दिवाळी अंक २०२१ : बासरी

Primary tabs

किरण कुमार's picture
किरण कुमार in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

बासरी

ताम्र होता रंग दिव्याचा उंच खांबावरी
समोर आला तत्परतेने कृष्ण सावळा हरी

वस्त्र तोकडी ठिगळे आणिक पाठीवर गोणी
पुढे चालता खळाळणारी खिशातली नाणी

एक बासरी त्यात देखणी मनात भरलेली
मुक्त सुरांना उधळत मी ती ओठी धरलेली

निवडक वेळू कांताराचा गोंड्याने सजला
मोह अनामिक कसा सुटावा रस्त्यावर मजला

चाचपताना खिसे जरासे मेख जाणवे खरी
कसे नेमके विसरुन आलो पैसे तेव्हा घरी

मुक्त मनाने तोही बोले, "घेउनी जा दादा"
मोल तयाचे नंतर द्यावे हिशोब हा साधा

माज धनाचा दावत वदलो देइन दुपटीने
थांबशील जर त्याच ठिकाणी उद्या सवडीने

आनंदे मी घेत बासरी आलो तेव्हा घरी
पुन्हा कधी त्या रस्त्यावर तो दिसला नाही हरी

भिडून गेली काळजास ती स्वच्छ किरदारी
घेत उधारी वणवण फिरलो त्याच्या दरबारी

श्रावणातल्या सरीत झिम्मड भिजून तो गेला
दान सुरांचे झोळीत टाकत निघून तो गेला

अहंपणाचा फुगाच फुटला त्या भर चौकात
भिक्षुक झाला क्षणात राजा जाणुनी औकात

दर्शन देउन सुदाम्यास या, अंतरी पेटाया
युगायुगातून तोच मुरारी येतो भेटाया

- किरण कुमार

प्रतिक्रिया

केडी's picture

2 Nov 2021 - 2:24 pm | केडी

सुंदर आहे मस्त रे

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 10:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचताक्षणी आवडली, तुमची पोतडी उघडा, आम्ही वाचण्यास उत्सुक आहोत
पैजारबुवा,

नावातकायआहे's picture

14 Nov 2021 - 9:15 pm | नावातकायआहे

बुवांशी १११११ % बाडिस!

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:17 am | पाषाणभेद

श्रावणातल्या सरीत झिम्मड भिजून तो गेला
दान सुरांचे झोळीत टाकत निघून तो गेला

वाहवा वा!!

स्थितप्रज्ञ's picture

3 Nov 2021 - 7:58 am | स्थितप्रज्ञ
स्थितप्रज्ञ's picture

3 Nov 2021 - 8:10 am | स्थितप्रज्ञ

कविता नेहमीप्रमाणे उत्तमच जमलीय.

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 Nov 2021 - 9:19 pm | भ ट क्या खे ड वा ला

भन्नाट.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 9:57 pm | मुक्त विहारि

शीर्षक वाचून, जरा धास्तीच घेतली होती...

मोकलायाची आठवण झाली

पण, सुखद भ्रमनिरास झाला

अन्या बुद्धे's picture

4 Nov 2021 - 1:25 pm | अन्या बुद्धे

फार सुंदर!

केशवकुमार आठवले..

चिंतामणी करंबेळकर's picture

11 Nov 2021 - 6:51 am | चिंतामणी करंबेळकर

किरणकुमारजी, कविता खूपच छान... !!!

तुषार काळभोर's picture

11 Nov 2021 - 12:44 pm | तुषार काळभोर

तुम्ही अजून लिहिलं पाहिजे..

चौथा कोनाडा's picture

11 Nov 2021 - 1:22 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम !

💗

खुप आवडली ही बासरी !

श्वेता व्यास's picture

11 Nov 2021 - 5:53 pm | श्वेता व्यास

खूप सुंदर !

चंबा मुतनाळ's picture

11 Nov 2021 - 6:21 pm | चंबा मुतनाळ

सुंदर कविता किरणकुमारजी !

किरण कुमार's picture

12 Nov 2021 - 3:00 pm | किरण कुमार

कवितेचा आस्वाद घेवून आपण इथे प्रतिक्रिया दिल्याबद्दल तसेच अनेकांनी भ्रमण ध्वनी वर संदेश पाठवून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो.
तसेच मिपा चमूस धन्यवाद .../\....

छान. कविता आवडली. कांतार आणि किरदारी या शब्दांचे अर्थ काय आहेत ?

किरण कुमार's picture

15 Nov 2021 - 4:25 pm | किरण कुमार

कांतार हा शब्द कवितेत घनदाट जंगल अशा अर्थाने घेतला आहे. घनदाट जंगलातून निवडून वेळू आणला आहे आणि त्याची बासरी बनवून त्याला गोंड्याने सजविला आहे .
किरदारी - फारसी शब्द किरदार वरुन घेतला आहे , व्यवहार किंवा चरित्र असा अर्थ अभिप्रेत आहे.

श्रीगणेशा's picture

13 Nov 2021 - 11:45 pm | श्रीगणेशा

दर्शन देउन सुदाम्यास या, अंतरी पेटाया
युगायुगातून तोच मुरारी येतो भेटाया

एखाद्या कलाकाराची कला हे त्या हरीने काहीही मोबदला न घेता दिलेलं दानच म्हणावं लागेल.
खूप अर्थपूर्ण वाटली कविता!

अभिजीत अवलिया's picture

14 Nov 2021 - 7:13 pm | अभिजीत अवलिया

छान कविता.

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 8:37 am | प्राची अश्विनी

कविता अतिशय आवडली.

गुल्लू दादा's picture

16 Nov 2021 - 2:01 am | गुल्लू दादा

आवडली. धन्यवाद.

किरण कुमार's picture

27 May 2022 - 1:05 pm | किरण कुमार

आपल्या सर्वांचे मनापसून धन्यवाद ..../\....