आमची माणसे, आमचा गौरव

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
12 Sep 2021 - 2:41 pm
गाभा: 

गणेशोत्सवानिमित्त एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे. मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.

संबंधित व्यक्ती ही मराठी भाषक असावी. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले चालेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा परप्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच.
धाग्याची सुरुवात खालील एका वाचलेल्या बातमीने करतो :

‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो.
….

तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांचा संबंधीच्या गौरव बातम्या. समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

12 Sep 2021 - 7:17 pm | उपयोजक

मातृभाषा मराठी हवी की मराठी बोलणारा अमराठी चालेल?

विजुभाऊ's picture

5 Jul 2022 - 10:40 am | विजुभाऊ

छान उपक्रम आहे.
काही शंका आहेत्त.
मराठी म्हणजे नक्की कोण? माझे आडनाव शाह आहे. आमचा समाज महाराष्ट्रात किमान गेली १५० वर्षे तरी रहातो. आमच्यापैकी गुजरातमधे कोणाचीही नाते संबन्ध / घरदार नाही . आम्ही मात्रुभाषा मराठी सांगतो. आजोबा / पणजोबा आणि खापरपणजोबा आणि त्यांच्या वडील/ अजोबांचे ,सर्वांचे जन्म/ शिक्षणे इथेच झाली.
तरीही आम्हाला अजूनही अमराठी म्हणून संबोधले जाते.
मला मराठीत बोलताना पाहून गुजराथी असूनही तुमची मराठी कित्ती चांगली आहे असा न आवडणारा पुरस्कार मिळतो.

विजुभाऊ's picture

5 Jul 2022 - 10:43 am | विजुभाऊ

मला असे काही लोक माहीत आहेत. जे लेखक आहेत, आर्किटेक्ट आहेत सैन्यात आहेत , शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत त्यांच्या बद्दल इथे लिहिले तर चालेल का?

कुमार१'s picture

5 Jul 2022 - 10:47 am | कुमार१

धन्यवाद !
लेखात हे स्पष्ट केलेलेच आहे :

संबंधित व्यक्ती ही मराठी भाषक असावी. ( मराठी तिची मातृभाषा किंवा दुसरी भाषा असली तरी चालेल).
म्हणजे,

जिला मराठी बोलता येते ती मराठी.
व्यक्तीचे 'मूळ' याच्याशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही.

कुमार१'s picture

12 Sep 2021 - 7:20 pm | कुमार१

चांगले कार्य केले असल्यास जरूर चालेल.
महाराष्ट्रात रुळलेला असा त्याचा साधारण अर्थ

Ujjwal's picture

12 Sep 2021 - 8:38 pm | Ujjwal
कुमार१'s picture

12 Sep 2021 - 8:52 pm | कुमार१

हा कार्यक्रम मी पूर्वी टीव्हीवर पाहिला होता.
सुंदर !

कुमार१'s picture

19 Sep 2021 - 3:31 pm | कुमार१

सोनाली नवांगुळ, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार

अभिनंदन !

कुमार१'s picture

22 Sep 2021 - 10:21 am | कुमार१

केंद्रीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.
(संदर्भ : छापील सकाळ 22 सप्टेंबर 2021)

फुटूवाला's picture

27 Sep 2021 - 8:22 pm | फुटूवाला

समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. गणेशोत्सव निमित्य अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय
नाशकातले मिलिंदकाका पगारे बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत. स्वत:च्या खर्चाने प्रोजेक्टर, लॅपटॉप, माईक, स्पिकर घेवुन बोलावतील तिथे जावुन प्लास्टिकचा विधायक वापर, विल्हेवाट पद्घती, घन कचरा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करतात. शाळा, कॉलेजेस, शासकीय/गैरशासकीय आस्थापनात स्वत: पुढाकार घेवुन हा विषय लोकांच्या पचनी पाडतात. .
गेल्या महिन्याभरापासुन यमराजाचा वेष धारण करुन वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह धरतायेत.नुकताच त्याना किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार प्राप्त झाला. झी २४ तासने बातमीही केलीय त्यांच्यावर. तंत्रस्नेही शिक्षक समूह या माध्यमातून काका , राज्यभरातील शिक्षकांसोबत जोडले गेले आहेत. सोप्या सोप्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून शिक्षकांना ते साहित्य पुरविणे असाही एक उपक्रम ते राबवितात . . .
काकांची अन माझी ओळख झाली ती गोदा परिक्रमेत, त्यानंतर आम्ही सोबत कचरा व्यवस्थापनावर भरपूर कार्यक्रम केले. २४ ऑगस्ट ला खोडाळ्याजवळ वाकडपाडा गावात ' रानभाजी महोत्सवाला ' आम्ही सोबत होतो. तिथे मिलिंद काका उपस्थित महिला बचत गटासोबत पाणी शुद्धीकरण , आणि पाणी व्यवस्थापनावर संवाद साधत होते....
लेखक - डॉ. वैभव दातरंगे, नाशिक.....

श्री.उमाकांत श्रीराम निखारे, माजी मुख्य अभियंता, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे..
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. गणेशोत्सव निमित्य अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय. . .
जानेवारी 2017 पासून श्री. उमाकांत निखारे NTPC, एकलहरे, नाशिक येथे रुजु झाले. अवघ्या 3 महिन्याच्या काळात युनिट भोवतीच्या मोकळ्या जागेचं रुपडे पालटुन 'श‍ांती वन' उभारले.
एकलहरा नाशिक येथे स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त केंद्र व वसाहत, शून्य कचरा प्रकल्प, वनीकरण, मियावाकी घनवन, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे एक ना अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले.
सुका कचरा व ओला कचरा वेगळा करुन योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सुका कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. ओला कचर्‍याची उद्गमस्थळीच विल्हेवाट लावण्यासाठी घरच्या घरी खत बनविणारे मॅजिक बॉक्स वापरण्यासाठी प्रोत्साहीत केले. तर प्लास्टीक मुक्त अभियानासाठी प्लास्टीकला पर्याय म्हणून कापडी पिशवी बनविण्यासाठी जुने कपडे संकलन केंद्र उभारले आहे.
श्री निखारे यांनी इ-वेस्ट संकलन केंद्र सुध्दा उभारले आहे. हे सर्व करत असतांनाचा हे केंद्र ''शुन्य गळती केंद्र“ म्हणून उपाययोजना सुरु आहेत पाणी, कोळसा, ऑईल, वाफ, हवा, सांडपाणी याची गळती शून्य करण्याचे ध्येय आहे.
आपल्या कार्यकाळात प्रकल्प परिसरात ४० हजारहुन अधिक वृक्षारोपण, तसेच प्रकल्पांतर्गत रोपवाटिका, सीड बॉल बनविण्याचे वर्कशॉप आयोजित केले.
"घन कचरा व्यवस्थापन" संदर्भाने एकलहर‍ा कॉलनी अन् प्लांटच्या भेटीदरम्यान प्रत्येक ठिकाणी निसर्गाशी जुळवुन घेण्याची ही आग्रही मांडणी मला विशेष भावली. कार्यकक्षेबाहेर जावुन आपली आग्रही भुमिका इतरांना पटेपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहणे ही यांची खुबी. .
आणखी एक विशेष मांडायचं ते म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या प्लांटवर महिनाभराची प्लेसमेंट सुरु करुन Hands on Practical experience देण्याचा निखारेंचा प्रयत्न तर सार्‍याच शासकिय आस्थापनांनी अनुकरण करण्यासारखा आहे. ३० ऑगस्ट १९ ला ते निवृत्त झालेत. अधिकाराचं जोखड दूर झालं तरी निसर्गावर प्रेम मात्र कायम राहील.
© डॉ. वैभव दातरंगे, नाशिक....

फुटूवाला's picture

27 Sep 2021 - 8:26 pm | फुटूवाला

शकुंतला मंकड - नाशिक
गेल्या ४० वर्षापासुन सामाजिक कार्य हेच कार्यक्षेत्र असणार्‍या शकुंतला मंकड 'शकुअक्का' नावानेच जास्त प्रसिद्ध आहेत.
विविध समाजसेवी संस्थांसोबत अमरावती, निपाणी कर्नाटक आणि वैतरणा, इगतपुरी परिसरात महिला आरोग्य हा जिव्हाळ्याचा विषय घेवुन अक्कांच काम सुरु आहे.
आरोग्य शिक्षण, महिला व बाल आरोग्य, कुपोषण या बाबत सतत मिळेल त्या व्यासपीठाचा आधार घेवुन अगदी शेवटच्या घटकाच्या चुलीपर्यंत पोहोचण्याची आक्कांची हातोटी. एक मिनिट अगोदर परिचय झालेल्याही जन्मांतरीचा परिचय असावा अश्या आपुलकीनं आक्का बोलतं करतात.
सध्या आदिवासी आश्रमशाळातील मुलग्या मुलींना जीवनकौशल्य प्रशिक्षण देण्यात आक्का बिझी आहेत. लिंगभाव, लैंगिकता या तसं म्हटलं तर भुवया उंचावणार्‍या विषयावर आक्का समोरच्याला लिलया बोलतं करतात.
आदिवासी चालिरिती, भाषा, सवयी वेळप्रसंगी पेहराव आत्मसात करुन आपला मुद्दा पटवुन देणार्‍या आक्कांशी संवादाला खर तर भाषेचही बंधन नाहीय. पांढरपेशा डॉक्टरी व्यवसायातुन सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा अक्कांकडुन मी 'उत्साह' शिकलो. . .
©डॉ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
नाशिक.

फुटूवाला's picture

27 Sep 2021 - 8:27 pm | फुटूवाला

सतिश शिर्के - माणगाव, रायगड...
सतिशचं परफेक्ट वर्णन करणारा शब्द म्हणजे अवलिया. दक्षिण रायगडसारख्या पोटार्थी परिसरात हा माणुस घरपोच वाचनालय चालवायचा. पुस्तकमित्र म्हणुनच ओळख आहे सतिशची.
भटक्या सतिश डोंगरदर्‍यात, सागरकिनारी सतत भटकत असतो. रायगडावर तर असंख्य आवर्तन झाली असतील.
आताशा जरा स्थिरावलाय ते वडघरच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची दैनंदिन जबाबदारी सांभाळतोय म्हणुन. इथेही समविचारी मित्रपरिवाचारा भला थोरला गोतावळा जमवलाय. स्मारकातल्या युवा छावणी, अभिव्यक्ती शिबिर, वर्षारंग असे एक ना अनेक उपक्रम जणु या प्राण्याला किक मिळवण्यासाठीच आखले जातात.
समुद्रकिनार्‍यावरचं कासव संवर्धन असो की महाडमधलं गिधाड संवर्धन, सतिशचे इनपुटस् असतातच.
या अनवट वाटेवर सतिश आपल्या लेकीलाही चालायला शिकवतोय. आमची ओळखही इथेच झाली. आमचं गुळपीठ अन् सतिशची स्वरा गोरेगावच्या ना.म. जोशी प्राथमिक शाळेत एकत्र होत्या. ओलं न होता तीरावर बसुन मजा घ्यायच्या स्वभावानं या प्राण्यापासुन चार हात लांबच राहिलो कायम. समानाने समानाची वाढ होते या तत्वाने न जाणो याची लागण आपल्यालाही व्हायची, या भीतीने. . .
©डॉ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
नाशिक.

कुमार१'s picture

27 Sep 2021 - 9:04 pm | कुमार१

४ ही उत्तम माहिती
छान !

सतिश गावडे's picture

27 Sep 2021 - 11:14 pm | सतिश गावडे

काही वेळा आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असते आणि बरीच माणसं खूप काही करत असतात, मात्र याबद्दल आपल्याला त्याची कल्पना नसते.

सतिश शिर्के चक्क माझ्या गावाच्या वेशीवर कार्यरत आहेत. वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक माझ्या गावापासून दोन किमी आणि शेतापासून चालत दहा मिनिटांवर आहे.

गावी गेल्यावर शक्य झाल्यास हा संदर्भ देऊन त्यांची भेट घेईन :)

कुमार१'s picture

27 Sep 2021 - 9:10 pm | कुमार१

कोविड १९ च्या भारतातील संशोधनात मिळालेला एक महत्त्वाचा पुरस्कार :
श्री. शैलेंद्र कवाडे
अध्यक्ष व कार्यकारी संचालक,
मायलॅब diagnostics यांना

ET Startup Award मिळाले होते.
..............................

मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सम्मान पुरस्कार . त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.

कुमार१'s picture

28 Sep 2021 - 8:41 am | कुमार१

Analytics इंडिया या नियतकालिकाच्या वतीने दरवर्षी AI क्षेत्रातल्या 50 नामवंतांची यादी जाहीर होते. यंदा या यादीत दीनानाथ खोलकर, उपाध्यक्ष, टीसीएस यांचा समावेश झालेला आहे.

श्रीरंग_जोशी's picture

28 Sep 2021 - 9:13 am | श्रीरंग_जोशी

परसिस्टंट कंपनीचे संस्थापक आनंद देशपांडे यांच्याबाबत ही गौरवास्पद बातमी.

Indian Tech Founder’s Persistence Pays Off And Makes Him A Billionaire.

या धाग्यासाठी धन्यवाद.

कुमार१'s picture

30 Sep 2021 - 6:48 pm | कुमार१

देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर असणार आहे. कारण संरक्षण दलाच्या तीन प्रमुख दलांपैकी दोन दलांचे प्रमुख एकाच वेळी मराठी व्यक्ती असणार आहेत.

एअर चीफ मार्शल विजय चौधरी यांनी आज देशाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर हा अनोखा योग जुळून आला आहे. कारण सध्या लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे हे काम पाहत आहेत.

Nitin Palkar's picture

16 Oct 2021 - 12:41 pm | Nitin Palkar

मराठी माणूस म्हणून आपल्याला हे नि:संशय अभिमानास्पद आहे. त्या बरोबरच सध्याचे राजकीय नेतृत्व गुणग्राहक असल्याकही पुरावा आहे..

कुमार१'s picture

16 Oct 2021 - 10:25 am | कुमार१

महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर!

https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/s...

Nitin Palkar's picture

16 Oct 2021 - 12:32 pm | Nitin Palkar

आपटेकाका उर्फ श्री. श्रीकांत मुरलीधर आपटे, बीएससी, एलएलबी, सीएआयआयबी, वकील, उच्च न्यायालय, मुंबई, वय 69, 'अवयव दानासंदर्भात जनजागृती'. हे त्यांचे जीवन व्रत आहे. 'v4organs foundation' ही स्वयंसेवी संस्था त्यांनी स्थापन केली आहे. (https://v4organs.org/)

ZTCC मुंबई आणि ROTTO / SOTTO द्वारे आयोजित, "प्रत्यारोपण समन्वयक प्रशिक्षण कार्यक्रम"याद्वारे त्यांनी अवयव दानासंबंधी प्राथमिक व प्रगत ज्ञान प्राप्त केले आहे.
राज्याद्वारे ‘प्राधिकरण स्थापना’ आणि केंद्र सरकारद्वारे ‘कॅडेवेरिक अवयव देणग्यांचे’ नियमन करणे या कार्यासाठी ते अक्षरशः 24 X 7 काम करतात.

त्यांना महाविद्यालये, मुंबई विद्यापीठ, बंगळुरू विद्यापीठ, रुग्णालये, नर्सिंग संस्था, चर्च, मंदिरे, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जायंट्स क्लब सारखे आंतरराष्ट्रीय क्लब,सार्वजनिक ठिकाणे जसे गार्डन, रेल्वे स्टेशन इत्यादि ठिकाणी 100 हून अधिक जागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव आहे.
साथीच्या काळात त्यांनी झूम प्लॅटफॉर्मवर 7,000 हून अधिक सहभागींना अवयव दान संदर्भात संबोधित केले आणि 1,650 तरुणांना अवयव दान जागरूकतेबद्दल ऑनलाइन प्रशिक्षण दिले.
‘मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण कायद्या’अंतर्गत स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय प्राधिकरण समिती’चे मानद सदस्य म्हणून महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांनी आपटेकाकांची नियुक्ती केली आहे. तसेच
बेंगळुरू विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंनी त्यांची मानद सदस्य म्हणून एनएसएस सल्लागार समितीवर , बेंगळुरू विद्यापीठात नियुक्ती केली आहे.

कुमार१'s picture

16 Oct 2021 - 12:57 pm | कुमार१

आपटेकाकांना वंदन !
अतिशय चांगले काम .

🙏
एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचे अवयवदान केल्यास 43 रुग्णांचा फायदा होऊ शकतो !

तुषार काळभोर's picture

17 Oct 2021 - 7:30 pm | तुषार काळभोर

सुहास काकडे

विमानांच्या सुट्या भागांची निर्मिती करणारी US AeroTeam ही अमेरिकन कंपनी सुहास काकडे या मराठी माणसाची आहे.
कराडमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या सुहास काकडे यांनी आय आय टी मुंबई मधून बी टेक आणि एम टेक केलं. त्यांनंतर १९७४ मध्ये ते अमेरिकेला गेले. आधी नोकरी, मग वाहन निर्मितीसाठी सुटे भाग बनवणारी कंपनी सुरू केली. नंतर विमानांच्या सुट्या भागांची निर्मिती करणारी US AeroTeam ही कंपनी स्थापन केली.

कुमार१'s picture

20 Oct 2021 - 12:33 pm | कुमार१

पुण्याच्या 'एन आय ओ' संस्थेचे नेत्रतज्ञ डॉ. आदित्य केळकर यांना अमेरिकी नेत्र ( रेटिना) तज्ञांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा र्‍हेट बकलर पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे.

हार्दिक अभिनंदन !!

कुमार१'s picture

31 Oct 2021 - 10:19 am | कुमार१

ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेश गोखले यांची केंद्रीय जैव तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे. या विभागाच्या स्थापनेनंतर गेल्या ३५ वर्षांत प्रथमच एका मराठी संशोधकाची त्याच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

अभिनंदन !

Bhakti's picture

31 Oct 2021 - 1:02 pm | Bhakti

चांगली माहिती.

कुमार१'s picture

23 Nov 2021 - 10:32 am | कुमार१

काल आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील पाच लष्करी अधिकारी व जवानांचा विविध पदके देऊन गौरव करण्यात आला.
त्यातील काही नावे :
• एअर मार्शल प्रदीप बापट
• व्हाइस एडमिरल किरण देशमुख

• एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस
• एअर कमोडोर मकरंद रानडे

अभिनंदन !

कुमार१'s picture

4 Dec 2021 - 4:19 pm | कुमार१

गिरीश कुबेर, अमोल पालेकर, अच्युत गोडबोले यांना छाया-प्रकाश फाऊंडेशनचा पुरस्कार

https://www.loksatta.com/maharashtra/chhaya-prakash-foundation-award-to-...

कुमार१'s picture

7 Dec 2021 - 4:55 pm | कुमार१

नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर; निवेदिता सराफ यांचाही होणार सन्मान.

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/manoranjan/gadima-award-an...

कुमार१'s picture

8 Dec 2021 - 8:26 am | कुमार१

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.

अभिनंदन !

कुमार१'s picture

28 Dec 2021 - 12:05 pm | कुमार१

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४४ व्यक्तींना 'महाराष्ट्राची गिरिशिखरे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कुमार१'s picture

1 Jan 2022 - 7:17 pm | कुमार१

डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी नुकतीच ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडं महत्त्वाची जबाबदारी आली आहे.

अभिनंदन !

कुमार१'s picture

14 Jan 2022 - 12:03 pm | कुमार१

महाराष्ट्राची शान! सायना नेहवालला हरवणारी नागपूरची मराठमोळी मालविका देशाची नवी आशा
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/photos/sports-gallery/2760...

कुमार१'s picture

26 Jan 2022 - 12:22 pm | कुमार१

फिट इंडिया मोहीमेच्या माध्यमातून यांनी आतापर्यंत २८ नोव्हेंबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ दरम्यान सलग ६० दिवस धावण्याचा पराक्रम केलाय. ६० दिवसांमध्ये ६० मॅरेथॉन धावण्याचा हा विक्रम आहे असं म्हणता येईल. या विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे.

अभिनंदन !

कुमार१'s picture

23 Feb 2022 - 12:04 pm | कुमार१

डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील, औषधनिर्माणशास्त्रज्ञ.
सलग तिसरे सुवर्णपदक प्राप्त.
कर्करोग -औषध संशोधनात अग्रेसर

अभिनंदन !

कुमार१'s picture

4 Mar 2022 - 6:40 pm | कुमार१

बीड जिल्हा परिषदेच्या कुर्ला प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बालवैज्ञानिक ओंकार अनिल शिंदे याने डोळ्यात पाणी न येता सराईतपणे कांदा कापता यावा यासाठी संशोधन करून ‘स्मार्ट चाकू’ची निर्मती केली आहे. त्याच्या या संशोधनाची दखल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतली आहे. त्याचे हे संशोधन दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

कुमार१'s picture

3 Apr 2022 - 4:29 pm | कुमार१

मंगला गोडबोले :
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार.

कुमार१'s picture

29 Apr 2022 - 11:03 am | कुमार१

डाॅ. सोनम कापसे

पुण्यातील ‘टेरासीन’ रेस्टाॅरंट पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जातं. डाॅ. सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला ‘टेरासीन’ची कल्पना सुचली. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं या उदात्त हेतूने डाॅ. सोनम कापसे यांनी टेरासीन हे रेस्टॉरंट सुरू केलंय.

अभिनंदन !

कुमार१'s picture

1 Jun 2022 - 10:33 am | कुमार१

लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर :
परम विशिष्ट सेवा पदक

कुमार१'s picture

10 Jun 2022 - 4:25 pm | कुमार१

डॉ. संजय तोषनीवाल, वाशिम
डॉ. जितेंद्र नाईक, जळगाव
डॉ. आनंद कुलकर्णी, औरंगाबाद

रक्तदाबावरील प्रभावी औषध शोधण्यासाठी भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पेटंट

(Sustained release metoprolol succinate).
अभिनंदन !

कुमार१'s picture

10 Jun 2022 - 4:25 pm | कुमार१

डॉ. सदानंद सरदेशमुख
जीवन गौरव पुरस्कार ,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

( आयुर्वेदिक क्षेत्रात भरीव संशोधन)
अभिनंदन

कुमार१'s picture

5 Jul 2022 - 10:07 am | कुमार१

दीपक चटप

ब्रिटिश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 45 लाख रुपयांच्या Chevening शिष्यवृत्तीचा मानकरी
ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील.

विजुभाऊ's picture

5 Jul 2022 - 10:52 am | विजुभाऊ

डॉ. गणेश देवी.
७८० बोली भाषांना पुनरुज्जिवन देणारे.
बी बी सी ने यांच्या कार्यावर केलेले आर्टिकल
https://www.bbc.com/news/world-asia-india-41718082

कुमार१'s picture

5 Jul 2022 - 10:59 am | कुमार१

डॉ. गणेश देवी.>>>

त्यांचे अनेक भाषाविषयक लेख वाचले आहेत.
तसेच त्यांच्यासंबंधी अन्य अभ्यासकांनी लिहिलेले गौरवलेखही वाचले आहेत
अभिनंदन !

विजुभाऊ's picture

5 Jul 2022 - 10:55 am | विजुभाऊ

प्रोफेसर डॉ. तनुजा नेसरी.
ब्रिटीश संसदेने गौरवले
https://theprint.in/world/uk-parliament-honours-aiia-director-tanuja-nes...

कुमार१'s picture

24 Jul 2022 - 9:05 pm | कुमार१

इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला मोठा मान मिळाला आहे. लिसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे. शनिवारी (२३ जुलै) हे नाव देण्यात आले. इंग्लंडमधील एखाद्या क्रिकेट मैदानाला ​​भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कुमार१'s picture

30 Jul 2022 - 4:27 pm | कुमार१

आनंदसागर शिराळकर
रिआन सॉफ्टवेअर चे निर्माते.
भारतीय बनावटीचा भाषांतर मंच

(दैनिक सकाळ, सप्तरंग पुरवणी, 24 जुलै २०२२)

कुमार१'s picture

4 Aug 2022 - 12:24 pm | कुमार१

डॉ. अपूर्वा पालकर
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू.

कुमार१'s picture

7 Aug 2022 - 7:32 pm | कुमार१

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा २०२२
अविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकलं

अनन्त अवधुत's picture

10 Aug 2022 - 12:45 am | अनन्त अवधुत

Steeplechase history

कुमार१'s picture

10 Aug 2022 - 7:50 am | कुमार१

अमित पाटणकर
(वास्तुविशारद आणि अंतर्गत सजावटकार)

xim20 या संकल्पना कारसाठी रेड डॉट डिझाईन आणि अन्य मानाचे पुरस्कार
13 आंतरराष्ट्रीय पेटंटस

कुमार१'s picture

28 Aug 2022 - 5:54 pm | कुमार१

शिल्पा व्यापारी</strong>
वयाच्या २६ व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू करत जपानमध्ये व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान
(इंडिकस सॉफ्टवेअर)

कुमार१'s picture

6 Sep 2022 - 7:40 am | कुमार१

शिक्षक दिन विशेष : राष्ट्रपती पुरस्कार

सोमनाथ वाळके, बीड
शशिकांत कुलथे, बीड
कविता सिंघवी, मुंबई

कुमार१'s picture

11 Sep 2022 - 9:58 am | कुमार१

५१ वेगवेगळ्या संशोधनांचे स्वामित्वहक्क.
जगातील सर्वांत लहान सेन्सर बनवला.

Nitin Palkar's picture

14 Sep 2022 - 1:24 pm | Nitin Palkar

चांगली माहिती.

कुमार१'s picture

14 Sep 2022 - 10:22 am | कुमार१

संपदा मेहता
सनदी अधिकारी

माननीय राष्ट्रपतींच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती.

अनन्त अवधुत's picture

14 Sep 2022 - 1:23 pm | अनन्त अवधुत

स्टारबक्स, मुख्य कार्यकारी अधिकारी.

*नावावर जावू नका, पुणेकर आहेत ते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2022 - 2:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

पुणेकर असतील पण पक्के पुणेकर नाहीत,

ते चक्क दुपारी १ ते ४ स्टारबक्स सुरु ठेवणार आहेत म्हणे

https://youtu.be/SImLZevNSlQ

पैजारबुवा,

कुमार१'s picture

14 Sep 2022 - 3:39 pm | कुमार१

दुपारी १ ते ४ स्टारबक्स सुरु ठेवणार आहेत

>>> छान !
...
नुकतेच या धाग्याला १ वर्ष पूर्ण झाले.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
सर्वांची माहिती प्रेरणादायी अआहे.

कुमार१'s picture

14 Sep 2022 - 3:39 pm | कुमार१

दुपारी १ ते ४ स्टारबक्स सुरु ठेवणार आहेत

>>> छान !
...
नुकतेच या धाग्याला १ वर्ष पूर्ण झाले.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
सर्वांची माहिती प्रेरणादायी आहे.

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 2:03 pm | कुमार१

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती.
अभिनंदन

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 2:06 pm | कुमार१

डॉ. सागर जवळे,
जळगाव

* लहान मुलांचे मूत्रमार्ग शल्यविशारद.
*संशोधनात अग्रेसर : 40 स्वामित्व हक्क प्राप्त
*अनेक नव्या शस्त्रक्रिया आणि खूप स्वस्तात होणार्या अभिनव उपचारांचा शोध

कुमार१'s picture

24 Oct 2022 - 8:32 am | कुमार१

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहा'तील स्पर्धेत देशभरातून एकूण 24 विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

त्यातील 13 स्टार्टअप महाराष्ट्रातील आहेत .!

अभिनंदन !

(बातमी: छापील सकाळ 24/ 10/ 2022)

कुमार१'s picture

30 Oct 2022 - 9:25 am | कुमार१

डॉ. सुधीर रसाळ
ज्येष्ठ साहित्य समीक्षक

यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार

कुमार१'s picture

4 Nov 2022 - 8:41 am | कुमार१

डॉ. माधव गाडगीळ
श्री मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार

कुमार१'s picture

7 Nov 2022 - 8:23 am | कुमार१

अभिनेते प्रशांत दामले यांचा विक्रमी 12,500वा नाट्यप्रयोग संपन्न.

कुमार१'s picture

12 Nov 2022 - 11:33 am | कुमार१

पत्रकार द्वारकानाथ लेले यांनी स्थापन केलेल्या काव्यशिल्प या कवी आणि रसिकांच्या संस्थेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

(द्वारकानाथ लेले हे स्वतः कवी नव्हते परंतु काव्यरसिक होते).

कुमार१'s picture

16 Nov 2022 - 8:30 am | कुमार१

द इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे यंदाचे पुरस्कार घोषित.

विदिता वैद्य (लाईफ सायन्सेस)
महेश काकडे (गणितीय विज्ञान)
निस्सीम काणेकर (भौतिकशास्त्र)

कुमार१'s picture

18 Nov 2022 - 12:30 pm | कुमार१

डॉ. जयंत खंदारे, पीएचडी
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा डॉ. ए व्ही रामाराव उत्कृष्ट आंत्रप्रेन्युअर पुरस्कार.

त्यांनी स्थापन केलेल्या एआयआर या संस्थेने कर्करोगाच्या चाचणी संदर्भात नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे.

कुमार१'s picture

13 Jan 2023 - 7:55 am | कुमार१

शालेय विद्यार्थी वय ९
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

चार वर्षाच्या लहान मुलाचे विजेचा झटका बसण्यापासून संरक्षण करून प्राण वाचवले.

पुरस्कार 25 जानेवारीला नवी दिल्ली येथे दिला जाणार.
अभिनंदन !

(बातमी: छापील सकाळ 13 जानेवारी 2023)

कुमार१'s picture

13 Feb 2023 - 8:20 am | कुमार१

शर्मिला ओसवाल
संचालक, बॅसिलिया ऑरगॅनिक स्टार्टअप

जागतिक पातळीवर पोषक अन्नधान्याच्या प्रचारासाठी केंद्र सरकारतर्फे 2023 साठी या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे.

कुमार१'s picture

26 May 2023 - 5:42 am | कुमार१

अशोक राणे:
सत्यजित राय स्मृती पुरस्कार ‘कान महोत्सवा’त प्रदान.
चित्रपट समीक्षकांची जागतिक संघटना असलेल्या ‘फिप्रेस्की’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला.