पिफ्फ, पायरसी आणि शिफ्ट ७२

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
25 Mar 2021 - 1:28 pm

लॉकडाऊन २०२० नंतर "न्यू नॉर्मल" होण्यासाठी सर्वांचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. तळागाळातील बहुतेक लोकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. करमणूक क्षेत्र देखील याला अपवाद नव्हते. काही मोठ्या कलाकारांनी बॅकस्टेज कलावंतासाठी मदत उभा करून त्यांना दिलासा द्यायाचा प्रयत्न केला. सिनेमागृहे निर्बंधासह उघडली तरी प्रेक्षकांनी पाठच फिरवली. अन याच पार्श्ववभूमी वर चित्रपट महोत्सव होणार की नाहीत अश्या चर्चा रंगायला लागल्या.

qwr2309

पिफ्फ अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर सावट जाणवू लागले. महोत्सवा भरवण्यासाठी आर्थिक रसद मिळणे अवघड झाले. शासन आणि विविध यंत्रणांचा कोरोनाच्या आर्थिक आव्हानाला पुरे पाडण्यासाठी धडपड सुरु होती. शेवटी एकदाचा जानेवारी २०२१ होता होता मार्च मध्ये कोविडनियमानुसार ५०% प्रेक्षकांसह पुण्याच्या मोजक्या चित्रपटगृहांमध्ये करण्याचे ठरले. पण हाय रे दैवा, कोरोनाचा विळखा पुन्हा वाढत चालला तसा पिफ्फला ऑनलाईन येण्याशिवाय गत्यंतर नव्हते. १८ मार्च पासून सुरु झालेल्या पिफ्फचा आज म्हणजे २५ मार्च २०२१ रोजी शेवटचा दिवस आहे.

123eHNBDH2ert4

या वेळच्या ऑनलाईन पिफ्फचं वैशिष्टय म्हणजे न्यझीलँडच्या " शिफ्ट ७२" तंत्रज्ञानाचा वापर. या तंत्रज्ञानामुळे एका प्रेक्षकाला एकावेळी एकच डिव्हाईस वर लॉगिन करता येणार, चित्रपट प्रेक्षकाच्या नावाचा वॉटरमार्क दिसत असल्याने कॉपी घेता येणार नाही, स्क्रीन शॉट घेता येणार नाही. आणि एक चित्रपट ८ तासाच्या अवधीत कधीही पाहता येणार !
या ऑनलाईन पिफ्फला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं जातंय.
" शिफ्ट ७२" हे तंत्रज्ञान माझ्या माहितीनुसार भारताच प्रथमच वापरलं जात आहे.

HNBDHhgft2234

शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे,
भारतीय मनोरंजन सृष्टीत आगामी काळात प्रचन्ड उलथापालथ चित्र पूर्ण बदलून जाईल असं वाटतंय.
या क्षेत्रातले भुरटे चोर उपाशी मारण्याची शक्यता आहे !

तुमचा आता पर्यंत शिफ्ट ७२ शी संबंध आला आहे का ? कसं काम करतं हे तंत्र ?
पायरसीवाल्या लोकांना या तंत्रज्ञानाला पुढेमागे झुकांडी देता येईल ?

भारतीय आयटी तंत्रज्ञांचा कायम उदोउदो केला जातो, मग अश्या तंत्राचा शोध भारतात का लागू शकत नाही ?
भारत यात का आत्मनिर्भर होऊ शकत नाही ? दरवेळी भारताला इतर प्रगत देशांकडेच का पाहावे लागते ?

तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ?

तंत्रलेख

प्रतिक्रिया

खेडूत's picture

25 Mar 2021 - 2:10 pm | खेडूत

चांगली ओळख.
याविषयी पूर्वीही चर्चा झाली आहे. भारतीय आयटी उद्योग पैसे टाकले की काम करतो. अशक्य काही नाही. कुणी कंपनी काम घेऊन आली तर हेही करतील.

उदा. जियो टी व्ही मोबाईलवर पाहताना स्क्रीन शॉट घेता येत नाही. कालनिर्णय पंचांगाचा स्क्रीन शॉट घेता येत नाही.. आणखी काही अप आहेत.. आत्ता आठवत नाहीत पण ती कॉपी करून देत नाहीत.

स्वलिखित's picture

26 Mar 2021 - 10:16 am | स्वलिखित

कालच एक piktale नावाचे social मीडिया app ,store वरती आले आहे , त्यातही कुठेच स्क्रीन शॉट घेता येत नाही , आपला फोटो सुद्धा कोणी चोरी करू शकत नाही, शिवाय शेअर करताना family , friends , colluge अशा कॅटेगरी आहेत ,ज्याने त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला आपली पोस्ट दिसत नाही , एकंदरीत छान आहे , privacy साठी

चित्रपट प्रेक्षकाच्या नावाचा वॉटरमार्क दिसत असल्याने कॉपी घेता येणार नाही

>>
यासाठी वापरकर्त्याचं 'खरं' नाव व्हेरिफाय करूनच प्रवेश मिळाला तर याचा उपयोग होईल.
अन्यथा "पैलवान" नावाचा वॉटरमार्क दिसून "तुषार काळभोर" पर्यंत पोहचता येणार नसेल तर अवघड आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Mar 2021 - 5:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

अश्या ठीकाणी हे दिसतात वॉटरमार्क. त्याची मॅपींग सगळीकडे केलेली असते, त्यामुळे अगदी सहज शोधता येतं.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Mar 2021 - 5:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

शिफ्ट ७२ बद्द्ल महिती नाही, पण आपण जो स्क्रीनवरच्या वॉटरमार्क चा उल्लेख केलाय, ते तंत्रज्ञान खुप दिवसांपासुन भारतातही आहे. डी२एच मध्ये वेगवेगळ्या वेळी हेक्साडेसिमल टेक्स्ट येतात, ते हेच.

ते रॅडम टेक्स्ट तुमच्या अकाऊंट्ला मॅप होते, अन पायरेटेड व्हिडियो मध्ये ते सापडले, तर बॅकट्रेसींग सहज शक्य होते.

तुषार काळभोर's picture

25 Mar 2021 - 5:59 pm | तुषार काळभोर

ते अंक म्हणजे आपली ओळख असतात!
मला इतकी वर्षे वाटत होतं की तो काही तरी डिजिटल एरर आहे!!
(कपाळावर हात मारणारी स्मायली)

फारएन्ड's picture

26 Mar 2021 - 12:49 am | फारएन्ड

तुषार - मलाही वाटायचे की आमच्या केबलवाल्याने कोठूनतरी पायरेटेड चॅनल घेतले आहे आणि त्यामुळे तो हेक्स नंबर दिसत आहे :)

सेम हियर. एररच वाटायची ती.

हे राम..

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2021 - 9:00 pm | चौथा कोनाडा

ते रॅडम टेक्स्ट ...

हो, तो त्या त्या सेट टॉप बॉक्स साठी विशिष्ट क्रमांक असतो, ज्याने कार्यक्रमाचा टीआरपी देखील मोजता येतो.
(हा बॅकग्राऊंडला हॉपींग कोड (बदलता संकेतांक) असतो का ते माहित नाही.
त्याला व्हीसी नंबर (व्हेरीफिकेशन कोड ? ) म्हणतात असं वाचल्यासारखं वाटतंय.
पण, वॉटरमार्क हे प्रकरण या पेक्षा वेगळं असावं असं वाटतंय, सध्या चित्रपट महोत्सव आणि सिनेमा रिलीज साठी हे तंत्रज्ञान अगदी अलीकडचं म्हणून वापरलं जातयं !

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Mar 2021 - 5:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

वॉटरमार्कींग एक बेसिक तंत्र आहे, कुठुन लीक झाला असावा त्याचा अंदाज मांडण्यासाठीच. शिफट ७२ अजुनही वेगवेगळे प्र्कार वापरत असेल.
नेटफ्लिक्सने नुकतेच जीपीएस एनेबल्ड टेकनीक अ‍ॅड केलंय. ज्यात ते लॉग इन केलेल्या डीव्हाईसचे लोकेशन ट्रॅक करुन अकाऊंट शेअरींग प्रकार बंद करणार आहेत, असा काहीसा प्लॅन आहे.

> या क्षेत्रातले भुरटे चोर उपाशी मारण्याची शक्यता आहे !

ह्या क्षेत्रांतील भुरटे चोर खरे चित्रपट निर्माते आहेत. प्रचंड प्रमाणात काळा पैसा करून, विदेशी कथानके आणि संगीत चोरून, डिस्ट्रिब्युटर ना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे चित्रपट आमच्या घश्याखाली घालतात, आपल्याच मंडळींकडून त्यांना भिकार अवॉर्ड्स देतात आणि सामान्य जनतेला "पायरसी" करू नका असले सल्ले देतात.

ज्या दिवशी प्रीतम आणि अन्नू मलिक ह्यांना कुणी दरवाजापुढे उभे करून घेणार नाही त्या दिवशी पायरसी संपली असे समजावे. नाही तर कोरियन गाणी हिंदीत ऐकण्यासाठी का बरे पैसे मोजावेत ?

मी तर, हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे ...

टाॅकीज मध्ये तर अजिबातच नाही ....

जे दिसतं ते कॉपी करता येतं. स्क्रीन शॉट घेणे डिसेबल करणे, स्क्रीन रिकॉर्डिंग डिसेबल करणे, राईट क्लिक डिसेबल करणे असे उपाय करणारी apps आणि वेबसाईट्स सुरक्षित मानणे (म्हणजे तिथून आपले खाजगी फोटो,दुर्मिळ व्हिडिओ, कॉपीरायटेड डिझाईन अथवा चित्रे वगैरे "कॉपी" होऊ शकणार नाहीत असे समाधान मानणे) भोळेपणाचे आहे.

दुसर्या क्यामेर्याने या स्क्रीनचा फोटो काढणे, किंवा व्हिडिओ काढणे हे डिसेबल करता येणार नाही.

क्वालिटी कमी होईल, थोडे जास्त कष्ट पडतील, पण कॉपी होणार.

नोटांची झेरॉक्स किंवा scan करता येऊ नये म्हणून त्यात विशिष्ट प्याटर्न छापून वरुन scanner , printer , photocopy मशीन्स या सर्वांना तांत्रिक बदल करायला लावले गेले तत्सम काही केले तरच शक्य.

चौथा कोनाडा's picture

26 Mar 2021 - 5:27 pm | चौथा कोनाडा

जे दिसतं ते कॉपी करता येतं. दुसर्या क्यामेर्याने या स्क्रीनचा फोटो काढणे, किंवा व्हिडिओ काढणे हे डिसेबल करता येणार नाही.

आणि त्यात दिसणारे वॉटरमार्क पुसट करण्याची किंवा घालवून टाकण्याची युक्ती भुरट्यांनी शोधलं की झालं !
;-))

टर्मीनेटर's picture

26 Mar 2021 - 6:35 pm | टर्मीनेटर

आणि त्यात दिसणारे वॉटरमार्क पुसट करण्याची किंवा घालवून टाकण्याची युक्ती भुरट्यांनी शोधलं की झालं !

त्याची युक्ती शोधायची गरजच नाहीये, त्यासाठी सॉफ्टवेअरर्स खूप वर्षांपासून उपलब्ध आहेत.
तसेच कुठलाही बऱ्यापैकी व्हिडीओ एडिटर वापरून वॉटरमार्क च्या वर हवा तो लोगो, इमेज गेला बाजार काळी पट्टी असे काहीही असलेला एक लेअर ओव्हरलॅप करण्याचा सोप्पा मार्गही आहेच की 😀
आणि हो ही सॉफ्टवेअर cracked स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत.

टर्मीनेटर's picture

26 Mar 2021 - 8:07 pm | टर्मीनेटर

माझ्या अल्पमती नुसार काही गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय
" शिफ्ट ७२" हे तंत्रज्ञान नाही. ती एक युट्युब, व्हिमिओ आणि अशा अनेक व्हिडीओ स्ट्रीमिंग, व्हिडीओ होस्टिंग, OTT प्लॅटफॉर्म सोल्यूशन SAAS (Software as a service) प्रकारची सेवा देणारी कंपनी आहे. अशा सेवा देणारी प्रत्येक कंपनी वेगवेगळी फिचर्स देऊ करते त्यापैकी वॉटर मार्क हे त्यांचे एक फिचर आहे (तंत्रज्ञान नव्हे).
ज्यांना पायरसी करायची आहे त्यांच्यासाठी हे वॉटरमार्क हटवणे / लपवणे ही अजिबात कठीण गोष्ट नाही.
तुम्हाला किंवा कोणालाही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी5 सारखा स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरु करायचा असल्यास किंवा फिल्म फेस्टिवल, शॉर्टफिल्म फेस्टिवल भरवायचा त्यांची सेवा घेऊ शकता. मासिक पॅकेज $399 + Gst (सुमारे 34,172 रुपये) पासून सुरु होतात आणि तुमचा यूजर बेस व डिस्क स्पेसच्या मागणी नुसार किंमत वाढत जाते.

शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे

असं काही होण्याची शक्यता जवळपास नाहीच!
पायरसी करणारे हॅकर्स/क्रॅकर्स हे प्रचंड बुद्धीमान लोकं असतात. एखादे वेब अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर हॅक किंवा क्रॅक करणे हा त्यातल्या बहुतेकांचा पेशा नसून पॅशन असते. अशी क्रॅक केलेली सॉफ्टवेअर्स, गेम्स कॉपी केलेले चित्रपट, गाणी, वेब सिरीज ही मंडळी टोरंट, फाईल शेअरिंग साईट्स वर विनामूल्य उपलब्ध करुन देत असतात. आणि असे चित्रपट, गाणी स्वतः डाऊनलोड करुन किंवा कोणा मित्र मैत्रिणी कडून आपल्यापैकी कोणी कधीच घेतली नाहीत का? काही अपवाद असतील पण आपल्या फोन, पीसी, लॅपटॉप, mp3 प्लेअर मधल्या सर्व mp3 फाईल्स, चित्रपट आपण विकत घेतलेलेच असतात का? तसेच आपल्या पैकी सर्वांनी संगणक वापरायला लागल्या पासून सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअर्स लायसन्स व्हर्जनच घेतली किंवा वापरली आहेत का? जर वरील प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर त्यांना भुरटे (चोर) म्हणणे सयुक्तिक ठरेल नाहीतर असा चोरीचा माल (फुकटात) वापरणारे आपणही भुरटेच आहोत की!
आयटी क्षेत्रात भारताची जी प्रगती झाली ती पायरेटेड os आणि सॉफ्टवेअर्स मुळे हे उघड गुपित आहे!
कोणाचाही उपमर्द/हेटाळणी करण्याचा हेतू हा प्रतिसाद लिहिण्यामागे नाहीये.
अजून खूप काही लिहिता येण्यासारखे आहे पण विस्तारभयाने आता आवरते घेतो 😀

चौथा कोनाडा's picture

26 Mar 2021 - 10:44 pm | चौथा कोनाडा


शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे

असं काही होण्याची शक्यता जवळपास नाहीच!

हे वाचून पोपट झाला !
अर्थात का ते त्या खालचा परिच्छेद वाचून स्पष्ट झालं !
आमच्या सारख्या नॉन-आयटी लोकांना शिफ्ट७२ सारखं नविन काही दिसलं की भारी वाटतं !
(वाटणारच, कारण जे आपल्याला नाही ठावे, ते आपल्या दृष्टीने भारी)
प्रतिसाद तपशिल पुरेसे स्पष्ट करतात ते फिचर आहे, आणि पायरसीवाले त्यांचे बाप आहेत.

एखादे वेब अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर हॅक किंवा क्रॅक करणे हा त्यातल्या बहुतेकांचा पेशा नसून पॅशन असते.

+१
बाकी, आम्हीतर चोरमंडळीपैकीच आहोत ! 😀

धन्यवाद, टर्मीनेटर 👍