वेड लागले

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
26 Jun 2021 - 5:03 pm

वेड लागले सखया, जिवाला वेड लागले.
दिसलास तू , सांगू कशी , माझी न मी राहिले.
वेड लागले सखया , जिवाला वेड लागले.

जादू अशी झाली कशी , दो नयनांच्या भेटीने.
आनंद हा साठवू कसा , इवल्या या मुठीने

फूलपाखरू हो ,मन माझे , तुला धुंडताना
आभाळ हे वाटे थिटे , तूज सवे हिंडताना

स्वप्नात मी रमले अशी , हे चित्र रेखताना
प्रीत ही तुझी माझी , पाहते बहरताना

स्वप्नांना पंख मिळाले , घेता हात हाती
दुनिया नवी वसवेन मी , तू असता सोबती

वेड लागले सखये, जिवाला वेड लागले
दिसलीस तू सांगू कसा , माझा न मी राहिलो
वेड लागले सखये जिवाला , वेड लागले.

( flying Kiss )प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

28 Jun 2021 - 9:09 am | पाषाणभेद

आनंददायक काव्य!