Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on Sun, 09/12/2021 - 14:41
गणेशोत्सवानिमित्त एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे. मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे. संबंधित व्यक्ती ही मराठी भाषक असावी. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले चालेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा परप्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच. धाग्याची सुरुवात खालील एका वाचलेल्या बातमीने करतो : ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो. …. तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांचा संबंधीच्या गौरव बातम्या. समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
  • 26136 views

प्रतिक्रिया

Submitted by अनन्त अवधुत on Wed, 08/10/2022 - 00:45

In reply to अविनाश साबळे by हेमंतकुमार

Permalink

त्या रौप्यपदकाचे महत्व

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 08/10/2022 - 07:50

Permalink

अमित पाटणकर

अमित पाटणकर (वास्तुविशारद आणि अंतर्गत सजावटकार) xim20 या संकल्पना कारसाठी रेड डॉट डिझाईन आणि अन्य मानाचे पुरस्कार 13 आंतरराष्ट्रीय पेटंटस
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 08/28/2022 - 17:54

Permalink

शिल्पा व्यापारी/strong>

शिल्पा व्यापारी</strong> वयाच्या २६ व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू करत जपानमध्ये व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान (इंडिकस सॉफ्टवेअर)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 09/06/2022 - 07:40

Permalink

शिक्षक दिन

शिक्षक दिन विशेष : राष्ट्रपती पुरस्कार सोमनाथ वाळके, बीड शशिकांत कुलथे, बीड कविता सिंघवी, मुंबई
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 09/11/2022 - 09:58

Permalink

डॉ. संजय भंडारी

५१ वेगवेगळ्या संशोधनांचे स्वामित्वहक्क. जगातील सर्वांत लहान सेन्सर बनवला.
  • Log in or register to post comments

Submitted by Nitin Palkar on Wed, 09/14/2022 - 13:24

In reply to डॉ. संजय भंडारी by हेमंतकुमार

Permalink

चांगली माहिती

चांगली माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/14/2022 - 10:22

Permalink

संपदा मेहता

संपदा मेहता सनदी अधिकारी माननीय राष्ट्रपतींच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Wed, 09/14/2022 - 13:23

Permalink

लक्ष्मण नरसिंहन

स्टारबक्स, मुख्य कार्यकारी अधिकारी. *नावावर जावू नका, पुणेकर आहेत ते.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 09/14/2022 - 14:42

In reply to लक्ष्मण नरसिंहन by अनन्त अवधुत

Permalink

पुणेकर असतील पण पक्के पुणेकर नाहीत

पुणेकर असतील पण पक्के पुणेकर नाहीत, ते चक्क दुपारी १ ते ४ स्टारबक्स सुरु ठेवणार आहेत म्हणे https://youtu.be/SImLZevNSlQ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/14/2022 - 15:39

Permalink

वर्षपूर्ती

दुपारी १ ते ४ स्टारबक्स सुरु ठेवणार आहेत
>>> छान ! ... नुकतेच या धाग्याला १ वर्ष पूर्ण झाले. सर्व प्रतिसादकांचे आभार ! सर्वांची माहिती प्रेरणादायी अआहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 09/14/2022 - 15:39

Permalink

वर्षपूर्ती

दुपारी १ ते ४ स्टारबक्स सुरु ठेवणार आहेत
>>> छान ! ... नुकतेच या धाग्याला १ वर्ष पूर्ण झाले. सर्व प्रतिसादकांचे आभार ! सर्वांची माहिती प्रेरणादायी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 10/18/2022 - 14:03

Permalink

सरन्यायाधीश

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती. अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 10/18/2022 - 14:06

Permalink

डॉ. सागर जवळे,

डॉ. सागर जवळे, जळगाव * लहान मुलांचे मूत्रमार्ग शल्यविशारद. *संशोधनात अग्रेसर : 40 स्वामित्व हक्क प्राप्त *अनेक नव्या शस्त्रक्रिया आणि खूप स्वस्तात होणार्या अभिनव उपचारांचा शोध
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 10/24/2022 - 08:32

Permalink

स्टार्टअप विजेते

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहा'तील स्पर्धेत देशभरातून एकूण 24 विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यातील 13 स्टार्टअप महाराष्ट्रातील आहेत .! अभिनंदन ! (बातमी: छापील सकाळ 24/ 10/ 2022)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 10/30/2022 - 09:25

Permalink

डॉ. सुधीर रसाळ

डॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ साहित्य समीक्षक यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 11/04/2022 - 08:41

Permalink

डॉ. माधव गाडगीळ

डॉ. माधव गाडगीळ श्री मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 11/07/2022 - 08:23

Permalink

विक्रम

अभिनेते प्रशांत दामले यांचा विक्रमी 12,500वा नाट्यप्रयोग संपन्न.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 11/12/2022 - 11:33

Permalink

काव्यशिल्प

पत्रकार द्वारकानाथ लेले यांनी स्थापन केलेल्या काव्यशिल्प या कवी आणि रसिकांच्या संस्थेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. (द्वारकानाथ लेले हे स्वतः कवी नव्हते परंतु काव्यरसिक होते).
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 11/16/2022 - 08:30

Permalink

इन्फोसिस...

द इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे यंदाचे पुरस्कार घोषित. विदिता वैद्य (लाईफ सायन्सेस) महेश काकडे (गणितीय विज्ञान) निस्सीम काणेकर (भौतिकशास्त्र)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 11/18/2022 - 12:30

Permalink

डॉ. जयंत खंदारे, पीएचडी

डॉ. जयंत खंदारे, पीएचडी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा डॉ. ए व्ही रामाराव उत्कृष्ट आंत्रप्रेन्युअर पुरस्कार. त्यांनी स्थापन केलेल्या एआयआर या संस्थेने कर्करोगाच्या चाचणी संदर्भात नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 01/13/2023 - 07:55

Permalink

ज्ञेय कुलकर्णी

शालेय विद्यार्थी वय ९ राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर चार वर्षाच्या लहान मुलाचे विजेचा झटका बसण्यापासून संरक्षण करून प्राण वाचवले. पुरस्कार 25 जानेवारीला नवी दिल्ली येथे दिला जाणार. अभिनंदन ! (बातमी: छापील सकाळ 13 जानेवारी 2023)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 02/13/2023 - 08:20

Permalink

पोषक अन्नधान्य

शर्मिला ओसवाल संचालक, बॅसिलिया ऑरगॅनिक स्टार्टअप जागतिक पातळीवर पोषक अन्नधान्याच्या प्रचारासाठी केंद्र सरकारतर्फे 2023 साठी या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 05/26/2023 - 05:42

Permalink

अशोक राणे:

अशोक राणे: सत्यजित राय स्मृती पुरस्कार ‘कान महोत्सवा’त प्रदान. चित्रपट समीक्षकांची जागतिक संघटना असलेल्या ‘फिप्रेस्की’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com