चार्ज ड

Primary tabs

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
8 Dec 2020 - 12:58 pm

"गुड मॉर्निंग"
चाळीशी चे वर्क फ्रॉम होम ६ फुटांवरून
गुड मॉर्निंग
"काय कसे काय"
Ok, nothing great, nothing bad either
"सर, एक प्रश्न विचारू"
माझ्या होकाराची वाट न बघता
"तुम्ही तुमचा मोबाईल १०० percent चार्ज व्हायची वाट बघता का"?
नाही. तसा कधी जास्त विचार केला नाही. तुमचे काय?
"सॉकेट आणि चार्जर ची कायम ची दोस्ती. सर्कस च होते.
कायम चार्ज वरून असुरक्षित वाटत राहते."
हो का? बर बर. सद्य स्थितीत माझा पण वापर जास्त आहे. पण १०० टक्के असावा असा आग्रह नसतो. मध्ये ब्रेक घेतला की जमून जाते. आणि असे आहे की मोबाईल जुना होतो तशी बॅटरी उतरते, बॅटरी उतरली की शेवटचे १०टक्के चार्ज व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ७५ते ८०टक्के वर म्यानेज करायची सवय झाली आहे.
"अरे व्वा, चांगले आहे की. तुम्ही कुठला मोबाईल वापरता"?
मोबाईल ब्रँड चे काही विशेष नाही. पण बॅटरी मात्र खास आहे.
"कुठली कुठली"?
मास्टर्स अँड जॉन्सन ची बॅटरी आहे. वाकासू ह्या ट्रेड नेम ने मिळते.
"सविस्तर सांगा ही सर, तुम्ही काय म्हणत आहात ते कळले नाही"
आता नको वेळ लागेल. माझी ५००० पावले पूर्ण झाली आहेत.
फोन करा. विस्कटून सांगतो.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

रूपक आहे वाटतं.

रूपक आहे वाटतं.

कंजूस's picture

8 Dec 2020 - 3:39 pm | कंजूस

चुकून चार झाले.

त्याचू वैलपान's picture

8 Dec 2020 - 4:09 pm | त्याचू वैलपान

चुकून चार झाले.

तुमचा मोबाईल जरा जास्तच "चार"ज झाला काय? :)

त्याचू वैलपान's picture

8 Dec 2020 - 4:07 pm | त्याचू वैलपान

अगदीच बाळबोध क्रिप्टीक. शेंबडं पोरगंही ओळखेल कशाबद्दल लिहीलं आहे. पुमिराना असे म्हणावेसे वाटते. :)