Skip to main content

मिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 26/08/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ ! खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत. सूत्रे : १. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७) २. साहित्यिक प्रश्न विचारतो (७) ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) ४. अंधारात खात बस (४) ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ६. समजून बर्फ पडले (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) १०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)

वाचने 36770
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

नाही जमत. आपला पास. आपण प्रेक्षकांत.

स्मिताके

In reply to by संग्राम

स्मिताके नाही. यात एक पण मूळ अक्षर नाही स्निग्ध वेगळे स्मित वेगळं !

In reply to by हेमंतकुमार

ताक = स्निग्ध अशा अर्थी प्रयत्न केला

In reply to by संग्राम

साठी अजून पर्याय बघता येतील का ? तुम्हाला जमेल :)

In reply to by हेमंतकुमार

प्रतिसाद देउन मला हसवल्याबद्दल धन्यवाद, पण मला तुमच्या कठीण प्रश्नांचे उत्तर नाही आले म्हणुन तुम्हाला सोप्पा प्रश्न विचारला, पण तुम्हाला उत्तर नाही आले व प्रश्नही नाही समजला म्हणुन हसलो, अविवाहीत = कुमार व पहीला आकडा = एक. कुमार१.

साहेबाला का लोंबकळत ठेवलाय ? द्या कि लावून त्याला कुणालातरी !

नाही मग आता राहिले कोण ? सोप्पय हो

8 सस्नेह

In reply to by पलाश

अ ग दी बरोबर ! पलाश, अहो, किती वर्षांनी भेटलात ! छान

श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) अर्रेच्या, ह्याचा अर्थ चामुंडराय होतो? माझा आयडी असून ही मला कळले नाही !! तर इतर कोडे सोडवणे अशक्यच. जरा फोड करून सांगा बरे संग्राम भाऊ किंवा कुमारेक सर.

चामुंडराय हे श्रवणबेळगोळ येथील राजमल्ल राजाचे मंत्री होते ....त्यांनी बाहुबली गोमटेश्वराची ५७ मूर्ती अखंड पाषाणातून घडवून घेतली संदर्भ - मराठी विश्वकोश श्रवणबेळगोळ

In reply to by संग्राम

संग्राम अगदी बरोबर. हां अजून एक संदर्भ जो मी घेतला होता : चामुंडराय रायमल्लाची प्रधानगिरी करीत असतांना हा पुतळा त्यानें केव्हां तरी उभारला.' -मसाप ६३.२७१. [सं.] https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81…+

५ अर्धवट राहिलेले आहे हा विजयी चौकार कोण मारतय, बोला ! आजच्या भारतीय सूर्योदयाला समाप्ती करूया सुंदर खेळलेत. सगळे

'बापू'साहेब

१. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७).... चंद्रसूर्यकुमार २. साहित्यिक प्रश्न विचारतो (७)... नावातकायआहे ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५)... चौकटराजा ४. अंधारात खात बस (४)....निशाचर ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५).... बापूसाहेब ६. समजून बर्फ पडले (५) …,माहितगार ७. आकाशातले व्यसन (४) …...मेघनाद ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)..... सस्नेह ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) ...चामुंडराय १०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७).... धर्मराजमुटके

१८ जणांच्या एकत्रित प्रयत्नातून हा खेळ संपन्न झाला. प्रयत्न केलेला प्रत्येक जण अभिनंदनास पात्र आहे. अमरेंद्र यांनी पहिल्या उत्तराचे उद्घाटन करून छान सुरुवात केली. पुढे त्यांनी सुरेख फटकेबाजीही केली. क्रमाक्रमाने पुढचे खेळाडू सहभागी झाले आणि मग खेळात रंगत भरली. खेळ निम्म्यावर स्थिरावल्यासारखा झाला होता तेव्हा संग्राम यांनी दणादण दोन चौकार मारून गाडी चांगलीच पुढे नेली. या खेळात ज्या मिपाकरांची नावे घेतलेली होती त्यापैकी चामुंडराय हे इथे हजेरी लावून गेल्याने छान वाटले. यानिमित्ताने पूर्वीच्या शब्दखेळाच्या धाग्यामधले काही सहकारी बर्‍याच दिवसांनी भेटले. त्याचबरोबर काही जण इथे पहिल्यांदाच भेटले. त्यांचे यापुढे नेहमीच स्वागत असेल. सर्वांचे मनापासून आभार !

आपल्या म्हणजे भारतीय नोटांवर बापू असतात की नाही? त्याला अजून एका साहेबाची भर लावली.

हा हा हा _/\_

व्यक्तिगत संपर्कातून एकदोघांनी शोधसूत्रांसंबंधी काही कुतूहल दाखविले म्हणून थोडे स्पष्टीकरण. या खेळातील शोधसूत्रे पाहून काहींना थोडेसे बुचकळ्यात पडलेल्या सारखे वाटू शकेल. यानिमित्ताने शोधसूत्रांच्या प्रकारांबद्दल काही लिहितो १.साधी : यामध्ये दिलेल्या सूत्राचा समानार्थ किंवा भावार्थ सरळ घ्यायचा असतो किंवा थेट माहितीच अपेक्षित असते. ती ओळखायची. इथे खेळ रचणारा आणि सोडवणारा यांच्यात शेवटी एकमत होते. गरजेनुसार निवाडा करण्यासाठी शब्दकोश उपयुक्त ठरतो. २. गूढ : या प्रकारात सूत्राच्या थेट अर्थाला तसे महत्त्व नसते. किंबहुना इथे शाब्दिक कसरतीना अधिक महत्त्व असते. मात्र सुत्रात दिलेल्या प्रत्येक शब्दाचा उत्तराशी काही ना काही संबंध असतो. अशा प्रकारच्या खेळामध्ये निर्मात्याला जे काय अपेक्षित आहे ते अखेर सोडवणार्याला पूर्णपणे पटतेच असे नाही. ही चांगल्या प्रकारे रचायला शास्त्रशुद्ध अभ्यास असतो. प्रस्तुत खेळामध्ये मी जी सूत्रे बनवली होती ती वरील दोन्हीपैकी थेट कुठल्याच प्रकारची नाहीत. परंतु त्या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहेत. एक प्रकारे ही गंमतगूढ प्रकारची सूत्रे म्हणता येतील.

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटर तुमचं नाव खेळात घेतलं नव्हतं परंतु एक पर्यायी उत्तर म्हणून ते बरोबर आलेले आहे हा पण सुंदर योगायोग.!

लवकरच सादर होईल : मिपा गंमतगूढ खेळ : भाग २ यावेळेस वेगळी गंमत असेल. सर्वांनी सामील व्हावे हे आवाहन !

भारीच प्रकार होता! पुढचा भाग येऊ दे लवकरच.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

असे म्हणायला हरकत नव्हती :)) पण या खेळामध्ये खालील सूचना दिलेली आहे ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. शिवाय पाच अक्षरी हवे. म्हणून हे उत्तर नाही.

नवे एकच सदस्यनाम देतो ओळखायला: ५ अक्षरी व त्यात एकच वेलांटी सूत्र : दोन मुली एकत्र आल्या की जग सुंदर होते !

नाव सलग आहे; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. अपेक्षित शब्द मराठी भाषेतील व देवनगरीत आहे.

In reply to by हेमंतकुमार

सृष्टीलावण्या