Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : पणती

लेखक स-ई यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
पणती पणतीला उमगत नाही चांगलं-वाईट कुरूप-सुंदर वा उजेड-अंधार ती अविरत तेजाची साथ देत सूर्याचं प्रतिबिंब होऊन चालत राहते तिला समजत नाही दिवस-रात्र चंद्र-तारे, तिचा प्रकाश तिलाच दिपवतो कितीदा वाटतं तिला शांत व्हावं दुसर्‍या कोणाच्या प्रकाशात जग बघावं पण तिच्या प्रकाशात मातीला दिसते दिवाळीसाठी काढलेली भलीमोठी रांगोळी आकाशात चमकणारा दूरचा एक तारा आणि एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत सई मांडे (२४/१०/२०२१)

वाचने 11355
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

सई तुझ्याकडे इतक्या लहान वयातच विलक्षण प्रतिभा आहे, दिवाळी टू दिवाळी ना लिहिता सुचेल तसे लिहित रहा, आम्हाला वाचायला आवडेल पैजारबुवा,

आकाशात चमकणारा दूरचा एक तारा आणि एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
कवितेचा अर्थ ज्याने त्याने उमगायचा, जाणवायचा असतो. पण न राहवून नमूद करावेसे (विचारावेसे नाही) वाटले - ही कविता एका गृहिणीचं मनोगत असावं! कविता आवडली.

तुमच्यासारख्या जाणत्यांकडून मिळालेल्या प्रोत्साहानाबद्दल सईकडून खुप खुप धन्यवाद!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

तिच्या नावानेच तर कविता प्रकाशित झाली आहे. नसेल तर तिला प्रशांत काका कडून पासवर्ड घ्यायला सांग. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बरोबर. मागच्या दिवाळीतही http://misalpav.com/node/47851 या धाग्यावर तीच्या नावावर कविता प्रकाशित झाली होती ! हॅप्पी दिवाळी !

खूप छान सुंदर कविता
तिच्या प्रकाशात मातीला दिसते .....एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
हे भारी आवडले

प्रतिक्रिया वाचून कविता वयाने लहान मुलीने लिहिली आहे असे समजते, इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल कौतुक ! लिहिते राहावे.