मिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला !

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
26 Aug 2021 - 6:49 pm
गाभा: 

आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !

खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.

तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत.

शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.

हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत.

सूत्रे :

१. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७)
२. साहित्यिक प्रश्न विचारतो (७)

३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५)
४. अंधारात खात बस (४)

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
६. समजून बर्फ पडले (५)

७. आकाशातले व्यसन (४)
८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)

९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)
१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 6:55 pm | कुमार१

एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.

ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 7:54 pm | अमरेंद्र बाहुबली

२. साहित्यिक प्रश्न विचारतो (७) >>>>>
नावातकायआहे (शेक्सपिअर)

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 7:57 pm | कुमार१

२ अगदी बरोबर !

छान सुरुवात अमरेंद्र

गुल्लू दादा's picture

26 Aug 2021 - 8:13 pm | गुल्लू दादा

खूप डोकं लावलं पण काही जमतं नाहीये बुवा. अजून प्रयत्न करून पाहीन. मजबूत शब्दसंग्रह दिसतोय सरांचा.

एकपण ओळखू येईना बाई :(

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:28 pm | कुमार१

दोघेही प्रयत्न करत आहात त्याबद्दल आभार !

ओ दादा ,
तुम्ही एवढ मोठ्या मोठ्या नीट परीक्षा देते आणि ही बारावीची जमेना व्हय ?
असं नाही चालणार !

चंद्रसुर्यकुमार....

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:25 pm | कुमार१

चंद्रसुर्यकुमार....
बरोबर !

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 8:34 pm | अमरेंद्र बाहुबली

कसंकाय??

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:36 pm | कुमार१

चंद्र शांत (शीतल )असतो,
सूर्य शक्तिदायी आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली

अच्छा. मला वाटलं चंद्रसुर्यकुमार शांत आहेत असं. त्याना जर तलवार मिळाली तर ते सर्व कम्युनिस्टांच्या मुंडक्या छाटत फिरतील :)

रामदास२९'s picture

26 Aug 2021 - 9:07 pm | रामदास२९

:)

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली

४. अंधारात खात बस (४) >>> गुपचूप??

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:42 pm | कुमार१

वर धाग्यात म्हटल्याप्रमाणे व्यक्तिगत शेरेबाजी टाळूया .

सूत्र आणि शब्द शोध एवढीच व्याप्ती असू द्यावी ही विनंती

:)

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 8:44 pm | अमरेंद्र बाहुबली

ओके. :) होप चंसुकूना वाईट वाटनार नाही :)

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:44 pm | कुमार१

४. अंधारात खात बस (४) >>> गुपचूप??
चूक.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 8:46 pm | अमरेंद्र बाहुबली

३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) >>>>> टर्मिनेटर?

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:48 pm | कुमार१

नाही.
खेळात कसे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 8:52 pm | अमरेंद्र बाहुबली

विडीओ गेम. :)

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 8:55 pm | कुमार१

३. पर्यायी बरोबर धरू
अपेक्षित मराठी शब्द आहे
तो पण ओळखा

सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेतील आहेत

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Aug 2021 - 1:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

३. मदनबाण?

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 1:28 pm | कुमार१

चौकटराजा

रंगीला रतन's picture

27 Aug 2021 - 12:40 am | रंगीला रतन

टर्मिनेटर नावाचा चित्रपट आणि व्हिडीओ गेम दोन्ही आहेत त्यामुळे मला पण हेच वाटलं होतं :) पण मराठी नाव आहे म्हणाले कुमार सर मग चौकटराजा असावे. बाकीचे काहीच ओळखता येत नाहीत :(

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:02 am | कुमार१

चौकटराजा
बरोबर.!

गॉडजिला's picture

26 Aug 2021 - 9:32 pm | गॉडजिला

आपल्या बुध्दी पलीकडील प्रकरण आहे हे. मिपाकरांचे आयडी ओळखायचे ? आपली तेव्हढी मती नाही.

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 9:53 pm | कुमार१

आघाडीच्या फलंदाजांनी छान कामगिरी केलेली आहे.
आता पुढच्या फळीत येणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा !

मी उद्या सकाळी इथे येईपर्यंत सर्व सुटलेले असेल या सदिच्छांसह
शुभ रात्री

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 11:41 pm | अमरेंद्र बाहुबली

९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) >>>> ऊपयोजक.

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:03 am | कुमार१

ऊपयोजक नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 11:48 pm | अमरेंद्र बाहुबली

९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) >>>> ऊपयोजक.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 11:48 pm | अमरेंद्र बाहुबली

१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७) >>>> धर्मराजमूटके

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:04 am | कुमार१

धर्मराजमुटके

सुंदर !!
अगदी बरोबर.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 11:52 pm | अमरेंद्र बाहुबली

चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) >>>>
कपीलमुनी? (कपील शर्मा आणी कपीलदेव)

रंगीला रतन's picture

27 Aug 2021 - 12:32 am | रंगीला रतन

३ चौकटराजा

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:06 am | कुमार१

१ २ ३ १०
सुटलेत,
छान !

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:33 am | कुमार१

४. अंधारात खात बस (४)

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
६. समजून बर्फ पडले (५)

७. आकाशातले व्यसन (४)
८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)

९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)

...
अपेक्षित सर्व शब्द मराठी भाषेत, देवनागरी लिपीत आणि सलग असे आहेत.

येऊ द्यात...

श्वेता२४'s picture

27 Aug 2021 - 12:46 pm | श्वेता२४

६.माहितगार

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 1:07 pm | कुमार१

६.माहितगार
बरोबर
वा !

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 1:32 pm | कुमार१

नवीन स्पर्धकांनी वर तूप प्रसाद उपप्रतिसादात न.जाता सरळ शेवटाकडे यावे म्हणजे काय राहिलेले आहे ते समजते

आता हे राहिले आहेत





श्वेता२४'s picture

27 Aug 2021 - 1:35 pm | श्वेता२४

८.कंजुस

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 1:50 pm | कुमार१

८.कंजुस चूक

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 2:57 pm | कुमार१

उत्तरांमध्ये पुरुषप्रधानता दिसत असली तरी स्त्रियांना विसरून कसे चालेल मंडळी !

श्वेता२४'s picture

27 Aug 2021 - 3:09 pm | श्वेता२४

८.पियुशा?

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 3:13 pm | कुमार१

८.पियुशा? चूक

तुमच्या उत्तरात मूळाक्षर कुठले ते सांगा बरं ?

संग्राम's picture

27 Aug 2021 - 4:50 pm | संग्राम

निशाचर

कॉमी's picture

27 Aug 2021 - 4:51 pm | कॉमी

८- अनिन्द्य

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 4:55 pm | कुमार१

४ निशाचर बरोबर !

८- अनिन्द्य चूक ,
ओशट ??

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 5:28 pm | कुमार१

अतिशय सुरेख खेळत आहात सर्वजण .
खेळ अगदी योग्य गतीने चालू आहे.
मुख्य म्हणजे दोघातिघांनीच तो संपवण्या ऐवजी अनेक जण सहभागी होत आहेत याचा आनंद वाटतो

अजून दोन तासांनी धाग्याचे 24तास झाल्याचे टोल पडतील.
मला खात्री आहे की आता येणारे खेळाडू खेळ त्याआधीच संपवतील !

.....
आता हे :

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)

७. आकाशातले व्यसन (४)
८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)

९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)

संग्राम's picture

27 Aug 2021 - 5:54 pm | संग्राम

जे.पी.मॉर्गन (?)

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 5:57 pm | कुमार१

अपेक्षित सर्व शब्द मराठी भाषेत, देवनागरी लिपीत आणि सलग असे आहेत.

संग्राम's picture

27 Aug 2021 - 5:56 pm | संग्राम

चामुंडराय (?)

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 5:59 pm | कुमार१

चामुंडराय.
बरोबर च
लढ बाप्पू.....

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 6:12 pm | गॉडजिला

आणि डॉक्टर साहेबांची क्रिएटिविटी दोन्हींना माझा कोपऱ्यापासुन नमस्कार...

अद्भुत. मला एकही आयडी ओळखता आला नाही याची खंत व काहीशी लाज वाटत आहे... पण खेळ बघणेही खेळण्या इतकेच प्रेक्षणीय काम झाले आहे.

कमाल धागा विणला आहे _/\_

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:19 pm | कुमार१

शेवटचे तीन तुमच्यासाठीच ठेवले आहेत !

या बरे मैदानात .
एवढी god given.गिफ्ट आहे तुमच्याजवळ आणि मागे काय राहताय राव ... :)

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Aug 2021 - 6:18 pm | अमरेंद्र बाहुबली

आकाशातले व्यसन (४) >>> पायलट

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:21 pm | कुमार१

>>> पायलट. नाही.

आकाशातले + व्यसन??

आकाशातले व्यसन = मुक्तविहारी (किंवा गगन विहारी आहेत पण त्यांचा शौक त्यानी शॉर्ट केलाय गवि असा)

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:38 pm | कुमार१

म्हणूनच ती उत्तरे नाहीत

उत्तर सलग चार अक्षरी शब्द आहे

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 6:43 pm | कुमार१

संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका

एव्हाना सूत्रांची रचना तुमच्या लक्षात आली असेल.

दोन भिन्न सूत्रे = २ कल्पना

>> दोन शब्द आणि मग जोडणे असं काही करून पाहायला हवे

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 6:56 pm | गॉडजिला

???

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 7:01 pm | कुमार१

मेघनाद हे शंभर टक्के बरोबर आहे

अंगाशी ! आता कसं....
छान

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 7:03 pm | कुमार१

हत्ती गेला शेपूट राहिले......

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)

८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)

सौंदाळा's picture

27 Aug 2021 - 7:17 pm | सौंदाळा

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
माईसाहेब ??

Bhakti's picture

27 Aug 2021 - 7:18 pm | Bhakti

५ -स्व वरून आहे का?

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 7:14 pm | गॉडजिला

???

अत्रुप्त नाही

ओशट पाहिजे ना

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 7:30 pm | कुमार१

माईसाहेब ?? नाही, पण योग्य दिशेने ! मेख समजलीय

स्व वरून आहे का?
हे मूळाक्षर होत नाही ताई ...

अनिंद्य नाही आधीच सांगितले आहे

अप्पासाहेब

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:01 pm | कुमार१

साहेबाच्या रिंगणात चांगले फिरताय...
जरा बदल करायचा आहे की येणार...

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 7:57 pm | गॉडजिला

ॐकार ?

ओशट हा शब्द स्निग्ध पदार्थ यासाठी देखील वापरतात जसे की तूप... म्हणून मी अतूप =अतृप्त असा विचार केला

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:02 pm | कुमार१

ॐकार ?नाही

ॐ हे मूळाक्षर अजिबातच नाही !

ओशट हा शब्द स्निग्ध पदार्थ >>>>
अगदी योग्य दिशा

Nitin Palkar's picture

27 Aug 2021 - 7:57 pm | Nitin Palkar

नाही जमत. आपला पास. आपण प्रेक्षकांत.

संग्राम's picture

27 Aug 2021 - 8:29 pm | संग्राम

स्मिताके

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:37 pm | कुमार१

स्मिताके नाही.
यात एक पण मूळ अक्षर नाही

स्निग्ध वेगळे स्मित वेगळं !

संग्राम's picture

27 Aug 2021 - 8:39 pm | संग्राम

ताक = स्निग्ध अशा अर्थी प्रयत्न केला

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:46 pm | कुमार१

साठी अजून पर्याय बघता येतील का ?
तुम्हाला जमेल :)

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 8:32 pm | शानबा५१२

कठीण आहे, येईल की नाही माहीती नाही : " पहीला अविवाहीत आकडा".

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:38 pm | कुमार१

समजला नाही प्रतिसाद

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 9:50 pm | शानबा५१२

प्रतिसाद देउन मला हसवल्याबद्दल धन्यवाद, पण मला तुमच्या कठीण प्रश्नांचे उत्तर नाही आले म्हणुन तुम्हाला सोप्पा प्रश्न विचारला, पण तुम्हाला उत्तर नाही आले व प्रश्नही नाही समजला म्हणुन हसलो, अविवाहीत = कुमार व पहीला आकडा = एक. कुमार१.

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 9:54 pm | गॉडजिला

हा हा हा...

चामुंडराय's picture

27 Aug 2021 - 10:48 pm | चामुंडराय

हे म्हणजे गुरुची विद्या गुरूला असे झाले की :))

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 3:58 am | कुमार१

छान !

गुल्लू दादा's picture

27 Aug 2021 - 9:59 pm | गुल्लू दादा

मस्त विनोदी.

Bhakti's picture

27 Aug 2021 - 10:40 pm | Bhakti

हे हे :)

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 8:58 pm | कुमार१

साहेबाला का लोंबकळत ठेवलाय ?

द्या कि लावून त्याला कुणालातरी !

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Aug 2021 - 10:59 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्हीच सांगा ऊत्तर

जोशी पुण्यात दन्गा's picture

27 Aug 2021 - 9:24 pm | जोशी पुण्यात दन्गा

रावसाहेब

कुमार१'s picture

27 Aug 2021 - 9:31 pm | कुमार१

नाही

मग आता राहिले कोण ?

सोप्पय हो

पलाश's picture

27 Aug 2021 - 9:52 pm | पलाश

8 सस्नेह

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 4:01 am | कुमार१

अ ग दी बरोबर !
पलाश,
अहो, किती वर्षांनी भेटलात !
छान

चामुंडराय's picture

27 Aug 2021 - 10:50 pm | चामुंडराय

श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)

अर्रेच्या, ह्याचा अर्थ चामुंडराय होतो?
माझा आयडी असून ही मला कळले नाही !!
तर इतर कोडे सोडवणे अशक्यच.

जरा फोड करून सांगा बरे संग्राम भाऊ किंवा कुमारेक सर.

संग्राम's picture

27 Aug 2021 - 11:48 pm | संग्राम

चामुंडराय हे श्रवणबेळगोळ येथील राजमल्ल राजाचे मंत्री होते ....त्यांनी बाहुबली गोमटेश्वराची ५७ मूर्ती अखंड पाषाणातून घडवून घेतली
संदर्भ -
मराठी विश्वकोश
श्रवणबेळगोळ

*५७ फूट उंच मूर्ती असे वाचावे

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 4:05 am | कुमार१

संग्राम अगदी बरोबर.
हां अजून एक संदर्भ जो मी घेतला होता :

चामुंडराय रायमल्लाची प्रधानगिरी करीत असतांना हा पुतळा त्यानें केव्हां तरी उभारला.' -मसाप ६३.२७१. [सं.]

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%...

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 4:10 am | कुमार१

५ अर्धवट राहिलेले आहे

हा विजयी चौकार कोण मारतय, बोला !

आजच्या भारतीय सूर्योदयाला समाप्ती करूया

सुंदर खेळलेत. सगळे

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 7:37 am | कुमार१

'बापू'साहेब

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 8:27 am | कुमार१

१. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७).... चंद्रसूर्यकुमार
२. साहित्यिक प्रश्न विचारतो (७)... नावातकायआहे

३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५)... चौकटराजा
४. अंधारात खात बस (४)....निशाचर

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५).... बापूसाहेब
६. समजून बर्फ पडले (५) …,माहितगार

७. आकाशातले व्यसन (४) …...मेघनाद
८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)..... सस्नेह

९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) ...चामुंडराय
१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७).... धर्मराजमुटके

गॉडजिला's picture

28 Aug 2021 - 7:12 pm | गॉडजिला

छान.

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 7:23 pm | कुमार१

१८ जणांच्या एकत्रित प्रयत्नातून हा खेळ संपन्न झाला. प्रयत्न केलेला प्रत्येक जण अभिनंदनास पात्र आहे.

अमरेंद्र यांनी पहिल्या उत्तराचे उद्घाटन करून छान सुरुवात केली. पुढे त्यांनी सुरेख फटकेबाजीही केली. क्रमाक्रमाने पुढचे खेळाडू सहभागी झाले आणि मग खेळात रंगत भरली. खेळ निम्म्यावर स्थिरावल्यासारखा झाला होता तेव्हा संग्राम यांनी दणादण दोन चौकार मारून गाडी चांगलीच पुढे नेली. या खेळात ज्या मिपाकरांची नावे घेतलेली होती त्यापैकी चामुंडराय हे इथे हजेरी लावून गेल्याने छान वाटले.

यानिमित्ताने पूर्वीच्या शब्दखेळाच्या धाग्यामधले काही सहकारी बर्‍याच दिवसांनी भेटले. त्याचबरोबर काही जण इथे पहिल्यांदाच भेटले. त्यांचे यापुढे नेहमीच स्वागत असेल.

सर्वांचे मनापासून आभार !

गॉडजिला's picture

28 Aug 2021 - 7:26 pm | गॉडजिला

५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५).... बापूसाहेब
हे अजुनही समजले नाही

कुमार१'s picture

28 Aug 2021 - 7:43 pm | कुमार१

आपल्या म्हणजे भारतीय नोटांवर बापू असतात की नाही?
त्याला अजून एका साहेबाची भर लावली.

गॉडजिला's picture

28 Aug 2021 - 7:45 pm | गॉडजिला

हा हा हा _/\_

कुमार१'s picture

30 Aug 2021 - 8:33 am | कुमार१

व्यक्तिगत संपर्कातून एकदोघांनी शोधसूत्रांसंबंधी काही कुतूहल दाखविले म्हणून थोडे स्पष्टीकरण.

या खेळातील शोधसूत्रे पाहून काहींना थोडेसे बुचकळ्यात पडलेल्या सारखे वाटू शकेल. यानिमित्ताने शोधसूत्रांच्या प्रकारांबद्दल काही लिहितो

१.साधी : यामध्ये दिलेल्या सूत्राचा समानार्थ किंवा भावार्थ सरळ घ्यायचा असतो किंवा थेट माहितीच अपेक्षित असते. ती ओळखायची. इथे खेळ रचणारा आणि सोडवणारा यांच्यात शेवटी एकमत होते. गरजेनुसार निवाडा करण्यासाठी शब्दकोश उपयुक्त ठरतो.

२. गूढ : या प्रकारात सूत्राच्या थेट अर्थाला तसे महत्त्व नसते. किंबहुना इथे शाब्दिक कसरतीना अधिक महत्त्व असते. मात्र सुत्रात दिलेल्या प्रत्येक शब्दाचा उत्तराशी काही ना काही संबंध असतो. अशा प्रकारच्या खेळामध्ये निर्मात्याला जे काय अपेक्षित आहे ते अखेर सोडवणार्याला पूर्णपणे पटतेच असे नाही. ही चांगल्या प्रकारे रचायला शास्त्रशुद्ध अभ्यास असतो.

प्रस्तुत खेळामध्ये मी जी सूत्रे बनवली होती ती वरील दोन्हीपैकी थेट कुठल्याच प्रकारची नाहीत. परंतु त्या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहेत. एक प्रकारे ही गंमतगूढ प्रकारची सूत्रे म्हणता येतील.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2021 - 1:03 pm | टर्मीनेटर

मला एकही सदस्यनाम ओळखता आले नसल्याने ती बरोबर ओळखता आलेल्या मिपाकरांचे प्रचंड कौतुक वाटतय!

कुमार१'s picture

31 Aug 2021 - 3:35 pm | कुमार१

टर्मिनेटर
तुमचं नाव खेळात घेतलं नव्हतं
परंतु एक पर्यायी उत्तर म्हणून ते बरोबर आलेले आहे

हा पण सुंदर योगायोग.!

कुमार१'s picture

1 Sep 2021 - 4:28 am | कुमार१

लवकरच सादर होईल :

मिपा गंमतगूढ खेळ : भाग २

यावेळेस वेगळी गंमत असेल.
सर्वांनी सामील व्हावे हे आवाहन !

गुल्लू दादा's picture

1 Sep 2021 - 6:38 am | गुल्लू दादा

वाट पाहतोय.

लई भारी's picture

1 Sep 2021 - 9:54 am | लई भारी

भारीच प्रकार होता! पुढचा भाग येऊ दे लवकरच.

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Sep 2021 - 6:40 pm | अनिरुद्ध.वैद्य

गामा पैलवान?

कुमार१'s picture

1 Sep 2021 - 6:44 pm | कुमार१

असे म्हणायला हरकत नव्हती :))
पण या खेळामध्ये खालील सूचना दिलेली आहे

ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही.
शिवाय पाच अक्षरी हवे.

म्हणून हे उत्तर नाही.

कुमार१'s picture

13 Oct 2021 - 12:38 pm | कुमार१

नवे एकच सदस्यनाम देतो ओळखायला:
५ अक्षरी व त्यात एकच वेलांटी

सूत्र :

दोन मुली एकत्र आल्या की जग सुंदर होते !

कुमार१'s picture

13 Oct 2021 - 12:46 pm | कुमार१

नाव सलग आहे; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. अपेक्षित शब्द मराठी भाषेतील व देवनगरीत आहे.

कुमार१'s picture

11 Nov 2021 - 12:12 pm | कुमार१

सृष्टीलावण्या