गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ?

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
8 Apr 2021 - 2:07 pm

म्युच्युअल फंड्स च्या धाग्यावरील प्रतिसाद / चर्चा बघून मला हा धागा लिहावासा वाटला... यात मी माझे विचार मांडणार आहे. मी लिहीन तेच बरोबर अशी भूमिका कधीच नव्हती / नसेल त्यामुळे तुमचे विचार वाचायला जरूर आवडेल. तसेच काही लोकांना हा धागा बाळबोध (बेसिक) वाटण्याची शक्यता आहे ... त्याच्यासाठी गणेशा चा धागा आहेच
__________________________________________________________________________________________________________________

गुंतवणूक का करावी ?

भविष्यातल्या खर्चाची तरतूद म्हणून गुंतवणूक करावी. ऋण काढून सण करू नयेत असे म्हणतात
आता भविष्यातले मध्ये कधीचे ? एक - पाच - दहा - पंधरा वर्षे ...
काही उदाहरणे पाहू :

१. वय वर्षे २५ .. नौकरीत नुकताच जम बसलाय .. आता ३-४ वर्षात लग्न करायचे आहे / परदेशी फिरायला जायचंय ... २ लाख तरी साठवले पाहिजेत
म्हणजे
Target Corpus amount : 2 lakh
Investment period : 3 years
Investment method : recurring deposit followed by FD or SIP (balanced funds)

२. वय वर्षे ३४ ... नोकरीं चांगला पगार मिळतोय ... मुलगा / मुलगी पाहिलीत गेली .. आता १२ वर्षांनी कॉलेज शिक्षणासाठी ५० लाख लागणार
म्हणजे
Target Corpus amount : 50 lakh
Investment period : 12 years
Investment method : SIP (Equity funds... aggressive for first 8 years then start restricting to more balanced for next 4 )

3. वय वर्षे ३४ ... नोकरीं चांगला पगार मिळतोय ... पण पेन्शन नाही ... जमलं तर पन्नाशीत रिटायर व्हायचंय
म्हणजे
Target Corpus amount : 1 crore
Investment period : 15 years
Investment method : SIP (Equity funds... aggressive for first 12 years then start restricting to more balanced for next 3 )

४. वय वर्षे ५५ ... रिटायरमेंट घेतली ... पण पेन्शन नाही ... PF / ग्रॅच्युइटी वगैरे मिळून ५० लाख मिळालेत आता उरलेले आयुष्य रिलॅक्स जगायचंय
म्हणजे
Target Corpus amount : regular income
Investment period : life span (say 20 years more)
Investment method : Fixed deposits / fixed maturity plan . monthly income schemes (no equity funds)

प्रातिनिधिक म्हणून ही काही उदाहरणे घेतली. त्यामुळे आपल्या भविष्यातल्या गरजांप्रमाणे गुंवणूकीचे प्रकार बदलतात .. पण आयष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूक आवश्यक ठरते ...

_____________________________________________________________________________________________________________________________________

गुंतवणुकीबद्दलचे काही गैरसमज :

१. जीवन बीमा / mediclaim इत्यादी : ही गुंतवणूक नाही याची कृपया नोंद घ्यावी. आपल्या जबाबदाऱ्या (liabilities) पूर्ण करण्याचे एक साधन आहे. त्यातून कॉर्पस तयार होत नाही.
२. आपले रहाते घर हे असेट नसून जबाबदारी (liability) आहे. दुसरे घर हा असेट आहे.
३. गुंतवणुकीचा अर्थ उद्याच्या तयारीसाठी आजचा आनंद बरबाद करणे ... आज किती रक्कम गुंतवायची हे आपल्या हातात आहे ... आयुष्यात समतोल साधणे महत्वाचे ... त्यामुळे आजचा आनंद आणि भविष्याची तरतूद यांच्यात समतोल साधणे आवश्यक
४. शेअर ट्रेडींग (Day or position) हा धंदा (business ) आहे. इन्व्हेस्टमेंट नाही. यातून उत्पन्न मिळते (फायदा)
_______________________________________________________________________________________________________________________________________

गुंतवणूक किती करावी :

ह्याचे उत्तर ३ गोष्टीवर अवलंबून आहे
१. तुमचे आत्ताचे assets आणि liabilities
२. तुमचे आत्ताचे "disposable income" (म्हणजे जरुरीचे / रोजचे टाळता न येणारे खर्च तुमच्या आवाक (income) मधून वजा केल्यावर राहणारी रक्कम. आता ही रक्कम तुम्ही एन्जॉय करायला वापरू शकता किंवा गुंतवणूक करायला
३. तुमची भविष्यातली गरज (टार्गेट)

___________________________________________________________________________________________________________________________________

गुंतवणूक कुठे करावी ?
पर्याय असंख्य आहेत ... पण निर्णय घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक :
सर्वात महत्वाचे : don't put all the eggs in one basket
गुंतवणूक करताना सामन्यतः या गोष्टी बघाव्या :
१. ROI किंवा परतावा (काही बाबतीत ग्रोथ पोटेन्शिअल )
२. कालावधी
३. कमीतकमी किती गुंतवणूक लागेल
४. तरलता (Liquidity)
५. तुमची जोखीम घेण्याची क्षमता

यानुसार वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते
आता वेगवेगळे असेट क्लास कुठले ?
१. इक्विटी (शेअर्स / म्युच्यअल फंड इत्यादी )
२. डेट (म्युच्युअल फंडस् )
३. फिक्स इनकम (बॉण्ड्स / फिक्स्ड डिपॉसिट / FMP इत्यादी)
४. सोने (प्रत्यक्ष / गोल्ड बॉण्ड्स / ETF )
५. स्थावर मालमत्ता (real estate ) राहते घर सोडून
बाकी futures / derivatives इत्यादी फारसे कोणी करत नाही म्हणून इथेच थांबतो.

आता या सगळ्याचा एकत्रित अंदाज यावा म्हणून खालचा तक्ता बघा

.

________________________________________________________________________________________________________________________________

या धाग्यात काही सध्या रोजच्या जीवनातल्या घटना, गुंतवणुकीचे महत्व आणि पर्याय सांगायचा प्रयत्न केला आहे ..
गुंतावणीचा पर्याय निवडताना सारासार विचार आणि अभ्यास आवश्यक

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Apr 2021 - 2:57 pm | चंद्रसूर्यकुमार

लेख आवडला.

आणखी दोन मुद्दे:

१. चुकूनही एन्डाऊमेंट प्लॅनमध्ये पैसे गुंतवू नयेत. हे प्लॅन्स म्हणजे लोकांना यड्यात काढायचा कारखाना असतात. हे प्लॅन्स विकून विकणार्‍यांना चांगले कमिशन मिळते म्हणून असले प्लॅन्स ते आपल्या गळ्यात मारतात. असल्या प्लॅन्समध्ये रिटर्न सेव्हीग्ज बँक अकाऊंटपेक्षा फार काही जास्त असतात असे अजिबात नाही आणि ३ ते ५ वर्षे लॉकिन असते. त्यानंतरही १५-२० वर्षांची टर्म पूर्ण व्हायच्या आत पैसे काढायचे असतील तर आपलेच पैसे ते लोक अर्धे खातात आणि उरलेले अर्धेच आपल्याला परत देतात.

२. बर्‍याच विमाकंपन्या अ‍ॅन्युईटी प्लॅन्स विकतात. म्हणजे आपण अमुक एक कॉर्पस त्यांना भरायचा आणि ते दर वर्षी/महिन्याला किंवा तीन महिन्यातून एकदा व्याज देतात. हे प्लॅन्स पण सगळ्या अटी वाचून मगच घ्यावेत. वय जास्त म्हणजे ६० च्या पुढे असेल तर ८-८.५०% असा व्याजाचा दर मिळू शकतो. हा दर बराच आकर्षक आहे आणि एफ.डी पेक्षा जास्त असल्याने तो चांगला दिसतो. मात्र त्यात गोम ही की जास्त दर असेल तर त्यात आपल्याला मुद्दल परत मिळणार का हे बघावे. काही प्लॅन्समध्ये व्याजाचा दर जास्त असला तरी मुद्दल परत मिळणार नाही ही मेख असते. काही प्लॅन्समध्ये आपण मेल्यावर वारसाला मुद्दल परत मिळणार असे असते पण त्यासाठी व्याजाचा दर कमी लागेल. तेव्हा अ‍ॅन्युईटी प्लॅन्समध्ये हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा.

plan

मराठी_माणूस's picture

8 Apr 2021 - 4:52 pm | मराठी_माणूस

अ‍ॅन्युईटी प्लॅन्स हा निवृत्ती नंतरचा एक चांगला गुंतवणूकीचा मार्ग आहे. आपल्या पुंजीचा काही भाग ह्या मधे ठेवण्याचा विचार करावा.

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2021 - 3:03 pm | टवाळ कार्टा

उत्तम

गणेशा's picture

8 Apr 2021 - 3:56 pm | गणेशा

अमर जी,

आपण दोघांनी आलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला एकाच वेळेस सारखेच धागे लिहिले आहेत

मला आधी माहीती असते तुम्ही लिहिता आहात तर माझा वेळ वाचला असता.. मी नक्कीच लिहिला नसता धागा..

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 4:34 pm | अमर विश्वास

गणेशा जी

आपले धागे परस्पर पूरक आहेत ...
आणि मुख्य म्हणजे we are on right track .... keep sharing

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 4:06 pm | मुक्त विहारि

मुलाला लिंक पाठवतो....

चौकटराजा's picture

8 Apr 2021 - 4:22 pm | चौकटराजा

खरे तर हे गुंतवणुकीला कितपत लागू पडते हे माहीत नाही पण मी पाहिलेले उदाहरण

चिंचवड येथे एकाच परिसरात चार कुटुंबे राहात होती. सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचे सूर जुळलेले होते. चार ही भाड्याने राहात होते . चौघांनी पैसे साठवून प्रथम चौघांच्या मालकीचा एक प्लॉट घेतला .( त्यावेळी या भागात ते शक्य झाले आता सर्व मोठमोठ्या बिल्डरचे ते काम आहे . ) काही वर्षे भाड्यानेच राहून आणखी पैसे साठवले व मग प्रत्येकाने थोडे कर्ज घेऊन इमारत स्वतः:च विकसित केली . फायदा असा झाला की ज्या किमतीत त्यांना बिल्डरकडून फ्लॅट मिळाला असता त्या किमतीत त्यांना एकेक आख्खया मजला वाट्याला आला . याला म्हणायचे प्लानींग व सहकार्य !!

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 4:44 pm | मुक्त विहारि

वेगळ्या तर्हेने, हा मार्ग अवलंबीन

चौकटराजा's picture

8 Apr 2021 - 6:34 pm | चौकटराजा

माझा एक मित्र . त्याचे वडीलानी घेतेलेले वाई येथील एक घर ! त्याची बदली जेव्हा वाई येथे झाली त्यावेळी त्याने आपल्याच खात्यातील एकीशी प्रेमविवाह केला . दोन तीन बदल्या त्याच्या लहान लहान मुदतीच्या झाल्या पण काही दिवसानी तो पुन्हा वाई येथे आला . त्यावेळी डबल इन्कम मुळे पैसे साठले होते. त्याने एक महिना रजा काढली. स्वतःच घराचा प्लान केला तो अर्किटेक्ट कडून सही करून घेऊन ( फी देऊन ) सम्मत करून घेतला जुने घर पाडले व महिन्यात स्वतः च्या सुपर व्हिजन खाली कंत्राट दाराकडून घर बान्धून घेतले. बिल्डर ने १ लाख ६० हजार सांगितले होते. याने ते ८०००० मधे बसविले .

गणेशा यांच्या लेखाप्रमाणे हा लेखही अतिशय सुंदर झालेला आहे. एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या कोणाने विचार करायला लावणारे लेख. सुरुवातीचे scenarios तर मस्तच! खरं सांगायचं तर हे गणेशा, अमर विश्वास, चंद्रसूर्यकुमार यांचे लेख/प्रतिसाद वाचल्यापासून अर्थकारणात आपण फारच मागास आहोत हे जाणवून जात आहे. अर्थात उशिरा का होईना पण शिकायला मिळतेय याचा आनंदच आहे.

चंद्रसूर्यकुमार हे ह्या field मधले उच्च विभुशीत आहेत..त्यांचा खरा अनुभव, अभ्यास जास्तच आहे..

माझे म्हणाल तर मी नविन आहे या field मध्ये..
आणि गुंतवणूक या विषयात खुप तुमच्या सारखाच उशिरा आलोय..
त्यामुळे आपण एक सारखे आहोत..मी शिकत आहेच..त्यात मी finance चा नाही..

माझ्या फक्त जमेच्या बाजू आहेत माझे maths आणि stat आणि जास्त खोलवर जाऊन अभ्यास.

आणि मला आनंद आहे आपल्या सारखी छान टीम झाली आहे तर अभ्यास जबरदस्त होईलच..

अमर जे सांगत आहेत, ते मी किती अभ्यासाचा प्रयत्न केला होता , पण अवघड जात होते.
ते mf मस्त सांगत आहेत..खुपच छान अभ्यास दिसतोय आणि अनुभव सुद्धा..

त्यामुळे आपले सगळे धागे एकत्र link देऊन ठेवत आहे..

Its nice..

अनन्त अवधुत's picture

9 Apr 2021 - 12:50 am | अनन्त अवधुत

सुरुवातीचे उदाहरणे खरच फार उपयोगाचे आहेत.