सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी अंक २०२१ : मन

Primary tabs

सौ. माधुरी दशपुते's picture
सौ. माधुरी दशपुते in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

मनं

मन माझे सैरभैर
भिरभिरत जाई दूरवर
कधी उंच उडे पाखरू
कधी धरतीचा ठाव!

मन माझे गंध सुगंध
कधी दीपवात मंद
कधी वेडापिसा छंद
कधी मायेचे बंध!

मन माझे नील आकाश
कधी लख्ख ऊन प्रकाश
कधी नुसताच वाटे भास
कधी लडिवाळ हट्ट खास!

मन माझे रातराणी
कधी मैफलीतली गाणी
कधी नेत्रातील पाणी
कधी धावे रानोरानी!

मन माझे चंचल वारा
कधी स्तब्ध स्थिर किनारा
कधी रिमझिम पाऊसधारा
कधी गंध मातीचा सारा!

मन माझे अल्लड वेडे
कधी न सुटणारे कोडे
कधी आयुष्याचे धडे
कधी आनंद चोहीकडे!!!!..

By -सौ. माधुरी दशपुते /भामरे

प्रतिक्रिया

राघव's picture

2 Nov 2021 - 6:21 pm | राघव

मन माझे अल्लड वेडे
कधी न सुटणारे कोडे
कधी आयुष्याचे धडे
कधी आनंद चोहीकडे!!!!..

सुंदर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 10:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

एका मागून एक कडव्याची लड उलगडली आणि थेट मनाला भिडली, वा अतिशय आवडली ही कविता

पैजारबुवा,

गुल्लू दादा's picture

16 Nov 2021 - 1:47 am | गुल्लू दादा

आवडली. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

16 Nov 2021 - 7:05 pm | तुषार काळभोर

छान लिहिलं आहे.

Bhakti's picture

16 Nov 2021 - 8:37 pm | Bhakti

मन माझे अल्लड वेडे
कधी न सुटणारे कोडे
कधी आयुष्याचे धडे
कधी आनंद चोहीकडे!!!!..

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2021 - 10:18 pm | चौथा कोनाडा

सुरेख !
मन माझे रातराणी
कधी मैफलीतली गाणी
कधी नेत्रातील पाणी
कधी धावे रानोरानी!

हे छानच !