दिवाळी अंक २०२१ : पणती
पणती
पणतीला उमगत नाही चांगलं-वाईट
कुरूप-सुंदर वा उजेड-अंधार
ती अविरत तेजाची साथ देत
सूर्याचं प्रतिबिंब होऊन चालत राहते
तिला समजत नाही दिवस-रात्र
चंद्र-तारे, तिचा प्रकाश तिलाच दिपवतो
कितीदा वाटतं तिला शांत व्हावं
दुसर्या कोणाच्या प्रकाशात जग बघावं
पण तिच्या प्रकाशात मातीला दिसते
दिवाळीसाठी काढलेली भलीमोठी रांगोळी
आकाशात चमकणारा दूरचा एक तारा
आणि एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
सई मांडे
(२४/१०/२०२१)
वाचने
11335
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
छान लिहिले आहे
In reply to छान लिहिले आहे by ज्ञानोबाचे पैजार
अस्सच म्हणतो.
एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी
सई, उत्कृष्ट काव्य. असेच
छान
कविता आवडली
किती मस्त !
आकाशात चमकणारा दूरचा एक तारा
In reply to आकाशात चमकणारा दूरचा एक तारा by श्रीगणेशा
श्रीगणेशा
कविता छान आहेच..
सुंदर!
खूप सुंदर कविता.
साधेपणातले सौंदर्य
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मिसळलेला काव्यप्रेमी
कवयित्रीने
In reply to कवयित्रीने by अनन्त्_यात्री
तिचं
In reply to तिचं by मिसळलेला काव्यप्रेमी
आहे की खाते सदस्य काळ १२ महिने आणि १ दिवस
In reply to आहे की खाते सदस्य काळ १२ महिने आणि १ दिवस by ज्ञानोबाचे पैजार
मागच्या दिवाळीतही
खूप छान
सुंदर लिहीलय.
प्रतिक्रिया वाचून कविता वयाने
आवडली