कार्बन प्रदूषण

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
17 Feb 2021 - 5:42 am
गाभा: 

कार्बन प्रदूषण

climate change

ग्लोबल वॉर्मिंग ह्या विषयवार खूपच लिहिले जाते पण बहुतेक माध्यमे (जी डाव्यांच्या खिश्यांत आहेत) ह्यावर लिहिताना अतिशय एकांगी पणे लिहितात. जणू काही पुढील काही वर्षांत जग नष्ट होणार आहे आणि हे रोखायचे असेल तर सर्व सत्ता आणि सूत्रें आम्हा 'एक्सपर्ट' मंडळींच्या हाती द्या असा सूर ह्या मंडळींचा असतो.

पण प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू असते. हि बाजू मांडणे महत्वाची आहे. सर्वच बाजू मांडायची झाली तर मग खूप लेख लिहावे लागतील पण दोन प्रमुख "खोट्या समजुतीचे" भेद इथे केले आहेत. वाचकांनी ह्यावर विचार केला होता कि नाही हे प्रतिक्रियांत सांगावे.

१. झाडे हि जगाची फुफ्फुसे आहेत.

असे अनेक लोक लिहितात. हे खोटे आहे. झाडे हवेंत असलेला co2, जमिनीतून शोषून घेतलेले h २ o आणि सूर्यप्रकाश ह्यांच्या माध्यमातून जी प्रक्रिया आपल्या शरीरांत करतात त्यातून दोन प्रमुख घटक निर्माण होतात. प्राणवायू आणि असंख्य प्रकारचे कार्बन आणि हैड्रोजन ह्यांचे हायड्रोकार्बन. झाडे मग हे हैड्रोकार्बन आपल्या शरीरांत लाकूड, पाने, मुळे, फळे म्हणून स्टोर करतात ज्याला आपण झाडाची वाढ म्हणतो.

फुफ्फुसे प्राणवायू हवेंतून शोषून घेतात आणि आपण खालेलले हायड्रोकार्बन, रक्त इत्यादी पदार्थ वापरून त्यांच्यापासून ऊर्जा निर्माण करतात ज्याद्वारे आम्ही मसल वापरून ती ऊर्जा इतर गोष्टींत ट्रान्स्फर करतो. बदल्यांत आम्ही हवेंत co2 सोडतो. पण माणूस ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही. खूप माणूस पृथ्वीवर असले तर मोठ्या प्रमाणावर c02 निर्माण होत जाईल. पण खूप झाडे असली तर खूप प्रमाणावर हवेंत प्राणवायू सोडला जाईल का ?

झाडाची पाने गळतात तेंव्हा त्यातील हैड्रोकार्बन जीवजंतू खाऊन हवेंत पुन्हा c02 सोडतात. आपण फळे खातो तेंव्हा पुन्हा त्या फळांतील c02 ला आपण मुक्त करतो. झाडाची कात कुसून पडते तेंव्हा पुन्हा त्यातील c02 ला छोटे जीव जंतू मुक्त करतात.

चाणाक्ष वाचकांना इथे लक्षांत आले असेल कि एखादे झाड पूर्ण वाढले म्हणजे त्याची वाढ थांबली तर त्याचाच अर्थ असा होतो कि हवेंतून c02 शोषून घेण्याची त्याची क्षमता शून्य झाली. म्हणजे साधारण वर्षाला जितका c02 हे झाड आपल्या शरीरांत साठवते तितकाच बाहेर सुद्धा फेकून देते. कॅनडा ह्या देशांत प्रचंड जंगले आहेत. जी जंगले खूप मोठी असली तरी c02 च्या दृष्टिकोनातून कार्बन पॉसिटीव्ह आहेत. म्हणजे हि c02 हवेंत सोडतात, कमी करत नाहीत. जे जंगल वेगाने वाढत आहे ते c02 हवेंतून शोषत आहे असे आपण म्हणून शकतो पण ज्या जंगलाची वाढ थांबली आहे त्याचा वातावरणातील c02 वर परिणाम शून्य असतो.

हे शालेय विज्ञान आहे. अर्थांत c02 वर झाडांचा विशेष परिणाम होत नाही ह्याचा अर्थ झाडे निरुपयोगी आहेत असा होत नाही झाडांचे आणि जंगलांचे प्रचंड फायदे पर्यावरण दृष्टिकोनातून आहेत आणि झाडांचे संवर्धन महत्वाचे आहे पण c02 आणि त्यांचा संबंध नाही.

आता एक झाड मारून तुम्ही त्याचे लाकूड घरबांधणीसाठी किंवा फर्निचर साठी वापरले आणि हे फर्निचर तुम्ही पुढील १०० वर्षे वापरले तर त्याचा पर्यावरणावर जास्त चांगला परिणाम होतो. कारण झाड मारून (ज्याने कदाचिन्त १ टन कार्बन आपल्या शरीरांत ठेवला होता) आपण तो कार्बन पुढील १०० वर्षे वापरणार आहात पण झाड मारल्याने त्याजागी नवीन झाड येऊन ते आणखीन १ टन कार्बन आपल्या शरीरांत साठवेल त्यामुळे एकूण दोन टन कार्बन आपण हवेंतून कमी केला.

ह्याउलट पेपर आहे. आपण कागद वापरला कि तो फेकून देतो, तो तात्काळ कुजतो आणि त्यातील c02 पुन्हा हवेंत जातो. कागदा ऐवजी कपड्याची पिशवी जास्त चांगली कारण हि तुम्ही वर्षभर वापरू शकता. किंवा १०० कागदांच्या पिशवी ऐवजी प्लास्टिक ची एक पिशवी वर्षभर वापराने सुद्धा जास्त चांगले. c02 हवेंत न सोडण्यासाठी.

दीर्घकाळ वापरासाठी लाकूड वापराने हे स्टील किंवा प्लास्टिक पेक्षा c02 च्या दृष्टिकोनातून नेहमीच चांगले.

जर जगांतील जंगले वाढत नसतील तर मानव जो c02 बाहेर फेकत आहे ( श्वास घेऊन किंवा प्रेट्रोल जाळून) तो रिसायकल होतच नाही असा त्याचा अर्थ होतो का ? किंवा उद्या सर्व झाडे गायब झाली तर हवेंतील c02 चे प्रमाण अचानक वाढून आम्ही मरणार नाही असा ह्याचा अर्थ होतो का ?

इतकेच नाही तर निव्वळ उदाहरण द्यायचे म्हणून जर आपण ह्या जगांतील प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक झाड, गावत, लाकडी वस्तू, जंतू, प्राणी, माणूस ह्या सर्वाना आग लावून जाळले तर जो c02 हवेंत निर्माण होईल तो इतका कमी असेल कि हवेंतील एकूण प्राणवायूचे प्रमाण विशेष बदलणार नाही (जमिनीत असलेला कोळसा आणि इतर खनिज तेल ह्यांचा मी समावेश केला नाही). (प्राणवायूचे प्रमाण २०.९ टक्क्यावरून २०.४ वर येईल आणि c02 चे प्रमाण ४०० ppm वरून ९०० ppm वर येईल).

पण पृथ्वीवरील कार्बन इतका कमी कसा झाला ? तर करोडोवर्षांपूर्वी जी झाडे आणि प्राणी होते ते अचानक जमिनीच्या खाली गेले. त्यातून कोळसा आणि ईथर तेलांच्या स्वरूपांत पृथ्वीवरील कार्बन हा जमिनीच्या आंत गडप झाला. आपण आता हा बाहेर काढून जाळत आहोत. तुम्ही जेंव्हा आपल्या दुचाकीत तेल घालता तेंव्हा प्रत्यक्षांत तुम्ही कोट्यवधी पूर्वीचे जंगल आणि प्राण्यांची शरीरे जाळत आहात.

पण हा कार्बन सुद्धा जास्त नाही. पण आपण हवेंतील c02 वाढवत आहोत हे नक्की.

झाडे हि जगाची फुफुसे नाहीत. हवेंतील c02 कमी करण्यासाठी झाडे उपयुक्त नाही आहेत.

२. c02 मुळे हवेचे प्रदूषण होते

मानवी शरीरासाठी c02 हानिकारक नाही. आपण c02 फुफुसांत घेतला म्हणून काहीही नुकसान होत नाही. c0 ह्याच्या उलट आहे. c0 मुळे शरीराला खूप नुकसान होते त्याशिवाय so२ इत्यादी मुळे शरीराला अपाय होतो पण c02 निरुपद्रवी आहे.

c02 हा झाडांसाठी खूप चांगला आहे. हवेतील c02 चे प्रमाण वाढल्याने बम्पर पीक येते, झाडांचा गवताचा, वाढण्याचा दर वाढतो. हवेंतील c02 चे प्रमाणे थोडे जर वर गेले तरी ऍमेझॉन, भारत चीन मधील जंगले वेगाने वाढतात. ह्या उलट प्राणवायूचे प्रमाण वाढले तर जंतू, जीव इत्यादींचा आकार आणि संख्या दोन्ही वाढते.श्वास ह्या दृष्टिकोनातून c02 हा हानिकारक नाही तर इतर वायू जास्त हानिकारक असतात. हवेंतील c02 चे प्रमाण ह्याचे इतर दुष्परिणाम असू शकतात पण हवेंतील c02 चे प्रमाण आणि हवेची स्वच्छता ह्याचा थेट संबंध नाही.

पण मग ग्रीन हाऊज इफेक्त्त चे काय ? c02 वाढत जाऊन पृथ्वी एखाद्या भट्टी प्रमाणे पेटणार ह्याचे काय ? c02 हा ग्रीन हाऊज गॅस आहे ह्यांत काहीही दुमत नाही. प्रयोगशाळेंत प्रयोग करून ते पाहणे सहज शक्य आहे पण संपूर्ण पृथ्वी हि प्रयोगशाळा नाही.

जेंव्हा आधी ग्रीन हाऊज इफेक्त्त चा शोध लागला होता तेंव्हा संशोधकांनी ह्या प्रकारातील क्लिष्टता समजून घेतली नाही पण विविध राजकीय संस्थांना हे चांगले हत्यार मिळाले. c02 चे निमित्त देऊन ऊर्जा व्यवस्थेला आपल्या हातांत घेतले तर इतर सर्व उद्योग आपोआप आपल्या हातांत येतील हे अनेक राजकीय पक्षांनी ताडले. ब्रिटन मधील कोळसा युनियन बलाढ्य युनियन होती आणि पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांच्या पायातील काटा बनून राहिली होती. ग्लोबल वॉर्मिंग हे एक शस्त्र थॅचर नी त्यांच्या विरोधांत उगारले. आज ग्लोबल वॉर्मिंग हि डाव्या लोकांची मुव्हमेंट आहे पण ह्याचा पाय थॅचर ह्यांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थॅचर ह्यांनी फूस लावून २००० मध्ये पृथ्वी वगैरे नष्ट होणार असली भाकिते सरकारी कृपेवर जगणाऱ्या "एक्स्पर्ट" नी सुरु केली. UN वगैरे शेवटी अमेरिका, इंग्लंड ह्यांच्या तालावर नाचत होती (आता चीन सुद्धा ह्यांत आलाय) त्यांनी सुद्धा री ओढली. [१]

c02 आणि त्याचा परिणाम ह्या विषयावर उपलब्ध असलेले एकूण संशोधन १९८० मध्ये विशेष नव्हते. c02 मुले गरमी वाढेल इतकेच काय ते भाकीत होते पण २००० पर्यंत अनेक संशोधकांनी ह्या विषयांत मोलाची भर घातली होती. १९८० मध्ये भाकितांना चुकीचे सांगणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली जात आहे. ग्रीन हाऊस गॅस हे साधे सोपे विज्ञान आहे आणि जास्त co2 म्हणजे जास्त गरमी हे ज्यांना समाजत नाही ते मूर्ख आहेत असे संशोधक तसेच राजकारणी मंडळी सांगत फिरत होती. पण साधारण १९९६ पर्यंत ह्या सर्व संशोधकांचे १००% भाकिते चुकलीच पण महा प्रचंड फरकाने चुकली. [३]

त्यातून आम्हाला कळले कि पृथ्वीचे तापमान हे इतिहासांत नेहमीच बदलत आले आहे. ते कधी थोडे थंड होते तर कधी जास्त गरम. हे नक्की का होते ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आज सुद्धा नाही पण मानव सोडून इतर अनेक गोष्टीवर हे अवलंबून आहे. c02 हा एकमें ग्रीन हाऊज गॅस नाही खरेतर सर्वांत महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे बाष्पीभूत झालेले पाणी. ह्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते पण वाढलेल्या तापमानाने आणखीन पाणी बाष्पीभूत होते आणि आणखीन गरमी वाढते. (ह्यामुळे अंटार्टिकावरील बर्फ वाढत आहे कमी होत नाही [२] ). समुद्र गरम झाला कि समुद्रांत विरघळलेला co2 बाहेर येतो आणि आणखीन गरमी वाढवतो. मग असे असेल तर आजची पृथ्वी महा प्रचंड गरम का नाही ? ह्याचे नक्की उत्तर आम्हाला ठाऊक नसले तरी विविध थेयर्या आहेत. शीत युगाचे सुद्धा मग असेच आहे. एकदा तापमान कमी झाले कि मग पाऊस जास्त पडतो, जास्त पावसाने तापमान आणखी कमी होते, जास्त पावसाने वृक्ष वल्ली आणखीन वाढून आणखीन तापमान खाली जाते, तापमान कमी असलेल्या समुद्रांत आणखीन co2 विरघळतो आणि तापमान आणखी कमी होते. असे असेल तर मग संपूर्ण पृथ्वी बर्फ आच्छादित का नाही ? ह्यावर सुद्धा १००% माहिती कुणालाच नाही.

पण २०२० मध्ये विविध विषयांवर जास्त संशोधन होऊन जास्त माहिती पुढे आली आहे. हि सर्वच माहिती नकारात्मक नाही तर वाढत्या co2 मुले पृथ्वीवर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सुद्धा त्यातून सामोरे आले.

पण अश्या संशोधनाची भीती विविध राजकारणी मंडळींना वाटत आली आहे त्यामुळे मिळेल तो मार्ग वापरून अश्या संशोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. सध्या प्रकरण इतक्या पराकोटीच्या लेव्हल ला पोचले आहे कि विज्ञान सोडून ग्रेटा सारख्या मतिमंद मुलांना आणि इंस्टाग्राम वर लाईक्स च्या शोधांत असणाऱ्या २१ वर्षीय पोरींना पुढे करून "भावनिक तर्क" वापरून लोकांना गप्प केले जात आहे. विज्ञानाच्या शोधांत काही लोक खोटे आणि काही लोक खरे ठरणार त्यांत काहीच वावडे नाही. पण ग्रेटा सारख्या लोकांना पुढे करणे किंवा बिल नाय सारख्या अभिनेते मंडळींना "संशोधक" म्हणून सर्वत्र फिरवणे हे माझ्या मते खोटारडे पणाचा पुरावा आहे.

co2 मुळे हवेचे तापमान थोडेफार वाढत असले तरी ह्याला प्रदूषण म्हणून संबोधने, ह्याचे फक्त नकारात्मक परिणामच होतील अशी भीती घालणे आणि त्यासाठी सत्ता आपल्या हातांत घेऊन बाबू आणि एक्स्पर्ट मंडळींना इतर लोकांवर राज्य करू देणे हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंग पेक्षा जास्त धोक्याचे आहे. कारण हि मंडळी आपल्याच लोकांवर जी बंधने टाकतील त्यानून आर्थिक प्रगती कमी होईल आणि त्यामुळे लक्षावधी लोक आता मरतील पण पुढील १०० वर्षांत पृथ्वीचे तापमान १ अंशाने वाढले म्हणून कोणी मरेलच ह्याची काहीही शक्यता नाही उलट कोणीही मरणार नाही ह्याची शक्यता जास्त आहे.

अमेरिकन राजकारणाचे परिणाम सर्वत्र होतात. रिपब्लिकन मंडळींनी जास्त टोकाची भूमिका घेऊन खनिज तेलाच्या मागे भक्कम सरकारी पाठिंबा ठेवला आहे. आणि डेमोक्रॅट मंडळींनी अगदी उलट दिशेने पाऊल ठेवले आहे. भारतांत महिलांना गर्भपात करण्यासाठी अमेरिकेने मदत केली पाहिजे अशी अनेक डाव्या मंडळींची भूमिका होती, तिथे बरणी सँडर्स ह्यांनी सहमती सुद्धा दर्शवली होती. प्रसंगी जे संशोधक ग्लोबल वॉर्मिंग विषयी साशंक आहेत त्यांना कैदेत डांबणार अशी भूमिका काही डेमोक्रॅट मंडळींची होती.

https://youtu.be/7I5RLbbXgPc

वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे आम्हाला आधीपासूनच ठाऊक आहे. अमेरिकेतून कुणी येऊन शिकवायला गरज नाही. पण अति सर्वत्र ... हेही आम्हाला ठाऊक आहे त्यामुळे सर्व भूतांशी प्रेम असले तरी खालील प्रकारच्या विकृती आपल्या समाजांत नकोच आणि विज्ञान सुद्धा हेच शिकवते.

- https://www.bbc.com/worklife/article/20190920-the-couples-reconsidering-...
- https://www.foxnews.com/politics/bernie-sanders-climate-change-abortion-...
- https://www.heritage.org/environment/commentary/prosecuting-climate-chan...
- https://www.foxnews.com/politics/professor-fired-after-expressing-climat...
- https://abcnews.go.com/blogs/technology/2012/07/climate-denialists-worse...

[१] https://www.history.com/news/margaret-thatcher-miners-strike-iron-lady
[२] https://insideclimatenews.org/news/31052016/why-antarctica-sea-ice-level...
[३] https://www.johnstossel.com/climate-myths/

टीप : प्रतिक्रियांना प्रत्युत्तर देण्याची प्रक्रिया मी बदलणार आहे. प्रामाणिक प्रश्न असला तरच उत्तर देणार आहे. माझ्यावर काहीही टीका केली तरी चालेल, वैयक्तिक हल्ले करायचे असल्यास कृपया विनोदी पद्धतीने लिहा म्हणजे करमणूक तरी होते. नाहीतर उगाच बॅण्डविड्थ खराब होऊन ऊर्जेची नासाडी.

प्रतिक्रिया

लेखाबद्दल धन्यवाद. तुमच्या लेखाची व त्याखालील लिंक्स ची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय उत्तर देणे योग्य होणार नाही. विषय पूर्ण वैज्ञानिक आहे आणि माझ्या मते यावर एकमत सुद्धा नाही.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 10:09 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

आग्या१९९०'s picture

17 Feb 2021 - 10:22 am | आग्या१९९०

त्यातून आम्हाला कळले कि पृथ्वीचे तापमान हे इतिहासांत नेहमीच बदलत आले आहे. ते कधी थोडे थंड होते तर कधी जास्त गरम. हे नक्की का होते ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आज सुद्धा नाही

अगदी बरोबर.

लेखातील बरेचसे मुद्दे पटले.

रॉबिन कुक (किंवा कदाचित दुसरा लेखक असेल) त्यांच्या पुस्तकात पण असेच मुद्दे वाचले आहेत. राजकारणी लोकांना उर्जा स्त्रोतांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचा बागुलबुवा उभा केला आहे. युरोप, अमेरीकेत अजुनही थंडी प्रत्येक सिझनला नविन उच्चांक करत आहे. पावसाचे प्रमाण्देखिल बरेच ठिकाणी वाढले आहे किंवा समाधानकारक आहे वगैरे वगैरे. त्यातले बरेच मुद्दे फॅक्ट दाखवुन लिहिलेले होते आणि त्यामुळे पटले.

प्रचेतस's picture

18 Feb 2021 - 11:37 am | प्रचेतस

मायकल क्रायटन-स्टेट ऑफ फियर

तुषार काळभोर's picture

17 Feb 2021 - 12:21 pm | तुषार काळभोर

प्रतिसादातून अधिक माहिती वाचायला मिळेल, ही अपेक्षा.

तुर्त, लहानपणापासून मनावर बिंबवलेले (जरी ते खोटे किंवा आता चुकीचे सिद्ध झाले असेल तरी) इतक्या सहजा सहजी जाणार नाहीच.

चौथा कोनाडा's picture

17 Feb 2021 - 1:28 pm | चौथा कोनाडा

रोचक विषय ! चर्चेकडे लक्ष ठेऊन आहे.

प्लास्टिक वापराबद्द्ल गैरसमज पसरवलेले आठवले. तज्ज्ञानी प्लास्टिक निर्मितिमुळे किती उर्जा बचत होते तुलनेने धातू किंवा इतर मटेरियल वापरून तयार केलेल्या वस्तू याची तुलना करून दाखवून दिले होते. तेच गणेशमुर्ती कागदाची तयार केली तर प्रदुषण शुन्य होते हे ही पसरवलेले आठवले !

प्रदूषणाचे मूलघटक : पर्यावरणात मुख्यत्वेकरून शिरणारी प्रदूषके म्हणजे ज्वलनक्रियेमुळे निर्माण झालेले पदार्थ, मानवी उत्सर्ग (मलमूत्र), निःश्वासित केलेले वायू, निरनिराळ्या वस्तूंचे सूक्ष्म धूलिकण, विकृतिकारक सूक्षजीव, विविध पदार्थांचे बाष्प कण, निरनिराळे विषारी वायू, विविध उद्योगांत वापरलेले विद्रावक (विरघळणारे पदार्थ), कृषिकार्यासाठी वापरलेली खते व कीटकनाशके ही होत. त्यांच्या जोडीला तापमानाच्या अतिरेकी सीमा, अवरक्त प्रारण (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग प्रारण म्हणजे तरंगरूपी ऊर्जा), जंबुपार प्रारण (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग) आणि क्वचित प्रसंगी तीव्र दृश्य प्रारण, आयनीकारक प्रारण (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणारे प्रारण) किरणोत्सर्गी समस्थानिकांनी (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक किरण बाहेर टाकणाऱ्या प्रकारांनी) बाहेर टाकलेले प्रारण, गोंगाट (अप्रिय आवाज), परा-उच्च कंप्रतेचे ध्वनी(प्रतिसेकंदास होणाऱ्या कंपनांची किंवा आवर्तनांची संख्या अतिशय उच्च असलेले ध्वनी) आणि विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मतरंगलांबीचे विद्युत् चुंबकीय प्रारण यांसारखे अनिष्ट घटक पर्यावरणात प्रदूषक म्हणून प्रवेश करतात. स्थलकालानुरूप ह्या भौतिक, रासायनिक व जैव घटकांचे प्रमाण व उपद्रव सह्य मर्यादांबाहेर गेल्यास प्रदूषण उद्‍भवते.

मानवाने अवलंबिलेल्या औद्योगिकीकरणामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सहा लक्ष टन अँटिमनी, तितकेच आर्सेनिक, दहा लक्ष टन कोबाल्ट, आठ लक्ष टन निकेल यांसारख्या विषारी मूलद्रव्यांचे कण वातावरणात विखुरले गेले आहेत आणि कोळसा, खनिज तेल व इतर जीवाश्मी (हायड्रोकार्बनयुक्त साठ्यांच्या रूपातील) इंधन जाळल्यामुळे गेल्या शंभर वर्षांत २५,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ३४,००० कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळला गेला, असा अंदाज करण्यात आलेला आहे. जंगलांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो पण १९५० सालानंतर जगात इमारती लाकडासाठी व इंधनासाठी बेसुमार जंगलतोड होऊन ६६% जंगलांचा विनाश झाला. त्यामुळे ऑक्सिजनाची उपलब्धता कमी झाली. औद्योगिकीकरणाबरोबर शहरांची संख्या व विस्तार वाढला. मोटारींची संख्या वाढली. त्याचबरोबर मोटारींनी बाहेर टाकलेला कार्बन मोनॉक्साइडसारखा विषारी वायू हवेत अधिकाधिक प्रमाणात मिसळू लागला. आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारी अत्याधुनिक स्वनातीत जेट विमाने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरतात आणि उच्चतर वातावरणात जलबाष्प व कार्बन डाय-ऑक्साइड सोडतात. तेथे जलबाष्पाचे मेघ बनतात आणि या सर्व घटनांमुळे स्थानिक जलवायुमानात (दीर्घ कालीन सरासरी हवामानात) बदल होऊ लागले. १९०० ते १९४० पर्यंतच्या कालावधीत उत्तर गोलार्धाचे सरासरी तापमान ०·६° से. इतके वाढले, तर पुढील तीस वर्षांत ते ०·३° से. ने कमी झाले, असे आढळून आले. तापमानऱ्हासाच्या अशा प्रवृत्तीमुळे हिमयुगाला प्रारंभ होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या प्रगत देशांत अनेक वस्तू काही काळ वापरल्यानंतर फेकून देण्यात येतात. त्यांत मुख्यत्वेकरून प्लॅस्टिकची भांडी, पिशव्या, आवरणे, वेष्टने, बाटल्या, टिनचे (कथिलाच्छादित पत्र्याचे) डबे, काचेची तावदाने, व इतर वस्तू आणि कागद यांचा समावेश असतो. थोडेसे नादुरुस्त असलेले दूरचित्रवाणी संच व मोटारगाड्याही फेकून देण्यात येतात. १९६० सालानंतरच्या अंदाजांप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये प्रतिवर्षी ६,००० कोटी टिनचे डबे, ३,००० कोटी बाटल्याव बरण्या, ४० लाख टन वजनाच्या प्लॅस्टिकच्या वस्तू, एक कोटी टन वजनाच्या लोखंड व पोलादाच्या वस्तू, ८० लक्ष दूरचित्रवाणी संच, ७० लक्ष ट्रक व मोटारगाड्या, ३ कोटी टन कागद व कागदी वस्तू त्याज्य म्हणून फेकून दिल्या जातात. शेतकी उद्योगातील २२८ कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, खनिज उद्योगांतून १७० कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, औद्योगिक प्रकल्पांतून बाहेर फेकलेले ११ कोटी टन वजनाचे पदार्थ, शहरी वस्त्यांतून साचणारा २५ कोटी टन वजनाचा कचरा व इतर त्याज्य पदार्थ एकत्रित केले जाऊन शहरांबाहेर टाकण्यात येतात. ह्या टाकाऊ वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर घाण पसरते व प्रदूषण उद्‍भवते. त्यातून उपद्रवी कीटक निर्माण होतात व वनस्पतींचा संहार होतो. अनेकदा टायरसारख्या निरुपयोगी रबराच्या वस्तू, कचरा, कागद वगैरे जाळण्यात येतात व राख नद्यांत किंवा समुद्रात फेकून देण्यात येते. त्यामुळे वातावरणीय व जलीय प्रदूषणाची आपत्ती ओढवते.

अणुस्फोटांमुळे निर्माण झालेले व अणुकेंद्रीय विक्रियकांतून (अणुभट्ट्यांतून) अभावितपणे वा अपघाताने निघालेले किरणोत्सर्गी कण आसमंतात विखुरले जातात. शेतातील पिकांवर, दुभत्या जनावरांच्या चाऱ्यावर, वनस्पतींवर, पाण्यावर व हवेत त्यांने अतिक्रमण होते. त्यामुळे परिणामी एक विषारी व प्राणघातक अन्नश्रृंखला [⟶ परिस्थितिविज्ञान] निर्माण होते. पिकांवर फवारलेल्या कीटकनाशकांचाही स्वल्प अंश ह्या अन्नश्रृंखलेत शिरतो. प्रदूषणाचे हे परिणाम फारच गंभीर स्वरूपाचे असतात.

बहुतेक सर्व प्रकारचे प्रदूषण औद्योगिक अपशिष्टांमुळे उद्‍भवते. या अपशिष्टांवर जर ती जेथे निर्माण होतात तेथेच नीट नियंत्रण ठेवले व ती निर्धोक केली, तर पर्यावरणी प्रदूषणाची गंभीर समस्या बऱ्याच अंशी सोडविली जाऊ शकते.

गामा पैलवान's picture

17 Feb 2021 - 9:12 pm | गामा पैलवान

साहना,

उत्तम लेख आहे. लेखाशी पूर्णपणे सहमत आहे.

दुसरं महायुद्ध झालं त्या काळात ( १९३८ ते १९४५ ) कर्बद्विप्राणिज ( = CO2 ) चं प्रमाण अचानक वाढलं होतं. तरीपण वातावरणाच्या तापमानात फारसा फरक पडला नव्हता.

दुसरी गोष्ट अशी की जे काही ग्लोबल वॉर्मिंग होतंय याविषयीचा पूर्वापार विदानोंदी ( = historic data ) ज्या वेधशाळांतून घेण्यात आल्या त्या पूर्वेस पुण्यापासून पश्चिमेस रेक्येविक (आईसलंड) येथवर विखुरलेल्या आहेत. त्यांत अमेरिकी व अमेझॉनी वेधशालांचा समावेश नाही. त्यामुळे जागतिक तापमानवाढ हा अर्धवट माहितीवर काढलेला निष्कर्ष आहे.

आ.न.,
-गा.पै.

सहना जी. तुमच्या विचारांशी सहमत व्हायला मन तयार होत नाहीये कारण लहानपणापासून बिंबवले गेलेल्या फॅक्ट्स तुमच्या लिखाणाच्या खूप विरुद्ध आहेत.

अर्थातच तुमचे लेखन आवडले. एखाद्या विषयाची दुसरी बाजू तुम्ही नीट उलगडून सांगता. तुमचे हे स्किल वाखाणण्याजोगे आहे.

जलीय प्रदूषण : पृथ्वीवर सु. १·४ X १०२१ लिटर इतके मुबलक पाणी आहे विद्यमान लोकसंख्येप्रमाणे त्याची दरडोई वाटणी केली, तर प्रत्येक माणसाला ४२,००० कोटी लिटर पाणी मिळू शकेल. ह्या पाण्याचा अतिशय मोठा भाग महासागरात सामाविलेला आहे. त्यात विविध प्रकारची लवणे व रसायने मोठ्या प्रमाणात विरघळलेली असतात. दैनंदिन उपयुक्ततेच्या दृष्टीने हे खारे पाणी जसेच्या तसे घेऊन वापरण्याजोगे नसते. त्या पाण्यावर काही प्रक्रिया करून त्यात विरघळलेली लवणे काढून टाकून ते पाणी गोडे करून वापरात आणणे शक्य असते पण अशा निर्लवणीकरणाला फार खर्च येतो. औद्योगिक कामासाठी असे गोडे करून घेतलेले पाणी वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे नैसर्गिक रीत्या उपलब्ध असलेले गोडे पाणीच मोठ्या प्रमाणावर वापरतात. कारखान्यांतून बाहेर पडणारे पाणी प्रदूषित असते. ते नद्यांत सोडले जाते किंवा समुद्राकडे वळविले जाते. कारखान्यांतून बाहेर पडणारे दूषित पाणी एका ठिकाणी साठवून काही प्रक्रियांनी शुद्ध केल्यानंतर ते पुन्हा वापरात आणण्याच्या शक्यतेचा क्वचितच विचार केला जातो [⟶ पाणीपुरवठा]. ज्यामुळे प्रदूषित पाण्याचे व जलीय दूषितीकरणाचे प्रमाण एकसारखे वाढत जाते व गोड्या पाण्याचे साठे हळूहळू संपुष्टात येऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.

नद्यांच्या काठांवर आणि सागरी किनाऱ्यांवर अनेक औद्योगिक प्रकल्प व मोठी शहरे वसली आहेत. लक्षावधी लोक शहरांत राहतात. शहरवासीयांनी विसर्जित केलेली घाण, गटारातील पाणी, कचरा, वाहितमल आणि औद्योगिक प्रकल्पाच्या विविध प्रक्रियांतून उत्सर्जित होणाऱ्या त्याज्य वस्तू, निरुपयोगी द्रव्ये व किरणोत्सर्गी पदार्थांचे कण विहिरींत, नद्यांत, नाल्यांत, सरोवरांत अथवा महासागरांत सोडलेजातात. त्यामुळे सर्व जलाशयांचे पाणी प्रदूषित होते. पिकांच्या संरक्षणासाठी डीडीटीसारखी कीटकनाशके व इतर कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारी) वा जंतुविनाशक रसायने जमिनीवर टाकण्यात येतात अथाव पिकांवर फवारण्यात येतात. त्यामुळे मृत्तिकावरण (जमिनीने व्यापलेली क्षेत्रे) प्रदूषित होते. पाऊस पडला की, हे सर्व विषारी पदार्थ शेवटी जलाशयांत जाऊन मिसळतात. भूमिगत पाण्याच्या साठ्यांपर्यंतही क्रमाक्रमाने हे पदार्थ जाऊन पोहोचतात. ॲस्बेस्टस, बेरिलियम व शिसे यांचे अतिसूक्ष्म कण, वालुकाकण, धूलिकण, धूम्रकण, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड इत्यादींसारखी वातावरणातील प्रदूषकेही पावसाबरोबर जमिनीवर येतात व अनेक जलमार्गांद्वारे शेवटी महासागरांत पोहोचतात. जलीय परिसरात वाढणाऱ्या वनस्पतींच्या कणाकणांत व कोशिकांत (पेशींत) ती सामावली जातात. अशा रीतीने भूमिगत जलप्रवाहांसहित संपूर्ण जलावरण प्रदूषित होते. अनंत प्रकारचे मासे महासागरांच्या किनारपट्टीजवळ वाढत असतात. ह्याच क्षेत्रात वनस्पतिप्लवकांसारखे (पाण्यावर तरंगणाऱ्या सूक्ष्म वनस्पतींसारखे) सूक्ष्मजीव मानवांना व मानवेतर प्राण्यांना श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. ह्या सागरी विभागात विषारी प्रदूषके मिसळल्यास प्रचंड प्रमाणावर माशांचा व वनस्पतिप्लवकांचा संहार होतो. मानवांचे अन्न प्रदूषित व विषमय होते आणि ऑक्सिजनाच्या निर्मितीत घट होते. शहरवासीयांनी उत्सर्जित केलेली घाण व सांडपाणी यांची नीट विल्हेवाट लावली नाही, तर सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.

गणेशा's picture

17 Feb 2021 - 11:48 pm | गणेशा

लेख आणि मते आवडली ...

लिंक आणि प्रतिसाद वाचत राहिल

वनांचे कार्य व उपयुक्तता: वने ही केवळ मानवी जीवनात समृद्धीची व संपत्तिनिर्मितीची साधनेच नव्हते. वनांचे याहून महत्त्वाचे कार्य म्हणजे वने निसर्गाचा समतोल राखून मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देतात. जेथे वनांचा प्रचंड प्रमाणावर विध्वंस झाला, त्या प्रदेशात वाळवंटे व दुष्काळ निर्माण होऊन तेथील संस्कृतीच नष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात.

वनांमुळे स्थानिक जलवायुमानावर निश्चित परिणाम होतो. उन्हाळ्यात वनाच्छादित प्रदेश सापेक्षतेने थंड व शीतकाळात सापेक्षतेने उबदार असतात. वनातील झाडांची दाटी, तेथील झाडांच्या पानांची रचना यांनुसार कमीअधिक प्रमाणात हा फरक घडतो. वनप्रदेशातील जमिनीचे दिवसा सूर्याच्या उष्णतेपासून रक्षण होते. रात्रीच्या वेळी झाडांच्या आच्छादनामुळे ही जमीन उघड्या माळावरील जमिनीप्रमाणे लवकर थंड होत नाही. त्यामुळे वनप्रदेशात हवेचे व जमिनीचे महत्तम तापमान उघड्या भूभागापेक्षा कमी व किमान तापमान उघड्या जमिनीपेक्षा जास्त असते, असे प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे. एकंदरीत वनांमुळे तापमानाची शीत व उष्ण या दोन्ही टोकांकडील प्रखरता कमी होते आणि स्थानिक जलवायुमान सम होण्याकडे प्रवृत्ती असते.

वनांमुळे पावसाचे प्रमाण वाढते की निर्वनीकरण केलेल्या प्रदेशात ते कमी होते याचे नक्की उत्तर शोधण्यासाठी वातावरण-वैज्ञानिकांनी बरेच प्रयोग केले आहेत. याबाबत आतापर्यंतचे निष्कर्ष असे आहेत की, चक्रावती पाऊस मुख्यतः वातावरणीय घटकांवर अवलंबून असतो व तो वनांमुळे अथवा वनांच्या अभावामुळे प्रभावित होत नाही, तथापि वनाच्छादित प्रदेशात प्रवाही ढगांच्या मार्गात अडथळा येतो, तेथील वृक्षमाथ्यांच्या असमतोल पृष्ठभागामुळे ढगांवर गतिकीय परिणाम होतो व ढगांच्या प्रवाहांची उंची वाढून संद्रवण सुलभ होते म्हणून आसपासच्या वनरहित प्रदेशापेक्षा येथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. या फरकाचे प्रमाण अल्प असले, तरी अवर्षण क्षेत्रात ते महत्त्वाचे ठरू शकते. तापमान व पाऊस यांप्रमाणेच हवेतील आर्द्रतेवरही वनांचा प्रभाव असतो. वनरहित प्रदेशापेक्षा वनाच्छादित क्षेत्रात हवेची निरपेक्ष तसेच सापेक्ष आर्द्रता जास्त असते तसेच वनक्षेत्रातील जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन तेथील आच्छादनामुळे कमी होते. अशा रीतीने वनरहित प्रदेशापेक्षा वनप्रदेशात एकूणच हवेतील व जमिनीतील ओलावा जास्त असतो.

वनप्रदेशातील झाडीमुळे त्या प्रदेशात वाहाणाऱ्या वाऱ्यावरही वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होत असतो. झाडी दाट असेल, तर वाऱ्याचा वेग वनप्रदेशात एकदम १० ते ६०% कमी होतो. जोरदार वाऱ्यांपासून वनप्रदेशाच्या आड असणाऱ्या शेतीच्या पिकांना अशा रीतीने उत्तम संरक्षण मिळते. तसेच सततच्या वाऱ्यामुळे मातीचे कण हवेत उडून धुळीच्या वावटळी उठणे व जमिनीची धूप होणे या क्रिया झाडी असलेल्या वनप्रदेशांमुळे रोखल्या जातात. विशेषतः उष्ण व कोरड्या हवेच्या प्रदेशात वनांच्या या उपयोगितेला फार महत्त्व आहे. तुफाने व चक्री वादळे यांपासून वनांमुळे परिणामकारक संरक्षण मिळते.

पर्यावरणावर होणाऱ्या वनांच्या उपकारक परिणामांत जलनियमनाला सर्वांत महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. झाडी असलेल्या भूभागावर पडणाऱ्या पावसाचे पाणी हे एकदम जमिनीवर न पडता झाडांच्या पानांवर, डहाळ्यांवर, फांद्यांवर, खोडावर मग भूपृष्ठावर अशा क्रमाने खाली उतरत जाते. त्यानंतर हे पाणी हळूहळू जमिनीत मुरते. मुळे पाणी शोषून घेतात. या सर्वांमुळे पाण्याचा वेग नियंत्रित होतो. व मृदेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. हे पाणी यथावकाश जमिनीच्या सच्छिद्र वाटांद्वारे संथ व स्वच्छ झऱ्यांच्या व ओहोळांच्या रूपाने जमिनीच्या बाहेर पडते व ते प्रदीर्घ काळ टिकण्याची शक्यता असते. याउलट वनाच्छादन नसलेल्या जमिनीवर पडणाऱ्या वृष्टीचे पाणी विनाविलंब भूपृष्ठीवरून वाहू लागते व त्या ओघात तेथे असणारी मृदाही पाण्याबरोबर वाहून जाते. म्हणून पाणलोट क्षेत्रात सुस्थितीतील वने नसली, तर जोराच्या पावसामुळे मृदेचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर होते व मूळ ठिकाणाची झपाट्याने धूप होते. भारतात दरवर्षी सु. ५०० कोटी टन मृदा अशा तऱ्हेने वाहून जाते. पावसाळ्यात नदीनाल्यांना गढूळ पाण्याचे भयानक पूर येण्याचे व त्यापासून होणाऱ्या जीवित व वित्तहानीचे कारण मुख्यतः पाणलोट क्षेत्रातील वनांचा विध्वंस अथवा संपूर्ण अभाव हेच असते. मृदा मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने जलविद्युत् व सिंचन प्रकल्पांतर्गंत प्रचंड गुंतवणूक करून तयार केलेल्या जलाशयात अवाजवी गाळ साठून तेथील पाणी साठविण्याची क्षमता झपाट्याने कमी होते. असे धरणातील पाण्याचा साठा कमी होण्याचे प्रकार जगात अनेक ठिकाणी घडत आहेत. यावर पाणलोट क्षेत्रात वने राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

निसर्गनिर्मित अनेक वनस्पती व प्राणी यांचे अस्तित्व केवळ वनांवरच अवलंबून असते आणि अशा वनस्पती, पशुपक्षी, कीटक व जिवाणू यांचे आश्रयस्थान म्हणून वने अतिशय महत्त्वाची आहेत. वनांचा विध्वंस होऊन त्यांचे नैसर्गिक निवासस्थान नाहीसे झाल्यामुळे अनेक वन्य पशुपाक्ष्यांच्या जाती भूतलावरून निर्वंश झालेल्या आहेत. योग्य संरक्षण असणाऱ्या वनांत वनस्पती, प्राणी इत्यादींना आश्रय व निवारा तर मिळतो

अर्धवटराव's picture

18 Feb 2021 - 3:41 am | अर्धवटराव

राजकारणी, धर्मकारणी, व्यापारी वगैरे मंडळींनी गोंधळ निर्माण करावा हे समजु शकतं. पण विज्ञानाने देखील असेच धरसोड निकाल दिले तर आमच्यासारख्या जनसामान्यांची किती पंचाईत होते.
मग आता कोणाकडे बघावं ?? :(

मुक्त विहारि's picture

18 Feb 2021 - 9:48 am | मुक्त विहारि

जगांत सर्वज्ञ अशी ती एकमेव व्यक्ती असते .....

आणि

बायको जवळपास नसेल तर, छानसा सिनेमा बघावा....

तेही शक्य नसेल तर, आकाशातील तारे मोजत रहायचे....

इतरांनी तोडलेले अकलेचे तारे मोजण्यापेक्षा, आकाशातील तारे मोजणे, सहज शक्य आहे, असे आमचे, बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात....

हा प्रतिसाद अजिबात मनावर आणि वैयक्तिक घेऊ नये.

पिनाक's picture

18 Feb 2021 - 9:51 am | पिनाक

कारण climatology हे परिपूर्ण विज्ञान नाही. आपले अंदाज सतत चुकतात कारण त्यात फार जास्त variables आहेत. तरीही वैश्विक उष्मीकरण होत नाही या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. लॉजिक च्या पट्टीवर ते बसत नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे जगात सगळीकडेच वादळे आणि चक्रीवादळे फार जास्त संख्येने धडकू लागली आहेत. अरबी समुद्रात या पूर्वी चक्रीवादळ आले होते? आठवत तरी नाही. निदान भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण फार जास्त वाढले आहे. ही दोन निरीक्षणे वैश्विक उष्मीकरणाचा सरळ परिणाम मानता येतील. पण अजून साहनाजींच्या सगळ्या लिंक्स मधून जायला वेळ मिळाला नाही. शिवाय विरोधी मते, अगदी सांख्यिकी माहितीसह सुद्धा आहेतच.

मुक्त विहारि's picture

18 Feb 2021 - 10:14 am | मुक्त विहारि

कोकणातील हवामान, हळूहळू बदलत आहे...

थंडीचा कालावधी आणि तापमान, हळूहळू कमी होत आहे.

आंब्याला मोहोर, पुर्वी इतका धरत नाही...

डिसेंबर ते जून, ह्या कालावधीत, पाऊस पडत नव्हता, हल्ली तो दर काही वर्षांनी पडतो किंवा वातावरण तरी ढगाळ राहते...

हवामानातील बदल हे अतिसुक्ष्म प्रमाणात आणि Butterfly Effect नुसार चालत असल्याने, आत्ताच कुठल्याही प्रकारचे ठाम निर्णय घेता येत नाहीत...किंवा ठोस असा अंदाज पण सांगता येत नाही ....

त्यामुळे, दोन्ही बाजूंना समजून घेणे भाग पडते....

विल स्मिथ होस्ट होता. त्यात बर्‍याचश्या पर्यावरण संबंधी बाबी होत्या. एक दावा असा होता कि एमेझॉनची जंगलं जितका प्राणवायु निर्माण करतात तितकाच शोषुन घेतात. त्यामुळे ते जगाचं फुफ्फुस वगैरे काहि नाहि. तेन ताड उडालोच हे ऐकुन. शिवाय म्हणे कि प्राणवायुचं प्रमाण कुठल्याही परिस्थितीत मेण्टेन राहातं, आणि त्यामागे काय सिस्टीम काम करते हे अजुन तरी समजलं नाहि. हे ही माझ्यासाठी नवीन होतं.

हरितद्रव्याधारीत सजीव (म्हणजेच वनस्पती) सोडल्यास प्राणवायुचा सोर्स काय पृथ्वीवर ? हवेतल्या इतर वायुंचे डिकंपोझीशन होतं काय ? म्हणजे सी-ओ-टु मधुन कार्बन वेगळा होणे, वाफेतुन हायड्रोजन वेगळा होणे वगैरे...

झाडं केवळ प्राणवायु देतात म्हणुन नाहि, पण एकुणच इको-सिस्टीम मधे झाडांचं महत्व अनन्य साधाराण आहे. त्यामुळे झाडं वाचवलीच पाहिजे. बाकी पर्यावरण रक्षण मोहिमेसाठी ग्रेटा बेबींच्या नेतृत्वाची गरज पडत असल्यास त्या मोहीमेत प्रचंड प्रदुषण माजलय हे नक्की. एका अत्यंत महत्वाच्या विषयाचं थिल्लरीकरण झालय/होतय त्यामुळे.

> हरितद्रव्याधारीत सजीव (म्हणजेच वनस्पती) सोडल्यास प्राणवायुचा सोर्स काय पृथ्वीवर ?

नाव घेण्यासारखा काहीच सोर्स नाही. पृथ्वीवर महाभयंकर प्रमाणांत प्राणवायू आहे. किती महाभयंकर प्रमाण आहे ते समजण्यासाठी मी उदाहरण दिले होते कि पृथीवच्या तलावर जो एक एक कार्बन चा ऍटम आहे तो जाळला म्हणजे त्या प्रत्येक कार्बनला आणखी दोन प्राणवायूचे ऍटम जोडले तरी सुद्धा एकूण प्राणवायूचे प्रमाण 20.9 to 20.4 इतकेच कमी होईल म्हणजे कार्बन च्या तुलनेत इतका प्राणवायू हवेंत आहे. पृथ्वीच्या गर्भांत नक्की किती खनिज तेल आहे हे आम्हाला ठाऊक नाही पण तरी सुद्धा बहुतेकांच्या मते ते सर्व जाळले तरी प्राणवायूच्या प्रमाणावर काहीही विशेष फरक पडणार नाही. (इतर दुष्परिणाम असतीलच).

आमच्या हवेंतील प्राणवायू हा कोट्यवधी नाही अब्जावधी वर्षे खर्च करून विविध छोट्या बॅक्टेरियानी निर्माण केला आहे आणि ते सुद्धा एका पेशी पासून पुढे द्वीपेशीय उत्क्रांती होण्याच्या आधी.

> पण एकुणच इको-सिस्टीम मधे झाडांचं महत्व अनन्य साधाराण आहे. त्यामुळे झाडं वाचवलीच पाहिजे.

हो म्हणूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरे.

मी हा लेखन प्रपंच अश्यासाठी केला होता कि "विज्ञान" म्हणून धांदात खोट्या गोष्टी लोकांच्या डोक्यांत घालायचे काम काही यंत्रणा करतात.

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष पहा कसे धांदात खोटे बोलत आहेत : https://twitter.com/EmmanuelMacron/status/1164617008962527232

ते हवामान बदल झाल्यामुळे कसा विनाश घडू शकतो ह्याची छोटी शी छलक आहे.
हवामान बदलामुळे असे घडू शकते असा विचार पण १०, वर्ष पूर्वी कोणी केला नव्हता.
प्रचंड थंडी आणि वीज गायब अशी अवस्था प्रगत टेक्सास ची झाली आहे.
आताच्या काही वर्षात मोठी वादळे येण्याचे प्रमाण वाढले आहे.
पावसाचा लहरी पना वाढला आहे.
अती वृष्टी चे किती तरी प्रसंग घडले आहेत.
तरी मानवी हस्तक्षेप मुळे हवामान वर विपरीत परिणाम होत नाही असे समजणे चुकीचे आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

20 Feb 2021 - 4:46 pm | मार्कस ऑरेलियस

लेख वरवर वाचला. अजिबात म्हणजे अजिबात पटले नाही.

अगदी साधं गणीत आहे: पृथ्वीवरची कोणतीही गोष्ट पृत्वी बाहेर जात नाही, जे आहे ते आपपला रंग रुप स्थिती बदलुन इथेच रहाते.

जे इंधन हजारो वर्षे पृत्वीच्या गर्भात पडुन होते ते पेत्रो केमिकल्स आपण उपसुन गेली किमान १०० एक वर्षे तरी जाळत आहोत, जमीनीत होता तो कार्बन आज जाळुन आपण हवेत पंप केलेला आहे. ह्युमन अ‍ॅक्टिव्हिटीज मुळेच जगाचे वातावरणीय समतोल बिघडत आहे. जेवढा कार्बन डाय ऑक्साईट्द आपण वातावरणात सोडलाय ना तेवढा परत पृय्थ्वीवर आणुन फिक्स करायला किमान १० तरी अ‍ॅमॅझॉन सारखी दाट जंगले उभारावी लागतील.

ती ग्रेटा थेनबर्ग बावळट , मुर्ख अन मतिमंद आहे, शिवाय लहान असल्याने स्पष्ट शब्दात भावनाही व्यक्त करता येत नाहीत तिच्या त्या मुर्खपणाबद्दल :(
पण असे असले तरीही विषय गंभीर आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज अ फ्यॅक्ट अन्ड युवर डिनायल इज नॉट गोईन्ग टू अल्टर इत.

बाकी पृथ्वीचे तापमान कमी जास्त होत असते हे विधान मान्य आहे अगदी सुरुवातीला हजार च्या वर होते ते हिमयुगात उणे ४० पर्यन्त गेले , हे होत रहाणार हे मान्य पण एक लक्षात घ्या कि तेव्हा मानप्रजाती नव्हती. ह्या तापमान वाढीत अन घसरणीत मानव प्रजाती नष्ट झाली तरी हरकत नाही असे म्हणत असाल तर मान्य आहे . =))))

सामील झाली.
हवामान बदल हे थोतांड नसून खरी स्थिती आहे.
वाढते industrialization मुळे पृथ्वी चे वातावरण धोक्यात आले आहे.
झाडे ही वातावरणातील वायूंचे योग्य प्रमाण राखण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत.
त्याच बरोबर झाडं मुळे जमिनीची धूप थांबते ,पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास झाडे खूप महत्वाची भूमिका पार पाडतात.
कार्बन उत्सर्जन नाही थांबवले तर मनुष्य सहित पृथ्वी वरील जीव सृष्टी नष्ट होईल ही अतीशोक्ती नाही तर सत्य आहे.

मराठी कथालेखक's picture

21 Feb 2021 - 4:27 pm | मराठी कथालेखक

एखादे झाड पूर्ण वाढले म्हणजे त्याची वाढ थांबली तर त्याचाच अर्थ असा होतो कि हवेंतून c02 शोषून घेण्याची त्याची क्षमता शून्य झाली.

मुद्दा रंजक असला तरी याबद्दल शंका वाटते. झाड कितीही जुने झाले तरी वार्षिक वलय वाढतंच जातात हे मला आतापर्यंत माहीत होते. मग ही वार्षिक वलये म्हणजे झाडाची वाढंच ना ? म्हणजेच झाडाची वाढ थांबते हे पटत नाही. किंवा वाढ थांबली तर लवकरच ते झाड मरत असेल .. म्हणजे न वाढता केवळ जगत नवीन अन्ननिर्मिती (कार्बोहायड्रेटची निर्मिती) न करता एखादे झाड वर्षानुवर्षे केवळ उभे रहात असेल हे पटत नाही.

वलय वाढले तरी झाड वाढले असा अर्थ होत नाही. शेवटी महत्व आहे ते एकूण घनफळाला. पडलेले प्रत्येक पान, फांदी झाडाचे घनफळ कमी करते. त्याशिवाय मोठे झाड इतर पशु, पक्षी, प्राणी, बॅक्टेरिया, फंगस ह्यांना आश्रय देते. शेवटी संपूर्ण जंगल कार्बन पॉसिटीव्ह आहे कि नाही ते मॅटर करते.

मराठी कथालेखक's picture

22 Feb 2021 - 9:21 pm | मराठी कथालेखक

शेवटी संपूर्ण जंगल कार्बन पॉसिटीव्ह आहे कि नाही ते मॅटर करते.

बरोबर आहे. पण अ‍ॅमेझॉन वा तत्सम मोठे जंगल कार्बन पॉजिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे सिद्ध झालेले आहे का ?
शिवाय झाडे वाढल्याने पशु पक्षी वाढल्याने कार्बन उत्सर्जन वाढते म्हणून जास्त झाडे नको असे म्हणत असाल तर अप्रत्यक्षरित्या पशु पक्षांची संख्या नियंत्रित असावी असेच तुम्ही सुचवत आहात का ?

झाडे नकोत असे लेखांत कुठेही म्हटलेले नाही किंवा अभिप्रेत सुद्धा नाही. झाडे आम्हाला प्राणवायू देतात, ती नसतील तर जगांतील प्राणवायू कमी होईल ह्या मिथकाचे खंडन करण्यासाठी लेख आहे. झाडांचे अनेक फायदे आणि उपयुक्तता आहे ज्याचा उहापोह ह्या लेखांत नाही केला.

> अ‍ॅमेझॉन वा तत्सम मोठे जंगल कार्बन पॉजिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे सिद्ध झालेले आहे का ?

होय.

https://www.sciencealert.com/african-forests-and-the-amazon-are-flipping...
https://www.cbc.ca/news/canada/calgary/canada-forests-carbon-sink-or-sou...

मराठी कथालेखक's picture

23 Feb 2021 - 7:04 pm | मराठी कथालेखक

तुम्ही दिलेल्या पहिल्या लिंकवर असं म्हंटलंय

Their paper, published in the journal Nature, estimated that the carbon sink capacity of the African forests studied will decline 14 percent by 2030.

In the Amazon, the forest's carbon sink capacity is predicted to reach zero by 2035.

कंजूस's picture

22 Feb 2021 - 9:57 am | कंजूस

झाडं लावायची का नाही?

मुक्त विहारि's picture

22 Feb 2021 - 11:49 am | मुक्त विहारि

झाडांसारखा मित्र नाही...

Rajesh188's picture

22 Feb 2021 - 12:59 pm | Rajesh188

जेव्हा कडक उन्हाळा असतो किंवा खूप थंडी असते झाडांना जमिनी मधून पाणी आणि इतर पोषक द्रव्य चे शोषण करता येत नाही तेव्हा झाडे photosynthesis ची प्रक्रिया थांबवता त.
तेव्हा झाडाची पान गळती होते .
त्या स्थिती ल लेखिका झाडाची वाढ थांबली असे समजत असावी.
पण परत योग्य वातावरण निर्माण झाले की पालवी फुटते आणि परत झाड अन्न निर्मिती करत.
आणि हे पक्क लक्षात असणे गरजेचे आहे.
विविध प्रकारच्या बुरशी,bacteria, अनेक सुष्म जीव हे पृथ्वी वर जीवन टिकवण्यात महत्वाची भूमिका निभावतात
त्यांचे अस्तित्व नसेल मानवाचे आणि बाकी जीव सृष्टी चे पण अस्तित्व नसेल

हे bacteria, व्हायरस,विविध कीटक,पृथ्वी च्या वातावरण मधील वायू चे योग्य प्रमाण,
सुर्य च्या प्रकाशातील विविध किरण,पृथ्वी चे चुंबकीय क्षेत्र,सागराच्या पाण्याच्या विविध प्रवाहचे योग्य तापमान,
आणि अशा माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या विविध घटकांवर ह्या पृथ्वी वर माणूस आणि इतर जीव सृष्टी राहील की नाही हे अवलंबून आहे.
मानवाला अजुन ह्या जीवसृष्टी ची अत्यंत अल्प माहिती आहे.
त्या माहिती चे प्रमाण minus मध्ये आहे.
हे जे खरोखर बुद्धिमान आहेत त्यांना त्याची जाणीव आहे.त्या मुळे खरे संशोधक कधीच अकल्पित दावे करत नाहीत.
ज्यांना ना पूर्ण माहिती ना अपूर्ण माहीत असेच
काही पण माहिती देत असतात.