दगड

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
5 Mar 2021 - 6:41 pm

शिल्पकार आणी शिल्पकला प्राचीन भारतात कीती प्रगत होती याचे पुरावे जागोजागी अढळतात.
माझा काही अनुभव शेअर करतो.
जबलपुर भेडाघाट लाईमस्टोन, जयपुर मकराणा मार्बल स्टोन ताजमहाल आणी अलीकडची बिर्ला मंदिर , जैन मंदिरे मध्यप्रदेश खजुराहो मंदिरे , सँण्ड स्टोन, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू कृष्णशिळा ब्लँकस्टोन, तिरुपती बालाजी ग्रानाईट आसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांमधून आपल्या पूर्वजांनी अद्भुत शिल्प निर्माण केली आहेत.
पुण्यात बदली झाल्यावर विचार केला दक्षिण भारतात प्रवासाला जाऊया.
मदुराई, कोडाईकँनाल, रामेश्वरम- कन्याकुमारी आणी त्रिवेंद्रम आसा दहा दिवसाचा प्रोग्राम. मुख्य म्हणजे भाषेचा प्रॉब्लेम.
माझा एक सहकारी ,उजवा हातच म्हणाना रामनाथपुरमचा , मला म्हणाला सर काळजी करू नका माझा मेव्हण्याची गाडी आहे तो तुम्हाला सगळीकडे फिरवेल. तुम्ही मदुराई ला जा तिथून तो तुम्हाला स्टेशनवर उतरून घेईल.
ठरल्याप्रमाणे घटना घडल्या, सर्वच वर्णन केले तर खुपच मोठ्ठं कदाचित कंटाळवाण पण होईल.
शिल्पकला या अनुषंगाने एक अनुभव फक्त सांगतो.
कन्याकुमारी ला पोहोचल्यावर त्याने आम्हाला शुचिंद्रन मंदिर दाखवले. त्रावणकोरच्या राजाने बनवले.
त्याला बरीच माहिती, कन्याकुमारी वरून त्रिवेंद्रम ला निघालो मधेच नागरकोईल ला भेट दिली व पुढे निघालो, पदम्नाभपुरम, वर्मन राजांची राजधानी बघीतली. जाताना आमचा सहप्रवासी म्हणला सर याच रस्त्यावर देवाच गाव आहे. मायलादी गाव त्याच नाव कृष्णशिळेतून देवी देवतांच्या मूर्ती इथेच बनतात. कन्याकुमारी चे शुचिंद्रन मंदिर याच्याच पूर्वजांनी बनवले. कृष्णशिळा मधे देवाच्या मुर्ती बनवतात.
तिथेच मला कळाले दगडांमधे पण स्त्री आणि पुरुष आसे भेद आहेत. पुरूष देवतांच्या मूर्ती पुरूष दगडांमधून तर देवींच्या मुर्ती स्त्री दगडांमधून बनवल्या जातात. कलाकार मुर्ती घडवण्याच्या आगोदर हाथोडा मारून दगडाचा प्रकार निश्चित करतात.जर हार्ड आवाज म्हणजे पुरुष आणी साँफ्ट आवाज म्हणजे स्त्री दगड. अर्थात हाडाच्या कलाकारांना च याचे ज्ञान.या भागातील कलाकार शेकडो वर्षांपासून या कला क्षेत्रात कार्यरत आहेत. दगडाच्या निवडी पासून ते मुर्ती देवळात बसवण्यात पर्यंत प्रत्येक कृती शास्त्रशुद्ध आणी धार्मिक रितीरिवाजा प्रमाणेच होतात. ते पण एक मोठ्ठे प्रकरण होऊ शकेल.
सगळ्या त कठीण कृष्णशिळा तर सगळ्यात नाजुक लाइम आणी सँण्ड स्टोन. पण कलाकार तो कलाकारच जशी आईच्या चापटीने बाळ दुखावत नाही तसेच काहिसे कलाकार, दगड आणि छिन्नी हातोडीचे नाते.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:17 pm | मुक्त विहारि

दगडात पण, स्त्री आणि पुरूष, हा भेद असतो, हे प्रथमच समजले...

कंजूस's picture

5 Mar 2021 - 8:43 pm | कंजूस

लेख थोडा वाढवा.

नागरकोईलचे नागाचे मंदिर पाहिले मी.
देवळाबाहेर मी पांढरी लुंगी ( धोती) नेसायला घेतली. तिथे एक जण होता. त्याने खुणेनेच सांगितले की गरज / आवश्यक नाही. जा आहे त्या कपड्यात. इतर मंदिरांत मात्र धोती ( चौकडीची निळी नाही, पांढरी किंवा केशरी) नेसावी लागते. सुचिंद्रमचे दगडी खांब छान वाजतात. आणि ते वाजवू देतात. पद्मनाभातले ( दीडशे असतील) मात्र बंदिस्त करून ठेवले आहेत.

टर्मीनेटर's picture

6 Mar 2021 - 5:48 pm | टर्मीनेटर

गारगोटी ते ग्रॅनाईट अशा सर्वच प्रकारच्या दगडांचे आपले आपले सौंदर्य आणि वैशिष्ठे आहेत. माझ्या आवडीच्या विषयावरील लेख आवडला आणी त्यातुन नवीन माहीतीही मिळाली.
धन्यवाद 🙏

चौथा कोनाडा's picture

6 Mar 2021 - 5:54 pm | चौथा कोनाडा

दगडांमधे पण स्त्री आणि पुरुष आसे भेद आहेत. पुरूष देवतांच्या मूर्ती पुरूष दगडांमधून तर देवींच्या मुर्ती स्त्री दगडांमधून बनवल्या जातात.

हे प्रथमच वाचण्यात आले.
छान आहे लेख.

रंगीला रतन's picture

6 Mar 2021 - 8:49 pm | रंगीला रतन

कर्नल साहेब लेख आवडला.

सिरुसेरि's picture

7 Mar 2021 - 1:50 pm | सिरुसेरि

छान माहिती . पुर्वी दुरदर्शनवर दर रविवारी दुपारी १.३० वाजता विविध भारतीय प्रादेशीक भाषांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दाखविले जात असत . त्यामधे , एका कन्नड चित्रपटात , एक जुन्या काळातील अनुभवी वास्तुशिल्पतज्ञ आपल्या शिष्यांना एका मंदीरातील स्त्री आणी पुरुष पद्धतीच्या पाषाण स्तंभांमधील फरक नादध्वनी द्वारे दाखवत असतो असा प्रसंग बघितल्याचे आठवते आहे .