पणजीच लुगडं (भाग-२)

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
6 Apr 2021 - 2:52 pm

https://misalpav.com/node/48608

रात्र झाली.जेवण आटोपली.विभाला झोपच येतच नव्हती ,पणजीच नाव काय,कशा होत्या त्या ? हे तिने काहीच विचारलं नव्हत.
नानी आल्यावर तिने हे सगळ विचारायचं असे ठरवलं.काही वेळाने रजनी काकू आल्या,
“विभा राजा झोप्लास का?” असा म्हणत त्यांना मायेने विभाच्या डोक्यावर हात फिरवला तर विभाला चांगलाच ताप होता.
त्या घाबरल्या...थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या,विभा तापेत बरळू लागली “पणजीच नाव काय ?”
रजनी काकू देवाशी दिवा रात्रभर तेवत राहावा म्हणून तेल घालायला गेल्या.देव्हाऱ्यात त्यांना बांधलेला भाग दिसेना.त्यांनी नानांना विचारलं,त्यांनी सर्व सांगितलं.तशा त्या चिडल्या.पण प्रेमाने विभाला “बाळा तो रुपया देतेस का ग?बाप्पाचा असतो तो..” असे म्हणाल्या.
विभा काही बोलेना..नानी इकडे तिकडे शोधू लागल्या कपाटाखाली त्यान तो सापडला.तसा त्यांनी तो पुन्हा बांधला आणि देव्हाऱ्यात ठेवला.
दीपा –संदीप दुसऱ्या दिवशी सकाळीच गावी धडकले.विभाला आता जरा बरे वाटत होते.पण तिला आपण आजारी होतो, काय घडल हे आठवेना दोन दिवस राहून ते पुन्हा निघाले .गाडीमध्ये विभा शांत शांत वाटत होती.बाहेरच्या झाडांना एकटक पाहत होती.वेशी बाहेर गाडी गेली तेव्हा ती बराच वेळ मागे वळून गावाकडे पाहत होती.
___________________________________________________________________________________________
आज विभा वीस वर्षांची झाली होती.दहा वर्षापूर्वी विभा भारतातून परतल्या नन्तर बरीच बदलली होती.आता ती हट्टी नव्हती ,समजूतदार होती.भारतीय पदार्थ मन लावून शिकली होती.पुरणाची पोळी तर दीपापेक्षा कैकपटीने ती सुरेख बनवायची.तोंडात घातल्या घातल्या विरघळून जायच्या.अमेरिकेत राहूनही ती भारतीय मंदिरांचा अभ्यास करायची.तिची खोली पुरातन मंदिरांच्या फोटोनी भरलेली असायची.दीपाला हे अतीच वाटायचे पण विभा तिच्या अभ्यासाविषयी बोलू लागली ती कौतुकाने ऐकत राहायची.
त्या रात्री विभा पुन्हा अचानक जागी झाली.आकाशातल्या ताऱ्यांशी बोलायची,बडबड करून झोपून जायची.दीपा-संदीपने खूप मनोविकार तज्ञाना दाखवूनही फरक पडला नाही.
दीपाचा पुन्हा म्हणाली “मम्मा मला पुन्हा भारतात हा वाढदिवस साजरा करायचा आहे...आपण मी एकटीच जाणार आहे.” विभावर दोघांचा अपार जीव होता त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला जग तिच्या दृष्टीने पाहण्याची पूर्ण सूट दिली.विभा भारतात आली.
वर्षापूर्वीच आजी –आजोबा वारल्या पासून पुण्यातल घर मोकळच होत.विभाने ७ दिवस पुण्याच एक एक कोना ,मंदिरे सर्व याची देही याची डोळा अभ्यासल.
नानांचा फोन आला “विभा राणी आग कधी येतेस गावाला ?”
“नानाजी परवाच येतेय परवा माझा वाढदिवस आहे ना” विभा म्हणाली
कधी नानांना भेटतेय असे झाल होत...नानी गेल्यापासून नांजी अमेरिकेत दोन वर्षांनी यायचे .तेव्हा आणि फोनवर विभा गावाकडच्या तासनतास गप्पा मारत.
विभा गावात शिरताच तिच वेस लागली.विभाची नजर दूर दूर गाव टिपत होती ...तिला जाताना एक वाडा दिसला.बराच जुना होता तो.
“नानाजी कसे आहात” म्हणत ती अशोककाकांच्या पाया पडली.त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला.
रात्री बारा वाजता नांनांनी आणलेला कप केक कापत तिने वाढदिवस साजरा केला.
“काय पार्टी देणार ?” अशोककाका म्हणाले.
“अर्थात पुरण पोळी “ विभा म्हणाली.दुसऱ्या दिवशी यथेच्छ पुरणपोळीवर ताव मारत,विभा म्हणाली “नानाजी तो वेशीजवळचा वाडा कोणाचा?”
“विभा तो वाडा नव्हे काय तो ,त्यात आत खूप जुनी मंदिर आहेत त्याट काही आपल्या पूर्वजांनी बांधलेली आहेत.आम्ही लहानपणी तिथेच खेळायचो” अशोकराव विभाला सांगत होते.”आपण जाऊ संध्याकाळी तिथे ,विभा म्हणाली”
उन्ह थोडी कमी झाली.दिवस संध्याकाळाकडे झुकायला लागला होता.विभा मंदिर पाहत होती.झाडांची सळसळ त्यात मुर्त्यांच देखण रूपड वाऱ्याच्या गारवा शरीराला तर मोहक मूर्तीच रूपड डोळ्याला थंडाई देत होतं.
गणपतीच ,शंकराच,दत्ताच एक एक सुबक खूपच पुरातन देखण्या मूर्ती होत्या.एक मंदिर ..गाभारा रिकामाच होता.
विभाने विचारलं “नानाजी हे असे का?”
अशोककाका सांगू लागले “एकदा गावात दरोडा पडला तेव्हापसुन इथली देवीची मूर्ती गायब आहे...अनेक मूर्ती स्थापन केल्या पण त्या काही कारणांनी भंग पावाट तेव्हापासून मूर्ती स्थापनेच कोणीच प्रयत्न नाही केला.”
विभा मागे फिरू लागली तोच तिला आवाज आला “मला सोडव रमा”...तिने मागे वळून पाहील विभाला काहीच कळेना,तिला भास झाला असा तिला वाटलं.
ते घरी आले विभाला आजही झोप येईना.ताऱ्यांशी बोलून तिला झोप आली.पहाटे उठून पाहील तर अशोकराव पूजा करत होता.तिला पुरचुंडी दिसली.तिला तो प्रसंग आठवला.तसं ती नानाजींची पूजा संपायची वाट पाहू लागली.
पूजा संपल्या संपल्या तिने नानाजीना प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.“ नानाजी पणजीच नाव काय होत?त्या कशा होत्या?...सांगा लवकर प्लीज”.
अशोकराव सांगू लागले, “रमाबाई ,पणजीच नाव.खूप देवभोळ्या होत्या .काळ गेलो ना त्या मंदिरात त्या रोज पहाटेच आरती करायच्या.अख्या पंचक्रोशीत त्यांच्या देवीच्या मोठ्या भक्त म्हणून बोलबाला होता.त्या देवीशी संवाद साधायच्या असे त्याकाळी लोक म्हणत.बायाबापुड्या आपल्या समस्या सांगायच्या रमाबाई गाभाऱ्यातला अशा समाधिस्त होत आणि मग अचानक बरळून त्यांना उपाय सांगत.तुला सांगितलं होत ना तो दरोडा त्यातच त्यांचा खून झाला होता.चल तू पण काय ऐकत बसलीस ,हे अस कुठ असत का म्हणशील ?जुन्या अंधश्रद्धा आहेत.”
रमा..नाव ऐकून विभाच्या पायाखालची जमीन सरकली.तिने नानाजीना अजून सांगायला लावलं.त्यांनी जुने दस्तावेज तिच्यापुढे मांडले “शोध बाई नाहीतरी तुला पुरातन अभ्यासाची सवय आहेच” हसून नानाजी बाहेर गेले.
विभाला रमाबाईंची पत्रिका सापडली.जन्मतिथी होती मार्गशीष अष्टमी ,विभाचीच जन्मतिथी!!विभाला कड्या सुटू लागल्या होत्या.तो भास नव्हता तो संकेत होता.
ती मंदिराकडे गेली,तसं पिंपळाच्या झाडाची सळसळ वाढली होती.झाडावरून टपकन काहीतरी खाली पडल.दगड होता तो आणि पडला तिथे टणकण आवाज आला,तिने पाहील तर तिथे छोटी छोटी बरीच पिंपळ रोपं होती.
तिला पुन्हा आवाज आला,“मला सोडव रमा”...तसं तिने त्या रोपांखालच्या जागेवर हात फिरवला.
घरी येऊन नानाजीना सांगितलं “आपण तिथ खोदकाम करायला हवं.”
विभाच्या हट्टापायी त्यांनी चार मजूर बोलावून आणि सरपंचयांना बोलावून खोदकाम केलं.खोदता खोडता टण ..आवाज आला.एक पेटी मिळाली.ती उघडली त्यात अष्टभुजा देवीची सुबक मूर्ती होती.गावकऱ्यांनी जल्लोष केला.पौर्णिमेला देवीचा अभिषेक आणि स्थापना करायची ठरवली.
विभाच्या आनंदाला पारावर नव्हता.घरी आली परत दस्तावेज पाहिले...एका फोटोच्यामध्ये चिठ्ठी सापडली.. “माझी देवी हरवणार आहे .तिच्या रुपाशिवाय मला चैन पडणार नाही पण तिला वाचवायला पाहिजे.”
विभाच विचार चक्र सुरु झाले.नक्कीच पणजीने मूर्ती सुरक्षित रहावी म्हणून इथे पुरली असणार आणि कोणाला सांगण्याआधी त्यानी या जगाचा निरोप घेतला.पण पणजीच लागोबंध देवीशी जुळले होते आणि पणजीच माझ्याशी?
पौर्णिमा आली विभाने सांगितलं “मी देवीला वस्त्र आणलाय आणि दक्षिणा”.
तिने तो पुरचुंडीमधला रुपया पुढे ठेवला आणि वस्त्र होत ते हिरव पणजीच लुगडं!!
समाप्त.
-भक्ती

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Apr 2021 - 3:49 pm | प्रचेतस

व्वा...!
कथा मस्त वळण घेत चाललीय.

पुभाप्र

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Apr 2021 - 4:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट इथेच संपली आहे.
शेवटी दि एन्ड चा बोर्ड पण लावला आहे.
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

6 Apr 2021 - 4:09 pm | प्रचेतस

अररर, मला वाटलं पुढं कथा आहे अजून.

पैजारबुवा धन्यवाद!
प्रचेतसाठी हसाव का रडाव ही स्मायली द्या पाहू इथे?
:-)

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 12:57 pm | चौथा कोनाडा

दि एन्ड चा बोर्ड नीट न लावल्यामुळे कथा आणखी पुढे आहे असं समजायला वाव आहे.
प्रचेतस यांचा तसा गैरसमज झाला असल्यास त्यांची चूक नाही !

नावाच्या आधीच्या ओळीत अंतर हवं होतं : या प्रमाणे

पौर्णिमा आली विभाने सांगितलं “मी देवीला वस्त्र आणलाय आणि दक्षिणा”.
तिने तो पुरचुंडीमधला रुपया पुढे ठेवला आणि वस्त्र होत ते हिरव पणजीच लुगडं!!

समाप्त.

-भक्ती

Bhakti's picture

9 Apr 2021 - 3:38 pm | Bhakti

अच्छा! लक्षात ठेवणे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 3:57 pm | ॲबसेंट माइंडेड ...

जमली आहे कथा.
शुद्धलेखनावर थोडी मेहनत घ्याच पण. म्हणजे अजुन चांगली वाटेल.

Bhakti's picture

6 Apr 2021 - 4:40 pm | Bhakti

खरच का!
डोळ्यात तेल घालत परत लिहील होत ,असू द्या.जमल्यास कोणी माझ्या खरडवहीवर चार पाच,दहा बारा असतील तेवढे अशुद्ध शब्द द्या प्लीज!
तूर्तास धन्यवाद :)

तुषार काळभोर's picture

7 Apr 2021 - 8:24 am | तुषार काळभोर

पण शेवट खूप म्हणजे खूप घाईत आवरला असं वाटलं.
शुद्धलेखनावर खूप मेहनत घ्यावी लागेल.
काही छोट्या चुका आहेतच. पण ही जास्त मोठी चूक >
त्यात आत खूप जुनी मंदिर आहेत त्याट काही आपल्या वंशजांनी बांधलेली आहेत.
>> पूर्वजांनी हवं.

वंशजांनी ऐवजी पूर्वजांनी हवं.हो की. तुम्ही दिलेल्या सूचनांचा खूपच फायदा झाला.धन्यवाद!

आंबट गोड's picture

7 Apr 2021 - 12:22 pm | आंबट गोड

ही वाक्यं तुम्हीच वाचून पहा...

झाडांची सळसळ त्यात मुर्त्यांच देखण रूपड वाऱ्याच्या गारवा शरीराला तर मोहक मूर्तीच रूपड डोळ्याला थंडाई देत होतं.
काही कारणांनी भंग पावाट
विभा राणी आग कधी येतेस गावाला

Bhakti's picture

7 Apr 2021 - 1:01 pm | Bhakti

ओके!

कथा वाचुन अरुंधती चित्रपटाची आठवण झाली . त्यामधे पणजीचे नाव जेजम्मा असते .

अरे वाह! मराठी सिनेमा आहे का?

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा

रोचक कथा !
छान जमलीय !