Skip to main content
लेखक सौ. माधुरी दशपुते यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मनं

मन माझे सैरभैर
भिरभिरत जाई दूरवर
कधी उंच उडे पाखरू
कधी धरतीचा ठाव!

मन माझे गंध सुगंध
कधी दीपवात मंद
कधी वेडापिसा छंद
कधी मायेचे बंध!

मन माझे नील आकाश
कधी लख्ख ऊन प्रकाश
कधी नुसताच वाटे भास
कधी लडिवाळ हट्ट खास!

मन माझे रातराणी
कधी मैफलीतली गाणी
कधी नेत्रातील पाणी
कधी धावे रानोरानी!

मन माझे चंचल वारा
कधी स्तब्ध स्थिर किनारा
कधी रिमझिम पाऊसधारा
कधी गंध मातीचा सारा!

मन माझे अल्लड वेडे
कधी न सुटणारे कोडे
कधी आयुष्याचे धडे
कधी आनंद चोहीकडे!!!!..

By -सौ. माधुरी दशपुते /भामरे

दिवाळी अंक वर्ष

वाचने 3823
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

एका मागून एक कडव्याची लड उलगडली आणि थेट मनाला भिडली, वा अतिशय आवडली ही कविता

पैजारबुवा,


मन माझे अल्लड वेडे
कधी न सुटणारे कोडे
कधी आयुष्याचे धडे
कधी आनंद चोहीकडे!!!!..