाल ती पार्टी देईन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

लिखाळ's picture

5 Dec 2008 - 7:19 pm | लिखाळ

मस्त :)
छान लेख..
तसेही मला सुद्धा धमु प्रमाणेच वजन वाढवायची गरज आहे.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 7:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तसेही मला सुद्धा धमु प्रमाणेच वजन वाढवायची गरज आहे.
हे प्रमाणपत्र घरून येऊ देत! ;-)

स्वानन्द's picture

5 Dec 2008 - 8:10 pm | स्वानन्द

लेख तर मस्तच जमलाय! फक्त एक शंका...
>>थोरल्या माधवरावांना तिथूनच दंडवत घालून परतीच्या वाटेला लागलो
तुम्हाला नानासाहेब पेशव्यांना तर नमस्कार नव्हता ना करायचा. बाकी थोरल्या माधवरावांना केला तरी मला काही प्रौब्लेम नाही बरं! :>

आपला अभिजित's picture

5 Dec 2008 - 8:28 pm | आपला अभिजित

दोघांनाही एकाच वेळी करायला मला काही प्रॉब्लेम नाही!

- अभिजित.
(माझा देवावर विश्वास आहे, पण त्याचा माझ्यावर नाही! (|: )

आपला अभिजित's picture

5 Dec 2008 - 8:08 pm | आपला अभिजित

बराचसा सत्य घटनांवर आधारित आणि थोडासा कल्पनाविलास आहे.

बाकी, व्यायामाचे नवनवे प्रयोग अद्याप सुरूच आहेत.
हा लेख लिहून झाल्यानंतरही नव्या जोमाने गेल्या महिन्यात स्विमिंग सुरू करण्यासाठी ४०० रुपये भरले.
पहिल्या दिवशी गेल्यानंतर पुढचे ४ दिवस अंग दुखतंय म्हणून विश्रांती झाली. कधी उठायला उशीर झाला म्हणून, कधी वेळ जमत नाही म्हणून, कधी थंडी, तर कधी सण....
महिनाभरात फक्त दोनदा पोहायला गेलो.
दीड तासाचे चारशे रुपये!

असो.

आता सायकलिंग सुरू करावे म्हणतो. सायकल घ्यायला ग्रुहमंत्र्यांची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे!

चतुरंग's picture

5 Dec 2008 - 8:17 pm | चतुरंग

माझेही वजन घटवण्याचे प्रयोग चालू असतात वेगवेगळे. वजन जर्रर्रा कमी झाले रे झाले की आनंदाने अंगावर मूठभर मांस चढून वजन पूर्ववत होते आणि मी नव्या दमाने दमायला सुरुवात करतो! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, घरुन सर्टिफिकेट मिळेल का रे तुला की सध्याचे प्रय्त्न फलद्रूप होताना दिसताहेत म्हणून? :W )

चतुरंग

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 8:21 pm | विनायक प्रभू

तुम्ही व्हा मेंबर विप्र बाबा जीम चे. असले वर सांगितलेले अघोरी प्रकार काहीही करावे लागणार नाहीत.
मी पुण्याला आलो की तुमच्याकडेच उतरीन. उतरणार नाही ह्याची काळ्जी तुम्ही घ्यायची.
अभिजितला १५ एमएल चे कमिशन.

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2008 - 12:05 am | प्रभाकर पेठकर

उतरणार नाही ह्याची काळ्जी तुम्ही घ्यायची.

अवश्य या. मिल बैठेंगे यार ३. आप, मैं और बॅगपायपर (सोडा).
सोडा चढतच नाही त्यामुळे उतरणारही नाही.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

संदीप चित्रे's picture

5 Dec 2008 - 8:54 pm | संदीप चित्रे

अभिजीत... व्यायामाच्या बाबतीत आपण एका नावेचे प्रवासी आहोत :)

आपला अभिजित's picture

5 Dec 2008 - 11:36 pm | आपला अभिजित

8} बुडणार्‍या की तरंगणार्‍या?

(बाकी, आपण दोघे बसलो, तर ही नौका बुडेलच म्हणा!)
- अभिजित.

रेवती's picture

5 Dec 2008 - 8:55 pm | रेवती

फारच आवडला लेख आणि माझ्या अनुभवांशी मिळता जुळता आहे.

मी ही जाते व्यायामाला.
मंगळवारी पॅम नावाची इन्स्ट्रक्टर आहे तर गुरूवारी कॅथी आहे.
व्यायाम सुरू केल्यावर पहिला अठवडा उठता बसता त्या दोघींची आठवण यायची.
त्यावरू आमच्याकडे एक नविनच म्हण जन्माला आलीये.
"उठता पॅम बसता कॅथी"

रेवती

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2008 - 12:08 am | प्रभाकर पेठकर

मंगळवारी पॅम नावाची इन्स्ट्रक्टर आहे तर गुरूवारी कॅथी आहे.
काय पत्ता काय आहे जीमचा???

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

यशोधरा's picture

6 Dec 2008 - 12:20 am | यशोधरा

पेठकरकाका, ऑऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ @)

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2008 - 12:36 am | प्रभाकर पेठकर

अगं ऑऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ काय?
बंदर कितनाभी बुढा हो जाय, गुलाटी मारना नही भुलता...|

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

चतुरंग's picture

6 Dec 2008 - 12:39 am | चतुरंग

प्रभाकर गुलाटी असे करायला हरकत नसावी! ;)

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

6 Dec 2008 - 12:40 am | पिवळा डांबिस

बंदर कितनाभी बुढा हो जाय, गुलाटी मारना नही भुलता...|
क्या बात है!!!
सुभानल्ला!!!
=))

रेवती's picture

6 Dec 2008 - 12:26 am | रेवती

देते ना!
आपल्या घरी पोस्टाने काकूंकडे पाठवते.

रेवती

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2008 - 12:39 am | प्रभाकर पेठकर

पॅम आणि कॅथीने आत्ताच मला ई-मेलने पत्ता कळवला आहे.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

रेवती's picture

6 Dec 2008 - 12:44 am | रेवती

ही ही ही.

रेवती

बाकरवडी's picture

5 Dec 2008 - 9:06 pm | बाकरवडी

छान, आवडला !!!!!!!!!
विनोदी धाटणीचा ,तरीही विचार करायला लावणारा--ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना !!!!

यशोधरा's picture

5 Dec 2008 - 9:16 pm | यशोधरा

>>"उठता पॅम बसता कॅथी"

=))

विनायक प्रभू's picture

6 Dec 2008 - 10:41 am | विनायक प्रभू

तुम्ही आमची जीम बंद पाडणार बहुतेक

पिवळा डांबिस's picture

6 Dec 2008 - 12:04 am | पिवळा डांबिस

आवडला! अगदी भाजणीची चकली खाल्ल्याचा आनंद मिळाला...
पण अभिजीतराव (आपले!),
दोन तीन गोष्टी लक्षात आल्या...
१. आपलं ठरवून केलेलं म्यारेज दिसतंय.....
नाय म्हणजे बायको तुम्हाला "अहो-जाहो" करतेय, "अरे-तुरे" नाही. हे आजकाल दुर्मिळ!!:)
२. नवीनच लग्न झालेलं दिसतंय...
कारण, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती,
असं काहीबाही प्रक्षोभक उघडपणे लिहितांय!
याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होते बरं!
नव्याचे नऊ दिवस संपले ना, की जाणवेल मग.....:)
आपुन्-तुपुन नवरा लोग, इसलिये इशारा दे रहेला है....
(एक सल्ला: पर्वती चढा-उतरायला एक माणूस भाड्याने ठेवलांत तर तुमचा बराच त्रास वाचेल नाही का?:))

बाकी प्रतिक्रियाही झकास आहेत.....

"उठता पॅम बसता कॅथी"
=))
तरीच इतके दिवस विचार करतोय! आमचा सुपीक मेंदूही विचार करकरून थकला...
की हा चतुरंग गेले काही महिने व्यायामावर इतका भडभडून, भडभडून का लिहितोय?:)
"उठता पॅम बसता कॅथी" काय!! आता तुझ्या व्यायाम करण्यामागची प्रेरणा लक्षात आली....
एक सेशनसुद्धा चुकवत नसशील नाही का? अरे च्चोराऽऽऽ

८४ किलो! हे वजन जास्त आहे?
अरे एवढ्या वजनापर्यंत मी 'रोडावलो' तर सगळ्या मिपा सदस्यांना, ओली-सुकी, मागाल ती पार्टी देईन.
पेठकरकाका, एकदम सहमत!!!
आणि असं बघा, आपापल्या बायकोला जमिनीवरून उचलून पलंगावर ठेवता आलं की झालं...:)
काय करायच्यायत आपल्याला बाकीच्या वजनाच्या उचापती!!!!

आम्ही काय कुणाचे खातो रे,
तो "बुश" आम्हाला देतो रे ||
:)

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2008 - 12:11 am | प्रभाकर पेठकर

आपापल्या बायकोला जमिनीवरून उचलून पलंगावर ठेवता आलं की झालं...

अच्छा तुम्ही असे खेळ खेळता तर.....

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

पिवळा डांबिस's picture

6 Dec 2008 - 12:25 am | पिवळा डांबिस

अच्छा तुम्ही असे खेळ खेळता तर.....
ऍबसोल्यूटली येस!!
आम्हाला इन्डोअर स्पोर्टसची भारी आवड!:)
तुम्हाला नाही या खेळांत इंटरेस्ट? :B

"उठता पॅम बसता कॅथी"
हे मी नाही रेवतीने लिहिलं आहे! कारण त्या दोघी (माझ्या दुर्दैवाने) फक्त तिच्याच सेशनच्या इन्ट्रक्टर आहेत! ;)

तरीच इतके दिवस विचार करतोय! आमचा सुपीक मेंदूही विचार करकरून थकला...
की हा चतुरंग गेले काही महिने व्यायामावर इतका भडभडून, भडभडून का लिहितोय?
"उठता पॅम बसता कॅथी" काय!! आता तुझ्या व्यायाम करण्यामागची प्रेरणा लक्षात आली....
एक सेशनसुद्धा चुकवत नसशील नाही का? अरे च्चोराऽऽऽ

मी बापडा स्पिनिंगमधे १६-१७ मैल सायकल मारुन थकून जातो! आपल्या सेशनला कुठली हो पॅम अन कॅथी!

चतुरंग

यशोधरा's picture

6 Dec 2008 - 12:25 am | यशोधरा

लग्गेच पष्टीकरण आले चतुरंगजींचे!! =))

पिवळा डांबिस's picture

6 Dec 2008 - 12:47 am | पिवळा डांबिस

रेवतीताईंचं स्पष्टीकरण यायच्या आधी चतुरंगजींचं ताबडतोब "पष्टीकरण" आलं...
:)

पिवळा डांबिस's picture

6 Dec 2008 - 12:28 am | पिवळा डांबिस

कारण त्या दोघी (माझ्या दुर्दैवाने) फक्त तिच्याच सेशनच्या इन्ट्रक्टर आहेत!
तुम्ही वेगवेगळे जिमला जाता होय!
मग काय,
ऑल मुसळ वेन्ट इंटु केर!!!!
:)

आपला अभिजित's picture

6 Dec 2008 - 1:01 am | आपला अभिजित

तुझा अंदाज अंमळ चुकलाय.

१. मी आधी म्हटल्याप्रमाणे लेख सत्यस्थिती+कल्पनाविलास आहे. मी, डॉक्टर, अशी काही पात्रे वास्तव असली, तरी अन्य काही पात्रे काल्पनिक आणि कल्पनाविलासी आहेत.
२. माझं अरेंज्ड म्यारेज नाही. अरंज्ड लव्ह म्हणता येइल हवं तर. त्याची कथा इथे वाचा. (बायकोने अहो-जाहो करण्याएवढं कुठलं आमचं भाग्य? हड-तुड करत नाही, एवढंच नशीब!)
३. लग्नाला ५ वर्षं झाली. त्याचं एक फळही पदरात (की शर्टात?) आहे.

असो.

बाकी, घरातल्या अन्य व्यायामांविषयी उघडपणे लिहिण्याची इच्छा नाही.

"उठता पॅम बसता कॅथी"
हे मात्र झकास आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2008 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपापल्या बायकोला जमिनीवरून उचलून पलंगावर ठेवता आलं की झालं...
काय करायच्यायत आपल्याला बाकीच्या वजनाच्या उचापती!!!!

हा हा हा सहमत आहे ! असे वजन उचलण्याचा आनंदही काही औरच असतो ;)
( पण असल्या वजने उचलण्याच्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी येऊ नये असे वाटते)

-दिलीप बिरुटे
(चावट)

मुक्तसुनीत's picture

6 Dec 2008 - 12:15 am | मुक्तसुनीत

>> >>"उठता पॅम बसता कॅथी"

जबरा !! =))

कपिल काळे's picture

6 Dec 2008 - 5:32 am | कपिल काळे

http://www.misalpav.com/node/4705

हे वाचा.

आपला अभिजित's picture

6 Dec 2008 - 10:01 am | आपला अभिजित

ही बातमी आधीही वाचली होती. त्यावर लिहायचा विचारही होता. पण जमले नाही.

बाकी, उपाय उत्तम आहे, पण प्रत्यक्ष पातळीवर कितपत उपयोगी आणि व्यवहार्य आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे!

- अभिजित.
(एखाद्याच्या लग्नाला जायला जमले नाही, तर मी हनीमूनला नक्की जातो!)

झकासराव's picture

6 Dec 2008 - 9:43 am | झकासराव

मस्त लेख.
आपण एकाच नावेचे प्रवासी. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao