मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२१ : पणती

स-ई · · दिवाळी अंक
पणती पणतीला उमगत नाही चांगलं-वाईट कुरूप-सुंदर वा उजेड-अंधार ती अविरत तेजाची साथ देत सूर्याचं प्रतिबिंब होऊन चालत राहते तिला समजत नाही दिवस-रात्र चंद्र-तारे, तिचा प्रकाश तिलाच दिपवतो कितीदा वाटतं तिला शांत व्हावं दुसर्‍या कोणाच्या प्रकाशात जग बघावं पण तिच्या प्रकाशात मातीला दिसते दिवाळीसाठी काढलेली भलीमोठी रांगोळी आकाशात चमकणारा दूरचा एक तारा आणि एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत सई मांडे (२४/१०/२०२१)

वाचने 11335 वाचनखूण प्रतिक्रिया 22

सई तुझ्याकडे इतक्या लहान वयातच विलक्षण प्रतिभा आहे, दिवाळी टू दिवाळी ना लिहिता सुचेल तसे लिहित रहा, आम्हाला वाचायला आवडेल पैजारबुवा,

श्रीगणेशा Mon, 11/08/2021 - 00:35
आकाशात चमकणारा दूरचा एक तारा आणि एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
कवितेचा अर्थ ज्याने त्याने उमगायचा, जाणवायचा असतो. पण न राहवून नमूद करावेसे (विचारावेसे नाही) वाटले - ही कविता एका गृहिणीचं मनोगत असावं! कविता आवडली.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

तिच्या नावानेच तर कविता प्रकाशित झाली आहे. नसेल तर तिला प्रशांत काका कडून पासवर्ड घ्यायला सांग. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चौथा कोनाडा Wed, 11/10/2021 - 14:14
बरोबर. मागच्या दिवाळीतही http://misalpav.com/node/47851 या धाग्यावर तीच्या नावावर कविता प्रकाशित झाली होती ! हॅप्पी दिवाळी !

मित्रहो Wed, 11/10/2021 - 14:27
खूप छान सुंदर कविता
तिच्या प्रकाशात मातीला दिसते .....एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
हे भारी आवडले