Skip to main content

मिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 26/08/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ ! खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत. सूत्रे : १. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७) २. साहित्यिक प्रश्न विचारतो (७) ३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५) ४. अंधारात खात बस (४) ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ६. समजून बर्फ पडले (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) १०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)

वाचने 36821
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल , तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे. ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल.

खूप डोकं लावलं पण काही जमतं नाहीये बुवा. अजून प्रयत्न करून पाहीन. मजबूत शब्दसंग्रह दिसतोय सरांचा.

In reply to by Bhakti

दोघेही प्रयत्न करत आहात त्याबद्दल आभार ! ओ दादा , तुम्ही एवढ मोठ्या मोठ्या नीट परीक्षा देते आणि ही बारावीची जमेना व्हय ? असं नाही चालणार !

In reply to by हेमंतकुमार

अच्छा. मला वाटलं चंद्रसुर्यकुमार शांत आहेत असं. त्याना जर तलवार मिळाली तर ते सर्व कम्युनिस्टांच्या मुंडक्या छाटत फिरतील :)

वर धाग्यात म्हटल्याप्रमाणे व्यक्तिगत शेरेबाजी टाळूया . सूत्र आणि शब्द शोध एवढीच व्याप्ती असू द्यावी ही विनंती :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

३. पर्यायी बरोबर धरू अपेक्षित मराठी शब्द आहे तो पण ओळखा सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेतील आहेत

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मिनेटर नावाचा चित्रपट आणि व्हिडीओ गेम दोन्ही आहेत त्यामुळे मला पण हेच वाटलं होतं :) पण मराठी नाव आहे म्हणाले कुमार सर मग चौकटराजा असावे. बाकीचे काहीच ओळखता येत नाहीत :(

आपल्या बुध्दी पलीकडील प्रकरण आहे हे. मिपाकरांचे आयडी ओळखायचे ? आपली तेव्हढी मती नाही.

आघाडीच्या फलंदाजांनी छान कामगिरी केलेली आहे. आता पुढच्या फळीत येणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा ! मी उद्या सकाळी इथे येईपर्यंत सर्व सुटलेले असेल या सदिच्छांसह शुभ रात्री

४. अंधारात खात बस (४) ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ६. समजून बर्फ पडले (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५) ... अपेक्षित सर्व शब्द मराठी भाषेत, देवनागरी लिपीत आणि सलग असे आहेत. येऊ द्यात...

नवीन स्पर्धकांनी वर तूप प्रसाद उपप्रतिसादात न.जाता सरळ शेवटाकडे यावे म्हणजे काय राहिलेले आहे ते समजते आता हे राहिले आहेत ४ ५ ७ ८ ९

उत्तरांमध्ये पुरुषप्रधानता दिसत असली तरी स्त्रियांना विसरून कसे चालेल मंडळी !

अतिशय सुरेख खेळत आहात सर्वजण . खेळ अगदी योग्य गतीने चालू आहे. मुख्य म्हणजे दोघातिघांनीच तो संपवण्या ऐवजी अनेक जण सहभागी होत आहेत याचा आनंद वाटतो अजून दोन तासांनी धाग्याचे 24तास झाल्याचे टोल पडतील. मला खात्री आहे की आता येणारे खेळाडू खेळ त्याआधीच संपवतील ! ..... आता हे : ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ७. आकाशातले व्यसन (४) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) ९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)

In reply to by संग्राम

अपेक्षित सर्व शब्द मराठी भाषेत, देवनागरी लिपीत आणि सलग असे आहेत.

In reply to by संग्राम

चामुंडराय. बरोबर च लढ बाप्पू.....

आणि डॉक्टर साहेबांची क्रिएटिविटी दोन्हींना माझा कोपऱ्यापासुन नमस्कार... अद्भुत. मला एकही आयडी ओळखता आला नाही याची खंत व काहीशी लाज वाटत आहे... पण खेळ बघणेही खेळण्या इतकेच प्रेक्षणीय काम झाले आहे. कमाल धागा विणला आहे _/\_

In reply to by गॉडजिला

शेवटचे तीन तुमच्यासाठीच ठेवले आहेत ! या बरे मैदानात . एवढी god given.गिफ्ट आहे तुमच्याजवळ आणि मागे काय राहताय राव ... :)

आकाशातले व्यसन = मुक्तविहारी (किंवा गगन विहारी आहेत पण त्यांचा शौक त्यानी शॉर्ट केलाय गवि असा)

In reply to by हेमंतकुमार

संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका एव्हाना सूत्रांची रचना तुमच्या लक्षात आली असेल. दोन भिन्न सूत्रे = २ कल्पना >> दोन शब्द आणि मग जोडणे असं काही करून पाहायला हवे

हत्ती गेला शेपूट राहिले...... ५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५) ८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)

माईसाहेब ?? नाही, पण योग्य दिशेने ! मेख समजलीय स्व वरून आहे का? हे मूळाक्षर होत नाही ताई ... अनिंद्य नाही आधीच सांगितले आहे

In reply to by गॉडजिला

साहेबाच्या रिंगणात चांगले फिरताय... जरा बदल करायचा आहे की येणार...

ॐकार ? ओशट हा शब्द स्निग्ध पदार्थ यासाठी देखील वापरतात जसे की तूप... म्हणून मी अतूप =अतृप्त असा विचार केला