(हलगी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
3 Nov 2021 - 10:44 pm

पेरणा

किरणकुमार यांची बासरी तर आमची हलगी

हलगी..

शाम वर्ण तो शोभत होता, सुडौल काये वरी
ठुकमत ठुमकत समोर आली, सुंदर ती नारी

वस्त्र राजसी, पदर भरजरी, गळ्या मधे साज
पुढे चालता पैंजण करती, छुमछुम आवाज

प्रथम दर्शने नार देखणी, नजरेत भरली
त:क्षणी मी तिला मनोमन, होती की वरली

मोहक पुष्पे खोवून होता,अंबाडा सजला
मोह अनामिक कसा सुटावा? सांगाकी मजला

आठवताना रुप आपुले, मेख जाणवे खरी
सापळ्यावरी हडकांच्या या का, भुलेल ती नारी?

मुक्त मनाने पण ती वदली, घरी एकदा यावे राव
मनानेही मग माझ्या कैसा, सोडून दिधला त्याचा ठाव

निवांत भेटू, पण ती वदली, नको गडबडीने
थांब इथे तू याच ठिकाणी उद्याच सवडीने

आनंदे मी घेउन गिरकी, आलो तेव्हा घरी
पुर्नभेटीच्या विश्वासाने, धकधक झाली उरी

भिडून गेली काळजास ती, बेछूट किरदारी
स्वप्ना मधे मग कितीदा पोचलो, तिच्याच दरबारी

वचन पाळूनी दुसर्‍या दिवशी, खरेच ती आली
हळूच यावे माझ्या मागे, कानी कुजबुजली

मर्दपणाचा फुगा उडाला, माझा आकाशी
तोवर आम्ही पोचून गेलो, तिच्या घरापाशी

त्वरा कर अन उतरव सदरा, मजला ती वदली
लवकर बाहेर ये रे बाळा, मोठ्यांद्या बोलली

दर्शन माझे देवून बाळा, त्याला ती म्हणते
दुध प्यायले नाहीतर बघ, कशी अवस्था होते

पैजारबुवा,

अदभूतकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालकथाकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Nov 2021 - 6:07 am | प्रचेतस

अरारारा बुवा, कहर आहे =))

पाषाणभेद's picture

4 Nov 2021 - 3:04 pm | पाषाणभेद

काय बोलावे!

आधी वाचताना आहाहा... आहाहा... आहाहा, नंतर आरारा... :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।